Sunday, 30 August 2020

खासगीरीत्या उत्पादित पिनाका क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी.



🔰 2020 रोजी भारतीय भुदलाने पोखरणच्या चाचणी क्षेत्रात खाजगी क्षेत्रातल्या कंपनीने देशातच तयार केलेल्या सहा ‘पिनाका’ क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली.

🔰भारतात पहिल्यांदाच, इकॉनॉमिक एसप्लोझिव्ह लिमिटेड (EEL) या खासगी कंपनीने ‘पिनाका’ क्षेपणास्त्र तयार केले आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत संरक्षण संशोधन विकास संस्थेनी (DRDO) कंपनीला पिनाकाक्षेपणास्त्राच्या निर्मितीचे कंत्राट दिले होते.

🔰आता शस्त्रास्त्रे आणि क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी संरक्षण दलाला आयुध निर्मिती मंडळ (ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड) या संस्थेवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.

🔴पिनाका क्षेपणास्त्र...

🔰पिनाका क्षेपणास्त्र प्रणाली ही संरक्षण संशोधन विकास संस्थेनी (DRDO) विकसित केलेली स्वदेशी बनावटीचे ‘मल्टी बॅरेल’ क्षेपणास्त्र प्रणाली आहे.

🔰ह जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे गाइडेड क्षेपणास्त्र आहे.‘पिनाका मार्क 1’ची मारक क्षमता 40 किलोमीटर, तर ‘पिनाका मार्क 2’ची मारक क्षमता 75 किलोमीटरपर्यंत आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

इंग्रजीतील 100 समानार्थी शब्द (Synonyms) आणि त्यांचे मराठीत अर्थ खाली दिले आहेत:

1️⃣ व्यक्तिमत्व व वर्तन (Personality & Behavior)  1. Brave – Courageous (शूर)  2. Honest – Truthful (प्रामाणिक)  3. Happy – Joyful (आनंद...