Ads

18 May 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली आमदारकीची शपथ

विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीमध्ये १३ पैकी ४ उमेदवारांनी आपली माघार घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व नऊ अधिकृत उमेदवारांची बिनविरोध निवड झाली

📌 शपथ घेणारे सदस्य

🎇 शिवसेना 🎇

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नीलम गोऱ्हे

🎇 भाजप 🎇

गोपीचंद पडळकर
प्रवीण दटके
रणजितसिंह मोहिते-पाटील
रमेश कराड

🎇 राष्ट्रवादी 🎇

शशिकांत शिंदे
अमोल मिटकरी

🎇 काँग्रेस 🎇

राजेश राठोड

नाम व त्याचे प्रकार

·         प्रत्यक्षात असणार्‍या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला 'नाम' असे म्हणतात.

·         उदा. टेबल, कागद, पेन, साखर, अप्सरा, गाडी, खरेपणा, औदार्थ, देव, स्वर्ग, पुस्तक इ.

👉नामाचे प्रकार :

·         नामाचे एकूण 3 मुख्य प्रकार पडतात.

🛑सामान्य नाम -

·         एकाच जातीच्या पदार्थातील समान गुण धर्मामुळे त्या वस्तूचे जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला 'सामान्य नाम' असे म्हणतात.

·         उदा. मुलगा, मुलगी, घर, शाळा, पुस्तक, नदी, शहर, साखर, पाणी, दूध, सोने, कापड, सैन्य, वर्ग इ.

 

·         (सामान्य नाम हे जातीवाच असते, काही विशिष्ट नामांचेच अनेकवचन होते. मराठीमध्ये पदार्थवाचक, समुहवाचक नाम हे सामान्य नामच समजले जाते.)

🛑विशेष नाम -

·         ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास 'विशेष नाम' असे म्हणतात.

·         उदा. राम, आशा, हिमालय, गंगा, भारत, धुळे, मुंबई, दिल्ली, सचिन, अमेरिका,गोदावरी इ.

·         (विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, विशेषनामाचे अनेकवचन होत नाही आल्यास सामान्य नाम समजावे.)

·         उदा. या गावात बरेच नारद आहेत.

🛑भाववाचक नाम -

·         ज्या नामाने प्राणी किंवा वस्तु यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म, किंवा भाव यांचा बोध होतो. त्याला 'भाववाचक नाम' असे म्हणतात.

·         उदा. धैर्य, किर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद इ.

 

·         (पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिति किंवा क्रिया दाखविणार्यां नामांना भाववाचक नाम असे म्हणतात.
उदा. धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य ही क्रियेला दिलेली नावे आहेत. वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण हे शब्द पदार्थाची स्थिती दाखवितात.)

🛑अशाच पद्धतीने नामांच्या कार्यावरून त्यांचे काही नियम आहेत ते खालीलप्रमाणे-

👉नियम –

1. केव्हा-केव्हा सामान्यनाम हे विशेषनामांचे कार्य करतात.

उदा.

आत्ताच मी नगरहून आलो.

शेजारची तारा यंदा बी.ए. झाली.

वरील वाक्यामध्ये वापरली गेलेली नगर कोणतेही शहर, तारा(नक्षत्र) ही  मुळीच सामान्यनामे आहेत परंतु येथे ती विशेषनामे म्हणून वापरली गेलेली आहेत.

. 👉केव्हा-केव्हा विशेषनाम सामान्य नामाचे कार्य करतात.

उदा.

तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो.

आमचे वडील म्हणजे जमदग्नि आहेत.

आम्हाला आजच्या विधार्थ्यात सुदाम नकोत भीम हवेत.

वरील वाक्यांत कुंभकर्ण, जमदग्नि, सुदाम, भीम गे मुळची विशेषनामे आहेत.
पण येथे कुंभकर्ण अतिशय झोपाळू, जमदग्नि = अतिशय रागीट मनुष्य, सुदाम=अशक्त मुलगे व भीम=सशक्त मुलगे या अर्थाने वापरली आहेत. म्हणजे मुळची विशेषनामे वरील वाक्यांत सामान्य नामांचे कार्य करतात.

. 👉 विशेषनामाचे अनेकवचन होत नाही झाल्यास त्यांना सामान्यनाम म्हणतात.

उदा. 

आमच्या वर्गात तीन पाटील आहेत.

या गावात बरेच नारद आहेत.

माझ्या आईने सोळा सोमवारांचे व्रत केले.

विशेषनामाचे अनेकवचन होत नाही पण वरील वाक्यात विशेषनामे अनेकवचनी वापरलेली दिसतील या वाक्यातील विशेषनामे म्हणून वापरली आहेत.

कर्मवीर भाऊराव पाटील


🔵 जीवन, शिक्षण व समाजकार्य 🔵

🔺भाऊरावांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावी 22 सप्टेंबर 1887 रोजी
एका जैन कुटूंबात झाला.

🔺 त्यांचे वडिल इस्ट इंडिया कंपनीत लिपिक म्हणून नोकरीस होते.

🔺 सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय

🔺भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण कुंभोज, दहिवडी, विटे इत्यादी ठिकाणी झाले.

🔺 पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले

🔺 राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती

🔺 राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला

🔺 साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले

🔺 संस्थेचे चिन्ह बोधी व्रुक्ष आहे, याच्या खालीच सिद्धार्थ गौतमांना द्न्यानप्राप्ती झाली होती म्हणुन

🔺 सातारा जिल्ह्यातील काले या गावी दिनांक "४ ऑक्टोबर १९१९" रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.

🔺 त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला

🔺 महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. 
‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ – या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

🔺 भाऊरावांनी महाराजा सयाजीराव हायस्कूल या नावाने देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले "फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल" सुरू केले.

🔺 भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’ हे कल्पना स्वीकारून मोठे काम केले.

🔺 २५ फेब्रुवारी १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते सातार्यातील वसतिगृहाचे "श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस" असे नामकरण केले गेले.

🔺 १६ जून १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली सातार्‍यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.

🔺  १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात "छत्रपती शिवाजी कॉलेज" ची, तर  १९५४ साली कऱ्हाड येथे "सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज" ची स्थापना केली.

🔺प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली, म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले

🔺 केंद्र सरकारने पद्मभूषन पुरस्कार दिला

🔺 1959 साली पुणे विद्यापीठाने डी लिट ही पदवी दिली

🔺9 मे 1959 या दिवशी पुण्याच्या ससून रुग्णालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन झाले.

17 May 2020

अमेरिका भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार..

🔰अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दर्शवला आहे.

🔰तसेच करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार असल्याचेही सांगितले  आहे.

🔰“मला सांगायला अभिमान वाटतो की अमेरिका आमच्या मित्र देश भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार आहे. या महामारीच्या काळात आम्ही भारत आणि नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे आहोत.

🔰आम्ही करोनाविरोधात लस विकसित करण्यासाठी सहकार्य करत आहोत. त्यामुळे आम्ही एकत्र येवून या अदृश्य शत्रूचा पराभव करु” असे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

🔰तर माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, ‘वर्षाच्या अखेरीस कोविड -19 वर लस उपलब्ध होईल अशी आशा आहे.’ त्यासाठी काही अधिकारी नेमण्याची त्यांनी घोषणा केली आहे.

वर्ष 2015-2020 या कालावधीत जंगलतोडीचे प्रमाण कमी झाले.


🅾संयुक्त राष्ट्रसंघाच्या खाद्यान्न व कृषी संघटनेनी (FAO) 'ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स अॅसेसमेंट रिपोर्ट, 2020' अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी वर्ष 1990 ते वर्ष 2020 या कालावधीत 236 देश आणि प्रांतांमध्ये असलेल्या वनांच्या संबंधित स्थितीचा अभ्यास केला गेला आहे.

🧩अहवालातल्या ठळक बाबी..

🅾गेल्या 30 वर्षांत सुमारे 178 दशलक्ष हेक्टर जंगले नष्ट झाली आहेत. शाश्वत व्यवस्थापनाच्या वाढीमुळे जंगले नष्ट होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. वर्ष 2015-2020 या कालावधीमध्ये जंगले नष्ट होण्याचे प्रमाण अंदाजे 10 दशलक्ष हेक्टर (mha) पर्यंत घसरले आहे, जे वर्ष 2010-2015 या कालावधीमध्ये 12 दशलक्ष हेक्टर एवढे होते.

🅾जंगले नष्ट होण्याचे प्रमाण कालांतराने कमी झाल्याचे दिसून आले आहे. जंगले नष्ट होण्याचे प्रमाण वर्ष 1990 ते वर्ष 2000 या दशकात वार्षिक 7.8 दशलक्ष हेक्टर एवढे होते, तर हे प्रमाण वर्ष 2000 ते वर्ष 2010 या दशकात वार्षिक 5.2 दशलक्ष हेक्टर आणि वर्ष 2010 ते वर्ष 2020 या दशकात वार्षिक 4.7 दशलक्ष हेक्टर एवढे होते.

🅾जगातले एकूण वनक्षेत्र 4.06 अब्ज हेक्टर (bha) आहे, जे एकूण भूभागाच्या 31 टक्के आहे. हे क्षेत्र प्रति व्यक्ती 0.52 हेक्टर इतके आहे.

🅾जगातल्या वनक्षेत्राचे सर्वात मोठे प्रमाण उष्णकटिबंधीय (45 टक्के) आहे आणि त्यानंतर बोरियल, समशीतोष्ण आणि उपोष्णकटिबंधीय वनांचे प्रमाण आहे.जगातले 54 टक्क्यांपेक्षा जास्त वनक्षेत्र केवळ रशिया, ब्राझील, कॅनडा, अमेरिका आणि चीन या पाच देशांमध्ये आहे.

🅾खंडानुसार आकडेवारीनुसार, वर्ष 2010 ते वर्ष 2020 या कालावधीत आफ्रिकेमध्ये सर्वाधिक जंगलतोड झाली, ज्याचा दर वार्षिक 3.9 दशलक्ष हेक्टर एवढा होता. त्याच्या पाठोपाठ दक्षिण अमेरिकेचा (2.6 दशलक्ष हेक्टर) क्रमांक लागतो. या काळातच आशिय, ओशनिया आणि युरोप यात सर्वाधिक वनक्षेत्र वाढले.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

पृथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार.


🅾व्दिपकल्प - एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.

🅾 भूशीर - व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील टोक केप ऑफ गुड होप जगातील सर्वात मोठे भूशीर ओळखले जाते.

🅾 खंडांतर्गत समुद्र - मध्यभागी समुद्र व भोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला खंडातर्गत समुद असे म्हणतात.

🅾 बेट - एखाद्या भूखंडाच्या सभोवताली सर्वच बाजूने पाणीच असेल तर, असा भूखंड बेट म्हणून ओळखला जातो.

🅾 समुद्रधुनी - काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडाच्यामध्ये पसरलेला असतो. ही चिंचोळी पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते. त्याला समुद्रधुनी असे म्हणतात.

 🅾संयोगभूमी - दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी होय.

 🅾आखात - उपसागरांहूनही निमुळता असा समुद्राचा भाग तीन बाजूंनी जमिनीचे वेढला जातो तेव्हा त्यास आखात असे म्हणतात.

🅾खाडी - आखातापेक्षाही चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय.

🅾 समुद्र किंवा सागर - महासागरापेक्षा आकाराने लहान असणार्‍या खार्‍या पाण्याच्या साठयाला समुद्र किंवा सागर असे म्हणतात. सागर हे महासागराचाच भाग असतो तर, काही समुद्र हे भुवेष्टित असतात.
उदा. अरबी समुद्र, भूमध्यसमुद्र, कॅस्पियन समुद्र.

 🅾उपसागर - खार्‍या पाण्याच्या ज्या  जलाशयाला तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेले असते त्या जलाशयाला उपसागर असे म्हणतात. उपसागर हा सागरापेक्षा लहान असतो. उदा. बंगालचा उपसागर नाही

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

अटल पेन्शन योजना

🅾  सुरुवात - 1 जून 2015
 
🅾असंघटित क्षेत्रातील कामगार, शेतकरी, शेतमजुर, दारिद्र्यरेषेखालील लोकांना वृद्धापकाळातील आयुष्य सुखकर आणि समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना.
 
🅾राष्ट्रीय पेन्शन पद्धतीव्दारे संचलित ही योजना आहे. शिवाय पेन्शन निधी विनियम आणि विकास प्राधिकरणाव्दारे नियमित केले जाते.
 
🅾पेन्शनधारकाला वयाच्या 60 व्या वर्षापासून पेन्शन मिळणार आहे. ही योजना कायम चालू राहील, मात्र पाच वर्षांनंतर सरकार कोणतीही रक्कम भरणार नाही.
 
🅾या योजनेत 18 ते 40 वर्षाची कोणीतीही व्यक्ति सामील होऊ शकते.
 
🅾ही योजना सर्व बचत बँक खातेदारांसाठी खुली आहे. वर्गणी ही पेन्शनधारकाच्या वयानुसार राहणार आहे.
 
🅾वर्गणीदाराने कमीतकमी 20 वर्षे योजनेत पैसे भरले पाहिजेत.
 
🅾या योजनेतून 60 वर्षाच्या आत बाहेर पडता येणार नाही, (अपवादात्मक परिस्थितीत वर्गणीदाराचा आकस्मिक किंवा आजाराने मृत्यू झाल्यास.)

🧩योजनेचे फायदे:-

🅾जे वर्गणीदार 18 ते 40 या वयोगटात वर्गणी भरत आहेत, त्यांच्या वर्गणीच्या प्रमाणात कायमस्वरूपी एक हजार ते पाच हजार प्रतिमाह पेन्शन मिळेल.
 
🅾या योजनेत केंद्र सरकार कमीत-कमी एक हजार किंवा वार्षिक वर्गणीच्या 50% रक्कम जमा करणार आहे.
 
🅾ही रक्कम सरकार 2015-16 ते 2019-20 या आर्थिक वर्षासाठी खात्यावर जमा करेल.
 
🅾सरकार ही रक्कम फक्त अशा वर्गणीदारांना देईल, जे इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत सामील नाहीत.
 
🅾वर्गणीदाराला त्याच्या वर्गणीच्या प्रमाणात 1000, 2000, 3000, 4000, 5000 रुपयांची पेन्शन कायमस्वरूपी वयाच्या 60 वर्षापासून मिळेल.
 
🅾अटल पेन्शन योजनेतील वर्गणीदाराच्या वारसांनाही लाभ मिळणार आहे.
 
🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

राज्यसेवा प्रश्नसंच

1) खालीलपैकी कोणते विधान विंध्य प्रणालीला लागू पडत नाही  ?
   1) विंध्य प्रणाली अग्निजन्य खडकांनी बनलेली आहे.
   2) तीची खोली 4000 मीटरपेक्षा जास्त आहे.
   3) या प्रणालीने गंगेचे मैदान व दख्खनचे पठार वेगळे होतात.
   4) ही प्रणाली तांबडया वाळुकाश्मासाठी प्रसिद्ध आहे.
उत्तर :- 1

2) श्रीनगर, लेह व जम्मू एकमेकांना जोडल्या गेल्यास जवळपास कशी आकृती निघेल ?
  
1) समभूज त्रिकोण   
2) काटकोन त्रिकोण   
3) सरळ रेषा     
4) वरीलपैकी कोणतीही  नाही
उत्तर :- 2

3) खालील विधाने भारतातील हिवाळयातील स्थिती वर्णन करतात.
  
अ) उत्तर भारतात कमी तापमान असते.   
ब) उत्तर भारतात उच्च दाब असलेला विभाग असतो.
क) हवेचा दाब उत्तरेकडे कमी होत जातो.   
ड) वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात.
   वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
1) अ, ब, क    2) अ, क, ड   
3) अ, ब, ड    4) फक्त क
उत्तर :- 3

4) ......................... हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.
1) जोग             2) नायगारा   
3) कपिलधारा    4) शिवसमुद्र
उत्तर :- 1

5) गुजरात राज्यातील गिर अभयारण्य हे .......................... साठी राखून ठेवण्यात आलेले आहे.
1) वाघ      2) हत्ती     
3) सिंह      4) गेंडा
उत्तर :- 3

6) जम्मू व काश्मिर या राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प ....................... या नदीवर आहे.
1) रावी       2) बियास   
3) चिनाब    4) व्यास
उत्तर :- 3

7) जमशेदपूर हे औद्योगिक शहर .......................... या नदीवर वसले आहे.
1) महानदी       2) सोन     
3) सुवर्णरेखा    4) गंगा
उत्तर :- 3

8) .................... हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे.
   1) दिल्ली ते आग्रा       2) मुंबई ते ठाणे
   3) हावडा ते खडकपूर 4) चेन्नई ते रेनीगुंठा
उत्तर :- 2

9) भारतात चहा उत्पादनात ...................... राज्याचा प्रथम क्रमांक आहे.
1) आसाम    2) बिहार     
3) महाराष्ट्र    4) ओरिसा
उत्तर :- 1

10) खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत  ?
   1) ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे.
   2) अशा विहीरी नैसर्गिक तेल पुरवतात.
   3) या विहीरी नैसर्गिक वायू पुरवतात.
   4) वरील कोणतेही नाही.
उत्तर :- 4

11) नियोजन आयोगाच्या मते, “सार्वजनिक बचतीत वाढ होऊन अत्यावश्यक सार्वजनिक गुंतवणूक अल्प राजकोषीय तुटीतून साध्य होईल की मध्यमकालीन राजकोषीय धोरणाचे उद्दिष्ट होते. सुधारणांचा हा भाग दुर्देवाने कधीच अंमलात आला नाही.” याचे कारण म्हणजे 
  
अ) मोठे सार्वजनिक कर्ज     
ब) उच्च व्याज दर
क) ऋण (उणे) सार्वजनिक बचती   
ड) जागतिकीकरण
1) अ आणि क    2) फक्त ब   
3) ब आणि ड     4) अ, ब आणि क
उत्तर :- 1

12) मागील काही वर्षात देशातील एकूण सकल उत्पादनाच्या तुलनेत भांडवली खर्चाचा टक्का......होता
1) सतत घसरला      2) अचल राहिला   
3) सातत्याने वाढला  4) कुठलाही स्पष्ट आलेख नाही
उत्तर :- 1

13) सार्वजनिक खर्चाचे योजनाबाह्य खर्च आणि योजना अंतर्गत खर्च असे वर्गीकरण कुठल्या सालापासून सुरू झाले  ?
1) 1987 – 88    2) 1982 -86   
3) 1991 – 92    4) 2000 – 2001
उत्तर :- 1

14) भारतात 2009 -10 मध्ये सार्वजनिक खर्चाचे प्रमाण जी. डी. पी. च्या किती टक्के होते ?
1) 17.2 टक्के    2) 25.6 टक्के   
3) 15.3 टक्के    4) 29.1 टक्के
उत्तर :- 4

15) 1987 – 1988 नंतर सार्वजनिक खर्चाचे कोणते वर्गीकरण अंमलात आले ?
  
अ) नागरी खर्च आणि संरक्षण खर्च     
ब) नियोजित खर्च आणि अनियोजित खर्च
क) अनुदाने व बिगर अनुदाने खर्च     
ड) महसूली व भांडवली खर्च
         दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.
1) अ आणि ब    2) ब फक्त   
3) ब आणि क    4) ड फक्त
उत्तर :- 2

16) सार्वजनिक खर्चासंबंधी खालील बाबी विचारात घ्या.
   अ) असा खर्च आर्थिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यास मदत करतो.
   ब) प्रादेशिक समतोल विकास साध्य करण्यात सहाय्य.
   क) ग्रामीण भागात विद्युतीकरणाच्या सोयी उभारण्यात मदत.
   ड) व्यवहारतोल सुधारण्यात सहाय्यभूत
        वरीलपैकी कोणत्या बाबी आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत मदत करतात ?
1) अ, ब आणि ड    2) ब, क आणि ड   
3) अ, ब आणि क    4) अ आणि ब फक्त
उत्तर :- 3

17) “सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिध्दांत” कोणी मांडला ?
  
1) प्रो. पिकॉक व प्रो. वाईजमन   
2) प्रो. पिगु
3) डॉ. मार्शल       
4) वरीलपैकी कोणतेही नाही
उत्तर :- 1

18) खालीलपैकी कोणती कार्ये सार्वजनिक आयव्ययाची आहेत ?
  
अ) संसाधनांची वाटणी   
ब) उत्पन्न विभाजन
क) स्थिरीकरण कार्ये   
ड) खाजगी वस्तुंचा पुरवठा
        दिलेल्या पर्यांयापैकी योग्य पर्याय निवडा :
1) अ फक्त              2) ब आणि क   
3) अ, ब आणि क    4) वरील सर्व
उत्तर :- 3

19) जेव्हा सार्वजनिक खर्चामध्ये घट करून चलन वाढीवर नियंत्रण ठेवले जाते, तेव्हा त्या उपायाला काय म्हणतात ?
  
1) राजकोषीय धोरणाचा उपाय   
2) द्रव्यविषयक धोरणाचा उपाय
3) व्यापारी धोरणाचा उपाय   
4) कर विषयक धोरणाचा उपाय
उत्तर :- 1

20) खालीलपैकी कोणता भारताच्या केंद्रशासनाच्या भांडवली खर्चाचा भाग नाही ?
  
1) संरक्षणावरील खर्च   
2) सामाजिक आणि सामुहिक विकासावरील खर्च
3) व्याजाचा भरणा   
4) सर्वसाधारण सुविधांवरील खर्च
उत्तर :- 3

21) मोबाईल फोन कंपनाची वारंवारता किती असते.
 
1) 130 ते 180 Hz   
2) 150 ते 200 Hz   
3) 80 ते 100 Hz   
4) 180 Hz पेक्षा जास्त
उत्तर :- 1

22) अ) जो पदार्थ दुस-या पदार्थाला प्रोटॉन देतो तो म्हणजे आम्लारी होय.
    ब) जो पदार्थ दुस-या पदार्थाकडून प्रोटॉन घेतो तो म्हणजे अम्ल होय.
          वरील विधानांपैकी अयोग्य विधान / विधाने कोणते ?
1) फक्त अ            2) फक्त ब   
3) दोन्ही अ व ब    4) दोन्हीही नाही
उत्तर :- 3

23) खालीलपैकी अचूक विधाने निवडा.
   अ) प्रद्रव्यपटल आणि केंद्रकामधील या तरल पदार्थाला पेशीद्रव्य म्हणतात.
   ब) अमिनो आम्ले, ग्लुकोज, जीवनसत्त्वे इ. महत्त्वाच्या पदार्थांची साठवण पेशीद्रव्य करते.
   क) वनस्पती पेशीमधील पेशीद्रव्य प्राणी पेशीमधील पेशी द्रव्यापेक्षा अधिक कणयुक्त आणि दाट असते.
   ड) वरील सर्व विधाने अचूक आहे.
1) अ, ब    2) अ, क     
3) ड         4) ब, क
उत्तर :- 3

24) माध्यमातील ध्वनीचा वेग खालीलपैकी कोणत्या घटकांवर अवलंबून असतो ?
1) आयात        2) ध्वनितरंग   
3) वारंवारता    4) माध्यमाचे स्वरूप
उत्तर :- 4

25) ज्या आम्लारीचे पाण्यात पूर्णत: विचरण होत नाही त्यांना ....................... असे म्हणतात.
1) सौम्य आम्ल        2) तीव्र आम्ल   
3) सौम्य आम्लारी    4) तीव्र आम्लारी
उत्तर  :- 3

26) वटवाघूळ आकाशात उडताना मार्गातील अडथळे कोणत्या लहरींव्दारे ओळखते ?
1) श्रव्यातील ध्वनी   
2) अश्रव्यातील ध्वनी   
3) अवश्राव्य ध्वनी   
4) यापैकी नाही
उत्तर :- 4

27) ‘मिथिल अमाईन’ हे आम्लारी असून ते आम्लारीच्या कोणत्या प्रकारात मोडते ?
  
1) तीव्र आम्लारी     
2) सौम्य आम्लारी     
3) दोन्ही तीव्र व सौम्य आम्लारी   
4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 1

28) खालील विधानांचा विचार करा.
   अ) गॉल्गी संकुल हे पेशीतील स्त्रावी अंगक आहे.
   ब) गॉल्गी संकुल मेदरेणूंची निर्मिती करतात.
   क) गॉल्गी संकुल रिक्तीका व पीटिकांची निर्मिती करते.
   ड) पेशी भित्तीका, लयकारिका यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावते.
1) अ, ब, क सत्य    2) सर्व सत्य   
3) अ, क, ड सत्य    4) अ, ड सत्य
उत्तर :- 3

29) RADAR म्हणजे काय ?
  
1) Range and detection Avoid Radiowaves     
2) Radio Detection and Ranging
3) Radio And Determine Applicated Range     
4) None of the above
उत्तर :- 2

30) ज्या आम्लारीचे पाण्यात पूर्णत: ‍विचरण होते त्यांना ........................ असे म्हणतात.
1) तीव्र आम्ल        2) सौम्य आम्ल   
3) तीव्र आम्लारी    4) सौम्य आम्लारी
उत्तर :- 1

अम्फान चक्रीवादळ

◾️ पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील काही दिवसांमध्ये भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांच्या किनारी भागाला अम्फान (Amphan) चक्रीवादळाचा फटका बसू शकतो असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

◾️देशातील आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या वादाळाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

◾️शनिवारी (१६ मे २०२०)
अंदमान-निकोबारसहीत लक्षद्वीपमध्ये चक्रवादळासहीत जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

◾️याचबरोबर ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील काही भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

◾️बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तयार झालेल्या अम्फान चक्रवादळाचा सर्वाधिक फटका पूर्वेकडी राज्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी दक्षिण, पश्चिम आणि उत्तरेकडील काही भागांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस येण्याची दाट शक्यता आहे.

◾️काही भागामध्ये धुळीची वादळेही उठतील असं अंदाज वर्तवण्यात येत आहे.
_________________________________