Wednesday 27 April 2022

भारतीय बेटे

भारतीय बेटे
भारतीय बेटे
भारतीय बेटे

मुख्य भूमीपासून अलग असलेली बेटे ही देशाच्या प्राकृतिक रचनेचाच एक भाग आहेत.
अ) अरबी समुद्रातील बेटे (लक्षद्वीप, मिनिकॉय व अमिनीदिवी बेटे)
लक्षद्वीप, मिनिकॉय व अमिनीदिवी बेटे ही प्रवाळांच्या संचयनातून निर्माण झालेली बेटे आहेत. लक्षद्वीप, मालदीव व छागोस द्वीपसमूह ही अरबी समुद्रातील बेटे म्हणजे जलमग्न पर्वतीय रांगेचे अतिउत्तरेकडील भाग आहेत. 'लक्षद्वीप' याचा शब्दशः अर्थ ‘एक लाख बेटे' असा असला तरी प्रत्यक्षात अरबी समुद्रातील या द्वीपसमूहात केवळ ३६ बेटांचा किंवा शैलभित्तीचा समूह आढळतो.
अरबी समुद्रात ज्वालामुखी पर्वतांच्या शिखरांभोवती कीटकांच्या संचयनामुळे निर्मिती झालेल्या बेटांना प्रवाळ बेटे म्हणतात. लक्षद्वीप बेटे ही या बेटांचाच भाग असल्याने ती ज्वालामुखी निर्मित बेटे आहेत, असे मानले जाते. येथे डोंगर अथवा नदी आढळत नाही. लक्षद्वीप बेटसमूहात मिनीकॉय, कावरती, लखदीव, अमिनी, किलतान, कादमत इत्यादी बेटांचा समावेश होतो. लक्षद्वीप बेटांचे क्षेत्रफळ ३२ चौ. किमी असून तो भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे.
लक्षद्वीपमधील एकमेव विमानतळ ‘अगाती विमानतळ' हा मुख्यभूमीवर केरळमधील कोची या शहरास जोडला गेला आहे. लक्षद्वीप परिसरात स्कूबा डायव्हिंग, विंडसर्किंग, वॉटरस्किइंग इत्यादी जलक्रीडांच्या माध्यमातून हा परिसर पर्यटकांचे आकर्षणस्थान बनविण्यात आला आहे. कॅनेनोर बेटे व अमीनीदिवी बेटे ही लक्षद्वीप बेटांचेच भाग आहेत.
ब) बंगालच्या उपसागरातील बेटे (अंदमान-निकोबार बेटे)
बंगालच्या उपसागरातील बेटे ही समुद्रात बुडालेल्या 'आव्हाकानयोमा' या पर्वताची शिखरे आहेत. उदा. अंदमान आणि निकोबार बेटसमूह (जगातील सर्वांत मोठा बेटसमूह) ।
अंदमान-निकोबार बेटसमूहात ५७२ बेटे असून यापैकी ३४ बेटांवर मानवी वस्ती आहे. - अंदमान बेटसमूहात लहानमोठी सुमारे ३०४ बेटे आहेत तर निकोबार बेटसमूहात सुमारे २२ बेटे आढळतात. (काही संदर्भ ग्रंथांत अंदमान बेटसमूहात २०३ बेट तर निकोबार बेटसमूहात १९ बेटे असा उल्लेख आढळतो.) अंदमान बेटे निकोबार बेटांपासून १०° चॅनेल'द्वारा विभागली गेली आहेत.
अंदमान बेटाचे मोठे अंदमान व लहान अंदमान असे दोन भाग आहेत. मोठे अंदमानचे उत्तर, मध्य व दक्षिण अंदमान असे भाग आहेत.
दहा अक्षांश खाडीच्या दक्षिणेकडील निकोबार हा २२ बेटांचा समूह असून त्यातील १० बेटांवर मानवी वस्ती आहे. अंदमान-निकोबारची राजधानी असलेले पोर्ट ब्लेअर मुख्य भूमीशी चेन्नई, विशाखापट्टणम व कोलकाता या शहरांना जोडलेले आहे.
अंदमान-निकोबारमधील पोर्ट ब्लेअर येथे 'वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ' हा एकमेव विमानतळ आहे. अंदमान-निकोबारमध्ये लक्षद्वीपच्या तुलनेत पर्यटन क्षेत्र पोर्ट ब्लेअर व त्याच्या जवळच्या काही बेटांपुरतेच मर्यादित आहे, कारण या बेटसमूहातील कमी होत चाललेल्या आदिवासी जमातींना संरक्षण देणे हे सरकारने मुख्य ध्येय मानले आहे. अंदमान बेटसमूहात प्रवाळ बेटे आढळत नाहीत.
भारतातील अन्य बेटे :
भारतात समुद्रातील सुमारे १३८२ बेटे आहेत. (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्स, २२ सप्टेंबर २०१६) .
बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर 'अवसादी बेटे' आहेत.
कच्छच्या आखातात झालरीसदृश्य प्रवाळांच्या शैलभित्तींच्या स्वरूपातील बेटे आहेत.
कोकण व मलबार किनाऱ्यालगत छोटी बेटे आढळतात.
न्यू-मुरे : हे बंगालच्या उपसागरातील बेट (हरिभंगा नदीलगत) भारताच्या मालकीचे आहे. या बेटावरून भारत व बांगला देश या राष्ट्रांमध्ये वाद सुरू आहे.
Barrier Island : आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर वाळूच्या संचयनाने श्रीहरिकोटा हे Barrier Island तयार झाले आहे.

____________________________

भारतीय बेटे (Indian Islands) : Mpsc Notes

भारतीय बेटे (Indian Islands)

भारतीय बेटे (Indian Islands)

– भारतीय सागरी बेटात एकूण ५९९ बेटे आहेत, यापैकी अंदमान आणि निकोबार बेटसमूहात ५७२ बेटे आहेत तर लक्षद्वीप बेटसमूहात २७ बेटे आहेत. -देशाच्या मुख्य भूमीपासून ही बेटे वेगळी असली तरी ती देशाच्या प्राकृतिक रचनेचा एक भाग आहे. समुद्रातील स्थानानुसार भारतीय बेटांची विभागणी अरबी समुद्रातील बेटे व बंगालच्या उपसागरातील बेटे अशी केली जाते.

१) अरबी समुद्रातील बेटेलक्षद्वीप बेट समूह

– अरबी समुद्रातील ज्वालामुखी पर्वताच्या शिखराभोवती प्रवाळ कीटकांचे संचयन होऊन या बेटाची निर्मिती झाली .म्हणून याना प्रवाळ बेटे असे म्हणतात .


– लक्षद्वीप बेटसमूहात फक्त २७ बेटे आहेत. त्यापैकी फक्त ११ बेटांवर मनुष्य वस्ती आहे.

– ही बेटे ८” उत्तर अक्षवृत्त ते १२२१’ उत्तर अक्षवृत्त आणि ७१ ४५’ पूर्व रेखावृत्त ते ७४ रेखावृत्त दरम्याण आहे

– बेटांचा क्षेत्रफळ फक्त ३२ चौ.कि.मी. आहे. केरळ मधिल कालिकत पासून लक्षद्वीप बेट फक्त १०९ कि.मी.अंतरावर आहे.

– या बेटसमूहात उत्तरेस अमिनदीत बेट, मध्यभागी लखदीव बेट तर दक्षिणेस मिनीकॉय ही बेटे आहेत. १९७३ साली लखदीव, अमिनदीव, मिनीकॉय बेटसमूहाचे नाव लक्षद्वीप असे ठेवण्यात आले.

– ११” उत्तर अक्षवृतताच्या उत्तरेकडे अमिनदिवी बेटे, या अक्षवृतताच्या दक्षिणेकडे कन्नोर बेटे, तर अति दक्षिणेकडे मिनिकॉय बेटे आहेत.

– लक्षद्वीप बेटे ८ खाडीमुळे (8°chanmel) मालदीव बेटापासून अलग झालेली आहे.

– लक्षद्वीप या प्रवाळ बेटात = १२ प्रवाळभित्ती ( Atolls) ,३ अनुतट प्रवाली (Fringing reef),निम्मजन वाळू किनारे (Submerged bunks)

– लक्षद्वीप बेटात मिनिकॉय बेट सर्वात मोठे असून त्याचे क्षेत्रफळ ४.५३ चौ.कि.मी. आहे. तर सर्वात छोटे बित्रा बेट आहे.

– लक्षद्वीप बेटांची उंची समुद्रसपाटीपासून ५ मीटरपेक्षा कमी आहे. या बेटावर पर्वतश्रेणी किंवा नदी नाही. पृथ्वीचे तापमान सतत वाढत असल्यामुळे, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून पुढील सुमारे ५० ते १०० वर्षाच्या कालावधीत लक्षद्वीप बेटे पाण्याखाली बुडतील असा अंदाज राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्थेने व्यक्त केला आहे.

– अनुतट प्रणाली (Fringing Reef) : खंडाच्या किनाऱ्याला लागून समुद्रभागात या प्रकारचे प्रवाळ खडक आढळतात, यांना अनुतट प्रणाली म्हणतात. – प्रणालभित्ती / वलयाकार प्रवाळ खडक (Atols) : समुद्राच्या तळभागावर समुद्रातील प्रवाळ कीटकांच्या अवशिष्ट भागापासून वलायाकार प्रवाळ खडकांची निर्मित होते. यांचा आकार पसरट बशीसारखा असतो.

२) बंगालच्या उपसागरातील बेटे (अंदमान व निकोबार बेटे)

– ही बेटे प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने अराकन योमा/राखीन योमा या समुद्रात बुडालेल्या पर्वतरांगांची पाण्यावर दिसणारी शिखरे आहेत, या बेट समुहांचे दोन गट रिची द्वीपसमूह (Ritchic’s Archipelago) आणि लॅबिरिंथ बेटे (Labyrinth Islands)

– याचा अक्षांश विसतार ६ ४५’ उत्तर अक्षवृत्त ते १३.४५’ उत्तर अक्षवृत्त आणि रेखांश विस्तार ९२ १० पूर्व रेखावृत्त ते ९४१५’ पूर्व रेखावृत्त आहे.

– अंदमान आणि निकोबार बेट समूह ऐकमेकापासून १० खाडी पासून अलग झालेले आहेत.

– एकूण क्षेत्रफळ ८२४९ ची.कि.मी. आहे, एकूण बेटांची संख्या ५७२ आहे; फक्त ३८ बेटावर मानवी वस्ती आहे. भारताच्या मुख्यभूमीषासून अंतर, कोलकत्यापासून १२५५, कि.मी. तर चेन्नाईपासून ११९० कि.मी. आहे.

– अंदमान बेटसमूह : याचे क्षेत्रफळ सुमारे ६५९६ चौ.कि.मी. अंदमान बेटसमूहाची पुढील गटात विभागणी केली जाते.

१) मोठे अंदमान

२) छोटे अंदमान

– मोठे अंदमान समुहात – उत्तर अंदमान, मध्य अंदमान, दक्षिण अंदमान बाराटांग, रटलॅंड हे बेटे आहेत. उत्तर अंदमान बेटेत अंदमान निकोबार बेट समूहातील सर्वात उंच शिखर सँडल शिखर आहे.

– पोर्ट ब्लेअर Port Blair राजधानी दक्षिण अंदमान वर आहे.

– मोठे अंदमान आणि छोटे अंदमान दरम्यान डकन मार्ग आहे. अंदमानापासून पूर्वेकडे ८० कि.मी. अंतरात बरेन आणि नार्कीडम ही दोन ज्वालामुखी बेटे आहे.या बेट समूहामध्ये प्रमुख बाळूचा खडक, चुनखडी आणि शेल आहे.

– निकोबार बेटसमूह : एकूण क्षेत्रफळ १६५३ चौ.कि.मी.

– निकोबार बेटे प्रामुख्याने प्रवाळ खडकापासून बनलेले आहे.

– निकोबार बेटात कार निकोबार, छोटे निकोबार, मोठे निकोबार, नानकवरी, कोमोती, काचाल इ. बेटे आहे.

– मोठे निकोबार हे सर्वात मोठे असून ते सर्वात दक्षिणेला आहे, भारताचे सर्वात दक्षिण टोक इंदिरा पाईंट (पिगमॅलिय पाईंट) या बेटावर आहे.

३) अपतट बेटे offshore islands)

– भारतात अनेक अपतट बेटे आहेत.

पश्चिम किनारपट्टी लगत :

१) कच्छ-वैदा, नोरा, प्रितन २) काठेवाड-पिरम ३) नर्मदा-तापी मुख – अलिया बेट ४) महाराष्ट्र-करंजा, घारापुरी, कासा ५) मंगळूर-सेंटमेरी, भटकळ, पीजनलॉक ६) गोवा अंजीदीव

पूर्व किनारपट्टी लगत :

१) मन्नारचे अखात-पांबन, क्रोकोडाइल २) आंध्र प्रदेश – श्रीहरिकोटा Noto ३) महानदी मुख-व्हीलर, शॉर्ट ४) गंगा त्रिभूज प्रदेश – न्यू मूर, गंगासागर, सागर.

No comments:

Post a Comment

Latest post

सहकार

   11th सहकार  :- Click Here 12th सहकार  :- Click Here