'या' देशांनाही 15 ऑगस्टला मिळाले होते स्वातंत्र्य!15 ऑगस्टच्या दिवशी केवळ भारतच नव्हे, तर हे इतर काही देशही स्वतंत्र झाले होते. आज अशाच देशांबद्दल माहिती पाहुयात...

● भारत (India) : ब्रिटीशांच्या राजवटीपासून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.

● बहरीन (Bahrain) : 15 ऑगस्ट 1971 ला बहरीन ब्रिटनपासून स्वतंत्र झाले होते.

● दक्षिण कोरिया (South Korea) : 15 ऑगस्ट 1945 ला यूएस आणि सोव्हिएत फोर्सेजने दक्षिण कोरियाची जपानपासून मुक्तता केली होती.

● उत्तर कोरिया (North Korea) : 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या तावडीतून उत्तर कोरिया मुक्त झाले होते.

● कांगो (Congo) : आफ्रिकेतील हा देश 15 ऑगस्ट 1960 ला फ्रान्सच्या राजवटीतून मुक्त झाला होता. नंतर रिपब्लिक ऑफ कांगो तयार झाला.

● लिकटेंस्टीन (Liechtenstein) : 15 ऑगस्ट 1866 ला हा देश जर्मनीपासून स्वतंत्र झाला आणि 1940 सालापासून तो 15 ऑगस्टला  आपला स्वतंत्रता दिवस म्हणून साजरा करतो.
संकलन ➖ राम कवले & तुषार शिरगीरे

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...