Ads

29 January 2022

पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती

पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चिती करण्याकरिता अक्षांश व रेखांश यांचा आधार घेतला जातो.

🔹उत्तर व दक्षिण ध्रुव – पृथ्वीच्या आसाची दोन टोके म्हणजेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव होय. पृथ्वीचे जे टोक ध्रुव तार्‍याकडे आहे. त्याला उत्तर ध्रुव म्हणतात व खालच्या टोकाला असे दक्षिणध्रुव म्हणतात.

🔹उत्तर व दक्षिण गोलार्ध – पृथ्वीच्या आसाला काटकोनात छेद दिल्यास पृथ्वीचे दोन भाग तयार होतात. या दोन भागापैकी उत्तर ध्रुवाकडील भागास उत्तर गोलार्ध व दक्षिण ध्रुवाकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.

🔹विषवृत्त – उत्तर व दक्षिण गोलार्ध जोडणार्‍या मध्यवर्ती काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात विषुववृत्त हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्तुळ होय. विषवृत्तालाच पृथ्वीचा परीघ असेसुद्धा म्हणतात.

🔹अक्षांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषववृत्ताला समांतर दर एका अंशावर काढलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते म्हणतात. उत्तर गोलार्धातील रेषांना उत्तर अक्षांश व दक्षिण गोलार्धातील रेषांना दक्षिण अक्षांश असे म्हणतात. अक्षवृत्ताचे विषुववृत्तावरील स्थान 0° अक्षवृत्त मानले जाते, तर दक्षिण ध्रुवावरील स्थान 90° दक्षिण अक्षांश व उत्तर ध्रुवावरील स्थान 90° उत्तर अक्षांश असे मानले जाते.

🔹रेखांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषुववृत्ताला काटकोनात छेदून जाणार्‍या व एक अंश अंतरावर काढण्यात आलेल्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषेला रेखावृत्त म्हणतात. मूळ रेखावृत्त (0° रेखावृत्त) इंग्लंड जवळील ग्रीनवीच या बेटावरुन गेलेले आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेस व पश्चिमेस दर एक अंश अंतरावर याप्रमाणे 180° पश्चिम आणि 180° पूर्व अशी एकूण 360 रेखावृत्ते मानली गेलेली आहेत. ग्रीनवीचच्या पूर्वेकडील रेखावृत्तांना पूर्व रेखावृत्त व पश्चिमेकडील रेखावृत्तांना पश्चिम रेखावृत्त असे म्हणतात. विषुववृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर 111 किलोमीटर असून ध्रुवाकडे जातांना हे अंतर कमी कमी होत जाते व ध्रुवावर शून्य होते. कारण सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवावर एकत्र येतात.

🔹स्थाननिश्चिती – पृथ्वीवरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते या दोहोंच्याही सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करता येते.

• विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन भाग पडतात.
• पृथ्वीवर आडव्या रेषेने दाखवतात त्याला अक्षवृत्त म्हणतात. एकूण 181 अक्षवृत्त आहेत.
• आणि उभ्या रेषेने दाखवितात त्यास रेखावृत्त म्हणतात. ती एकूण 360 आहेत.
• शून्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त होय.

• पृथ्वीच्या स्वत: भोवती फिरण्याला परिवलन म्हणतात.
• पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, त्यास परिभ्रमण म्हणतात.
• पृथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.
• नकाशात हिरवा रंग वनक्षेत्रासाठी वापरतात.
• भारताची प्रमाणवेळ ही 82.30 पूर्व रेखावृत्तावरून ठरते. हे रेखावृत्त मिर्झापूर (उ. प्र.) वरून ठरते.
• तपांबर- पृथ्वीपृष्ठालगत असणाऱ्या वातावरणाच्या थरास तपांबर म्हणतात. याचा विस्तार 13 किमी आहे. वादळे, ढग, पाऊस इ.ची निर्मिती होते.
• वातावरणातील सर्वात कमी तापमान मध्यांबरात आढळते.
• संदेशवहनासाठी आयनांबर या थराचा उपयोग होतो.
• इंदिरा पॉंईट हे भारताचे सर्वात शेवटचे टोक आहे.
• क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात 7 वा क्रमांक आहे.
• मुख्य भूमी व सागरी बेटे मिळून भारतास 7517 किमी लांबीचा सागर किनारा लाभला आहे.
• भारताच्या वायव्येस पाकिस्तान व आफगाणिस्तान, उत्तरेस- चीन, नेपाळ, भूतान, पूर्वेस- म्यानमार व बांग्लादेश आहेत.
• क्षेत्रफळाच्या बाबतीत राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. त्यानंतर मध्यप्रदेश व तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो.
• गोवा या राज्याचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे.
• भारताच्या तिन्ही बाजूस पाणी असल्याने त्यास द्वीपकल्प म्हणतात.
• कांचनगंगा हे पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर तर, k2(गॉडवीन ऑस्टीन 8611 मी. ) हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे.
• दक्षिण भारतीय पठारास दख्खनचे पठार असे म्हणतात.
• अंदमान समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे.

संकीर्ण भूगोल

१]  सरोवरांचे शहर म्हणून ओळखले जाते. – उदयपूर

२]पश्चिम बंगालमधील सिंगनूर येथून ‘नॅनो’ कारचे उत्पादन गुजरात येथील मधील कोणत्या ठिकाणी हलविण्यात आले आहे. सानंद

३] ‘मुर’ बेटावरून कोणत्या दोन देशांदरम्यान वाद चालू आहे ? भारत – बांगलादेश

४]भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूंनी वेगवेगळ्या समुद्रांनी वेढलेला
आहे त्यास काय म्हणतात ?

भारतीय द्वीपकल्प

५] जगातील सर्वात मोठे नदीच्या पात्रातील बेट ‘माजोली’ हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे ? ब्रह्मपुत्रा

६]‘नोकरेक’ जैविक आरक्षण क्षेत्र कोठे आहे ? मेघालय

७]भारतातील प्रमुख अवकाशयान उड्डाण केंद्र कुठे आहे ? श्रीहरीकोटा

८] कोणत्या नदीच्या प्रवाहात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते ? कावेरी

९]जगातील सर्वात लांब धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे. पेराना

१०] भारतातील सर्वात मोठा सिंचन कालवा कोणता ? इंदिरा गांधी कालवा

११] कोणत्या प्रमुख पिकांच्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो? आंबा, केळी, अंगूर,

१2] जगातील आंबा उत्पादनापैकी किती टक्के आंब्याचे उत्पादन भारतात होते. ३९ %

१३] जगात फुलगोबीच्या उत्पादनात भारतात प्रथम क्रमांक, कांद्याच्या उत्पादनात दुसरा तर पत्तागोबीच्या उत्पादनात कोणता क्रमांक लागतो. तिसरा

१४] भारत …. यांच्या उत्पादनात व उपभोगत जगात प्रथम क्रमांकावर आहे. काजू

१५] दुधाच्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक आहे तर अंड्याच्या उत्पदनात त्याचा जगात कितवा नंबर लागतो. पाचवा

१६] कोंबड्यांना होणारा बर्ड फ्ल्यू म्हणजेच …… हा रोग आहे ? एविअन एन्फ्ल्यूएंजा

१७] सध्या भारतात प्रतिदिन, प्रतिव्यक्ती दुधाची उपलब्धता किती आहे ? २३१ ग्रॅम

१८] सध्या भारतात कोणत्या पाण्यातील मासेमारीचे प्रमाण सार्वधिक आहे. गोड्या पाण्यातील

१९] गोपनाथ सागर किनारा कोठे आहे ? गुजरात

२०] पाचव्या आर्थिक गणनेनुसार सार्वधिक उद्योग कोणत्या राज्यात आहेत ? तामिळनाडू ( ४४. ४७ लाख )
( दुसरा – महाराष्ट्र ४३.७५ लाख )

कायमधारा पध्दत

   प्रायोगिक स्वरूपात :- इ.स. 1790
   कायम स्वरूपात :- इ.स. 1793
   ठिकाण :- बंगालa, बिहार, ओडिसा, उत्तर मद्रास, वाराणसी
   प्रमाण :- भारतातील एकूण शेतजमीनीच्या 19%
   महसूल वाटणी :- शासन, जमीनदार व शेतकरी
   संकल्पना :- लॉर्ड कॉर्नवॉलिस
   गव्हर्नर :- लॉर्ड कॉर्नवॉलिस
   प्रभाव :- सर जॉन शोअर
   इतर नावे - जहागिरदारी पध्दत, मालगुजारी पध्दत, बिसवेदारी पध्दत.
🖍 वॉरन हेस्टिंग याने जमीन महसुल वसुल करण्याच्या अधिकारांचे लिलाव करण्याची पध्दत स्विकारली होती. मात्र ही व्यवस्था काही उपयोगात ठरली नाही. यामुळे हेस्टिंग्जच्या या पध्दतीतील दुष्परिणाम दूर करण्यासाठी कॉर्नवॉलिसने 1789 मध्ये सर जॉन शोअरच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. सर जाॅन शोअर समितीच्या शिफारशी नुसार, कायमधारा पध्दत लॉर्ड कॉर्नवॉलिस याने बंगाल प्रांतात इ.स. 
1790 ला 10 वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर लागू केली होती, परंतू नंतर 1793 मध्ये कॉर्नवॉलिसने ही व्यवस्था कायमस्वरूपासाठी लागू केली. म्हणूनच या व्यवस्थेला कायमधारा पध्दत असे म्हणतात.
🖍कायमधारा पध्दतीत जमीनीचा मालक जमीनदार असून प्रत्यक्ष शेतकरी हा भुदास असतो.
🖍या पध्दतीत शेतसारा हा रोख स्वरूपात गोळा केला जात असल्याने या पध्दतीत व्यापारवादाची तत्वेदिसतात.
🖍या व्यवस्थेत संपूर्ण जमिनीचे महसुल गोळा करण्याची जबाबदारी ही संपुर्णपणे जमिनादारांवरच सोपविण्यात आली.
🖍शेतकऱ्यांकडून मिळालेल्या महसुलांपैकी विशिष्ट रक्कम ही जमिनदाराने ब्रिटीशांना महसुल रूपात देणे आवश्यक होते.
🖍या व्यवस्थेनुसार जमिनदार व शेतकरी यांच्यात करारनाम्याची तरतूद होती जेणे करुन जमीनदाराला शेतकऱ्यांकडून ठराविक रक्कम महसूल रुपात मिळेल. परंतू तसे प्रत्यक्षात न झाल्यामुळे जमिनदार शेतकऱ्यांकडून कितीही महसुल वसुल करु शकत होता व ती जास्तीची रक्कम ही ब्रिटीशांना देण्याची 
गरजही नव्हती.
🖍1799 मध्ये तर महसूलाची रक्कम वेळेत न मिळाल्यास जमिनदारास शेतकऱ्याची जमीन, अवजारे किंवा जनावरे जप्त करण्याचा अधिकार मिळाला व यासाठी त्यास न्यायालयाच्या परवानगीची गरज देखील नव्हती.
🖍या व्यवस्थेचे खास वैशिष्ट्य म्हणजे जमीन महसुलाची रक्कम ही कायमची ठरविण्यात आली. यानुसार 89 टक्के सरकारला व 11 टक्के जमीनदारांना असे जमीन महसूलाच्या रकमेचे दोन भाग करण्यात आले होती.
🖍शेतसारा हा 30 ते 40 वर्षेस्थिर असेल.यात वाढ करण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळाला नाही.
🖍या कायमधारा पध्दतीचे लाभार्थी हे केवळ जमिनदारच बनत असे.
🖍या व्यवस्थेवर सर जॉन शोअर याचा प्रभाव होता.
🖍जॉन शोअर समितीच्या शिफारसीनुसार या समितीत जेम्स ग्रँट आणि जोनार्थन डंकन हे इतर सदस्य होते.
🖍ही पध्दत सुरूवातीला केवळ बंगाल प्रांतामध्ये लागु करण्यात आली हाेती. 
🖍तिचा विस्तार पुढे बिहार, ओडिसा, उत्तर मद्रास, वाराणसी या भागांमध्ये करण्यात आला.
🖍भारतातील एकुण शेतजमिनीच्या 19 % क्षेत्रफळावर ही पध्दत अस्तित्वात होती.
🖍विल्यम बेंटिकने आपल्या 1829 च्या भाषणात कायमधारा पध्दतीचे फायदे स्पष्ट केले होते.

प्रश्नमंजुषा


 १९३५ च्या कायद्याने-------% जनतेला मतदानाचा अधिकार मिळाला.

१) ५
२) १०✅
३) १५
४) २०
_______________________________
 सांप्रदायिक निवडणुकीचे जनक असे कोणाला संबोधतात?

१) लॉर्ड कर्झन 
२) लॉर्ड मिन्टो✅
३) मोंटेग्यु
४)  चेम्सफर्ड
_______________________________
 ---------- च्या चार्टर कायद्यानुसार नागरी सेवकांसाठी खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येवू लागले

१) १८५८
२)  १८११
३) १८६१
४) १८३३ ✅
___________________________
 १८३३ च्या चार्टर कायद्यानुसार बंगालच्या  गव्हर्नर  जनरल ला भारताचा  गव्हर्नर  जनरल असे संबोधण्यात आले भारताचे प्रथम गव्हर्नर  जनरल ----------------- हे होते

१) विल्यम बेंटिक ✅
२) वॉरन हेस्टीग्ज
३) रोबर्ट क्लाइव्ह
४) लॉर्ड कोर्नवालीस
_______________________________
 १७७३  च्या रेग्युलेटिंग  कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नर ला गव्हर्नर  जनरल असे संबोधण्यात येवू लागले पहिले गव्हर्नर जनरल ------------- हे होते

१) विल्यम बेंन्टीक
२) वॉरन हेस्टीग्ज ✅
३) रोबर्ट क्लाइव्ह
४ लॉर्ड कोर्नवालीस
_______________________________
 भारतात देशी वृत्तपत्रांना खरा प्रारंभ कधी आणि कोणाच्या काळात झाला?

१) मार्क्विस ऑफ हेस्टीग्ज ✔️✔️
२) लॉर्ड वेलस्ली
३) लॉर्ड मिंटो
४) लॉर्ड विल्यम बेंटिक
_______________________________
⚫️ भारतात पोलीस खात्याची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?

१) वॉरन हेस्टींग्ज
२) विल्यम कॅरी
३) लॉर्ड विल्यम बेंटिक
४) चार्ल्स बॅबेज
५) लॉर्ड कॉर्नवालीस ✅
_______________________________
⚪️ ब्रिटीश नागरी सेवेची सुरवात
कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
१) रोबर्ट हुक
२) जॉन स्नोव
३) लॉर्ड कॉंर्नवालीस ✅
४) रॉबर्ट कोच
_______________________________
 भारतीय सनदी सेवांचा जनक कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हणतात?
१)फ्रँकेल
२)लॉर्ड कर्झन
३) रिकेट्स
४) लॉर्ड कॉंर्नवालीस ✅
___________________________
 भारतीय नागरिकांना उच्च पदे आणि इंग्रजी शिक्षण कोणत्या गव्हर्नर जनरलने दिले?
१) एम.डब्लू.beijerinck1
२) लॉर्ड विल्यम बेंटीक ✅
३) जे.एच. वॉलकर
४)लॉर्ड मिंटो
___________________________

裂 कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय पर्यटन दिन’ साजरा केला जातो?

(A) 26 जानेवारी
(B) 24 जानेवारी
(C) 25 जानेवारी✅✅
(D) 22 जानेवारी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

裂 2020 या वर्षासाठी कोणत्या देशाने ‘ग्रुप ऑफ 77’ या समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे?

(A) भारत
(B) गुयाना✅✅
(C) ट्युनिशिया
(D) अफगाणिस्तान

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

裂 कोणती व्यक्ती 2020 या वर्षासाठी ‘दक्षिण आशियाच्या निवडणूक व्यवस्थापन मंडळाचा मंच’ (FEMBoSA) याचे अध्यक्ष आहेत?

(A) के. एम. नुरुल हुडा
(B) सुनील अरोरा✅✅
(C) सुशील चंद्र
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

裂 कोणत्या ठिकाणी सेवेसाठी प्राण्यांना समर्पित केलेले देशातले पहिले युद्ध स्मारक उभारण्यात येणार आहे?

(A) जम्मू
(B) लखनऊ
(C) पटना
(D) मेरठ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

裂 निवडणूक-विषयक व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने पापुआ न्यू गिनी आणि ____ या देशांसोबत सामंजस्य करार केला आहे.

(A) ट्युनिशिया✅✅
(B) श्रीलंका
(C) बांग्लादेश
(D) मालदीव

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

裂 कोणत्या राज्याने कृषी व्यवसायांना मदत करण्यासाठी जागतिक बँकेसोबत 210 दशलक्ष डॉलरचा कर्ज करार केला?

(A) आसाम
(B) नवी दिल्ली
(C) मणीपूर
(D) महाराष्ट्र✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव

संन्याशाचा उठाव : 1765-1800 – बंगाल शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक

चुआरांचा उठाव : 1768 – बंगाल-मिजापूर जिल्हा जगन्नाथ घाला

हो जमातीचे बंड : 1820 – छोटा नागपूर व सिंगभूम

जमिनदारांचा उठाव : 1803 – ओडिशा जगबंधू

खोंडांचा उठाव : 1836 – पर्वतीय प्रदेश दोरा बिसाई

संथाळांचा उठाव : 1855 – कान्हू व सिंधू

खासींचा उठाव : 1824 – आसाम निरतसिंग

कुंकिंचा उठाव : 1826 – मणिपूर

❇️ दक्षिण भारतातील उठाव 

पाळेगारांचा उठाव : 1790 – मद्रास

म्हैसूरमधील शेतकर्यांचा उठाव : 1830 – म्हैसूर

विजयनगरचा उठाव : 1765 – विजयनगर

गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव : 1870 – गोरखपूर

रोहिलखंडातील उठाव : 1801 – रोहिलखंड

रामोश्यांचा उठाव : 1826 – महाराष्ट्र उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत

भिल्ल व कोळ्यांचा उठाव : 1824

केतूरच्या देसाईचा उठाव : 1824 – केतूर

फोंडा सावंतचा उठाव : 1838

भिल्लाचा उठाव : 1825- खानदेश

दख्खनचे दंगे : 1875 पुणे, सातारा, महाराष्ट्र शेतकरी

महाराष्ट्र - सामान्यज्ञान


★ महाराष्ट्राची स्थापना : १ मे १९६०
★ महाराष्ट्राची राजधानी : मुंबई
★ महाराष्ट्राची उपराजधानी : नागपूर
★ महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग : ६
★ महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग : ५
★ महाराष्ट्रातील एकुण जिल्हे : ३६
★ महाराष्ट्रातील महानगरपालिका : २७
★ महाराष्ट्रातील नगरपालिका : २२६
★ महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत : ७
★ महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती : २८,८१३
★ महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा : ३४
★ महाराष्ट्रातील एकुण तालुके : ३५८
★ महाराष्ट्रातील पंचायत समित्या : ३५५
★ महाराष्ट्राची लोकसंख्या : ११,२३,७४,३३३
★ स्त्री : पुरुष प्रमाण : ९२९ : १०००
★ महाराष्ट्रातील एकुण साक्षरता : ८२.९१%
★ महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा : सिंधुदुर्ग
★ सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा : मुंबई उपनगर (८९.९१% )
★ सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा : नंदुरबार (६४.४% )
★ सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा : ठाणे
★ सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा : सिंधुदुर्ग
★ क्षेत्रफळाने मोठा जिल्हा : अहमदनगर
★ क्षेत्रफळाने लहान जिल्हा : मुंबई शहर
★ जास्त लोकसंख्येचा जिल्हा : ठाणे
★ जास्त लोकसंख्या घनतेचा जिल्हा : मुंबई शहर
★ कमी लोकसंख्येचा जिल्हा : सिंधुदुर्ग
★ भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण : ९.२८%
★ महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते : आंबा
★ महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते : मोठा बोंडारा
★ महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता : हारावत
★ महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता : शेकरु
★ महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती : मराठी
★ महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर : कळसुबाई (१६४६ मी. / ५,४०० फुट)
★ महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी : गोदावरी (पूर्ण लांबी : १,४६५ किमी)
★ महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी : ७२० किमी (४५० मैल)

★ महाराष्ट्राचा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक : ३रा
★ महाराष्ट्राचा भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक : २रा
★ महाराष्ट्राचा मानवी विकास निर्देशांक : ४था (०.६६५९)
★ महाराष्ट्राचा भारताच्या साक्षरतेच्यादृष्टीने क्रमांक : ६वा (८२.९%)
★ महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार क्रमांक (GDP) : १ला
★ महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा जिल्हा : सोलापूर
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी : मुंबई
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाटयगृह/सभागृह : षन्मुखानंद सभागृह, मुंबई
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लागलेला जिल्हा : रत्नागिरी
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा : चंद्रपूर
★ महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस : शताब्दी एक्सप्रेस (पुणे मुंबई)
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे :महाराष्ट्र एक्सप्रेस (कोल्हापूर-गोंदिया)
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा : अहमदनगर
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा : अहमदनगर
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी : गोदावरी
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ : बल्लारपूर (चंद्रपूर)
★ महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मुद्रा : रेगूर मृदा
★ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री : यशवंतराव चव्हाण
★ महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल : श्री. प्रकाश
★ महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका : मुंबई
★ महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र : मुंबई (१९२७)
★ महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र : मुंबई (२ ऑक्टोबर १९७२)
★ महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण : गंगापूर (गोदावरी नदीवर -जि.नाशिक)
★ महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य : कर्नाळा (रायगड)
★ महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र : खोपोली (रायगड)
★ महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प : तारापुर
★ महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ : मुंबई विद्यापीठ (१८ जुलै १८५७)
★ महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ : राहुरी, जि.अहमदनगर (१९६८)
★ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि.अहमदनगर : (१९५०)
★ महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी : कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी
★ महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प : जमसांडे, देवगड (जि. सिंधुदुर्ग)
★ महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र : आर्वी (पुणे)
★ महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प : चंद्रपुर
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक : दर्पण (१८३२)
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक : दिग्दर्शन (१८४०)
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र : ज्ञानप्रकाश (१९०४)
★ महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा : पुणे (१८४८)
★ महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा : सातारा (१९६१)
★ महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी : मुंबई (१८५४)

जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती


1.  जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते.

2.   नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.

📌. रचना -  प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.

📌. सभासद संख्या -  प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात. हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात.

📌. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.

📌.  सभासदांची निवडणूक -  प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.

📌.  पात्रता (सभासदांची) - जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

1.    तो भारताचा नागरिक असावा.

2.    त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3.    1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.

📌.  आरक्षण : -.   1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

📌.  तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.

📌. कार्यकाल : -  5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.

📌.  अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड : जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.

📌.  कार्यकाल : अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.

📌.  राजीनामा :

1.    अध्यक्ष - विभागीय आयुक्ताकडे

2.    उपाध्यक्ष - जिल्हा परिषद अध्यक्षाकडे

मानधन :

1. अध्यक्ष - 20,000/-

📌.  अविश्वासाचा ठराव :  - अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.

📌.  सचिव - . जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.

📌.  बैठक :-.  जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.

📌.  मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) :-  प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.

७३ वी घटना दुरुस्ती ( १९९२ – ९३ )

   ग्रामविकास राष्ट्रविकासाचा मूलभूत पाया मानला जातो. भारतीय राह्यघटनेच्या कलम ४० मध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आढळतो. परंतु हे कलम राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये येत असल्यामुळे याकडे राज्यांनी दुर्लक्ष केले. भारतामध्ये प्राचीन कालखंडापासून पंचायतराज संस्था अस्तित्वात आहेत. परंतु या संस्थांना घटनात्मक दर्जा नसल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणामध्ये या संस्थांचा विकास झाला नाही. पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा. अशी शिफारस सर्वप्रथम १९८६ मध्ये डॉ. एल. एम. सिंघवी या समितीने केली होती.
            ग्रामीण भागात सत्तेचे विकेंद्रीकरण होण्यासाठी व पंचायतराज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यासाठी पहिला प्रयत्न राजीव गांधी यांनी केला ‘नया पंचायतराज’ नावाचे ६४ वे घटनादुरुस्ती विधेयक १९८९ ला संसदेत सादर केले. परंतु अपयश आले. तसेच व्ही. पी. सिंग व चंद्रशेखर यांनीही प्रयत्न केले.
– पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा अशी शिफारस प्रथम डॉ. एल. एम. सिंघवी यांनी केली.
– राजीव गांधी यांनी सर्वप्रथम १५ मे  १९८९ ला ‘नाय पंचायतराज’ नावाचे ६४ वे पंचायतराज घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केले.

– १९८९ ला व्ही. पी.सिंग व चंद्रशेखर यांनीही पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याचा प्रयत्न केले.
– १९९० ला लोकसभा विसर्जित झालयामुळे या विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही.
-१९९२ ला पी. व्ही. नरसिंहराव यांनी पंचायतराज संबधी ७३ वे घटना दुरुस्ती विधेयक तयार केले.
– २२ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर लोकसभेत बहुमत सिद्ध.
– २३ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर राज्यसभेत बहुमत सिद्ध. व त्यानंतर या विधेयकास १७ राज्याची विधिमंडळाची मंजुरी मिळाली.
– २० एप्रिल १९९३ ला या विधयेकावर राष्टत्रपतीची स्वाक्षरी होऊन पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.
– २४ एप्रिल १९९३ पासून ७३ व्या घटना दुरुस्तीच्या अंबलबजावणी सुरु.
– २४ एप्रिल १९९४ पर्यंत या शिफारशी सर्व राज्यांना लागू करण्याचे बंधनकारक आले.
– २०१० पासून २४ एप्रिल हा दिवस संपूर्ण देशामध्ये ‘पंचायतराज दिन’ म्हणून पाळला जातो.

२४ एप्रिल १९९४ पर्यंत या शिफारशी सर्व राज्यांना लागू करण्याचे बंधनकारक आले.
– २०१० पासून २४ एप्रिल हा दिवस संपूर्ण देशामध्ये ‘पंचायतराज दिन’ म्हणून पाळला जातो.
– भारतीय राज्यघटनेच्या कलम २४३ ( A ते O ) मध्ये पंचायतराजची तरतूद करण्यात आली. व भारतीय राज्यघटनेला ११ वे परिशिष्ट जोडण्यात आले व त्यामध्ये एकूण २९ विषयांचा समावेश करण्यांत आला आहे.
– ७३ व्या घटनादुरुस्ती विधेयकास बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांनी विरोध दर्शविला होता.

अन्नातील पोषक तत्वे/घटक

स्थूल पोषक तत्वे – शरीरासाठी सर्वांत जास्त आवश्यकता. उदा. प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ (मेदपदार्थ)

सूक्ष्म पोषक तत्वे – अत्यंत कमी प्रमाणात (अल्प) आवश्यकता. उदा. जीवनसत्वे, क्षार.

🌿🌿प्रथिने (प्रोटीन्स) :🌿🌿

प्रथिने हि अमिनो आम्लांपासून बनलेली असतात.

शरीराला ’24’ अमिनो आम्लांची गरज असते.

त्यापैकी ‘9’ अमिनो आम्ले शरीरात निर्माण होऊ शकत नाहीत. ती आहारातून पुरवावी लागतात. म्हणून अशा अमिनो आम्लांना ‘आवश्यक अमिनो आम्ले’ असे म्हणतात.

(लायसीन, ल्युसीन, आयासोल्युसीन, व्हॅलिन, हिस्टीजीन, थ्रिओनिन, टिप्ट्रोफॅन, मिथिओनिन, फिनाईल, अॅलॅनिन)

अमिनो आम्ले ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर व कधी-कधी फॉस्फरस व लोह यांपासून बनलेली असतात.

🌿🌿प्रथिनांची साधने :🌿🌿

🌷प्राणीज साधने – दूध, अंडी, मांस, मासे.

🌷वनस्पतीज साधने –

डाळी-तूर, मूग, हरभरा, उडीद, मसूर, सोयाबीन  
                

धान्ये – ज्वारी, बाजारी, नाचणी, गहू.

तेलबिया – शेंगदाणे, तीळ, बदाम, करडई.

डाळींमध्ये प्रथिनांचे प्रमाण – 20-25% असते.

सोयबींमध्ये प्रथिनांचे प्रमाण – 43.2% (सर्वाधिक)

दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण- 3.2-4.3%

अंडी प्रथिनांचे प्रमाण – 13%

मासे प्रथिनांचे प्रमाण – 15-23%

मांस प्रथिनांचे प्रमाण – 18-26%

प्राणीज प्रथिने ही वनस्पतीज प्रथिनांपेक्षा ‘उच्च दर्जाचे’असतात. कारण त्यांच्यामध्ये सर्व आवश्यक अमिनो आम्ले उपलब्ध असतात.

विज्ञान :- पंचसृष्टी

- 1969 मध्ये आर. एच. व्हिटाकर यांनी या पंचसृष्टी पद्धतीचा शोध लावला.

1. सृष्टी मोनेरा (Kingdom Monera):

- जीवाणूंची सृष्टी
- Archaebacteria: Methanogens, Halophiles, Thermoacidophiles
- Eubacteri:
अॅन्टाॅन व्हाॅन लिवेनहुक- Father of  Bacteriology
- Cynobacteria
- Mycoplasma
- Actinomtcetes

2. सृष्टी प्रोटेस्टा (Kingdom Protesta):

- एकपेशीय सजीवांची सृष्टी
- Chrysophytes, Dinoflagellates, Euglenoids, Slime Moulds,
- Protozoa: Zooflagellates, Sarcodines, Sporozoan, Ciliates

3. सृष्टी कवक (Kingdom Fungai):

- असंश्लेषी, दृश्यकेंद्रकी & परपोषी सजीवांची सृष्टी
- कवकांचा अभ्यास - मायसिटाॅलाॅजी - जनक पियर अॅन्टोनिओ मायकेली
- भारतीय मायकाॅलीचा जनक - बटलर
- कवकांचे विभाजन: Myxeomicotina, Eumycoyina - Phycomycetes, Ascomycetes, Basidiomycetes, Dueteromycetes

4. सृष्टी वनस्पती (Kingdom Plantae):

- सर्व सजीवांची सृष्टी
- कॅरोलस लिनीयस - वनस्पतींच्या वर्गीकरणाचे श्रेय
- स्वयंपोषी व अचल असतात, इतर सजीवांसाठी अन्नाचे प्रमुख स्रोत

5. सृष्टी प्राणी (Kingdom Animalia):

- बहुपेशीय सजीवांची सृष्टी
- परपोषी व चल असतात, पेशीभित्तीका नसते.

● पंचसृष्टी

- 1969 मध्ये आर. एच. व्हिटाकर यांनी या पंचसृष्टी पद्धतीचा शोध लावला.

1. सृष्टी मोनेरा (Kingdom Monera):

- जीवाणूंची सृष्टी
- Archaebacteria: Methanogens, Halophiles, Thermoacidophiles
- Eubacteri:
अॅन्टाॅन व्हाॅन लिवेनहुक- Father of  Bacteriology
- Cynobacteria
- Mycoplasma
- Actinomtcetes

2. सृष्टी प्रोटेस्टा (Kingdom Protesta):

- एकपेशीय सजीवांची सृष्टी
- Chrysophytes, Dinoflagellates, Euglenoids, Slime Moulds,
- Protozoa: Zooflagellates, Sarcodines, Sporozoan, Ciliates

3. सृष्टी कवक (Kingdom Fungai):

- असंश्लेषी, दृश्यकेंद्रकी & परपोषी सजीवांची सृष्टी
- कवकांचा अभ्यास - मायसिटाॅलाॅजी - जनक पियर अॅन्टोनिओ मायकेली
- भारतीय मायकाॅलीचा जनक - बटलर
- कवकांचे विभाजन: Myxeomicotina, Eumycoyina - Phycomycetes, Ascomycetes, Basidiomycetes, Dueteromycetes

4. सृष्टी वनस्पती (Kingdom Plantae):

- सर्व सजीवांची सृष्टी
- कॅरोलस लिनीयस - वनस्पतींच्या वर्गीकरणाचे श्रेय
- स्वयंपोषी व अचल असतात, इतर सजीवांसाठी अन्नाचे प्रमुख स्रोत

5. सृष्टी प्राणी (Kingdom Animalia):

- बहुपेशीय सजीवांची सृष्टी
- परपोषी व चल असतात, पेशीभित्तीका नसते.

● वनस्पतींचे वर्गीकरण

- 1883 मध्ये एचर या शास्त्रज्ञाने अबीजपत्री (Cryptogame) आणि बीजपत्री (Phanerogamae) असे केले
- आर. एच. व्हिटाकर यांनी अबीजपत्री उपसृष्टीचे तीन प्रकारात खालीलप्रमाणे विभाजन केले.

1. थॅलोफायटा (Thalophyta)

- शैवाळांचा विभाग
- मूळ, खोड, पान नसतात
- फायकोलाॅजी म्हणजे शैवाळांचा अभ्यास
- जनक: माॅरिस
- भारतीय जनक: लाईंगर
- जगातील एकूण प्रकाशसंश्लेषणापैकी 90% प्रकाशसंश्लेषण शैवाळांमार्फत होते.
- शैवाळांचे 3 प्रकार: हिरवे (Chlorophyceae), तपकिरी (Phaeophyceae), लाल (Rhodophyceae)

2. ब्रायोफायटा (Bryophyta)

- मूळ, खोड, पान नसतात, मूलाभ असतात.
- वर्गीकरण: लिव्हरवार्टस (हिपॅटेसी) आणि माॅसेस (मुस्सी)
- ब्रायोलाॅजी म्हणजे ब्रायोफायटचा अभ्यास
- जनक: हेडविक
- भारतीय जनक: कश्यप

3. टेरिडोफायटा (Pteridophyta)

- पृथ्वीवरीर पहिली संवहनी संस्था
- मूळ, खोड, पान असतात
- चार प्रकार: सिलोफायटा, लायकोफायटा, आर्थोफायटा, फिलीकोफायटा
- जनक: थ्रिओफ्रस्ट

● मानवातील स्नायू

- सर्वात मोठा स्नायू - पार्श्वभागात असतो: Gluteus Maximus
- सर्वात लांब स्नायू - मांडीमध्ये असतो: Sartorious
- सर्वात मजबूत स्नायू - जबड्यात असतो: Masseter
- सर्वात अखूड स्नायू - कानात असतो: Stapedial Muscle