३१ ऑगस्ट २०२०

वाचा :- क्षय रोग (Tuberculosis- TB)



📌कषय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस' या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. यात मुख्यतः ७५% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते.

📌इ.स.१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली.म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.ज्या व्यक्तीला क्षयरोग (टि.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो.

📌परकार

✍️फफ्फुसाचा क्षयरोग

दूषित थुंकी (स्पुटम पॉसिटिव्ह)

अदूषित थुंकी (स्पुटम निगेटिव्ह)

📌फफ्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवांचा

✍️गरंथीचा क्षय्ररोग ( लिम्फ नोड )

✍️हाडाचा व सांध्याचा क्षय्ररोग

✍️जनन व विसर्जन संस्थाचा क्षयरोरोग (जनायटो-युरिनरी ट्रॅक्ट )

✍️मज्जासंस्थेचा क्षय्ररोग (नर्व्हस सिस्टिम )

✍️आतडयाचा क्षय्ररोग

📌निदान

खकाऱ्याची तपासणी, एक्सरे, रक्ताच्या चाचण्या यांवरून या क्षयरोगाचे रोगनिदान केले जाते.

📌चाचण्या-

✍️खकाऱ्याची तपासणी-

वयस्कांमध्ये- सकाळचा खकारा निर्जंतुक बाटलीत घेतला जातो. तो काचपट्टीवर पसरवून त्यावर अल्कोहोलची प्रक्रिया करून चिकटवला जातो. त्यावर झिअल नेल्सन स्टेन या पद्धतीने पेशींना रंग देउन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण केले जाते. यामध्ये जर जीवाण् सापडले तर अशा रुग्णास थुंकी दूषित रुग्ण समजले जाते.

✍️लहान मुलांमध्ये- सकाळीच उपाशीपोटी अन्ननलिकेतून एनजीटी टाकून जठरातील द्रव निर्जंतुक बाटलीत घेतला जातो. तो काचपट्टीवर पसरवून त्यावर अल्कोहोलची प्रक्रिया करून चिकटवला जातो. त्यावर झिनलेन्स स्टेन या पद्धतीने पेशींना रंग देऊन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण केले जाते.

✍️मॉन्टुक्स टेस्टद्वारेही रोगाचे निदान केले जाते.

📌रक्ताच्या तपासण्या-

इएसआर- (एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट) यामध्ये रक्ताचा नमुना न गोठू देणाऱ्या द्रवाच्या सहाय्याने संकलित करून तो नलिकेमध्ये भरला जातो व त्या नलिकेवरील आकड्यांनुसार नोंद घेतली जाते. ही तपासणी विश्वासार्ह नाही, कारण इतर रोगांमध्येही ही तपासणी असामान्य असू शकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...