Tuesday 10 May 2022

प्राजक्त देशमुख यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार

प्राजक्त देशमुख यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार

◾️ प्राजक्त देशमुख यांच्या 'देवबाभळी' नाटकाला साहित्य अकादमीच्या युवा पुरस्काराने गौरविण्यात आले.

◾️ या नाटकाची संहिता 2018 मध्ये पुस्तकरुपात आली. या संहितेला 2020 सालचा युवा पुरस्कार देण्यात आला आहे.

◾️ पुरस्काराचे स्वरुप : ताम्रपत्र आणि 50 हजार रुपये
◾️ 35 वर्षांखालील लेखकाची या पुरस्कारासाठी निवड केली जाते.

◾️ मराठी पुस्तकाचे परीक्षण करण्यासाठी समिती :  दिलीप प्रभावळकर,आशा बगे आणि लक्ष्मीकांत देशमुख

◾️ 'देवबाभळी' हे नाटक 22 डिसेंबर 2017 मध्ये व्यावसायिक रंगभूमीवर आले. अध्यात्माचा पाया घेऊन स्त्रीमनाचे पदर उलगडणाऱ्या या नाटकाने सर्व रसिकांना मोहून टाकले.

◾️ भद्रकाली नाट्य संस्थेने या नाटकाची निर्मिती केली असून आजवर राज्यभरात 333 प्रयोग झाले आहेत तर, या नाटकाला 40 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 24 एप्रिल 2024

◆ 'राष्ट्रीय पंचायती राज दिन' दरवर्षी 24 एप्रिल रोजी भारतात साजरा केला जातो. ◆ ‘प्राध्यापक नईमा खातून’ या अलीगड मुस्लिम विद्यापीठा...