Ads

06 May 2020

नवी दिल्लीमध्ये संसदेच्या नव्या इमारतीला पर्यावरण मंत्रालयाची मंजूरी.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

✴️पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तज्ज्ञ मूल्यांकन समितीने संसद भावनाच्या शेजारी नवीन संसद भवनाची उभारणी करण्यास मंजूरी दिली आहे.

✴️हा प्रकल्प राष्ट्रपती भवनापासून ते इंडिया गेट पर्यंत 3 किलोमीटर लांबीच्या सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास योजनेचा एक भाग आहे. हा प्रकल्प 15 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. बांधकाम प्रकल्पाला येणारा खर्च 922 कोटी रुपये एवढा आहे.

♒️भारतीय संसदेच्या नवीन इमारतीची खास वैशिष्ट्ये:-

✴️इमारत 10.5 एकर भूखंडावर 65,000 चौरस मीटर क्षेत्रफळात बांधण्यात येणार. इमारतीची उंची 42 मीटर असणार.नव्या इमारतीचा आकार त्रिकोणी असणार आहे. या इमारतीला तीन मोठे मिनार असणार आहेत. हे तीन मिनार लोकशाहीच्या तीन स्तंभांचे प्रतिक असतील.

✴️इमारतीमध्ये 900 ते एक हजार लोकप्रतिनिधींची आसनक्षमता असणारी लोकसभा, राज्यसभा आणि सेंट्रल हॉलप्रमाणे संयुक्त सभागृह असणार. इमारतीच्या तळाशी सर्व मंत्रालयाच्या कार्यालयांना जोडणारी शटल सेवाही असणार आहे.

✴️संसदेची नवी इमारत ही सध्याच्या संसदेच्या जवळच असणार. संसद भवनाच्या खिडक्या या भारतातली विविधता दर्शवतील.इमारतीमध्ये सर्व खासदारांची कार्यालयेही असणार. नवीन संसद भवन हे अत्याधुनिक असणार.

✴️संसदेचे 75 वे अधिवेशन नवीन इमारतीमध्ये आयोजित करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे.पंतप्रधानांसाठी नवीन निवासस्थान बांधण्याचीही योजना आहे. पंतप्रधानांच्या नव्या निवासस्थान दिल्लीच्या महत्वाच्या परिसरात म्हणजेच सेंट्रल व्हिस्टा येथे असणार.

✴️सध्याचे संसद भवन ही भारतीय संसदेची इमारत आहे. 1912-13 यावर्षी ब्रिटीश वास्तुकार हर्बट ब्रेकर यांनी या वर्तुळाकार इमारतीची रचना केली. इमारतीच्या बाह्य वर्तुळकार गच्छीस 257 ग्रेनाइट स्तंभांचा आधार आहे. संसद भवन दिल्लीला जनपथ वरील राष्ट्रपती भवन जवळ आहे.

देशात आतापर्यंत चार मुख्यमंत्री राज्यपालनियुक्त सदस्य

👉राज्यपाल नियुक्त सदस्याने मुख्यमंत्री किंवा मंत्रिपद भूषवू नये, असे संकेत असतात. तसा नियम नाही वा घटनेत तरतूदही नाही.

👉मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करावी, अशी शिफारस राज्य मंत्रिमंडळाने दोनदा करूनही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ती मान्य केली नाही.

👉राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या दोन जागा रिक्त असल्या तरी त्यांची मुदत ५ जूनला संपुष्टात येईल.

👉लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार एक वर्षांपेक्षा कमी कालावधी असल्यास पोटनिवडणूक घेण्याची आवश्यकता नाही.

👉याआधी दोन सदस्यांच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव आले असता राज्यपालांनी ते मान्य केले नव्हते. याच मुद्यावर ठाकरे यांच्या नियुक्तीस राज्यपालांनी बहुधा मान्यता दिलेली नसावी.

👉देशात आतापर्यंत चार मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

👉१९५२ मध्ये तत्कालीन मद्रास प्रांताच्या मुख्यमंत्रिपदी निवड झालेले ज्येष्ठ नेते राजगोपाळचारी ऊर्फ  राजाजी यांनी पोटनिवडणूक लढविण्यास असमर्थता व्यक्त केली होती, पण त्यांची राज्यपालांनी नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती केली होती.

👉१९६१मध्ये उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रभान गुप्ता यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या निवडीला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. पण उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली होती.

👉इतर मागासवर्गाला आरक्षणाचे लाभ मिळाले त्या मंडल आयोगाचे अध्यक्ष बी. पी. मंडल यांची १९६८मध्ये बिहार विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीनंतर त्यांची बिहारच्या मुख्यमंत्रिपदी अल्प काळासाठी निवड झाली होती.

👉१९७१ मध्ये टी. एन. सिंग यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाली होती. त्यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. सिंग यांच्या निवडीस आव्हान देण्यात आले होते, पण न्यायालयाने सिंग यांना दिलासा दिला होता.

👉महाराष्ट्रात अलीकडच्या काळात दत्ता मेघे, फौजिया खान या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त सदस्य असताना मंत्रिपद भूषविले होते.

✅मुख्यमंत्रिपद भूषवलेले राज्यपाल नियुक्त सदस्य.

1.राजगोपाळचारी –  मद्रास राज्य – १९५२
2.चंद्रभान गुप्ता – – उत्तर प्रदेश – १९६१
3.बी. पी. मंडल –  – बिहार – १९६८
4.टी. एन. सिंग – उत्तर प्रदेश – १९७१

●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●

लॉकडाउनमुळे गावातील लोकसंख्येत ७ टक्क्यांनी वाढ

लॉकडाउनंतर गावातील लोकांचं शहराकडे येणं बंद झालं आहे आणि गावातील लोकसंख्येत वाढ झाल्याची नोंद सीपीआर या संस्थेनं केली आहे.

सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (सीपीआर) या संस्थेने केलेल्या अभ्यासात शहरातील लोकसंख्येत जवळपास ११ टक्क्यांची घट झाल्याचं समोर आलं आहे. तर गावातील लोकसंख्येत ७ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. लॉकडाउनमुळे लोकांचं गावाकडून शहरात होणार अप-डाउन बंद झालं आहे, असंही या अहवालात समोर आलं आहे.

'लॉकडाउनमुळे लाखोंच्या संख्येनं गावाकडील लोक शहरात येणं आता बंद झालं आहे. यामुळे शहरानजिकच्या गावांमध्ये लोकसंख्येत वाढ झाली आहे. यात राजस्थानचा पश्चिम भाग, ओडिशा येथे सर्वाधिक स्थलांतरणाचं प्रमाण आढळून आलं आहे. प्रवासी मजुरांनी केलेलं पलायन हे यामागचं कारण असू शकतं', असं सीपीआर संस्थेचे वरीष्ठ अधिकारी पार्थ मुखोपाध्याय यांनी सांगितलं.

लक्षवेधी बाब अशी की जास्त लोकसंख्या असलेल्या आणि गरीब राज्य म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्येत जास्त वाढ झालेली नाही. या राज्यांमधून मोठ्या संख्येने लोक इतर राज्यांमध्ये जात असतात. लॉकडाउमुळे रेल्वेसेवा बंद आहे. त्यासोबतच राज्यांच्याही सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमधील लाखोंच्या संख्येने लोक इतर राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. मजुरांसाठी रेल्वे सुरू करण्यासाठीची परवानगी देण्यात आल्याने येत्या काळात या आकडेवारी लक्षणीय बदल दिसू शकतो.

भारतीय चलन अवमूल्यन

📌 पहिले अवमूल्यन

◾️ 26 सप्टेंबर 1949
◾️अवमूल्यन प्रमाण 30.5 टक्के 
◾️वित्तमंत्री जॉन मथाई

📌 दुसरे अवमूल्यन

◾️ 6 जून 1966
◾️अवमूल्यन प्रमाण 36.5 टक्के
◾️ वित्तमंत्री सचिन चौधरी

📌 तिसरे अवमूल्यन

◾️ जुलै 1966
◾️अवमूल्यनाचे प्रमाण 20%
◾️ वित्तमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग

📌 तिसरे अवमूल्यन तीन टप्प्यांमध्ये झाले
💰 1 जुलै 1991 ला 9.5% अवमूल्यन
💰 3 जुलै 1991ला 10 ते 10.78%
अवमूल्यन
💰 15 जुलै 1991 ला 2%

राष्ट्रीय पशू जैवतंत्रज्ञान संस्थेनी ‘ईकोवसेन्स’ उपकरण विकसित केले

- हैदराबादच्या राष्ट्रीय पशू जैवतंत्रज्ञान संस्था (NIAB) येथील संशोधकांनी एक उपकरण विकसित केले, ज्याला त्यांनी ‘ईकोवसेन्स’ (eCovSens) हे नाव दिले आहे.

▪️ठळक बाबी

- हे एक बायोसेन्सर (जैवसंवेदक) आहे, ज्यामुळे पशूच्या लाळेची तपासणी कोविड-19 रोगासाठी केली जाऊ शकते.

- हे उपकरण केवळ 20 मायक्रोलिटर एवढ्या प्रमाणात नमुन्याचा वापर 30 सेकंदात आपला अहवाल देते. हे उपकरण ब्ल्यूटूथ तंत्रज्ञानाच्या माध्यमाने संगणक किंवा दूरध्वनी संचाशी देखील जोडले जाऊ शकते आणि ज्यामुळे प्राप्त माहितीचा अभ्यास केला जाऊ शकतो.

- हे उपकरण साधारण सेल बॅटरीवर चालवले जाऊ शकतो कारण त्यात 1.3V-3V व्होल्टेजचा वापर केला जातो.

DRDOच्या प्रयोगशाळेनी अतिनील निर्जंतुकीकरण टॉवर विकसित केला

- संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) याच्या दिल्लीतल्या लेजर सायंस अँड टेक्नॉलॉजी सेंटर (LASTEC) या प्रयोगशाळेनी अतिबाधित क्षेत्रांमध्ये वेगाने आणि रसायन-रहीत निर्जंतुकीकरणासाठी अतिनील (UV) निर्जंतुकीकरण टॉवर विकसित केला आहे. या उपकरणाला ‘UV ब्लास्टर’ असे नाव देण्यात आले आहे.

- संस्थेनी न्यू एज इंस्ट्रुमेंट्स अँड मटेरियल्स प्रायवेट लिमिटेड (गुरुग्राम) या कंपनीच्या सहकार्याने उपकरणाचे आरेखन केले आहे आणि विकसित केले.

▪️उपकरणाची ठळक वैशिष्ट्ये  

- हे उपकरण अतिनील किरणांच्या सहाय्याने निर्जंतुकीकरण करते. 

- या उपकरणात चौफेर किरणोत्सर्ग होण्यासाठी ‘254 nm’ लहरींवर सहा दिवे बसवले आहेत. प्रत्येक दिव्याची ऊर्जा क्षमता 43 UV-C वॅट एवढी आहे.

- खोलीत विविध ठिकाणी हे उपकरण बसवता येते. त्यानुसार अंदाजे 12x12 फुट आकाराची एक खोली 10 मिनिट आणि 400 वर्ग फुटाची खोली 30 मिनिटांमध्ये निर्जंतुक केली जाऊ शकते.

- प्रयोगशाळा, कार्यालय, विमानतळ, मॉल, उपहारगृह, कारखाने अशा महत्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी याचा प्रभावी वापर करता येऊ शकतो.

- अतिनील किरणांवर आधारित निर्जंतुकीकरणासाठी वायफायचा वापर करुन मोबाईल किंवा लॅपटॉपद्वारेही दूर ठिकाणी ही प्रक्रीया करता येऊ शकते.
------------------------------------------------

05 May 2020

इतिहास विषयक महत्वाची प्रश्ने....

1. 1869 साली महात्मा गांधींचा जन्म _ ह्या ठिकाणी झाला.

A. सुरत
B. बडोदा
C. पोरबंदर ✔
D. नाताळ (दक्षिण आफ्रिका)

2. गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ?

A. 1890
B. 1893 ✔
C. 1896
D. 1899

3. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ?

A. आफ्रिकन ओपिनियन
B. इंडियन ओपिनियन ✔
C. नाताळ काँग्रेस
D. ब्लॅक सॅल्युट

4. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ?

A. साबरमती आश्रम
B. सेवाग्राम आश्रम
C. फिनिक्स आश्रम ✔
D. इंडियन आश्रम

5. महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?

A. दिल्ली
B. मुंबई
C. अहमदाबाद
D. चंपारण्य ✔

6. कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ?

A. सन 1916
B. सन 1918 ✔
C. सन 1919
D. सन 1920

7. जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ?

A. सायमन कमिशन
B. हंटर कमिशन ✔
C. रिपन कमिशन
D. वूड कमिशन

8. _ साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.

A. सन 1930
B. सन 1933 ✔
C. सन 1936
D. सन 1939

9. 'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ?

A. आगा खान
B. खान अब्दुल गफार खान ✔
C. महात्मा गांधी
D. मोहम्मद अली जीना

10. ____ रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला.

A. 1 ऑगस्ट 1920 ✔
B. 1 ऑगस्ट 1925
C. 1 ऑगस्ट 1929
D. 1 ऑगस्ट 1935

11. भारतीय घटनेत सुरूवातीला किती कलमे होती ?

A. 6
B. 8 ✔
C. 10
D. 12

12. देशात आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार जारी केली जाते ?

A. कलम 356
B. कलम 360 ✔
C. कलम 365
D. कलम 368

13. भारत सरकारला कायदेविषयक सल्ला कोण देतो ?

A. कायदामंत्री
B. राष्ट्रपती
C. सरन्यायाधीश ✔
D. लोकसभा सभापती

14. भारतात खरी कार्यकारी सत्ता कोणाकडे असते ?

A. भारतातील सनदी अधिकारी
B. भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती
C. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ ✔
D. भारताचे सर्वोच्च न्यायालय

15. राज्यसभा लोकसभेने मंजूर केलेले अर्थविधेयक किती काळापर्यंत रोखून ठेवू शकते ?

A. 14 दिवस ✔
B. एक महिना
C. चार महिना
D. एक वर्ष

16. विधानसभेत कमाल किती सदस्य असतात ?

A. 250
B. 270
C. 350
D. 500 ✔

17. केंद्र-राज्य विवाद खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून सोडविले जातात ?

A. उच्च न्यायालय
B. नियोजन मंडळ
C. आंतरराज्यीय परिषद
D. यापैकी कोणी नाही ✔

18. राज्यपालाचा कार्यकाळ सामान्यतः किती असतो ?

A. कायम
B. 5 वर्षे ✔
C. 6 वर्षे
D. 10 वर्षे

19. भारताने घटनादुरुस्तीची पध्दत कोणत्या देशाकडून घेतली ?

A. अमेरिका
B. दक्षिण आफ्रिका ✔
C. कॅनडा
D. आयर्लंड

20. भारतात केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी केली जाते ?

A. 3 वर्षे
B. 4 वर्षे
C. 5 वर्षे ✔
D. 6 वर्षे

21. रक्तात असणाऱ्या प्रथिनाला काय म्हटले जाते ?

A. मायोसीन
B. फायब्रीनोजन ✔
C. केसीन
D. व्हिटेलीन

22. एक ग्रॅम प्रथिनांमधून किती उष्मांक मिळतात ?

A. 10
B. 8
C. 6
D. 4 ✔

23. खालीलपैकी कोणते खरे फळ आहे ?

A. सफरचंद
B. काजू
C. अननस
D. नारळ ✔

24. TRIPS आणि TRIMS ह्या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत ?

A. WTO ✔
B. IMF
C. IBRD
D. ADB

25. वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे ?

A. मिसोस्फियर
B. थर्मोस्फियर
C. ट्रोपोस्फियर ✔
D. स्ट्रॅटोस्फियर

26. एकक क्षेत्र जमिनीवर पीक वाढीच्या कालावधीत पर्णक्षेत्र निर्माण करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात?

A. पर्णक्षेत्र निर्देशांक
B. पर्णक्षेत्र कालावधी ✔
C. पीक वाढीचा दर
D. तुलनात्मक पीक वाढीचा दर

27. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह _ येथे झाला.

A. संगमनेर, रत्नागिरी, मालवण
B. वडाळा, मालवण, शिरोडा ✔
C. शिरोडा, संगमनेर, ठाणे
D. कल्याण, मालवण, शिरोडा

28. युनेस्कोने पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला ?

A. WHO
B. WWF
C. IEEP
D. UNEP ✔

29. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ?

A. कराड
B. कोल्हापूर
C. नरसोबाची वाडी ✔
D. सातारा

30. ___ यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना 'आर्यसमाज' स्थापनेसाठी मदत केली.

A. स्वामी विवेकानंद
B. आगरकर
C. गोखले
D. लोकहितवादी ✔

31. कोणत्या साली गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी आपली सत्ता स्थापन केली ?

A. सन 1500
B. सन 1510 ✔
C. सन 1520
D. सन 1530

32. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

A. सन 1500
B. सन 1550
C. सन 1600 ✔
D. सन 1650

20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

▪️ कोणत्या केंद्रीय मंत्रीने ‘पीटर्सबर्ग क्लायमेट डायलॉग’ याच्या प्रथम आभासी सत्रात भारताचे प्रतिनिधित्व केले?
उत्तर : प्रकाश जावडेकर

▪️ कोणत्या प्रयोगशाळेनी HCARD रोबोटिक उपकरण विकसित केले?
उत्तर : केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधन संस्था

▪️ कोणत्या व्यक्तीची सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाच्या अध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर : राजीव कुमार

▪️ आंतरराष्ट्रीय नृत्य दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 29 एप्रिल

▪️ कोणत्या संस्थेनी ‘अल्झायमर इनहिबिटर’ विकसित केले?
उत्तर : JNCASR

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘जगनअन्ना विद्या दिवेना’ योजना लागू केली?
उत्तर : आंध्रप्रदेश

▪️ कोणत्या व्यक्तीची OECD समूहामध्ये अमेरिकेचे दूत म्हणून नेमणूक करण्यात आली?
उत्तर : मनीषा सिंग

▪️ कोणत्या प्रदेशावरच्या ओझोन थरात आतापर्यंतचे सर्वात मोठे छिद्र तयार झाले होते?
उत्तर : आर्क्टिक क्षेत्र

▪️ श्वासोच्छवासामधली समस्या सोडवण्यासाठी कोणत्या संस्थेनी हर्बल डिकंन्जेस्टंट स्प्रे तयार केले?
उत्तर : नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट

▪️ कोणत्या संस्थेनी चंद्राचा पहिला भौगोलिक नकाशा प्रसिद्ध केला?
उत्तर : युनायटेड स्टेट्स जियोलॉजीकल सर्व्हे (USGS)

▪️ 2020 या वर्षी कामावर सुरक्षा आणि आरोग्य विषयक जागतिक दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : स्टॉप द पँडेमीक: सेफ्टी अँड हेल्थ अॅट वर्क कॅन सेव्ह लाईव्ह्ज

▪️ कोणत्या शहरात ‘आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरण’ याचे मुख्यालय आहे?
उत्तर : गांधीनगर

▪️ कोणत्या मंत्रालयाने ‘आयडीयाथॉन’ नावाने कार्यक्रमाचा आरंभ केला?
उत्तर : जल शक्ती मंत्रालय

▪️ GI टॅग प्राप्त झालेले ‘चक-हाओ’ हे काय आहे?
उत्तर : मणीपूरचा काळा तांदूळ

▪️ कोणत्या संस्थेनी "अतुल्य" नावाचे मायक्रोवेव्ह निर्जंतुकीकरण यंत्र विकसित केले?
उत्तर : डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी

▪️ कोणत्या विभागाने ‘यश’ नावाने एका कार्यक्रमाचा आरंभ केला?
उत्तर : विज्ञान व तंत्रज्ञान विभाग

▪️ CSIR याच्या कोणत्या संस्थेनी ‘किसान सभा’ नावाचे अ‍ॅप तयार केले?
उत्तर : केंद्रीय रस्ते संशोधन संस्था

▪️ कोणत्या राज्य / केंद्रशासित प्रदेशाने ‘आयुरक्षा’ कार्यक्रम आयोजित केला?
उत्तर : दिल्ली

▪️ कोण ‘राष्ट्रीय पायाभूत पाइपलाइन’ संदर्भात नेमलेल्या कृती दलाचे प्रमुख होते?
उत्तर : अतनू चक्रवर्ती

▪️ कोणता देश जगातला सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय सागरी सराव आयोजित करतो?
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका

General Knowledge

▪️ कोणत्या संस्थेनी “आय स्टँड विथ ह्यूमॅनिटी” मोहीम चालवली?
उत्तर : आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन

▪️ कोणत्या राज्य सरकार वा केंद्रशासित प्रदेशाने ‘ऑपरेशन SHIELD’ कार्यक्रमाचा आरंभ केला?
उत्तर : दिल्ली

▪️ कोणती व्यक्ती परराष्ट्र मंत्रालयाचे नवे प्रवक्ता आहेत?
उत्तर : अनुराग श्रीवास्तव

▪️ ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालय, जेथे ‘नादिया’ वाघ कोविड-19 विषाणूने संक्रमित झाला, ते कोणत्या देशात आहे?
उत्तर : संयुक्त राज्य अमेरिका

▪️ कोणत्या दिवशी 'विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिडा दिन' साजरा केला जातो?
उत्तर : 6 एप्रिल

▪️ भारतात कोविड-19 तपासणीची पहिली मोहीम कोणत्या प्रयोगशाळेकडून आरंभ करण्यात आली आहे?
उत्तर : डॉ. डॅंग्स लॅब

▪️ कोणती संस्था चंद्रावर ‘आर्टेमिस बेस कॅम्प’ स्थापन करणार आहे?
उत्तर : नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन

▪️ कोणत्या संस्थेनी ‘पर्सनल सॅनिटायझेशन एनक्लोजर’ या नावाने शरीर निर्जंतुकीकरण कक्ष विकसित केले?
उत्तर : संरक्षण संशोधन व विकास संस्था

▪️ 2020 या वर्षी राष्ट्रीय सागरी दिनाची संकल्पना काय होती?
उत्तर : सस्टेनेबल शिपिंग फॉर सस्टेनेबल प्लॅनेट

▪️ कोणता घटक अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलेल्या ‘5T’ योजनेचा भाग नाही?
उत्तर : टेस्टिफाय

General Knowledge

▪️ कोणत्या केंद्रीय मंत्रीने ‘पीटर्सबर्ग क्लायमेट डायलॉग’ याच्या प्रथम आभासी सत्रात भारताचे प्रतिनिधित्व केले?
उत्तर : प्रकाश जावडेकर

▪️ कोणत्या प्रयोगशाळेनी HCARD रोबोटिक उपकरण विकसित केले?
उत्तर : केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधन संस्था

▪️ कोणत्या व्यक्तीची सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाच्या अध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर : राजीव कुमार

▪️ आंतरराष्ट्रीय नृत्य दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 29 एप्रिल

▪️ कोणत्या संस्थेनी ‘अल्झायमर इनहिबिटर’ विकसित केले?
उत्तर : JNCASR

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘जगनअन्ना विद्या दिवेना’ योजना लागू केली?
उत्तर : आंध्रप्रदेश

▪️ कोणत्या व्यक्तीची OECD समूहामध्ये अमेरिकेचे दूत म्हणून नेमणूक करण्यात आली?
उत्तर : मनीषा सिंग

▪️ कोणत्या प्रदेशावरच्या ओझोन थरात आतापर्यंतचे सर्वात मोठे छिद्र तयार झाले होते?
उत्तर : आर्क्टिक क्षेत्र

▪️ श्वासोच्छवासामधली समस्या सोडवण्यासाठी कोणत्या संस्थेनी हर्बल डिकंन्जेस्टंट स्प्रे तयार केले?
उत्तर : नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट

▪️ कोणत्या संस्थेनी चंद्राचा पहिला भौगोलिक नकाशा प्रसिद्ध केला?
उत्तर : युनायटेड स्टेट्स जियोलॉजीकल सर्व्हे (USGS)

घटना परिषदेची इतर महत्वाची कामे

I. राष्ट्रीय ध्वज स्वीकारला – २२ जुलै १९४७
II. राष्ट्रकुल सदस्यत्वाला मंजुरी देण्यात आली.- मे १९४९
III. राष्ट्रगीताचा स्वीकार करण्यात आला- २४ जानेवारी १९५०
IV. राष्ट्रीय गीताचा स्वीकार करण्यात आला- २४ जानेवारी १९५०
V. पहिले राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली- २४ जानेवारी १९५०

घटना परिषदेविषयी विशेष महत्वाचे

या घटना परिषदेची स्थापना करण्यात आल्यापासून तिचे कामकाज २ वर्ष ११ महिने व १८ दिवस चालले. शेवटची बैठक २४ जानेवारी १९५० रोजी झाली. घटनापरिषदेने देशांच्या घटनांचा अभ्यास केला. या परिषदेवर एकूण कालावधीमध्ये ६० लाख रुपये खर्च झाले. या परिषदेचे एकूण ११४ दिवस अधिवेशन चालले.

घटना समितीतील महत्वाच्या समित्या व त्यांचे अध्यक्ष

अ. क्र.   समितीचे नाव   समितीचे अध्यक्ष
१   संघराज्य घटना समिती   पं. जवाहरलाल नेहरू
२.   केंद्रीय उर्जा समिती   पं. जवाहरलाल नेहरू
३.   मसुदा समिती   डॉ. बाबासाहेब आंबेडकर
४.   प्रांतीय राज्यघटना समिती   सरदार पटेल
५.   राज्य समिती   पं. जवाहरलाल नेहरू
६.   सुकाणू समिती   डॉ. राजेंद्र प्रसाद
७.   सभागृह समिती   पट्टाभी सीतारामय्या

मसुदा समिती

आपण पाहिलेल्या समितीमध्ये मसुदा समितीचे कार्य हे महत्वाचे होते. कारण, या समितीने घटनेला लिखित स्वरूप प्राप्त करून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली २९ ऑगस्ट १९४७ मध्ये मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये सात सदस्यांचा समावेश करण्यात आलेला होता.
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( अध्यक्ष)
२) एन. गोपालस्वामी अय्यंगार
३) अल्लादी कृष्णास्वामी अय्यर
४) के.एम.मुन्शी
५) सय्यद मोहमद शादुल्ला
६) एन. माधव राव
७) टी. टी. कृष्णम्माचारी ( यांची निवड खैतानच्या मृत्युनंतर करण्यात आली.)
मसुदा समितीने घटना परिषदेतील वेगवेगळ्या समित्यांसोबत चर्चा केली. त्याचबरोबर देशातील वेगवेगळ्या गटांबरोबर चर्चा करून आपला मसुदा फेब्रुवारी १९४८ मध्ये प्रसिध्द केला.
तो मसुदा प्रसिद्ध केल्यानंतर लोकांना त्यावर चर्चा करण्यासाठी व त्यावर आपले मत मांडण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी देण्यात आला. ज्या लोकांना आपले मत मांडावयाचे आहे त्यांच्यासाठी पत्राद्वारे आपले मत मांडण्यास परवानगी देण्यात आली.
- लोकांकडून आलेल्या मतानुसार काही दुरुस्त्या करण्यात आल्या. काही दुरुस्त्या करण्यात येऊन ऑक्टोबर १९४८ मध्ये पुन्हा मसूदा तयार करण्यात आला.

मसुद्याचे कायद्यात रुपांतर कसे झाले ?

पहिले वाचन

४ नोव्हेंबर १९४८ मध्ये मसुदा घटना परिषदेसमोर ठेवण्यात आला. या परिषदेमध्ये मसुद्यावर सर्वसाधारण ५ दिवस चर्चा करण्यात आली. या वाचनामध्ये काही दुरुस्त्या सुचवण्यात आल्या.

दुसरे वाचन

दुसऱ्या वाचन १५ नोव्हेंबर १९४८ ते १७ ऑक्टोबर १९४९ या कालावधीदरम्यान करण्यात आले. पहिल्या वाचनामध्ये ज्या दुरुस्त्या सुचवण्यात आलेल्या होत्या त्यावर चर्चा करण्यात आली.

तिसरे वाचन

तिसरे वाचन १९ नोव्हेंबर १९४९ रोजी करण्यात आले. हे एक औपचारिक वाचन होते. कारण ज्या काही दुरुस्त्या होत्या त्या दुसऱ्या वाचनादरम्यान करण्यात आलेल्या होत्या. या वाचनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेला मसुदा मान्यतेसाठी घटना समितीसमोर ठेवला.
२६ नोव्हेंबर १९४९ मध्ये घटना परिषदेकडून राज्यघटनेला मान्यता देण्यात आली.

राज्य घटना प्रत्यक्ष लागू

- २६ जानेवारी १९५० रोजी राज्य घटना प्रत्यक्ष लागू करण्यात आली. २६ जानेवारी ही तारीख निवडण्याचे कारण म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये २६ जानेवारी १९३० रोजी पूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आलेली होती.