13 November 2025

पोषण (Nutrition)



🔷 अर्थ व प्रकार

➤ पोषण म्हणजे शरीराच्या वाढीस, दुरुस्तीला आणि ऊर्जानिर्मितीसाठी आवश्यक घटकांचे सेवन.

➤ पोषक घटक सहा प्रकारचे असतात – कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि पाणी.


🔷 १. कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates)

➤ रासायनिक दृष्ट्या हे C, H, O पासून बनलेले असतात.

➤ ऊर्जेचा मुख्य स्रोत (1 ग्रॅम = 4 कॅलरी).

➤ सामान्य सूत्र: Cₙ(H₂O)ₙ


कार्बोहायड्रेट्सचे प्रकार

(अ) मोनोसॅकॅराइड्स (Monosaccharides)

➤ एकच साखरेचा घटक असतो.

➤ उदा. ग्लुकोज, फ्रक्टोज, गॅलॅक्टोज.

➤ ग्लुकोज = रक्तातील साखर (Blood Sugar).

➤ फ्रक्टोज = फळांमधील साखर.


(ब) डायसॅकॅराइड्स (Disaccharides)

➤ दोन मोनोसॅकॅराइड्स एकत्र येऊन बनतात.

➤ उदा.

सुक्रोज = ग्लुकोज + फ्रक्टोज (ऊस साखर)

लॅक्टोज = ग्लुकोज + गॅलॅक्टोज (दुधातील साखर)

माल्टोज = ग्लुकोज + ग्लुकोज (धान्यातील साखर)


(क) पॉलीसॅकॅराइड्स (Polysaccharides)

➤ अनेक मोनोसॅकॅराइड्स एकत्र येऊन बनतात.

➤ उदा. स्टार्च, ग्लायकोजन, सेल्युलोज.

➤ स्टार्च – वनस्पतींमध्ये साठवण ऊर्जा.

➤ ग्लायकोजन – प्राण्यांमध्ये साठवण ऊर्जा.

➤ सेल्युलोज – वनस्पतींच्या पेशीभित्तीचे घटक.


महत्त्व:

➤ शरीराला त्वरित ऊर्जा पुरवतात.

➤ फॅट्सच्या ऑक्सिडेशनसाठी आवश्यक.

➤ नर्व्हस सिस्टमसाठी महत्त्वाचे इंधन.


🔷 २. प्रोटीन्स (Proteins)

➤ हे अमिनो आम्लांपासून (Amino acids) बनतात.

➤ सूत्र: C, H, O, N आणि काहीवेळा S व P.

➤ 1 ग्रॅम प्रोटीन = 4 कॅलरी ऊर्जा देते.


प्रोटीन्सचे प्रकार

(अ) साधे प्रोटीन (Simple proteins)

➤ पूर्णतः अमिनो आम्लांपासून बनलेले.

➤ उदा. अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, केराटिन.


(ब) संयुक्त प्रोटीन (Conjugated proteins)

➤ प्रोटीन + नॉन-प्रोटीन घटक.

➤ उदा. हेमोग्लोबिन (प्रोटीन + हीम), लिपोप्रोटीन, गायक प्रोटीन.


(क) व्युत्पन्न प्रोटीन (Derived proteins)

➤ मूळ प्रोटीनच्या रासायनिक बदलांमुळे तयार झालेले.

➤ उदा. पेप्टोन, प्रोटिओस.


प्रोटीनचे गुणधर्म (Properties of Proteins)

➤ Denaturation:

तापमान, आम्ल किंवा क्षारामुळे प्रोटीनची रचना बदलते.

उदा. अंड्याचा पांढरा भाग गरम केल्यावर घट्ट होणे.

➤ Coagulation (गोठविणे):

द्रवरूप प्रोटीन ठोस रूपात येणे.

उदा. दुधाचे दही बनणे.

➤ Amphoteric nature:

प्रोटीनमध्ये आम्ल आणि क्षार दोन्ही गुणधर्म असतात.

➤ Hydration property:

पाण्याशी संयोग करून फुगण्याची क्षमता.

➤ Buffering property:

शरीरातील pH स्थिर ठेवण्यास मदत.

➤ Biuret test positive:

प्रोटीन उपस्थिती तपासण्यासाठी.


महत्त्व:

➤ शरीराची वाढ, पेशींची दुरुस्ती, एन्झाइम्स आणि हार्मोन्सची निर्मिती.

➤ उदा. अंडी, दूध, डाळी, मांस, कडधान्ये.


🔷 ३. फॅट्स / लिपिड्स (Fats/Lipids)

➤ C, H, O घटक असतात.

➤ 1 ग्रॅम फॅट = 9 कॅलरी ऊर्जा देते.


प्रकार:

➤ साधे फॅट्स – ट्रायग्लिसराइड्स.

➤ संयुक्त फॅट्स – फॉस्फोलिपिड्स, लिपोप्रोटिन्स.

➤ व्युत्पन्न फॅट्स – स्टेरॉल्स (उदा. कोलेस्ट्रॉल).


महत्त्व:

➤ ऊर्जा साठवणूक, अंगरक्षण, ऊष्णतारोधक थर.

➤ व्हिटॅमिन A, D, E, K शोषणासाठी आवश्यक.


🔷 ४. व्हिटॅमिन्स (Vitamins)

➤ शरीरात ऊर्जा निर्माण करत नाहीत पण एन्झाइम क्रियांना मदत करतात.

(अ) चरबीद्रव्य विद्राव्य (Fat-soluble vitamins): A, D, E, क


Vitamin A:कॅरोटीन

➤ डोळ्यांच्या दृष्टीसाठी आवश्यक.

➤ स्रोत – गाजर, बटर, मासे तेल.

➤ कमतरता – रातांधळेपणा (Night blindness).


Vitamin D:कॅल्सीफेरोल

➤ हाडांच्या मजबुतीसाठी, कॅल्शियम शोषणासाठी.

➤ स्रोत – सूर्यप्रकाश, मासे तेल, अंडी.

➤ कमतरता – रिकेट्स, ऑस्टिओमलेशिया.


Vitamin E:

➤ प्रजनन व पेशींचे रक्षण.

➤ स्रोत – बदाम, तेलबिया, हिरवी पालेभाजी.

➤ कमतरता – स्नायू कमजोरी.


Vitamin K:

➤ रक्त गोठविण्यासाठी आवश्यक.

➤ स्रोत – पालेभाज्या, आतड्यांतील जीवाणू.

➤ कमतरता – रक्तस्त्राव वाढणे.


(ब) पाण्यद्रव्य विद्राव्य (Water-soluble vitamins): B-कॉम्प्लेक्स आणि C

Vitamin B₁ (थायामिन):

➤ नर्व्हस सिस्टीमसाठी आवश्यक.

➤ कमतरता – बेरीबेरी.

Vitamin B₂ (रायबोफ्लेविन):

➤ त्वचा आणि डोळ्यांसाठी.

➤ कमतरता – तोंडाच्या कोपऱ्यांवर जखमा.

Vitamin B₃ (नायसिन):

➤ एन्झाइम क्रिया.

➤ कमतरता – पेलाग्रा.

Vitamin B₆ (पायरीडॉक्सिन):

➤ प्रोटीन चयापचय.

➤ कमतरता – अशक्तपणा.

Vitamin B₁₂ (सायनोकॉबॅलामिन):

➤ रक्तनिर्मिती.

➤ कमतरता – पर्निशस अ‍निमिया.

Vitamin C (अ‍स्कॉर्बिक आम्ल):

➤ रोगप्रतिकारशक्ती, कोलेजन निर्मिती.

➤ स्रोत – संत्री, लिंबू, आवळा.

➤ कमतरता – स्कर्वी.


🔷 ५. खनिजे (Minerals)

➤ शरीरात हाडे, दात, रक्त, स्नायूंसाठी आवश्यक.


अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com

No comments:

Post a Comment