Ads

10 January 2021

विधानसभेची रचना :


170 व्या कलमात सांगितल्याप्रमाणे विधानसभेत 60 व जास्तीत जास्त 500 सभासद असतात.


राखीव जागा :


घटना कलम क्र. 332 मध्ये सांगितल्याप्रमाणे अनुसूचीत जाती जमातीसाठी महाराष्ट्रामध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचीत जातींसाठी 33 तर अनुसूचीत जमातीसाठी 14 राखीव जागा आहेत.


निवडणूक : प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते.


उमेदवारांची पात्रता :


1.    तो भारताचा नागरिक असावा.


2.    त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी.


3.    संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.


सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष इतका असतो.


गणसंख्या : 1/10


अधिवेशन : दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.


सभापती व उपसभापती :


विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्‍या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.


सभापतीचे कार्य आणि अधिकार :


1.    विधानसभेत मांडण्यात येणार्‍या प्रस्तावाला संमती देणे.


2.    विधानसभेत शांतता व सुव्यवस्था राखणे.


3.    सभागृहात एखाद्या विषयावर समान मते पडल्यास आपले निर्णायक मत देणे.


4.    जनविधेयक आहे की नाही ते ठरविणे.


जनरल माहिती :


1.    धनविधेयक प्रथम विधानसभेत मांडतात.


2.    धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सभापतीला आहे.


3.    धनविधेयकाला विधानपरिषदेने 14 दिवसाच्या आत मान्यता द्यावी लागते. काहीच न कळवल्यास तीला ते मान्य आहे असे समजले जाते.


4.    मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.


5.    घटकराज्यांचे मंत्रीमंडल संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते.


6.    मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.


7.    मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री भूषवितो.


8.    स्वातंत्र्य भारताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते.

भारतीय संघराज्य निर्मिती



* संघराज्य म्हणजे अधिकार वाटपाची व्यवस्था असून त्यात एक सर्वसाधारण शासन केंद्रशासन व संघराज्य शासन आणि सर्वसाधारण शासनाचे घटक पातळ्या निर्माण केल्या जातात.


* संघराज्य निर्मितीच्या मुख्यतः दोन प्रक्रिया दिसून येतात एक केंद्रोकर्षी व केंद्रोत्सारी आहेत.


* केंद्राकर्षी - यात स्वतंत्र प्रदेश येऊन संघशासन निर्माण करतात. उदा - अमेरिकन संघराज्य पूर्वसूचीच्या १३ स्वतंत्र वसाहतींनी एकत्र येऊन निर्माण झाले.


* केंद्रोत्सारी - यात एक अखंड भूप्रदेश विविध कारणामुळे घटक शासनाची निर्मिती करतो. उदा भारत


* पुढील कारणामुळे व्यवस्थेचा स्वीकार केला लक्षात येते समाजव्यवस्थेत आढळणारी विविधता, सामाजिक, राजकीय, आर्थिक विकासाचे उद्दिष्ट्ये, लोकशाही विकेंद्रित करणारे तत्व, प्रशासकीय सोय.

आतापर्यंतचे लोकसभेतील एंग्लो इंडियन खासदार.


1. १९५२ ते १९५७ - श्री. फ्रैंक एन्थोनी


2. १९५२ ते १९५७ - श्री. ए.इ.टी. बैरो


3. १९५७ ते १९६२ - श्री. फ्रैंक एन्थोनी


4. १९५७ ते १९६२ - श्री. ए.इ.टी. बैरो


5. १९६२ ते १९६७ - श्री. फ्रैंक एन्थोनी


6. १९६२ ते १९६७ - श्री. ए.इ.टी. बैरो


7. १९६७ ते १९७० - श्री. फ्रैंक एन्थोनी


8. १९६७ ते १९७० - श्री. ए.इ.टी. बैरो


9. १९७१ ते १९७७ - श्री. फ्रैंक एन्थोनी


10. १९७१ ते १९७७ - श्रीमती मर्जरी गॉडफ्रे


11. १९७७ ते १९७९ - श्री. ए.इ.टी. बैरो


12. १९७९ ते १९७९ - श्री. रुडॉल्फ रॉड्रीग्ज


13. १९८०ते १९८४ - श्री. फ्रैंक एन्थोनी


14. १९८० ते १९८४ - श्री. ए.इ.टी. बैरो


15. १९८४ ते १९८९ - श्री. फ्रैंक एन्थोनी


16. १९८४ ते १९८९ - श्री. ए.इ.टी. बैरो


17. १९८९ ते १९९१ - श्री. जॉस फर्नांडीज


18. १९८९ ते १९९१ - श्री. पॉल मंतोष


19. १९९१ ते १९९६ - श्री. फ्रैंक एन्थोनी


20. १९९१ ते १९९६ - मेजर जनरल रॉबर्ट इ विल्यम्स


21. १९९६ ते १९९७ - श्री. नील ओब्रायन


22. १९९६ ते १९९७ - श्रीमती हेडविग रेगो


23. १९९८ ते १९९९ - डॉ. श्रीमती बेट्रीक्स डिसुजा


24. १९९८ ते १९९९ - लेफ्टनंट जनरल नेविल फॉले


25. १९९९ ते २००४ - डॉ. श्रीमती बेट्रीक्स डिसुजा 


26. १९९९ ते २००४ - श्री. डेन्झेल बी. एटकिन्सन


27. २००४ ते २००९ - श्रीमती इंग्रीड मैकलिओड


28. २००४ ते २००९ - श्री फ्रान्सिस फान्थोमे


29. २००९ ते २०१४ - श्रीमती इंग्रीड मैकलिओड


30. २००९ ते २०१४ - डॉ. श्री. चार्ल्स डायस


31. २०१४ ते पुढे - प्रा. रिचर्ड हे


32. २०१४ ते पुढे - श्री. जॉर्ज बेकर


भारतीय निवडणूक आयोग


🔺 सथापना :- २५ जानेवारी १९५०

🔹 मख्यालय :- नवी दिल्ली

🔸 मख्यनिवडणूक आयुक्तांची निवड :- 

    राष्ट्रपती - सूनिल अरोरा

🔹 हल्पलाईन क्रमांक :- १९५०

🔸 सलोग्न :- देश का महा त्योहार

🔹 पोर्टल :- eci.gov.in

🔸 राज्यघटना भाग :- १५

🔺 कलम :- 324

🔹 आयोग संबधित कलम :- 

   ३२४ - ३२९

🔸 ७३ वी घटना दुरुस्ती :- राज्य निवडणूक 

📚  आयोगाची स्थापना

🔸 निवडणूक आयोगाची कामे :-

०१) मतदारसंघ आखणे

०२) मतदारयादी तयार करणे

०३) राजकीय पक्षांना मान्यता देणे 

       निवडणूक चिन्हे ठरवणे

०४) उमेदवारपत्रिका तपासणे

०५) निवडणुका पार पाडणे

०६) उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा 

       ताळमेळ लावणे

◆ ६१ वी घटना दुरुस्ती :- १९८८ , 

    मतदार वय २१ वरून १८ करण्यात 

   आले.

◆ अन्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक - 

     राष्ट्रपती - ३२४ (२) - या दोन 

     निवडणूक आयुक्तांना पदावरून 

     काढण्या साठी महाभियोग 

     चालवण्यात येत नाही.

◆ आयोग घटनात्मक, स्थायी, स्वायत्व

भारत में बैंकों का स्थापना वर्ष


👉 बक आॅफ हिन्दुस्तान =1770 में

👉इलाहाबाद बैंक =1865 में 

👉 अवध काॅमर्शिल बैंक = 1881 में

👉 पजाब नेशनल बैंक =1894 में

👉 कनरा बैंक =1906 में

👉 बक आॅफ इंडिया = 1906 में

👉 काॅरपोरेशन बैंक = 1906 में

👉 इडियन बैंक =1907 में

👉 पजाब एंड सिंधी बैंक = 1908 में

👉 बक आॅफ बड़ौदा= 1908 में

👉 सट्रल बैंक आॅफ इंडिया =1911 में

👉 यनियन बैंक आॅफ इंडिया =1919 में

👉 इम्पीरियल बैंक =1921में

👉 आध्रा बैंक = 1923 में👉 सिंडीकेट बैंक = 1925 में

👉 विजया बैंक =1931 में

👉 रिजर्व बैंक आॅफ इंडिया =1935में

👉 बक आॅफ महाराष्ट्र =1935में

👉 इडियन ओवरसीज बैंक =1937 में

👉 दना बैंक =1938 में

👉 ओरिएंटल बैंक आॅफ काॅमर्स =1943में

👉 यको बैंक =1943 में 

👉 यनाइटेड बैंक आॅफ इंडिया = 1950 में

👉 सटेट बैंक आॅफ इंडिया =1955 में 

👉 ICICI बैंक = 1994 में

👉 HDFC बैंक = 1994 में

👉 IDBI बैंक =1964 में

👉 एक्सिस बैंक = 2007 में


लंब आणि क्षैतिज आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय.


🔰सर्वोच्च न्यायालयाने लंब आणि क्षैतिज आरक्षणावर आपला निर्णय दिला आहे.


🔰नयायालयाचा निर्णय - लंब-क्षैतिज आरक्षित प्रवर्ग असे दोन्हीमध्ये मोडणारी एखादी व्यक्ति जर लंब आरक्षणाशिवाय पात्र होण्यासाठी पुरेसे गुण मिळविलेले असेल तर त्या व्यक्तीला लंब आरक्षणाशिवाय पात्र ठरविले जाणार आणि सर्वसामान्य श्रेणीतल्या क्षैतिज आरक्षणापासून वगळता येणार नाही.


🔰लब आरक्षण (Vertical reservation) - अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला लंब आरक्षण असे संबोधले जाते. कायद्यानुसार निर्दिष्ट केलेल्या प्रत्येक गटासाठी ते स्वतंत्रपणे लागू होते.


🔰कषैतिज आरक्षण (Horizontal reservation) – समाजात सर्व नागरिकांना समान संधी देण्याच्या उद्देशाने स्त्री, जेष्ठ व्यक्ती, तृतीयपंथी समुदाय आणि दिव्यांग व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या आरक्षणाला लंब आरक्षण म्हणतात.

निवडणूक खर्च मर्यादेत वाढ



▪️लोकसभा आणि विधानसभा निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांना दिलासा देताना केंद्र सरकारने निवडणूक खर्चाची मर्यादा १० टक्क्यांनी वाढविली आहे.


▪️तयाअंतर्गत आता उमेदवार लोकसभा निवडणुकीत ७७ लाखांपर्यंत आणि विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त

३०.८० लाख रुपये खर्च करू शकतील.


▪️लोकसभेत आतापर्यंत खर्चाची ही मर्यादा जास्तीत जास्त ७० लाख रुपये आणि विधानसभेत २८ लाख रुपयांपर्यंत होती.


▪️कद्रीय कायदा मंत्रालयाने दिलेल्या अधिसूचनेनंतर ही वाढ तातडीने अंमलात आली आहे.


▪️यापूर्वी निवडणूक खर्च मर्यादेमध्ये २०१४ मध्ये ही वाढ करण्यात आली होती. (डिटेल्स मध्ये या लेखानंतर माहिती देतो )


▪️अरुणाचल प्रदेश, गोवा, सिक्कीम, पुद्चेरी, अंदमान आणि निकोबार, दादरा नगर हवेली आणि दमण दीव, लक्षद्वीप, लडाख या छोट्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सरकारने निवडणूक खर्चाची मर्यादा कमीच ठेवली आहे. लोकसभा निवडणुकीत ५९.४० लाख आणि विधानसभा निवडणुकीत २२ लाख रुपये.


▪️यासह मेघालय, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, नागालँड या ईशान्येकडील राज्यांत लोकसभेने खर्चाची मर्यादा ७७ लाख ठेवली आहे, परंतु विधानसभा निवडणुकीत खर्चाची मर्यादा २२ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.


♦️निवडणूक आयोगाकडून दोन सदस्यीय समिती: :-


▪️कद्रीय विधि व न्याय मंत्रालयाने निवडणूक खर्चात दहा टक्के वाढ केल्यानंतर यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने २१ ऑक्टोबर २०२० रोजी दोन सदस्यांची समिती नियुक्त केली.


▪️माजी महसूल अधिकारी हरीश कुमार व उमेश सिन्हा यांची समिती उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याबाबत चार महिन्यांत आयोगाला अहवाल सादर करेल.


♦️निवडणूक खर्चाची मर्यादा - 2014.


▪️सन २०१४ मध्ये केंद्र सरकारने मोठ्या राज्यांतील लोकसभेच्या उमेदवारांसाठी निवडणूक खर्चाची कमाल मर्यादा पूर्वीच्या रु. ४० लाखांवरून रु.७० लाख अशी वाढविली. इतर राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मर्यादा पूर्वीच्या रु.१६ लाख ते ४० लाख यांवरून रु. ५४ लाख करण्यात आली. 

▪️तयाचप्रमाणे मोठ्या राज्यातील विधानसभेच्या जागेसाठी ही मर्यादा पूर्वीच्या रु.१६ लाखांवरून रु. २८ लाख करण्यात आली.


▪️इतर राज्ये व संघराज्य प्रदेशांसाठी ही मर्यादा रु.८ लाख ते रु.१६ लाखांवरून रु. २० लाख करण्यात आली.


▪️ तसेच खर्चाच्या राज्यनिहाय मर्यादा वेगवेगळ्या आहेत.

......................................................

📌 आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा 100% प्रश्न विचारला जाऊ शकेल.


📌घटक - निवडणुक प्रक्रिया.


📌उपघटक - निवडणूकविषयक सुधारणा व निवडणुकीतील निवडणुकीतील खर्च


भारताने ‘राष्ट्रीय अणु कालमापक’ विकसित केले


4 जानेवारी 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी मापनशास्त्र’ या संकल्पनेखाली आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय मापन शास्त्र परिषद 2021’ याचे उद्‌घाटन झाले. याप्रसंगी ‘राष्ट्रीय अणु कालमापक’ आणि ‘भारतीय निर्देशक द्रव्य प्रणाली’ हे महत्वाचे शोध राष्ट्राला अर्पण करण्यात आले.


राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (CSIR-NPL) या संस्थेनी ‘राष्ट्रीय अणु कालमापक’ तयार केला आहे.2.8 नॅनो सेकंदापर्यंतची अचूक वेळ मोजण्यात कालमापक सक्षम आहे.


भारत आता एका नॅनो सेकंदाच्या कालमापन करण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला आहे. आता भारतीय प्रमाण वेळ 3 नॅनो सेकंदापेक्षा कमी अंतराने आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळेशी जुळते.


ह्या प्रणालीची ISRO सारख्या अति अचूक तंत्रज्ञानाशी संबंधित काम करणाऱ्या संस्थांना मोठी मदत होणार आहे. बँकिंग, रेल्वे, संरक्षण, आरोग्य, दूरसंचार, हवामान अंदाज, आपत्ती व्यवस्थापन आणि अशा आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक क्षेत्रांना याचा मोठा फायदा होणार आहे.

अमेरिकेतील न्यायाधीशपदासाठी भारतीयाला नामांकन


 


• डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया (वॉशिंग्टन सी.) न्यायालयाच्या सहाय्यक न्यायाधीशपदासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे वकील विजय शंकर यांच्या नावाची शिफारस केली आहे.


• शंकर यांच्या नावाला सिनेटची मंजुरी मिळाल्यास या पदावरील त्यांचा कार्यकाल 15 वर्षांचा असेल.


• ते सध्या न्याय विभागात वरिष्ठ वकील आहेत.  


• 2012 मध्ये न्याय विभागात नियुक्त होण्यापूर्वी शंकर वॉशिंग्टन डीसीमध्ये खासगी वकिली करत होते.

कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या...


▪️पोलादपूर तालुक्यातील ऐतिहासिक कोंढवी किल्लय़ावर भैरवनाथ जोगेश्वरी मंदिराच्या जीर्णोद्धार समयी खोदकाम करतेवेळी शिवकाळातील १५ मुर्त्यां सापडल्या आहेत.


▪️तालुक्यातील आठगाव भैरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोंढवी येथे मंदिराचे काम करतेवेळी पाण्यासाठी पाण्याची टाकी बांधण्यासाठी खोदकाम करतेवेळी शिवकाळातील पंधरा मुर्त्यां सापडल्या या मूर्तीमध्ये भैरी ,जोगेश्व्री ,वाघजाई, वीर मूर्ती, तसेच गणेश मूर्ती इत्यादी मूर्तिंचा समावेश आहे. मोठय़ा प्रमाणात मुर्ति सापडल्यामुळे पोलादपूर तालुक्यासह कोकणातील भाविकांची या कोंढवी गडाकडे दर्शनासाठी रीघ लागली आहे


▪️तालुक्यातील आठगाव भैरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोंढवी सह चोळई, गाजवणे, खडकवणे, धामणदेवी, फणसकोंड, गोलदरा, तळ्याचीवाडी या गावाचे आराध्य दैवत असलेल्या जोगेश्वरी मंदिराच्या पूर्व बाजू पाण्याची साठवण टाकी साठी खोदकाम करीत असताना या मुर्त्यां आढळून आले आहेत.


▪️या मुर्त्यां मध्ययुगीन व शिवकाळातील असून सदर मुत्यांमध्ये श्री गणेश, भैरी जोगेश्वरी वाघजाई वीर मुर्त्यां इत्यादींचा समावेश आहे कोकण इतिहास परिषदेचे प्रा.अंजय धनावडे तसेच इतिहास संशोधक प्रवीण भोसले यांनी या मूर्त्यां संदर्भात या मुर्त्यां चौदाव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत असल्याचे नमूद केले आहे सदर मुर्ती या अगोदर सुद्धा येथे शिव लिंगाखालील पीठ,दिवा,तसेच मध्ययुगीन भांडय़ांचे अवशेष सापडले आहेत.

टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन अशक्य.


🔶जपानसह काही देशांमध्ये करोनाची साथ पुन्हा तीव्र झाल्यामुळे येत्या जुलै-ऑगस्ट महिन्यांत लांबणीवर पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन अवघड आहे, असे मत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.


🔶टोक्योसहित काही राज्यांमध्ये जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी गुरुवारी आणीबाणी जाहीर केली आहे. यासंदर्भात कॅनडाचे ‘आयओसी’ सदस्य रिचर्ड पौंड यांनी ‘बीसीसी’ वृत्तवाहिनीवर म्हटले की, ‘‘सध्या करोना संसर्गाची रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. त्यामुळे ऑलिम्पिकबाबत अनिश्चितता पसरली आहे.’’


🔶जपानमध्ये गुरुवारी २,४४७ नव्या रुग्णांची विक्रमी नोंद झाली. त्यामुळे लागू करण्यात आलेली आणीबाणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत असेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. या परिस्थितीतही ऑलिम्पिक होईल, अशी संयोजकांना आशा आहे. परंतु याकरिता कृती आराखडा त्यांच्याकडे नाही, असे पौंड यांनी सांगितले. खेळाडूंना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात यावे, असे आवाहन पौंड यांनी केले आहे. २३ जुलै ते ८ ऑगस्ट या काळात ऑलिम्पिक आयोजित केले जाणार आहे.

09 January 2021

Online Test Series

प्रवासी भारतीय दिवस: 9 जानेवारी 2021.


🔰परदेशांत राहणाऱ्या भारतीयांना जोडून आणि सामावून घेण्याच्या प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावणारी ‘प्रवासी भारतीय दिवस परिषद’ हा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे.


🔰यदाची सोळावी प्रवासी भारतीय दिवस परिषद 9 जानेवारी 2021 रोजी आभासी माध्यमातून आयोजित केली जाणार आहे. “आत्मनिर्भर भारतासाठी योगदान देताना” परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे.


🔰परिषदेचे उद्‌घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तर सुरीनाम प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी सोहळ्याचे प्रमुख अतिथी आहेत.


🔰यवा प्रवासी भारतीय दिवस परिषदेचे आयोजन 8 जानेवारी 2021 रोजी आभासी माध्यमातून झाली असून, “भारत आणि परदेशातील यशस्वी तरुणांना एकत्र आणताना” अशी या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना होती. ही परिषद युवक कल्याण व क्रिडा मंत्रालय यांच्यावतीने आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शासनाची परवानगी.


🔰महाराष्ट्र केसरी किताब लढत आणि ६४व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेला महाराष्ट्र शासनाने गुरुवारी परवानगी दिली.


🔰या स्पर्धेच्या आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने पाठपुरावा केला होता. करोनाविषयक सर्व शिष्टाचारांचे पालन करून या स्पर्धेला परवानगी देण्यात आली आहे. शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्यक्ष संपर्क असलेल्या क्रीडा प्रकारांमध्ये कुस्तीचा समावेश होता. याआधी वैयक्तिक कौशल्य आणि तंदुरुस्तीपुरती खेळाडू आणि प्रशिक्षकांना प्रमाणित कार्यपद्धतीनुसार परवानगी होती. मात्र शासनाच्या या आदेशाने अन्य स्पर्धा संयोजकांनाही दिलासा मिळाला आहे.


🔰सरक्षित अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे, थर्मन स्कॅनिंग, इत्यादी कोविड-१९ करिता घालून दिलेल्या सर्व निकषांचे पालन करण्याच्या अटीवर स्पर्धेच्या आयोजनाला परवानगी देण्यात आली असल्याचे शासनाने पत्रकात म्हटले.


🔰‘‘शासनाने दिलेल्या अटी-शर्तीनुसार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी परवानगी मिळाली आहे. आता कार्यकारिणी समितीच्या बैठकीत आम्ही आयोजनाचे धोरण ठरवू,’’ अशी माहिती राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी दिली.

एमपीएससी’ परीक्षा मार्चमध्ये.


🔰महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तब्बल वर्षभरापासून रखडलेल्या परीक्षांच्या नव्या तारखांबाबत आयोगाने अंतिम निर्णय घेतला आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात राज्य सेवा पूर्व परीक्षा तर तिसऱ्या आठवडय़ात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा एप्रिल महिन्यात होणार आहे. शुक्रवारी याबाबत राज्य सरकारकडून अधिकृत तारखांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.


🔰सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा मागास (एसईबीसी) आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलल्या. राज्यसेवा पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व, अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणार होत्या. मात्र, एसईबीसी आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर संघटनांकडून परीक्षा घेण्यास विरोध दर्शवण्यात आला.


🔰मात्र आता सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातून(एसईबीसी) अर्ज केल्यास उमेदवारांना खुल्या किंवा आर्थिकदृष्टय़ा मागास (ईडब्लूएस) प्रवर्ग निवडण्याची संधी आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. यामुळे परीक्षा घेण्याचा तिढा सुटला असून तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.


🔰यासंदर्भात राज्य शासनाची चर्चा करून आयोगाने परीक्षांच्या तारखा ठरवल्या आहेत. त्याप्रमाणे आता राज्यसेवा पूर्व परीक्षा व अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा मार्च महिन्यात तर दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहे. आयोगाने किमान वर्षभरापासून रखडलेल्या परीक्षांच्या तारखा तरी जाहीर कराव्या, अशी मागणी परीक्षार्थीकडून केली जात होती.

‘जेईई अ‍ॅडव्हान्स’ परीक्षा ३ जुलैला होणार; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा.


🔰‘जेईई अ‍ॅडव्हान्स्ड’ परीक्षेच्या तारेख संदर्भात आज केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यानुसार ३ जुलै २०२१ रोजी जेईई अॅडव्हान्स परीक्षा होणार आहे. यावेळी पोखरियाल यांनी आयआयटी प्रवेशासाठी आवश्यक पात्रता आणि नियमांबाबत देखील माहिती दिली.


🔰दशभरातील लाखो विद्यार्थ्यांना या घोषणेची प्रतीक्षा होती. जेईई मुख्य परीक्षेच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर, ‘जेईई अ‍ॅडव्हान्स्ड’  परीक्षा कधी होणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता.


🔰या परीक्षेच्या तारखेची घोषणा करताना पोखरियाल यांनी सांगितले की, आपण अद्याप पूर्णपणे करोनाच्या संकटातून बाहेर पडलेलो नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत जेईईद्वारे आयआयटीमध्ये प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी ७५ टक्क्यांची पात्रता नसेल. याची विद्यार्थ्यांना मदत होईल. आयआयटी खरगपूर या परीक्षेचं आयोजन करणार आहे.

एलन मस्क बनले जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती.


🔰स्पेसएक्स आणि टेस्ला या जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपनीचे संस्थापक एलन मस्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी दिग्गज अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस यांना मागे टाकत हा किताब पटकावला. टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये गुरुवारी ४.८ टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे मस्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत ५०० लोकांच्या ब्लूमबर्गच्या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचले.


🔰दक्षिण अफ्रेकत जन्मलेल्या मस्क यांची काल १८८.५ अब्ज डॉलर संपत्तीची नोंद झाली. ही बेजोस यांच्या तुलनेत १.५ अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. दरम्यान, जेफ बेजोस ब्लूमबर्गच्या या यादीत ऑक्टोबर २०१७ पासून पहिल्या स्थानावर होते. हे स्थान आता एलन मस्क यांनी पटकावलं आहे.


🔰दरम्यान, गेल्या काही वर्षांत एलन मस्क यांच्या संपत्तीत बरीच वाढ झाली आहे. एका निरिक्षणानुसार, गेल्या वर्षी मस्क यांच्या संपत्तीत १५० अब्ज डॉलरपेक्षा अधिक वाढ झाली. चांगला फायदा झाल्याने गेल्या वर्षी टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीत ७४३ टक्के वाढ झाली. सहा जानेवारीपर्यंत एलन मस्क यांची संपत्ती १८१ अब्ज डॉलरवर पोहोचली होती. तेव्हापासूनच बेजोस यांचे अव्वल स्थान डळमळीत झाले होते.

भारताची राज्ये आणि त्यांचे राज्यपाल


‼️ 1. आंध्र प्रदेश

➡️ राज्यपाल - श्री विश्व भूषण हरीचंदन


‼️ 2.अरुणाचल प्रदेश

➡️ राज्यपाल - ब्रिगेडिअर (डॉ) बी.डी. मिश्रा (सेवानिवृत्त)


‼️3. आसाम

➡️ राज्यपाल - प्राध्यापक श्री जगदीश मुखी


‼️ 4. पश्चिम बंगाल

➡️ राज्यपाल - श्री. जगदीप धनकर


‼️ 5. बिहार

➡️ राज्यपाल - श्री फागु चौहान


 ‼️6. छत्तीसगड

➡️ राज्यपाल - सुश्रीअनसुइया उईके


 ‼️7. गोवा

➡️ राज्यपाल - श्री भगतसिंग कोश्यारी(प्रभारी)


‼️ 8.गुजरात

➡️ राज्यपाल - श्री आचार्य देववृत्त  


‼️ 9. हरियाणा

➡️ राज्यपाल - श्री सत्यदेव नारायण आर्य


‼️ 10. हिमाचल प्रदेश

➡️ राज्यपाल - श्री बंडारू दत्तात्रेय


‼️ 11. झारखंड

➡️ राज्यपाल - श्रीमती द्रौपदी मुर्मू


‼️ 12. कर्नाटक

➡️ राज्यपाल - श्री वजुभाई वाला


‼️ 13. केरळ

➡️ राज्यपाल - श्री. आरिफ मोहम्मद खान


‼️ 14. मध्य प्रदेश

➡️ राज्यपाल - श्रीमती आनंदीबेन पटेल


‼️ 15. महाराष्ट्र

➡️ राज्यपाल - श्री भगतसिंग कोश्यारी


‼️ 16. मणिपूर

➡️ राज्यपाल - नजमा हेपतुल्ला


‼️ 17. मेघालय

➡️ राज्यपाल - श्री सत्यपाल मलिक


‼️ 18. मिझोरम

➡️ राज्यपाल - श्री पी.एस. श्रीधरन पिल्लई


‼️ 19. नागालँड

➡️ राज्यपाल - श्री आर.एन. रवी


‼️ 20. ओडिशा

➡️ राज्यपाल - प्राध्यापक गणेशीलाल


‼️21. पंजाब

➡️ राज्यपाल - श्री व्ही.पी. सिंग बदनोर


‼️ 22.राजस्थान

➡️ राज्यपाल - श्री कलराज मिश्रा


‼️ 23. सिक्किम

➡️ राज्यपाल - श्री गंगा प्रसाद


‼️ 24. तामिळनाडू

➡️ राज्यपाल - श्री बनवारीलाल पुरोहित


‼️ 25. तेलंगणा

➡️ राज्यपाल - डॉ. तमिलीसाई सौंदराराजन 


‼️26. त्रिपुरा

➡️ राज्यपाल - श्री. रमेश बैस


‼️27. उत्तर प्रदेश

➡️ राज्यपाल - श्रीमती आनंदीबेन पटेल


‼️ 28. उत्तराखंड

➡️ राज्यपाल - श्रीमती बेबी राणी मौर्य

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार.


🔰 साहित्य महामंडळाच्या काल औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीनंतर अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही माहिती दिली. 


🔰 नाशिकच्या लोकहितवादी मंडळाच्या प्रस्तावानुसार महामंडळाच्या निवड समितीनं नाशिकमध्ये स्थळपाहणी केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. 


🔰 मार्च महिन्याच्या अखेरीस हे साहित्य संमेलन होणार आहे.

08 January 2021

विभक्ती



नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.


वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात. 

शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.

जी काही क्रिया घडलेली असते, ती सांगितलेली असते. म्हणून वाक्यातील क्रियापद सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यपद मानले जाते. त्या मानाने इतर पदे 


असतात. यावरून विभक्ती व विभक्तीचे अर्थ याबद्दल साधारणपणे असे म्हणतात.


विभक्त्यार्थ दोन प्रकार 


१) कारकार्थ - कारक व कारकार्थ

२) उपपदार्थ - कर्ता, करण, कर्म


विभक्तीची आठ नावे


१) प्रथमा 

२) द्वितीया 

३) तृतीया 

४) चतुर्थी  

५) पंचमी 

६) षष्ठी 

७) सप्तमी  

८)  संबोधन 


विभक्तीतीचे प्रत्यय - नी, ट, चा


विभक्ती  -  (एकवचन)  -  (अनेकवचन)


१) प्रथमा  -  प्रत्यय नाही  -  प्रत्यय नाही       

२) द्वितीया  -  स, ला, ते  -  स, ला, ना, ते    

३) तृतीया  -  ने, ए, शी  -  नी, शी, ही     

४) चतुर्थी  -  स, ला, ते  -  स, ला, ना, ते     

५) पंचमी  -  ऊन, हून  -  ऊन, हून     

६) षष्ठी  -  चा, ची, चे  -  चे, च्या, ची   

७) सप्तमी  -  त, ई, आ  -  त, ई, आ   

८) संबोधन  -  प्रत्यय नाही  -  नो


विभक्तीतील रूपे


विभक्ती  -  (एकवचन)  -  (अनेकवचन)


१) प्रथमा -  फूल  -  फुले 

२) द्वितीया  -  फुलास, दुलाला  -  फुलांस, फुलांना

३) तृतीया  -  फुलाने, फुलाशी  -  फुलांनी, फुलांशी

४) चतुर्थी  -  फुलास, फुलाला  -  फुलांस, फुलांना

५) पंचमी  -  फुलातून, फुलाहून  -  फुलांतून, फुलांहून

६) षष्ठी  -  फुलाचा, फुलाची, फुलाचे  -  फुलांचा, फुलांची, फुलांचे

७) सप्तमी  -  फुलात  -  फुलांत

८) संबोधन  -  फुला  -  फुलांनी


〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे



१) चटरगाला बोगदा _ या ठिकाणांना जोडतो.

(A) कठुआ आणि दोडा✅

(B) जम्मू आणि बारामुल्ला

(C) राजौरी आणि कुपवाडा

(D) कठुआ आणि उधमपूर


२) जानेवारी 2021 मध्ये चर्चेत आलेला बर्ड फ्लू आजार कोणत्या विषाणूमुळे होतो?

(A) इन्फ्लूएंझा टाइप-बी विषाणू

(B) व्हॅरिसेला-झोस्टर विषाणू

(C) इन्फ्लूएंझा टाइप-ए विषाणू✅

(D) एचएसव्ही-2


३) __ या ठिकाणांना जोडणारी जगातली पहिली डबल स्टॅक लाँग हल 1.5 किलोमीटर लांबीची कंटेनर रेलगाडी कार्यरत झाली.

(A) कोटा आणि अंबाला

(B) अजमेर आणि फरीदाबाद

(C) जोधपूर आणि गुडगाव

(D) अटेली आणि किशनगड✅


४) 'नवी दिल्ली स्कूल बॅग’ धोरणानुसार, स्कूल बॅगचे वजन किती असावे?

(A) विद्यार्थ्याच्या शारीरिक वजनाच्या 15 टक्क्यांपेक्षा अधिक नसावे

(B) विद्यार्थ्याच्या शारीरिक वजनाच्या 10 टक्क्यांपेक्षा अधिक नसावे✅

(C) विद्यार्थ्याच्या शारीरिक वजनाच्या 18 टक्क्यांपेक्षा अधिक नसावे

(D) विद्यार्थ्याच्या शारीरिक वजनाच्या 16 टक्क्यांपेक्षा अधिक नसावे


५) कोणत्या संस्थेनी ‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट’ अहवाल प्रसिद्ध केला?

(A) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

(B) जागतिक व्यापार संघटना

(C) जागतिक बँक✅

(D) युनेस्को


६) कोणत्या विद्यापीठाने आफ्रिकी हत्तींचे AI-आधारित सर्वेक्षण करणारे तंत्र तयार केले?

(A) हार्वर्ड विद्यापीठ

(B) कॅंब्रिज विद्यापीठ

(C) स्टॅनफोर्ड विद्यापीठ

(D) ऑक्सफोर्ड विद्यापीठ✅


७) कोणत्या देशासोबत भारताने "विशिष्ट कौशल्य कामगार" संबंधित सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार केला?

(A) जपान✅

(B) चीन

(C) अमेरिका

(D) रशिया


८) कोणती बँक RBI कडून लघु वित्त बँकेचा परवाना मिळविणारी भारतातली पहिली शहरी सहकारी बँक ठरली?

(A) राजकोट सहकारी बँक मर्यादित

(B) शिवालिक मर्केंटाईल सहकारी बँक✅

(C) राजानगर सहकारी बँक मर्यादित, बेंगळुरू

(D) पालमूर सहकारी अर्बन बँक मर्यादित


९) कोणत्या देशासोबत भारताने मध्यम-श्रेणीच्या पृष्ठभाग-ते-हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र (MRSAM) संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली?

(A) रशिया

(B) जर्मनी

(C) जपान

(D) इस्त्रायल✅


1०) कोणती व्यक्ती ‘अयोध्या’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?

(A) माधव भंडारी✅

(B) देवेंद्र फडणवीस

(C) उद्धव ठाकरे

(D) भागवत सिंह कोश्यारी

Online Test Series

Coronavirus - देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये ८ जानेवारीला दुसरा ‘ड्राय रन’.

\

🔰दशात करोना लसीकरण कार्यक्रमास सुरूवात होण्या अगोदर ८ जानेवारी रोजी देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये दुसरा ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे. या अगोदर २ जानेवारी रोजी संपूर्ण देशात ‘ड्राय रन’ चे आयोजन करण्यात आले होते. मात्र, तेव्हा सर्वच जिल्ह्यांमध्ये ‘ड्राय रन’ घेण्यात आलेला नव्हता. आता होणारा दुसरा ‘ड्राय रन’ हा देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे. लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम २८ व २९ डिसेंबर रोजी चार राज्यांमधील काही ठिकाणी पहिला ‘ड्राय रन’ घेण्यात आला.


🔰पजाबा, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या ‘ड्राय रन’चे परिणाम समोर आल्यानंतर, सरकारने संपूर्ण देशात ‘ड्राय रन’ घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता ८ जानेवारी रोजी पुन्हा एकदा संपूर्ण देशात ‘ड्राय रन’ पार पडणार आहे.


🔰दसरीकडे लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन हे उद्या(गुरुवार) राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांबरोबर बैठक करणार आहेत. या वेळी ते राज्य सरकारच्या तयारीचा आढावा घेतील. उद्या साडेबारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे.

राज्यातील अवयवदानात पुणे अव्वल



पुणे : राज्यात अवयवदानाची चळवळ रुजवण्यात पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीचे योगदान मोठे आहे. २०२० या महामारीच्या वर्षांतही राज्यातील सर्वाधिक अवयव दान यशस्वी करण्यात समितीला यश आले आहे. हे अवयवदान गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी असले तरी राज्यात सर्वाधिक आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात ६२ मेंदूमृत रुग्णांची माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीला मिळाली. त्यांपैकी ४१ मेंदूमृत रुग्णांचे अवयव गरजू रुग्णांसाठी उपलब्ध झाले. त्यातून ३६ मूत्रपिंडं, ३९ यकृत, तीन हृदय, सहा मूत्रपिंडं-स्वादुपिंड, एक मूत्रपिंड-यकृत आणि दोन लहान आतडय़ांचे यशस्वी प्रत्यारोपण गरजू रुग्णांवर करण्यात आले. २०१९ मध्ये विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीला १०४ मेंदूमृत रुग्णांची माहिती मिळाली होती. त्यांपैकी ७८ रुग्णांच्या नातेवाइकांनी मृतांचे अवयव दान करण्याची तयारी दर्शवली होती. ६३ मेंदूमृत रुग्णांकडून १९२ अवयव प्राप्त झाले. त्यांपैकी १८८ अवयवांचे गरजू रुग्णांच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. त्यांमध्ये ९६ मूत्रपिंडे, ६४ यकृत, १३ हृदय, तीन हृदय-यकृत, पाच मूत्रपिंड-स्वादुपिंड, ६४ कॉर्निआ आणि आठ त्वचा यांचे प्रत्यारोपण पूर्ण करण्यात आले. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये झालेले अवयवदान तुलनेने कमी असले तरी महामारीसारख्या आव्हानात्मक काळात ते यशस्वी करण्याचे मोल अधिक ठरले.

समितीच्या आरती गोखले म्हणाल्या,की करोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली त्या वेळी अवयव प्रत्यारोपणही बंद होते. ते पुन्हा सुरू करताना गरजू रुग्ण आणि त्यांच्या कु टुंबीयांच्या मनात धाकधुक असणे शक्य होते. राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय समितीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत प्रत्यारोपण सुरू करण्यात आले. गरजू रुग्ण शक्य तेवढा नजिकच्या परिसरातील असावा अशी सूचना होती, त्यामुळे दूरच्या रुग्णांना अवयव देणे शक्य नव्हते. मात्र, सर्व आव्हानांवर मात करत काही गरजू रुग्णांना निरोगी अवयव मिळाल्याचे समाधान गोखले यांनी व्यक्त केले.

जम्मू व काश्मिरच्या औद्योगिक विकासासाठी केंद्रीय क्षेत्र योजनेला केंद्रीय सरकारची मान्यता.


⚙️पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक बाबींविषयीच्या मंत्रिमंडळाच्या समितीच्यावतीने जम्मू व काश्मिरच्या औद्योगिक विकासासाठी उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या केंद्रीय क्षेत्र योजनेच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.


⚙️नवीन गुंतवणूक आकर्षित करून आणि सध्याच्या गुंतवणूकींना बळकटी देऊन रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि शाश्वत विकासावर भर देण्यावर नव्या जोमाने काम करून उद्योग आणि सेवा क्षेत्रातल्या विकासाच्या दृष्टीने वर्तमान योजना कार्यान्वित केली जात आहे.


💎योजनेची ठळक वैशिष्ट्य...


⚙️लहान आणि मोठ्या दोन्ही प्रकाराच्या उद्योगांसाठी ही योजना आकर्षक आहे. प्रकल्प आणि यंत्रसामग्रीमध्ये 50 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करणाऱ्या छोट्या उद्योगांना 7.5 कोटी रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर भांडवल मिळणार आणि जास्तीत जास्त 7 वर्षांसाठी 6 टक्के दराने अर्थसहाय्य मिळणार.


⚙️परस्तावित योजनेचा आर्थिक खर्च आर्थिक वर्ष 2020-21 ते आर्थिक वर्ष 2036-37 या कालावधीत 28,400 कोटी रुपये आहे.


⚙️जम्मू व काश्मिर केंद्रशासित प्रदेशात तालुका पातळीवर औद्योगिक विकास करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. 


⚙️योजनेतून संपूर्ण केंद्रशासित प्रदेशात अधिक शाश्वत व संतुलित औद्योगिक वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

उद्योग सुलभतेच्या धर्तीवर ही योजना अधिक सुलभ करण्यात आली असून GST संलग्न फायदे मिळून पारदर्शकतेशी तडजोड न करणारी खात्रीशीर योजना आहे.


⚙️दावे मंजूर होण्यापूर्वी स्वतंत्र लेखापरीक्षण संस्थेद्वारे पडताळणी करून ही योजना नोंदणी आणि अंमलबजावणीच्या दृष्टीने जम्मू व काश्मिर केंद्रशासित प्रदेशात महत्वाची भूमिका बजावत आहे.


💎इतर बाबी...


⚙️जम्मू व काश्मिरच्या केंद्रशासित प्रदेशात उद्योगांच्या विकासासाठी भारत सरकारने एक केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून “जम्मू व काश्मिर औद्योगिक विकास योजना-2021” तयार केली आहे. 


⚙️रोजगार निर्मिती हा या योजनेचा मुख्य हेतू आहे, ज्याद्वारे क्षेत्राचा थेट सामाजिक आर्थिक विकास होणार.


⚙️‘जम्मू व काश्मिरच्या पुनर्गठन अधिनियम-2019’ अंतर्गत 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू व काश्मिरचे जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेशात रूपांतर झाले.