गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटी भागाला जोडणाऱ्या सर्वाधिक लांबीच्या रोपवे सेवेचे उद्घाटन.❇️आसाम राज्यात ब्रम्हपुत्र नदीच्या पात्राला पार करणाऱ्या देशातल्या सर्वाधिक लांबीच्या रोपवे सेवेचे उद्घाटन करण्यात आली आहे.

‼️ठळक बाबी..

❇️ती सेवा गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटी या दोन भागांना जोडते.

❇️तो 1.8 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे.
ती सेवा गुवाहाटीचे कचरी घाट आणि उत्तर गुवाहाटीचे डोल गोविंदा मंदिर या ठिकाणांदरम्यान कार्यरत आहे.
रोपवे सेवेमुळे प्रवासाचा वेळ कमी होण्यासोबतच राज्यातल्या पर्यटन क्षेत्राला चालना देखील मिळणार.

‼️बरह्मपुत्र नदी विषयी...

❇️आशियातली ही एक प्रमुख नदी तिबेटमध्ये उगम पावून ईशान्य भारतातून वाहत जाऊन पुढे बांगला देशात गंगा नदीला मिळते. नदीची एकूण लांबी 2900 किलोमीटर आहे. हिमालयाच्या कैलास पर्वतश्रेणीत चेमा-युंगडुंग या हिमनदीतून ब्रह्मपुत्र उगम पावते.

❇️बरह्मपुत्र नदीला तिबेटमध्ये त्सांगपो, भारताच्या अरुणाचल प्रदेशात दिहांग, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा तर बांगला देशात जमुना असे म्हणतात. चिनी लोक हिला या-लू-त्सांगपू चिअँग या नावाने ओळखतात.

No comments:

Post a Comment

Latest post

ZP पद भरती Strategy

📌📌 Strategy📌📌                मागचे तीन दिवस आयबीपीएस(IBPS) ने पशुसंवर्धन विभागासाठी परीक्षा घेतल्या. या परीक्षांमधील मराठी आणि इंग्लिश...