27 July 2020

व्यक्ती विशेष : सर जॉन हॉटन

- संयुक्त राष्ट्रांचा हवामान विज्ञान सल्लागार गट हा खास हवामान बदलांच्या अभ्यासांसाठीच नेमण्यात आला. अलीकडेच त्यांच्या सूचना अमेरिकेने अव्हेरल्या हे खरे; पण या सल्लागार गटाला २००७ मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता. या गटाचे सदस्य असलेले जॉन हॉटन हे वेल्सचे हवामान भौतिकशास्त्रज्ञ.

-  विज्ञान, धोरणनिश्चिती व धार्मिक समुदाय यांच्यात समन्वय घडवून आणण्याचे काम केले. हॉटन यांच्या निधनाने हवामान बदलांच्या समस्यांवर संशोधन करणारा एक ख्यातनाम वैज्ञानिक आपण गमावला आहे. त्यांचा मृत्यू हा करोनाशी संबंधित गुंतागुतीने झाला. संयुक्त राष्ट्रांचा हवामान बदल सल्लागार गट (आयपीसीसी) १९८८ मध्ये स्थापन झाला. या गटाचे तीन पहिले अहवाल हॉटन यांच्या मुख्य संपादकत्वाखाली सादर करण्यात आले होते.

- १९९० मध्ये या गटाचा पहिला अहवाल प्रसिद्ध झाला तेव्हाच धोक्याची घंटा वाजवली गेली. त्यानंतर दोन वर्षांनी रिओची वसुंधरा परिषद झाली.
त्या वेळी सर्वच देशांनी ही समस्या मान्य केली होती. दुसरा अहवाल १९९५ मध्ये आला. त्यानंतर क्योटो करार झाला. तिसरा अहवाल २००२ मध्ये सादर केला गेला. त्यात सागरी पातळी वाढण्याचे संकेत देण्यात आले.

- २००७ मध्ये या सल्लागार गटाला नोबेल मिळाले तेव्हाही हॉटन त्याचे सदस्य होते. हॉटन हे मूळ साउथ वेल्सचे, ब्रिटनच्या हवामान कार्यालयात ते १९८३ ते १९९१ या काळात महासंचालक होते. त्यांनीच ‘हॅडली सेंटर फॉर क्लायमेट सायन्स अँड सव्‍‌र्हिसेस’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. हवामान विज्ञानातील ती एक नावाजलेली संस्था आहे. १९६० पासून त्यांनी हवामान बदलांवर संशोधन सुरू केले.

-  अणुयुद्धानंतरच्या हवामान बदलांचा त्यांनी अभ्यास केला. त्यात नासाच्या निम्बस उपग्रहांचा वापर करण्यात आला होता.

- वातावरणात कार्बन डायॉक्साइडचे प्रमाण वाढत असल्याबाबत त्यांनी १९८० मध्येच लक्ष वेधले होते. हॉटन यांचा जन्म वेल्समध्ये १९३१ मध्ये झाला.
वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना ऑक्सफर्डची शिष्यवृत्ती मिळाली. तेथे त्यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास केला. तेथेच ते वातावरणीय भौतिकशास्त्राचे प्राध्यापक झाले. रॉयल सोसायटीचे ते फेलो होते.

- राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी त्यांना उमरावपदाने सन्मानित केले होते. रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक व ‘जपान प्राइझ’ हे सन्मान त्यांना मिळाले.
‘ग्लोबल वॉर्मिग- द कम्प्लीट ब्रीफिंग’ (१९८४) या त्यांच्या पुस्तकाच्या पाच आवृत्त्या निघाल्या. विज्ञान व धर्म या विषयांवरही त्यांनी लेखन केले. ‘इन द आय ऑफ द स्टॉर्म’ हे आठवणीपर पुस्तक त्यांनी लिहिले होते.
---------------------------------------------------

वाक्यप्रचार व अर्थ

🌷हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे

🌷 गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे

🌷अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे

🌷पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे

🌷वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे

🌷कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे

🌷नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे

🌷दत्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे

🌷जन्माची माती होणे - जीवन व्यर्थ होणे

🌷चारी मुंड्या चीत होणे - संपूर्ण पराभव होणे

🌷सर्द होणे - वरमणे, थिजून जाणे

🌷रामराम ठोकणे - निरोप घेणे

🌷आकाशपाताळ एक करणे - फार आरडाओरडा करणे

🌷कानामागून येऊन तिखट होणे - मागाहून येऊन वरचढ होणे

🌷उमाळा येणे - तीव्र इछा होणे

🌷 वर्ज्य करणे - टाकणे

🌷 काडीमोड करणे - संबंध तोडणे

🌷 अहमहमिका चालणे - चढाओढ लागणे

🌷 अगतिक होणे - उपाय न चालणे

🌷कां-कूं करणे - एखादी गोष्ट करण्यास तयार नसणे

🌷आभाळ फाटणे - मोठे संकट येणे

🌷 इडापिडा टळणे - संकट जाणे

🌷उतराई होणे - उपकार फेडणे

🌷अंतर्मुख होणे - स्वत:शी विचार करणे

🌷 लकडा लावणे - सारखी घाई करणे

🌷परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे

🌷 ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे

🌷कागाळी करणे - तक्रार करणे

🌷 खांदा देणे - मदत करणे

🌷 खोबरे करणे - नाश करणे

🌷गय करणे - क्षमा करणे

🌷 न्यूनगंड वाटणे - कमीपणा वाटणे

🌷जीव मुठीत घेणे - फार घाबरणे

🌷जीव ओतणे - मन लावून काम करणे

🌷सुपारी देणे - आमंत्रण देणे

🌷 तोंडाला तोंड देणे - उद्धटपणे बोलणे

🌷 डोळे दिपणे - आश्चर्य वाटणे

🌷 नामोहरम होणे - पराभूत होणे

🌷 पदर पसरणे - याचना करणे

🌷 पाणउतारा करणे - अपमान करणे

🌷 वाली नसणे - रक्षणकर्ता नसणे

🌷हात तोकडे पडणे - मदत करण्यास  क्षमता कमी पडणे

🌷 हिरमुसले होणे - नाराज होणे

🌷 पांग फेडणे - इच्छा पूर्ण करणे

🌷 विटून जाणे - त्रासणे

🌷 डोके सुन्न होणे - काही न सुचणे

🌷 फडशा पाडणे - संपवणे

🌷गोरेमोरे होणे - लाज वाटणे

🌷आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे

🌷धिंडवडे निघणे - फजिती होणे

🌷 आटापिटा करणे - खूप कष्ट करणे

🌷माया पातळ होणे - प्रेम कमी होणे

🌷वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे

🌷हातपाय गाळणे - धीर सोडणे

🌷 कागदी घोडे नाचवणे - कृतिशील
काम न करता कागदी पराक्रम गाजविणे

🌷गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे

🌷झाकड पडणे - अंधार पडणे

🌷पोटात आग पडणे - खूप भूक लागणे

🌷टोपी उडवणे - टवाळी करणे

🌷पाणी पाजणे - पराभव करणे

🌷वहिवाट असणे - रीत असणे

🌷छी थू होणे - नाचक्की होणे

🌷प्रादूर्भूत होणे - दिसू लागणे

🌷दंडेली करणे - जबरदस्ती करणे

🌷दिवा विझणे - मरण येणे

🌷मूठमाती देणे - शेवट करणे

🌷 सुगावा लागणे - अंदाज लागणे

🌷प्रतारणा करणे - फसवणूक करणे

🌷डोक्यावर घेणे - कौतुक करणे

🌷कानाशी लागणे - चहाडी करणे

🌷किटाळ करणे - आरोप होणे

🌷देव्हारे माजविणे - महत्व वाढविणे

🌷हातावर तुरी देणे - फसविणे

🌷बेगमी करणे - साठा करणे

🌷सोन्याचा धूर निघणे - चांगली स्थिती येणे

🌷पोटात तुटणे - वाईट वाटणे

🌷नख लावणे - नाश करणे

🌷डोळो निवणे - समाधान होणे

एकमान पद्धत

(अ) एकमान पद्धत

नमूना पहिला –

उदा. 84 रुपयांना 6 पेन मिळतात;तर दीड डझन पेनांची किंमत किती?

252 रु.

336 रु.

168 रु.

420 रु.

उत्तर : 252 रु.  

स्पष्टीकरण :-
दीड डझन = 18 पेन आणि 6 ची 3 पट = 18:: 84 ची 3 पट = 84×3 = 252

नमूना दूसरा –

उदा. प्रत्येक विधार्थ्याला 8 वह्या वाटल्या; तर दीड ग्रोस वह्या किती मुलांना वाटता येतील?

16

24

27

36

उत्तर : 27

स्पष्टीकरण :-
एक ग्रोस = 144 किंवा 12 डझन :: दीड ग्रोस = 18 डझन18×12/8 = 27 किंवा एक ग्रोस वह्या 144/8 = 18 मुलांना:: 1 ½ = 18 च्या दिडपट = 27 मुलांना



नमूना तिसरा –

उदा. एका संख्येचा 1/13 भाग = 13, तर ती संख्या कोणती?

26

121

84

169

उत्तर : 169

क्लृप्ती :-
एक भाग ‘क्ष’ मानू.उदाहरणानुसार 1/13 क्ष = 13:: क्ष = 13×13 = 132 = 169 अपूर्णांक व्यस्त करुन गुणणे.

नमूना चौथा –

 

उदा. 60 चा 2/5 =?

12

24

18

30

उत्तर : 24

क्लृप्ती :-
60 चा 2/5 = 60×2/5 = 12×2 = 24  किंवा1/5 = 2/10 आणि 2/5 = 4/10, 60 चा = 1/10 आणि 60 चा 4/10 = 6×4

नमूना पाचवा –

उदा. 80 चा 3/5 हा 60 च्या ¾ पेक्षा कितीने मोठा आहे?

5

3

2

8

उत्तर : 3

क्लृप्ती :-
80 चा 3/5 = 80×3/5 = 48, 60 चा ¾ = 60×3/4 = 45,उदाहरणानुसार 48-45 = 3

नमूना सहावा-

उदा. 400 चा 3/8 हा कोणत्या संख्येचा 5/8 आहे?

200

180

210

240

उत्तर : 240

स्पष्टीकरण :-
400 चा 3/8 = 400×3/8 = 50×3 = 150 आणि क्ष चा 5/8 = 150:: क्ष = 150×8/5 = 240 किंवा5 भाग = 400:: 3 भाग = 400 × 3/5 = 240 किंवा400×3/8×8/5 = 240

नमूना सातवा –

उदा. 350 लीटर पाणी मावणार्‍या टाकीचा 2/7 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लीटर पाणी मावेल ?

3.15 ली.

200 ली.

250 ली.

245 ली.

उत्तर : 250 ली.

स्पष्टीकरण :-
350 चा 2/7 = 50×2 = 100 उदाहरणानुसार 350-100 = 250 लीटर

नमूना आठवा –

उदा. रामरावांनी आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस लावला, ¼ भागात भुईमुग लावला व उरलेल्या 25 एकारांत ज्वारी लावली, तर रामरावांचे एकूण किती एकर शेत आहे?

50

60

120

75

उत्तर : 60

स्पष्टीकरण :-
1/3+1/4=4/12+3/12=7/12;1-7/12=12/12-7/12=5/12=25 एकर,:: एकूण शेत = 5/12  चा व्यस्त 12/5 ने 25 ला गुणणे,यानुसार 12/5×25=60

 

26 July 2020

भामरागड अभयारण्या

चंद्रपूर जिल्ह्यात वसलेल्या भामरागड अभयारण्याचे राखीव वनक्षेत्र १०४.३८ चौ.कि.मी इतके आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वसलेल्या भामरागड अभयारण्याचे राखीव वनक्षेत्र १०४.३८ चौ.कि.मी इतके आहे. विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि वन्यजीवांसाठी हे अभयारण्य म्हणजे एक स्वर्ग आहे. अभयारण्यातून पार्लोकोटा आणि पामलगौतम नद्या वाहतात. त्या अभयारण्यातील वन्यजीवांसाठी आणि इथे राहणाऱ्या गोंड आणि माडिया जातींच्या आदिवासी बांधवांसाठी पाण्याच्या प्रमुख स्रोत आहेत.

एकेकाळी शिकारीचे स्थळ ६ मे १९७७ रोजी संरक्षित वन झाले असून ते रानडुक्कर, बिबट्या, ससे, भुंकणारे हरीण, मुंगूस, अस्वल, खार, उडणारी खार, नीलगाय, जंगली कोंबडी, मोर अशा असंख्य वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवासाचे ठिकाण झाले आहे. अनेक जातीचे सरपटणारे प्राणी आणि सस्तन प्राणी आपण इथे पाहू शकतो.

गोंड आणि माडिया जमातीचे आदिवासी लोक येथे राहत असून माडिया आणि गोंडी या स्थानिक भाषा येथे बोलल्या जातात.

यावल अभयारण्य (Yawal Wildlife Sanctuary)

सुकी, अनेर आणि मांजल या तीन नद्या आणि त्यांना मिळणारे छोटे मोठे नाले यामुळे यावल अभयारण्याचे क्षेत्र हिरवेगार आणि जैवविविधतेने समृद्ध झाले आहे. वनस्पती आणि प्राण्यांच्या अस्तित्त्वाने संपन्न असलेल्या या अभयारण्याची घोषणा शासनाने 21 फेब्रुवारी 1969 रोजी केली.

वनपर्यटनाचा मनमुराद आनंद घेणाऱ्यांसाठी हे क्षेत्र अतिशय सुंदर असून ज्यांना वन्यजीव पहायचे आहेत त्यांच्यासाठी, ज्यांना पक्षी पहायचे आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना वाघ पहायचा आहे त्यांच्यासाठीही हे अभयारण्य एक आकर्षणाचे ठिकाण आहे. अनेर आणि सुकी धरणाच्या आसऱ्याला वन्यजीव येतात. रानपिंगळ्याबरोबर गरूड, सुतार या पक्ष्यांसह 200 हून अधिक प्रजातींचे पक्षी आपण येथे पाहू शकतो. पट्‌टेदार वाघाचा वावर आणि बिबट्याचे होणारे दर्शन अंगावर रोमांच उभे करतात. अस्वल, कोल्हा, लांडगा, रानकुत्रा, रानडुक्कर, रानमांजर, चिंकारा, हरिण, चितळ, चौशिंग्या, सांबर आणि नीलगायीही आपल्याला नजरेस पडतात. साग, अंजनासोबत ऐन, शिसव, तिवस, खैर, हिरडा, बेहडा, तंदूच्या झाडांची गर्दी मनाला सुखावून जाते. या वनामध्ये बांबूही मोठ्या प्रमाणात दिसून येतो.

ताम्हिणी अभयारण्य (Tamhini Sanctuary)

डोंगर कड्यांवर ओथंबून आलेली ढगांची गर्दी, दाटलेलं धुकं आणि सरींवर सरी… घेऊन कोसळणाऱ्या पावसाशी झिंगडझुम्मा करायचा असेल तर तुमच्या-माझ्या सारख्यांची पाऊलं आपणहूनच ताम्हिणी घाटाकडे वळतात. पावसाच्या अलौकिक स्पर्शानं दाटीवाटीने फुलून आलेला निसर्ग आणि आपला ताठरपणा बाजूला ठेवत अंगाखांद्यावर वृक्ष वेलींना आणि कोसळणाऱ्या धबधब्यांना घेऊन मायाळू झालेल्या डोंगररांगा यांचं वर्णन कसं करावं ? त्यासाठी शब्दही अपुरे पडतात. त्यामुळेच वर्षा सहलीसाठी आलेल्या पर्यटकांनी इथल्या डोंगररांगा आणि घाट रस्ता फुलून जातो. मुळशी धरणाचा नयनरम्य देखावा मन प्रसन्न करतो.

पुण्यापासून 70 कि.मी अंतरावर असलेल्या या घाटाचं निसर्गसौंदर्य मनाला भूरळ पाडणार आहे. मुंबई-गोवा मार्गाने कोलाडपर्यंत गेले की पुढे कुंडलिका नदी लागते. तिच्यावरचा पूल ओलांडला की डाव्या बाजूने मुळशी धरणावरून पुढे पुण्याला जाता येते. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात ताम्हिणी घाट आहे या घाटात ताम्हिणी वन्यजीव अभयारण्य वसलेलं आहे. 3 मे 2013 रोजी या अभयारण्याची घोषणा करण्यात आली. प्रामुख्याने पुणे आणि अंशत: रायगड जिल्ह्यात 49.62 चौ.कि.मी.

चंद्रशेखर आझाद

🔸जन्म- 23 जुलै 1906 भाबरा, मध्यप्रदेश.
🔸पूर्ण नाव- चंद्रशेखर सीताराम तिवारी.
🔸मृत्यू- 27 फेब्रुवारी 1931, अलाहाबाद.

🔹आझाद हे कुस्ती, धनुर्विद्या, भालाफेक, नेमबाजीसह पोहण्यात निपून होते.

🔹संघटना - कीर्ती किसान पार्टी ,
                  नवजवान किसान सभा.

🔹रामप्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर त्यांनी "हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन (HRA)" या क्रांतीकारी संघटनेची "हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन(HSRA)" या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली.

🔹इ.स 1921 मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात पंधरा वर्षे वयाच्या चंद्रशेखर यांनी सहभाग घेतला.
त्यासाठी त्यांना अटक झाली तेव्हा न्यायालयात चंद्रशेखर याने आपले आडनाव 'आझाद' असल्याचे नोंदवले.

🔹चंद्रशेखर आजाद व त्यांचे इतर क्रांतिकारक साथीदार यांनी काकोरी येथे सरकारी कोषागारातील पैसे घेऊन जाणारी रेल्वे लुटली.

🔹लाला लजपत राय यांच्या मृत्यूला जबाबदार पोलीस अधिकारी जेम्स स्टॉक विरुद्ध बदला घेण्यासाठी कट रचला. परंतु ओळखीच्या अभावाने चुकीच्या व्यक्तीला लक्ष्य केले गेले, पोलीस सहाय्यक अधिक्षक जॉन पी सँडर्स ची हत्या झाली.

🔹HSRA ने या घटनेची जबाबदारी स्वीकारली. राजगुरू सुखदेव यांच्यासहसह 21 क्रांतीकारकांना अटक झाली.

🔹आझाद यांनी वेषांतर केले व राजकोट मार्गे इलाहाबादला गेले.

🔹आझाद आपल्या मित्रांना भेटण्यासाठी २७ फेब्रुवारी १९३१ या दिवशी अलाहाबादमधील आल्फ्रेड पार्कमध्ये गेले असता ब्रिटिश पोलीस व आझाद यांच्यात गोळीबार होऊन चंद्रशेखर यांनी अखेर ची गोळी स्वतःच्या माथ्यावर मारली.

Online Test Series

विद्यासागर, ईश्वरचंद्र.

🅾 (२६ सप्टेंबर १८२०—२९ जुलै १८९१). बंगालमधील एक श्रेष्ठ संस्कृत पंडित, लेखक व उदारमतवादी सुधारक. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमध्ये मिदनापूर जिल्ह्यातील वीरसिंह या गावी झाला.

🅾 त्यांच्या पित्याचे नाव ठाकूरदास आणि आईचे नाव भगवतीदेवी असे होते. प्राथमिक शिक्षण जन्मगावी घेऊन कलकत्त्याच्या (कोलकात्याच्या) संस्कृत महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले.

🅾१८३९ साली हिंदुधर्मशास्त्रविषयक परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने मिळालेल्या प्रमाणपत्रात त्यांच्या नावापुढे ‘विद्यासागर’ ही उपाधी लावली होती; म्हणून बंदोपाध्याय हे त्यांचे उपनाम मागे पडून विद्यासागर हेच नाव रूढ झाले.

🅾ते अठरा वर्षांचे असताना त्याच महाविद्यालयात व्याकरणाचे वर्ग घेण्याचे काम त्यांच्याकडे देण्यात आले. वयाच्या चौदाव्या वर्षी शत्रुघ्‍न भट्टाचार्य यांची कन्या दीनमयी देवी हिच्याशी त्यांचा विवाह झाला.

वल्लभभाई झवेरभाई पटेल

🅾 यांचा जन्म लेवा पटेल समाजामध्ये, त्यांच्या मामांच्या नडियाद (गुजरात) येथील घरी झाला. त्यांची अचूक जन्मतारीख ज्ञात नाही, पण त्यांनी मॅट्रिक परीक्षेच्या वेळी स्वतःची जन्म तारीख ३१ ऑक्टोबर अशी लिहिली होती

🅾 पिता झवेरभाई व माता लाडबा यांचे ते चौथे पुत्र होत. झवेरभाई खेडा जिल्ह्याच्या करमसद गावचे रहिवासी होते. सोमाभाई, नरसिंहभाई व विठ्ठलभाई (विठ्ठलभाई - पुढे राजकारणीही झाले) ही त्यांची मोठी भावंडे होती. त्यांना एक काशीभाई नावाचा धाकटा भाऊ व दहीबा नावाची धाकटी बहीण होती.

🅾 बालपणी वल्लभभाई वडिलांना शेतीत मदत करत असत.

🅾 ते१ ८ वर्षाचे झाले असता त्यांचे लग्न जवळच्या गावातील १२/१३ वर्षाच्या झवेरबा यांच्यासोबत झाले. वल्लभभाई मॅट्रिकची परीक्षा तुलनेने उशिरा, म्हणजे वयाच्या २२व्या वर्षी उत्तीर्ण झाले.

🅾 इतरांकडे पुस्तके मागून, कुटुंबापासून दूर राहून दोन वर्षात वल्लभभाई पटेल वकिलीची परीक्षा पास झाले. त्यानंतर गोध्रा येथे झवेरबांसोबत त्यांनी गृहस्थ जीवनाची सुरूवात केली. तिथल्या बार कौन्सिलमध्येही नाव नोंदवले. झवेरबांपासून त्यांना दोन अपत्ये झाली

🅾- १९०४मध्ये मणीबेन आणि १९०६मध्ये डाह्याभाई. गुजरातमध्ये त्या वेळी ब्युबॉनिक प्लेगची साथ पसरली होती. या काळात त्यांनी स्वतःच्या कुटुंबास सुरक्षित स्थानी हलवले.

🅾वल्लभभाई गोधरा, बोरसद व आणंद भागात वकिली करत असताना करमसदच्या घराची जबाबदारीही सांभाळत

खान अब्दुल गफारखान

🅾 (१८९० - १९८८), सरहद्द गांधी व बादशाह खान या नावाने प्रसिद्ध, हे वायव्य सरहद्द प्रांतातील स्वातंत्र्यसेनानी होते. ज्यांनी भारतीय स्वतंत्रचा लढ्यामध्ये भाग घेतला होता. 

🅾भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते. गफारखानांनी १९२९ मध्ये 'खुदाई खिदमतगार' नावाची संघटना उभारली होती. ही संघटना "सुर्ख पोश" या नावाने देखील ओळखली जात होती.

🅾अब्दुल गफ्फार खान एक राजनैतिक आणि आध्यात्मिक नेता होते, त्यांना महात्मा गांधी सारखे अहिंसा आंदोलन साठी ओळखले जात होते. ते महात्मा गांधी यांचे चांगले मित्र होते, ब्रिटिश इंडिया मध्ये त्यांना ‘फ्रंटियर गाँधी’ चा नावाने संबोधले जायचे.

🅾खुदाई खिदमतगारचा यशामुळे ब्रिटि सरकारने त्यांना आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली, आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील काही या दडपशाहीस बळी पडले.

🅾बच्चा खानने अखिल भारतीय मुस्लिम लीगच्या भारताच्या फाळणीच्या मागणीचा जोरदार विरोध केला. जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने विभागीय योजनेची स्वीकृती जाहीर केली. विभाजनानंतर त्यांनी पाकिस्तान सोबत राहण्याचा निर्णय घेतला.

25 July 2020

Online Test Series

महाराष्ट्रातील पहिले----

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री 

➡️यशवंतराव चव्हाण

महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका

➡️मुंबई

महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र 

➡️मुंबई (1927)

महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र

➡️मुंबई (2 ऑक्टोबर 1972)

महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण

➡️गंगापूर (गोदावरी नदीवर -जि.नाशिक)

महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य

➡️कर्नाळा (रायगड)

महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र 

➡️खोपोली (रायगड)

महाराष्ट्रातील पहिला अनुविद्युत प्रकल्प

➡️तारापुर

महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ 

➡️मुंबई (1957)

महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ

➡️राहुरी (1968 जि. अहमदनगर)

महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना

➡️प्रवरानगर (1950 जि. अहमदनगर)

महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी 

➡️कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था इचलकरंजी

महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प जमसांडे 

➡️देवगड (जि. सिंधुदुर्ग)

महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र 

➡️आर्वी (पुणे)

महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प 

➡️चंद्रपुर

महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक 

➡️दर्पण (1832)

महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक

➡️दिग्दर्शन (1840)

महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र 

➡️ज्ञानप्रकाश (1904)

महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा

➡️पुणे (1848)

महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा 

➡️सातारा (1961)

महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी 

➡️मुंबई (1854)

महाराष्ट्रचे पहिले पंचतारांकित हॉटेल

➡️ताजमहाल, मुंबई

एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ति

➡️श्री. सुरेन्द्र चव्हाण

भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति 

➡️महर्षि धोंडो केशव कर्वे

रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति

➡️आचार्य विनोबा भावे

महाराष्टाचे पहिले रँग्लर

➡️रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे

महाराष्ट्रातील पहिल्या महिल्या डॉक्टर 

➡️आनंदीबाई जोशी

महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा

➡️वर्धा जिल्हा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष 

➡️न्यायमूर्ती महादेव रानडे

महाराष्ट्रातील पहिली रेल्वे ( वाफेचे इंजिन ) 

➡️मुंबई ते ठाणे (16 एप्रिल1853 )

महाराष्ट्रातील पहिली रेल्वे (विजेवरील) 

➡️मुंबई ते कुर्ला (1925)

महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक 

➡️सुरेखा भोसले (सातारा)

महाराष्ट्रातील पहिला  संपूर्ण साक्षर जिल्हा

➡️सिंधुदुर्ग

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा

➡️कुसुमावती देशपांडे

महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त 

➡️डॉ. सुरेश जोशी

महाराष्ट्रातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग 

➡️वडूज

ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट

➡️श्वास (2004)

राष्ट्रपती पदक प्राप्त दुसरा मराठी चित्रपट 

➡️श्वास

राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट

➡️श्यामची आई

भूगोल प्रश्नसंच

०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
बियास

०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
तिरुवनंतपुरम

०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
मध्य प्रदेश

०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
औरंगाबाद

०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
रांची

०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
जळगाव

०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
लक्षद्वीप

०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
१२ लाख चौ.कि.मी.

०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
दख्खनचे पठार

१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
मध्य प्रदेश

११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
उत्तर

१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
निर्मळ रांग

१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
नदीचे अपघर्षण

१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
Lignite

१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
औरंगाबाद

१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
पाचगणी

१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
आसाम

१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
मणिपूर

१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
मरियाना गर्ता

२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
राजस्थान

२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
दुर्गा

२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
प्रशांत महासागर

२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
शुक्र
______________________________________