10 April 2022

राष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती

राष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती

भारतीय संसद ही लोकसभा व राज्यसभा व राष्ट्रपती मिळून तयार झालेली आहे. भारतीय घटनेच्या कलम 52 मध्ये भारताला एक राष्ट्रपती असेल असे स्पष्ट म्हटलेले आहे.
भारतीय लोकशाही पद्धतीमध्ये दुहेरी स्थान शासन व्यवस्था दिसून येते. यामध्ये केंद्राचा कारभार हा संसदेमार्फत चालतो. तर घटक राज्याचा कारभार हा राज्य विधीमंडळामार्फत चालतो.
परंतु या दोन्ही प्रकारच्या राजकीय सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रपती हे पद संविधानाने तयार केलेले आहे.

भारताचे राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च परंतु नामधारी शासन प्रमुख आहेत. देशातील सर्व राज्यकारभार हा राष्ट्रपतीच्या नावाने चालतो. संसदेचा प्रत्येक कायदा राष्ट्रपतीच्या सहिने तयार होत असतो.
राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक म्हणून ओळखले जातात. या राष्ट्रपतीला 26 जानेवारीच्या दिवशी मनवंदना स्वीकारण्याचा अधिकार आहे.
राष्ट्रपती हे पद अतिशय जबाबदारीचे असल्यामुळे राष्ट्रपतीला काही घटनात्मक विशेष अधिकार देखील देण्यात आलेले आहेत.
राष्ट्रपती हा तिन्ही दलांचा सर सेनापती असून घटक राज्याच्या राज्यकारभारावर देखील राज्यपालाच्या मार्फत त्याचे नियंत्रण असते. असे असले तरी भारताचे राष्ट्रपती हे इंग्लंडच्या राजाप्रमाणे वंश परंपरेने सत्तेवर येत नाही किंवा अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाप्रमाणे भारताचे राष्ट्रपतीपद तयार केलेले नाही.
अमेरिकेमध्ये राष्ट्रपती हे वास्तविक शासन प्रमुख आहे. तर भारतात राष्ट्रपती हे नामधारी शासनप्रमुख आहेत.
भारताच्या राष्ट्रपतीपदाची परंपरा ही अतिशय महत्वाची आहे.
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. बाबू राजेंद्र प्रसाद तर 11 वे राष्ट्रपती के.आर. नारायणन तर बारावे राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम होते.
तेराव्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व चौदावे राष्ट्रपती म्हणून प्रवण मुखर्जी हे कार्यरत आहेत.
पात्रता –

भारतीय घटना कलम 1951-56 (84-अ) च्या कलमानुसार

ती व्यक्ती भारताची नागरिक असावी.
त्या व्यक्तीने वयाची 35 वर्षे पूर्ण केली असावी.
त्याचे नाव देशाच्या कोणत्याही मतदार यादीत असणे आवश्यक आहे.
ती व्यक्ती लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावी.
संसदेने वेळोवेळी कायदा करून विहित केलेल्या अटी त्या व्यक्तीने पूर्ण केलेल्या असाव्यात.
अपात्रता –

भारतीय घटना कलम 1951-56 (84-अ) च्या कलमानुसार

ती व्यक्ती सरकारी नोकर असल्यास.
ती व्यक्ती सरकारी लाभ प्राप्त करणारी असल्यास.
ती व्यक्ती वेडी किंवा दिवाळखोर असल्यास.
ती व्यक्ती न्यायालयाने एखाद्या गुन्ह्यासाठी शिक्षा सुनावलेली असल्यास.
त्या व्यक्तीची परदेशाशी निष्ठा असल्यास.
निवडणूक

राष्ट्रपतीपद हे अतिशय महत्वाचे असल्यामुळे भारतीय घटनेच्या कलम 54 व 55 नुसार राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत ठरवून दिलेली आहे.
राष्ट्रपतीची निवड ही जनतेच्या प्रतिनिधीमार्फत एकलसंक्रमणीय पद्धतीनुसार होत असते.
कार्यकाल

भारतीय संविधानाच्या घटना कलम 83 नुसार राष्ट्रपतीचा कार्यकाल हा पाच वर्षाचा निश्चित केला आहे.
राष्ट्रपती पदाची मुदत पाच वर्षाची असली तरी मुदतपूर्व राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देऊ शकतो.
याशिवाय त्याने घटनेचा भंग केला असेल किंवा घटनाविरोधी कृत्य केले असेल अशा परिस्थितीत राष्ट्रपतीवर संसदेमध्ये महाभियोगाचा खटला चालविला जातो व हा महाभियोगाचा खटला सिद्ध झाल्यास राष्ट्रपतीला आपल्या पदाचा त्याग करावा लागतो.
एक व्यक्ती राष्ट्रपतीपदासाठी किमान दोन वेळा निवडणूक लढवू शकते.
वेतन, भत्ते व सुविधा

राष्ट्रपतीला दरमहा 1,50,000 रु. वेतन प्राप्त होते.
त्याशिवाय त्याच्या पदाला साजेल व शोभेल अशा सर्व सुविधांनी युक्त राष्ट्रपती भवन हे निवासस्थान प्राप्त होते.
कार्यकालीन कामांसाठी देशी विदेशी प्रवास हा देखील मोफत असतो.
एकदा निश्चित झालेले वेतन कोणी कमी करू शकत नाही.
आर्थिक आणीबाणी लागू केली तर तेव्हा मात्र त्यांच्या वेतनात कपात होऊ शकते.
निवृत्त वेतन प्राप्त करण्याचा अधिकार आहे.    
राष्ट्रपतीचे कार्ये व अधिकार

भारताचे राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च परंतु नामधारी शासनप्रमुख असतात. भारतीय संविधानाने राष्ट्रपतीला काही विशेष अधिकार दिलेले आहेत.
भारतीय राज्यघटनेत कलम 47 मध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की, मंत्रीमंडळाने दिलेल्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आपले कार्ये पार पाडतील साधारणत: राष्ट्रपतीला पुढील कार्ये पार पाडावी लागतात.
कार्यकारी अधिकार –

राष्ट्रपती पंतप्रधनाची नेमणूक करतो व पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांची नेमणूक करतो.
संसदेने केलेल्या सर्व कायद्याची अंमलबजावणी राष्ट्रपती करतो.
राष्ट्रपती वरिष्ठ शासकीय अधिकार्‍यांच्या नेमणुका करतो. यामध्ये प्रामुख्याने महालेखापाल, महान्यायवादी, निवडणूक आयुक्त केंद्रीय लोकसेवेचे अध्यक्ष व सभासद बँकेचे गव्हर्नर, राज्यपाल इ.
संरक्षणाच्या तिन्ही दलांचा सरसेनापती असल्यामुळे सैन्यातील प्रमुख अधिकार्‍यांच्या नेमणुका करतो.
देशातील सर्व प्रकराचे राजकीय व सामाजिक उत्सवांच्या प्रसंगी प्रमुख मनाचे सर्वश्रेष्ठ पद भूषवतो.
कायदेविषयक अधिकार –

वर्षातून किमान 2 वेळा संसदेचे अधिवेशन बोलवतो.
लोकसभा व राज्यसभा यांच्यात मतभेद झाल्यास संयुक्त अधिवेशन बोलवतो.
प्रत्येक वर्षाच्या सुरूवातीला संसदेपुढे अभिभाषण करतो व शासकीय ध्येयधोरण स्पष्ट करतो.
संसदेच्या दोन्ही सभागृहात काही सदस्यांची नेमणूक करू शकतो.
संसदेने पास केलेल्या प्रत्येक विधेयकाला राष्ट्रपतीची संमती घ्यावी लागते.
अर्थविषयक अधिकार –

राष्ट्रपतीची पूर्वसंमती घेतल्याशिवाय कोणतेही अर्थविधेयक संसदेपुढे मांडता येत नाही.
पुरवणी अंदाजपत्रक संसदेपुढे मांडण्याची मांडण्याची व्यवस्था राष्ट्रपती करतो.
राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय सरकारला संसदेकडे अनुदानाची मागणी करता येत नाही.
देशाच्या संचित निधिवर राष्ट्रपतीचे नियंत्रण असते.
केंद्र सरकार आणि घटकराज्य सरकार यांच्यातील करविषयक उत्पन्नाची वाटणी राष्ट्रपती करतो.
देशामध्ये नवीन कर लादण्याविषयीचे किंवा कमी करण्याविषयीचे विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय लोकसभेत मांडता येत नाही.
न्यायविषयक अधिकार –

भारतीय घटनाकलम 124 नुसार राष्ट्रपती सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करतो.
न्यायालयाच्या एखाद्या व्यक्तिला शिक्षा केल्यास त्याची शिक्षा कमी करण्याचा, रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे.
राष्ट्रपतीला विशिष्ट घटनेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला विचारण्याचा अधिकार आहे.
सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर महाभियोगाचा खटला सिद्ध झाल्यास त्याला पदच्युत करतो.
आणीबाणीविषयक अधिकार –

भारतीय घटनेच्या 18 व्या भागात कलम 352-360 मध्ये आणीबाणी विषयक तरतुदी दिल्या आहेत.
घटना कलम 352 नुसार बाह्य आक्रमण किंवा युद्धाच्या परिस्थितीत राज्याची सुरक्षितता धोक्यात आल्यास राष्ट्रपती आणीबाणी घोषित करतो.
घटना कलम 356 नुसार एखाद्या घटकराज्यांत राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यास राष्ट्रपती तेथे आणीबाणी घोषित करतो.
घटना कलम 360 नुसार संपूर्ण देशात किंवा विशिष्ट घटकराज्यात आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्यास राष्ट्रपती तेथे आणीबाणी घोषित करतो.
राष्ट्रपतीवरील महाभियोग –

राष्ट्रपतीने घटनेच भंग केला असेल किंवा घटनाविरोशी कृत्य केले असेल तर त्याला बडतर्फ करण्याचा अधिकार संसदेला आहे.
राष्ट्रपतीवर महाभियोग प्रक्रिया 61 व्या कलमात संगीतलेली आहे.
संसदेच्या कोणत्याही एका सभागृहात राष्ट्रपतीने घाटना भंग केल्याचा ठराव प्रथम मांडावा लागतो.
हा ठराव लोकस्वरुपाचा असावा लागतो व सभागृहातील किमान 1/4 (25%) सभासदांची त्याला संमती असावी लागते.
ठराव मांडण्यापूर्वी राष्ट्रपतीला आरोपासंबंधी 14 दिवस अगोदरची सूचना राष्ट्रपतीला द्यावी लागते.
या ठरावावर सभागृहात चर्चा होऊन सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या 2/3 बहुमताने तो ठराव मंजूर झाला पाहिजे आरोप बहुमताने सिद्ध न झाल्यास तो ठराव तेथेच रद्द होतो.
एक सभागृहाने आरोपपात्र ठेवल्यानंतर दुसर्‍या सभागृहात त्याची चौकशी होते. सभागृहातील चर्चेच्या वेळी स्वत: किंवा आपल्या प्रतींनिधीमार्फत आपली बाजू मांडू शकतो तसा घटनेत राष्ट्रपतीला अधिकार आहे.
दुसर्‍या सभागृहाने एकुण सभासदाच्या 2/3 बहुमताने आरोप सिद्ध केल्यास त्या दिवसापासून राष्ट्रपती पदच्युत होतात.
राष्ट्रपतीपदाचे महत्व –

भारतीय संसदीय शासन पद्धतीमध्ये लोकसभा, राज्यसभा, आणि राष्ट्रपती मिळून संसद तयार झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य घटक म्हणून ओळखला जातो.
भारतीय घटना कलम 52 मध्ये भारताला एक राष्ट्रपती असेल असा स्पष्ट उल्लेख केले आहे.

राष्ट्रपती भारतीय संविधानामध्ये अतिशय महत्वाचे स्थान आहे.
राष्ट्रपती हे पद देशाचे सर्वात श्रेष्ठ अधिकारपद आहे. राष्ट्रपतीचे घटनात्मक स्थान अतिशय उच्च दर्जाचे आहे. घटनेने राष्ट्रपतीला सर्वोच्च पद देऊन त्याला व्यापक प्रमाणावर अधिकार दिले आहे.
राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख असल्याने त्याला अनेक प्रकारची कार्ये पार पडावी लागतात. अनेक प्रकारचे अधिकार राष्ट्रपतीला प्राप्त होतात.
भारतीय शासन व्यवस्थेने दोन प्रमुख आहेत एक नामधारी प्रमुख तर एक वास्तविक प्रमुख आहे. राष्ट्रपती हा नामधारी व प्रंतप्रधान हा वास्तविक शासनप्रमुख आहे.
राष्ट्रपती स्वेच्छेने आपल्या अधिकाराच्या जोरावर आणीबाणी जाहीर करू शकतो.
राष्ट्रपती स्वअधिकाराच्या जोरावर गुन्हेगाराला दयरा दाखवून त्याची शिक्षा स्थगित करू शकतो किंवा कमी करू शकतो.

_________________________________

विधानसभेबद्दल संपूर्ण माहिती

विधानसभेबद्दल संपूर्ण माहिती

घटना कलम क्र. 170 मध्ये प्रत्येक घटकराज्यासाठी एक विधानसभा असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा हे कनिष्ठ परंतू अधिकाराच्या बाबतीत श्रेष्ठ सभागृह समजले जाते तर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून अधिकाराच्या बाबतीत

विधानसभेची रचना :

170 व्या कलमात सांगितल्याप्रमाणे विधानसभेत 60 व जास्तीत जास्त 500 सभासद असतात.

राखीव जागा :

घटना कलम क्र. 332 मध्ये सांगितल्याप्रमाणे अनुसूचीत जाती जमातीसाठी महाराष्ट्रामध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचीत जातींसाठी 33 तर अनुसूचीत जमातीसाठी 14 राखीव जागा आहेत.

निवडणूक : प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते.

उमेदवारांची पात्रता :

तो भारताचा नागरिक असावा.
त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी.
संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.
सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष इतका असतो.

गणसंख्या : 1/10

अधिवेशन : दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

सभापती व उपसभापती :

विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्‍या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.

सभापतीचे कार्य आणि अधिकार :

विधानसभेत मांडण्यात येणार्‍या प्रस्तावाला संमती देणे.
विधानसभेत शांतता व सुव्यवस्था राखणे.
सभागृहात एखाद्या विषयावर समान मते पडल्यास आपले निर्णायक मत देणे.
जनविधेयक आहे की नाही ते ठरविणे.
जनरल माहिती :

धनविधेयक प्रथम विधानसभेत मांडतात.
धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सभापतीला आहे.
धनविधेयकाला विधानपरिषदेने 14 दिवसाच्या आत मान्यता द्यावी लागते. काहीच न कळवल्यास तीला ते मान्य आहे असे समजले जाते.
मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.
घटकराज्यांचे मंत्रीमंडल संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते.
मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.
मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री भूषवितो.
स्वातंत्र्य भारताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते.

विज्ञानातील संशोधक व त्यांनी लावलेले शोध

विज्ञानातील संशोधक व त्यांनी लावलेले शोध

क्र. संशोधक शोध
1. सापेक्षता सिद्धांत आईन्स्टाईन
2. गुरुत्वाकर्षण न्यूटन
3. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट आईन्स्टाईन
4. किरणोत्सारिता हेन्री बेक्वेरेल
5. क्ष-किरण विल्यम रॉटजेन
6. डायनामाईट अल्फ्रेड नोबेल
7. अणुबॉम्ब ऑटो हान
8. प्ंजा सिद्धांत मॅक्स प्लॅक
9. विशिष्टगुरुत्व आर्किमिडीज
10. लेसऱ टी.एच.मॅमन
11. रेडिअम मेरी क्युरी व पेरी क्यूरी
12. न्युट्रॉन जेम्स चॅड्विक
13. इलेक्ट्रॉन थॉम्पसन
14. प्रोटॉन रुदरफोर्ड
15. ऑक्सीजन लॅव्हासिए
16. नायट्रोजन डॅनियल रुदरफोर्ड
17. कार्बनडाय ऑक्साइड रॉन हेलमॉड
18. हायड्रोजन हेन्री कॅव्हेंडिश
19. विमान राईट बंधू
20. रेडिओ जी.मार्कोनी
21. टेलिव्हिजन जॉन बेअर्ड
22. विजेचा दिवा,ग्रामोफोन थॉमस एडिसन
23. सेफ्टी लॅम्प हंप्रे डेव्ही
24. डायनामो मायकेल फॅराडे
25. मशीनगन रिचर्ड गॅटलिंग
26. वाफेचे इंजिन

वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग

वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग

शास्त्रीय नाव मराठी नाव  उपयोग
रेडीमीटर रेडीमीटर उत्सर्जित शक्ती मोजणारे उपकरण
टॅकोमीटर विमानगतीमापक विमान व मोटारबोटींची गतिमानता मोजणारे उपकरण
सॅलिंनोमीटर क्षारमापक क्षार द्रावणाची घनता मोजणारे उपकरण
डायनॅमो जनित्र विद्युत निर्मितीसाठी उपयुक्त उपकरण
अॅमीटर वीजमापी  विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण
कॅलोरीमीटर उष्मांक मापक   उष्मांक मोजणारे उपकरण
हायड्रोमीटर    जलध्वनी मापक पाण्यातील आवाजाची तीव्रता मोजणारे साधन
फोटोमीटर प्रकाशतीव्रता मापी प्रकाशाची तीव्रता मोजू शकणारे उपकरण
मायक्रोफोन मायक्रोफोन आवाज लहरींचे विद्युत लहरीत रूपांतर करून वर्धन करणारे उपकरण
रडार रडार विमानतळाकडे येणार्‍या विमानांची दिशा दाखवणारे व अंतर मोजणारे उपकरण
पायरो मीटर उष्णतामापक 500′ सेंटीग्रेडपेक्षा जास्त तापमान दूर अंतरावरून मोजू शकणारे उपकरण
कार्डिओग्राफ हृदयतपासणी हृदयाची जागरूकता आजमावणारे उपकरण
बॅरोमीटर वायुभारमापन वातावरणातील हवेचा दाब मोजणारे यंत्र
लॅक्टोमीटर दूधकाटा  दुधाची सुद्धता व पाण्याचे प्रमाण मोजू शकणारे उपकरण
स्फिरोमीटर गोलाकारमापी पृष्ठभागाची वक्रता मोजणारे उपकरण
फोनोग्राफ फोनोग्राफ आवाज लहरी निर्माण करणारे यंत्र
मॅनोमीटर वायुदाबमापक  वायुदाब मोजू शकणारे उपकरण
सॅकरीमिटर शर्करामापी रासायनिक द्रव्यातील साखरेचे प्रमाण मोजणारे उपकरण
ऑडिओमीटर ध्वनीमापक    आवाजाची तीव्रता मोजणारे उपकरण
क्रोनोमीटर वेळदर्शक आगबोटीवर वापरले जाणारे घड्याळ
टेलिस्कोप दूरदर्शक  आकाशस्थ ग्रह गोल बघण्याकरिता उपयुक्त
कार्ब्युरेटर कार्ब्युरेटर  वाहनात पेट्रोल, वाफ व हवेचे मिश्रण करणारे उपकरण
अॅनिओमीटर वायुमापक वार्‍याचा वेग व दिशामापक उपकरण
स्टेथोस्कोप स्टेथोस्कोप हृदयातील व फुफ्फुसाची माहिती पुरविणे
अल्टिमीटर विमान उंचीमापक विमानात वापरले जाणारे ऊंची मोजण्याचे यंत्र
स्पेक्ट्रोमीटर वर्णपटमापक एका पदार्थातून दुसर्‍या पदार्थात सूर्यकिरण जाताना त्याचा वक्रीभवन कोन मोजणारे उपकरण
टेलिप्रिंटर टेलिप्रिंटर संदेश टाईपरायटरवर टाईप करू शकणारे स्वयंचलित यंत्र
सिस्मोग्राफ भूकंपमापी भूकंपाची तीव्रता मोजू शकणारे यंत्र
थर्मामीटर तापमापक उष्णतेचे प्रमाण मोजणारे उपकरण
कॅलक्युलेटर गणकयंत्र अगोदर पुरविलेल्या माहितीच्या आधारे अत्यंत गुंतागुंतीची गणितीय प्रश्न क्षणार्धात सोडवणारे यंत्र
युडीऑमीटर युडीऑमीटर रासायनिक क्रिया होत असताना वायूच्या

विज्ञान व विषयशाखा,विज्ञानातील संशोधक व त्यांनी लावलेले शोध

विज्ञान व विषयशाखा

1.मीटिअरॉलॉजीहवामानाचा अभ्यास
2.अॅकॉस्टिक्सध्वनीचे शास्त्र
3.अॅस्ट्रोनॉमीग्रहतार्‍यांचा अभ्यास
4.जिऑलॉजीभू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास
5.मिनरॉलॉजीभू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास
6.पेडॉगाजीशिक्षणविषयक अभ्यास
7.क्रायोजेनिक्सअतिशय कमी तापमानाच्या निर्मिती, नियंत्रण व उपयोगाचे शस्त्र
8.क्रिस्टलोग्राफीस्फटिकांचा अभ्यास
9.मेटॅलर्जीधातूंचा अभ्यास
10.न्यूरॉलॉजीमज्जसंस्थेचा अभ्यास
11.जेनेटिक्सअनुवंशिकतेचा अभ्यास
12.सायकॉलॉजीमानवी मनाचा
 

______________________________



विज्ञानातील संशोधक व त्यांनी लावलेले शोध


क्र.संशोधकशोध1.सापेक्षता सिद्धांतआईन्स्टाईन2.गुरुत्वाकर्षणन्यूटन3.फोटोइलेक्ट्रिक इफेक्टआईन्स्टाईन4.किरणोत्सारिताहेन्री बेक्वेरेल5.क्ष-किरणविल्यम रॉटजेन6.डायनामाईटअल्फ्रेड नोबेल7.अणुबॉम्बऑटो हान8.प्ंजा सिद्धांतमॅक्स प्लॅक9.विशिष्टगुरुत्वआर्किमिडीज10.लेसऱटी.एच.मॅमन11.रेडिअममेरी क्युरी व पेरी क्यूरी12.न्युट्रॉनजेम्स चॅड्विक13.इलेक्ट्रॉनथॉम्पसन14.प्रोटॉनरुदरफोर्ड15.ऑक्सीजनलॅव्हासिए16.नायट्रोजनडॅनियल रुदरफोर्ड17.कार्बनडाय ऑक्साइडरॉन हेलमॉड18.हायड्रोजनहेन्री कॅव्हेंडिश19.विमानराईट बंधू20.रेडिओजी.मार्कोनी21.टेलिव्हिजनजॉन बेअर्ड22.विजेचा दिवा,ग्रामोफोनथॉमस एडिसन23.सेफ्टी लॅम्पहंप्रे डेव्ही24.डायनामोमायकेल फॅराडे25.मशीनगनरिचर्ड गॅटलिंग26.वाफेचे इंजिनजेम्स वॅट27.टेलिफोनअलेक्झांडर ग्राहम बेल28.थर्मामीटरगॅलिलिओ29.सायकलमॅक मिलन30.अणू भट्टीएन्रीको फर्मी31.निसर्ग निवडीचा सिद्धांतचार्ल्स डार्विन32.अनुवंशिकता सिद्धांतग्रेगल मेंडेल33.पेनिसिलीनअलेक्झांडर फ्लेमिंग34.इन्शुलीनफ्रेडरिक बेंटिंग35.पोलिओची लससाल्क36.देवीची लसएडवर्ड जेन्नर37.अॅंटीरॅबिजलस लुई पाश्चर38.जीवाणूलिवेनहाँक39.रक्तगटकार्ल लँन्डस्टँनर40.मलेरियाचे जंतूरोनाल्ड रॉस41.क्षयाचे जंतूरॉबर्ट कॉक42.रक्ताभिसरणविल्यम हार्वे43.हृदयरोपणडॉ. ख्रिश्चन बर्नार्ड44.डी.एन.ए.जीवनसत्वेवॅटसन व क्रीक45.जंतूविरहित शस्त्रक्रियाजोसेफ लिस्टर46.होमिओपॅथीहायेमान

 

मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बद्दल संपूर्ण माहिती

मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बद्दल संपूर्ण माहिती

CEO हे भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी असतात.
CEO ची निवड यु.पी.एस.सी. मार्फत होते व नेमणूक राज्यशासन करते.
CEO हे जिल्हा परिषदेचे कार्यालयीन व प्रशासकीय अधिकारी असतात.
CEO वर नजीकचे नियंत्रण विभागीय आयुक्ताचे असते.
जिल्हा परिषदेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, कायदेविषयक तरतुदीचे जिल्हा परिषदेतील कर्मचारी व अधिकारी यांना मार्गदर्शन करणे तसेच जिल्हा परिषदेने घेतलेल्या विविध निर्णयाची अंमलबजावणी करणे हे काम सी.ई.ओ. चे असते.
CEO हा जिल्हा परिषदेच्या वर्ग 1 व वर्ग 2 दर्जाच्या अधिकार्‍यांची दोन महीने मुदतीपर्यंतची रजा मंजूर करू शकतो.
जिल्हा परिषदेमधील वर्ग 3 व वर्ग 4 दर्जाच्या कर्मचार्‍याची नेमणूक करण्याचा अधिकार CEO ला असतो.
जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकार्‍यांवर नियंत्रण CEO चे असते.
जिल्हा परीषदेतील महत्वाची कागदपत्रे मुख्य कार्यकारी अधिकार्‍याच्या ताब्यात असतात.
मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचा गोपनीय अहवाल जिल्हा परिषदेचा अध्यक्ष लिहीत असतो व तो अहवाल अध्यक्ष विभागीय आयुक्ताकडे पाठवित असतो.
जिल्हा परिषदेचा सचिव हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो.
मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करतो.
मुख्य कार्यकारी अधिकार्‍याच्या कार्यावर जिल्हा परिषदेची प्रगति अवलंबून असते असे म्हणतात.
मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषद व राज्यशासन तसेच जिल्हा परिषद व तज्ज्ञ प्रशासकीय अधिकारी वर्ग यामधील दुवा असतो.
मुख्य कार्यकारी अधिकार्‍याचा राजीनामा मंजूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस असतो.
उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍याचा राजीनामा मंजूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस असतो.
उपमुख्य कार्यकरी अधिकार्‍याची निवड MPSC मार्फत होते व नेमणूक राज्यशासन करते.

पंचायत समितीबद्दल संपूर्ण माहिती

पंचायत समितीबद्दल संपूर्ण माहिती

महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961, कलम क्र. 56 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी एक पंचायत समिती निर्माण करण्यात आली आहे.

पंचायत राज्यातील मधला स्तऱ म्हणून पंचायत समितीला ओळखले जाते.

निवडणूक : प्रत्येक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.

सभासदांची पात्रता :

तो भारताचा नागरिक असावा
त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.
त्या तालुक्यातील मतदान यादीत त्याचे नाव असावे.
आरक्षण :

महिलांना : 50 %
अनुसूचीत जाती/जमाती : लोकसंख्येच्या प्रमाणात (महिला 50%)
इतर मागासवर्ग : 27% (महिला 50%)
विसर्जन : राज्य सरकार करते व विसर्जन झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे.

कार्यकाल : 5 वर्ष

राजीनामा :

सभापती – जिल्हा परिषदेच्याअध्यक्षांकडे

उपसभापती – पंचायत समितीच्या सभापतीकडे त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास : 30 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्‍याकडे व त्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे.

मानधन : सभापती – दरमहा रु 10,000/- व इतर सुखसुविधा

उपसभापती – पंचायत समितीच्या सभापतीकडे यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास : 30 दिवसाच्या  आत जिल्हाधिकार्‍याकडे व त्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे.

मानधन : सभापती – दरमहा रु 10,000/- व इतर सुखसुविधा

उपसभापती – दरमहा रु 8,000/- व इतर सुखसुविधा पंचायत समितीची बैठक – कलम क्र. 117 व 118 नुसार वर्षात 12 म्हणजेच प्रत्येक महिन्याला 1 अंदाज पत्रक – गटविकासअधिकारी तयार करतो व त्याला जिल्हा परिषदेची मान्यता आवश्यक आहे.

गटविकास अधिकारी :

निवड – गटविकास अधिकारी

नेमणूक – राज्यशासन

कर्मचारी – ग्रामविकास खात्याचा वर्ग-1 व वर्ग-2 चा अधिकारी

नजिकचे नियंत्रण – मुख्य कार्यकारी अधिकारी

पदोन्नती – उपमुख्य कार्यकारी अधिकारी

कार्य व कामे :

पंचायत समितीचा सचिव
शासनाने ठरवून दिलेले कर्तव्य पार पाडणे.
वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचार्‍यांच्या राजा मंजूर करणे.
कर्मच्यार्‍यांवर नियंत्रण ठेवणे.
पंचायत समितीने पास केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.
पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करणे.
पंचायत समितीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांस सादर करणे.
अनुदानाची रक्कम काढणे व तिचे वितरण करणे.
महत्वाची कागदपत्रे सांभाळणे.
________________________

लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या

लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या :

लोकसंख्या :

600 ते 1500 – 7 सभासद
1501 ते 3000 – 9 सभासद
3001 ते 4500 – 11 सभासद
4501 ते 6000 – 13 सभासद
6001 ते 7500 – 15 सभासद
7501 त्यापेक्षा जास्त – 17 सभासद
निवडणूक – प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.

कार्यकाल – 5 वर्ष

विसर्जन – कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राज्यसरकार विसर्जित करू शकते.

आरक्षण :

महिलांना – 50%
अनुसूचीत जाती/जमाती – लोकसंख्येच्या प्रमाणात
इतर मागासवर्ग – 27% (महिला 50%)
ग्रामपंचायतीच्या सभासदांची पात्रता :

तो भारताचा नागरिक असावा.
त्याला 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.
त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे.
ग्रामपंचायतीचे विसर्जन : विसर्जित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे तिच्या राहिलेल्या कालावधीसाठी पुढे काम करणे.

सरपंच व उपसरपंच यांची निवड : निवडून आलेल्या सदस्यांमधूनच ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेच्या वेळी केले जाते.

सरपंच व उपसरपंचाचा कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु त्यापूर्वी ते आपला राजीनामा देतात.

राजीनामा :

सरपंच – पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो.
उपसरपंच – सरपंचाकडे

निवडणुकीच्या वेळी वाद निर्माण झाल्यास :

सरपंच-उपसरपंचाची निवड झाल्यापासून 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्‍याकडे तक्रार करावी लागते व त्यांनी दिलेल्या निर्णयानंतर त्याविरोधी 15 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी लागते.

अविश्वासाचा ठराव :

सरपंच आणि उपसरपंचाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही व तो फेटाळला गेल्यास पुन्हा त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.

बैठक : एका वर्षात 12 बैठका होतात (म्हणजे प्रत्येक महिन्याला एक)

अध्यक्ष : सरपंच असतो नसेल तर उपसरपंच

तपासणी : कमीत कमी विस्तारात अधिक दर्जाच्या व्यक्तीकडून तपासणी केली जाते.

अंदाजपत्रक : सरपंच तयार करतो व त्याला मान्यता पंचायत समितीची घ्यावी लागते.

आर्थिक तपासणी : लोकल फंड विभागाकडून केली जाते.

ग्रामसेवक / सचिव :

निवड : जिल्हा निवडमंडळाकडून केली जाते.

नेमणूक : मुख्य कार्यकारी अधिकारी

नजीकचे नियंत्रण : गट विकास अधिकारी

कर्मचारी : ग्रामविकास खात्याचा वर्ग-3 चा

कामे :

ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.
ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे
कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवणे.
ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.
व्हिलेज फंड सांभाळणे.
ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.
ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे.
गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.
जन्म-मृत्यूची नोंद करणे.
ग्रामपंचातीची कामे व विषय :

कृषी
समाज कल्याण
जलसिंचन
ग्राम संरक्षण
इमारत व दळणवळण
सार्वजनिक आरोग्य व दळणवळण सेवा
सामान्य प्रशासन
ग्रामसभा : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार निर्मिती करण्यात आली आहे.

बैठक : आर्थिक वर्षात (26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोंबर)

सभासद : गावातील सर्व प्रौढ मतदार यांचा समावेश होता.

अध्यक्ष : सरपंच नसेल तर उपसरपंच

ग्रामसेवकाची गणपूर्ती : एकूण मतदारांच्या 15% सभासद किंवा एकूण100 व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल.

  

________________________