Wednesday 27 April 2022

काही समानार्थी म्हणी

📔आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा
 
📒आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
 
📕कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले
 
📗साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच
 
📘कामा पुरता मामा - ताकापुरती आजी
 
📙काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
 
📓करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी
 
📔खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे
 
📒खाण तशी माती - बाप तसा बेटा
 
📕आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू
 
📗गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून
 
📘काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे
 
📙घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच
 
📓चोरावर मोर - शेरास सव्वाशेर
 
📔जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम
 
📒पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या
 
📕नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस
 
📗नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा
 
📘बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला
 
📙पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
 
📓वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला
 
📕वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण   

--------------------------------------------------------------
              ‼️   मायबोली मराठी   ‼️
--------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...