Wednesday 27 April 2022

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी 'स्माईल' कर्ज योजना


◆ कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अनुसूचित जातीच्या व्यक्तीच्या कुटुंबीयांचे व्यवसाय उभारून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाव्दारे स्माईल कर्ज योजना राबविण्यात येत आहे.

◆ इच्छुकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन महामंडळाव्दारे करण्यात आले आहे.

◆ या योजनेंतर्गत एक ते पाच लक्ष रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध केले जाणार असून, एनएसएफडीसी सहभाग 80 टक्के,
भांडवल अनुदान २० टक्के तर सहा टक्के व्याजदर व परतफेडीचा कालावधी सहा वर्षे असा राहणार आहे.

◆ या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढीलप्रमाणे पात्रता व कागदपत्रे आवश्यक राहील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार अनुसूचित जातीतील असावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपर्यंत असावे, अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य असावा ( कुटुंबप्रमुखांच्या रेशनकार्डवर सदर सदस्यांचे नाव असणे बंधनकारक), मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा 18 ते 60 या दरम्यान असावी. मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

◆ योजनेंतर्गत कर्जाचा लाभ घेण्यासाठी मयत व्यक्तीचे नाव व पत्ता, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला (तीन लक्ष पर्यंत), कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, रेशन कार्ड. वयाचा पुरावा आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...