Sunday 30 August 2020

निर्यात सज्जता निर्देशांक 2020’मध्ये गुजरात राज्य प्रथम क्रमांकावर.



◾️नीती आयोगाने (राष्ट्रीय परिवर्तन भारत संस्था) ‘निर्यात सज्जता निर्देशांक 2020’ (EPI 2020) जाहीर केला आहे. भारतातल्या राज्यांची निर्यात-बाबतची तयारी आणि कामगिरी यांचे परीक्षण करून आव्हाने आणि संधी ओळखणे, सरकारी धोरणाचा प्रभाव अधिक वाढवणे आणि सोयीचे नियमन संरचना तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या पहिल्या अहवालाचा उद्देश आहे.

◾️राज्यांच्या एकूणच यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) - गुजरात, महाराष्ट्र आणि तमिळनाडू

◾️भपरिवेष्टित राज्यांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) - राजस्थान, तेलंगणा आणि हरयाणा

◾️हिमालयी राज्यांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) – उत्तराखंड, त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेश

◾️कद्रशासित प्रदेशांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) – दिल्ली, गोवा आणि चंदीगड

⭐️इतर ठळक बाबी...

◾️हा निर्देशांक चार स्तंभावर आधारित आहे, ते आहेत - धोरण, व्यवसाय परीसंस्था, निर्यात परिसंस्था, निर्यात कामगिरी. यात 11 उप-स्तंभ आहेत.

◾️निर्यात वृद्धीसाठी प्रादेशिक कामगिरी उंचावण्यासाठी हा निर्देशांक राज्य सरकारांना मार्गदर्शक ठरणार आहे.
निर्यात वैविध्य, वाहतूक संपर्क आणि पायाभूत सुविधा या उप स्तंभाबाबत बऱ्याच भारतीय राज्यांनी चांगली कामगिरी केली आहे.

◾️या तीन स्तंभाबाबत भारतीय राज्यांचे सरासरी गुण 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहेत.साधारणपणे बहुतांश किनारी राज्यांनी उत्तम कामगिरी दर्शवली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

हिमालयातील 8000 मी.उंचीपेक्षा जास्त उंची असणारी शिखरे..

-----------------======---------------------- शिखर               उंची(मी)             स्थान ---------------------------------------------...