Thursday 7 January 2021

राज्यातील अवयवदानात पुणे अव्वलपुणे : राज्यात अवयवदानाची चळवळ रुजवण्यात पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीचे योगदान मोठे आहे. २०२० या महामारीच्या वर्षांतही राज्यातील सर्वाधिक अवयव दान यशस्वी करण्यात समितीला यश आले आहे. हे अवयवदान गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी असले तरी राज्यात सर्वाधिक आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात ६२ मेंदूमृत रुग्णांची माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीला मिळाली. त्यांपैकी ४१ मेंदूमृत रुग्णांचे अवयव गरजू रुग्णांसाठी उपलब्ध झाले. त्यातून ३६ मूत्रपिंडं, ३९ यकृत, तीन हृदय, सहा मूत्रपिंडं-स्वादुपिंड, एक मूत्रपिंड-यकृत आणि दोन लहान आतडय़ांचे यशस्वी प्रत्यारोपण गरजू रुग्णांवर करण्यात आले. २०१९ मध्ये विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीला १०४ मेंदूमृत रुग्णांची माहिती मिळाली होती. त्यांपैकी ७८ रुग्णांच्या नातेवाइकांनी मृतांचे अवयव दान करण्याची तयारी दर्शवली होती. ६३ मेंदूमृत रुग्णांकडून १९२ अवयव प्राप्त झाले. त्यांपैकी १८८ अवयवांचे गरजू रुग्णांच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. त्यांमध्ये ९६ मूत्रपिंडे, ६४ यकृत, १३ हृदय, तीन हृदय-यकृत, पाच मूत्रपिंड-स्वादुपिंड, ६४ कॉर्निआ आणि आठ त्वचा यांचे प्रत्यारोपण पूर्ण करण्यात आले. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये झालेले अवयवदान तुलनेने कमी असले तरी महामारीसारख्या आव्हानात्मक काळात ते यशस्वी करण्याचे मोल अधिक ठरले.

समितीच्या आरती गोखले म्हणाल्या,की करोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली त्या वेळी अवयव प्रत्यारोपणही बंद होते. ते पुन्हा सुरू करताना गरजू रुग्ण आणि त्यांच्या कु टुंबीयांच्या मनात धाकधुक असणे शक्य होते. राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय समितीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत प्रत्यारोपण सुरू करण्यात आले. गरजू रुग्ण शक्य तेवढा नजिकच्या परिसरातील असावा अशी सूचना होती, त्यामुळे दूरच्या रुग्णांना अवयव देणे शक्य नव्हते. मात्र, सर्व आव्हानांवर मात करत काही गरजू रुग्णांना निरोगी अवयव मिळाल्याचे समाधान गोखले यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...