ऑपरेशन गंगा


🔷 ऑपरेशन गंगा :-

◆ ऑपरेशन गंगा हे 2022 च्या युक्रेनवरील रशियन आक्रमणाच्या दरम्यान भारतीय नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारची एक निर्वासन मोहीम. यात
भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय सैन्याने भाग घेतला.

◆ या मोहीमेदरम्यान बस आणि रेल्वेने भारतीयांना युक्रेनच्या पश्चिम सीमेवर आणले गेले आणि तेथून त्यांना बुखारेस्ट, बुडापेस्ट, वॉर्सा तसेच इतर शहरांमार्गे भारतात आणण्यात आले.

युक्रेनमध्ये भारताचे सुमारे 20 हजार भारतीय नागरिक होते, त्यापैकी 18 हजार विद्यार्थी होते. यांतील बहुसंख्य व्यक्ती या मोहीमेद्वारे भारतात परतले.

◆ 26 फेब्रुवारी, 2022 रोजी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दल चर्चा केली. भारताचे चार केंद्रीय मंत्री - हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल व्ही. के. सिंग हे 26 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेन शेजारील देशांमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी गेले.

◆ या मोहीमेंतर्गत पहिले उड्डाण 26 फेब्रुवारी रोजी रोमानियातील बुखारेस्ट येथून झाले. मिकोलेव बंदरात अडकलेल्या भारतीय खलाशांना आणि इतर देशांतील अनेक खलाशांनाही यामार्गे निर्वासन करता आले.

◆ भारतीय विद्यार्थ्यांनी आपले नागरिकत्व दाखविण्यासाठी त्यांच्या वाहनांवर भारताचा ध्वज लावला होता.

🔷 ऑपरेशन देवी शक्ती (2021) :- तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये सत्ता हस्तगत केल्यानंतर तेथील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने राबवलेली मोहीम.

🔷 वंदे भारत मिशन (2020-21) :- कोविड-19 साथरोग काळात परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाने राबवलेली मोहीम. 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत, वंदे भारत मिशन अंतर्गत 2.17 लाखांहून अधिक उड्डाणे चालवण्यात आली आणि 1.83 कोटींहून अधिक प्रवाशांना सुविधा देण्यात आली.

🔷 ऑपरेशन समुद्र सेतू (2020) :- कोविड-19 महामारीच्या काळात परदेशातील भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय नौदलाची मोहीम.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 26 जानेवारी 2024

◆ यंदा देशातील एकूण 1132 पोलिस, अग्नीशामक सेवा, ग्रहरक्षक कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके जाहीर झाली आहेत. ◆ महाराष्ट्र पोलीस दलाला एकून 62 ...