Sunday 16 August 2020

‘बीसीसीआय’चे ‘अर्थलक्ष्य’.



🔰‘सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ’ असा रुबाब असणारे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आर्थिक अडचणीत नाही, असा दावा अध्यक्ष सौरव गांगुलीने नुकताच केला होता. सध्या करोना साथीच्या कठीण कालखंडातही लोकप्रिय इंडियन प्रीमियर लीगद्वारे (आयपीएल) तीनशे कोटी रुपयांहून अधिक ‘अर्थलक्ष्य’प्राप्तीची योजना ‘बीसीसीआय’ने आखली आहे.

🔰चिनी मोबाइल कंपनी विवोशी संबंध तोडल्यानंतर येत्या ७२ तासांत ‘बीसीसीआय’चे अर्थभरारी स्पष्ट होऊ शकेल, असा क्रिकेटवर्तुळातील जाणकारांचा अंदाज आहे. ‘बीसीसीआय’ने विवोच्या जागी शीर्षक प्रायोजक ठरवताना तीनशे कोटी रुपयांचे लक्ष्य आखले आहे. शीर्षक प्रायोजकाच्या शर्यतीत अ‍ॅमेझॉन, बायजू, ड्रीम ११, अनअ‍ॅकॅडमी, इंडिया इंक शर्यतीत आहेत.

🔰मार्चपासून क्रिकेट स्थगित असल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचे प्रायोजक बायजूचे काही प्रमाणात पैसे वाचले आहेत. परंतु हा आकडा आश्चर्यकारक भरारी घेऊ शकेल, अशी ‘बीसीसीआय’ला अपेक्षा आहे. याचप्रमाणे अधिकृत सहप्रायोजकांचा आकडा तीनवरून पाचपर्यंत वाढवताना प्रत्येकी ४० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे करार डिसेंबपर्यंत चार महिन्यांसाठीच आहेत. मंडळाने आपले पत्ते अद्याप खुले केले नसले तरी आर्थिक अडचणीच्या काळातही भारतीय क्रिकेट जागतिक क्रीडा क्षेत्राचे लक्ष वेधू शकेल.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...