‘शाश्वत विकास निर्देशांक (SDG) 2020’ याच्या यादीत भारत 117 व्या क्रमांकावर🔸सयुक्त राष्ट्रसंघांकडून ‘शाश्वत विकास अहवाल 2020’ प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात 2020 सालाचा अद्ययावत ‘शाश्वत विकास निर्देशांक (SDG)’ प्रसिद्ध करण्यात आला आहे.

🔸‘शाश्वत विकास निर्देशांक 2020’ मधील 166 देशांच्या या यादीत भारताचा 117 वा क्रमांक लागतो आहे.

🎯इतर ठळक बाबी

🔸‘शाश्वत विकास निर्देशांक 2020’ मधील यादीत स्वीडन हा देश प्रथम क्रमांकावर आहे.

🔸यादीत प्रथम दहामध्ये स्वीडन देशाच्या पाठोपाठ डेन्मार्क, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, नॉर्वे, ऑस्ट्रिया, झेक प्रजासत्ताक, नेदरलँड आणि एस्टोनिया या देशांचा क्रम लागतो आहे.

🔸भारताचे शेजारी देश, बांग्लादेश आणि पाकिस्तान ही अनुक्रमे 109 आणि 134 व्या क्रमांकावर आहेत.

🔸भारताने दारिद्र्य निर्मूलन, स्वच्छ पेयजल आणि स्वच्छता, सभ्य काम आणि आर्थिक वाढ तसेच हवामानविषयक कार्य अश्या क्षेत्रांमध्ये अधिक प्रगती केली आहे.

🔸SDG 13 म्हणजेच हवामानविषयक कार्य या क्षेत्रांमध्ये भारताने आपले ठरविलेले ध्येय साध्य केले आहे.

शाश्वत विकास ध्येये (SDGs) बाबत

🔸2015 सालासाठी ठरविण्यात आलेली सहस्त्राब्द विकास ध्येये (MDGs) यांपासून 2030 सालासाठी शाश्वत विकास ध्येये (SDGs) विकसित झाली आहेत. 2000 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहस्त्राब्द (मिलेनियम) शिखर परिषदेनी ठरविलेल्या 2015 सालासाठीच्या सहस्त्राब्द विकास ध्येये (MDGs) यामध्ये 18 लक्ष्यांसह आठ आंतरराष्ट्रीय विकास ध्येयांची एक सूची होती. हा जगभरातल्या आव्हानांना सोडविण्यासाठी केला गेलेला प्रथम आणि एकमात्र वैश्विक प्रयत्न होता.

🔸शाश्वत विकास ध्येये (SDGs) ही 17 ध्येये, 169 लक्ष्ये आणि 306 राष्ट्रीय निर्देशकांची एक सार्वत्रिक सूची आहे, जे मानवी कल्याणासाठी 2030 सालापर्यंत कोणीही विकासाच्या दृष्टीने मागे राहणार नाही या उद्देशाने मोठ्या यशासाठी विकासात्मक कृतींचे नियोजन करण्यास आणि सुव्यवस्थित करण्यासाठी मदत करतात.

🔸सप्टेंबर 2015 मध्ये झालेल्या ऐतिहासिक संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या शिखर परिषदेत 193 सदस्य राष्ट्रांनी अंगिकारलेल्या आणि दि. 1 जानेवारी 2016 रोजी लागू झालेल्या “ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड: द 2030 एजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट” या पुढाकाराचा हा एक भाग आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...