10 April 2022

क्रियापद व त्याचे प्रकार

क्रियापद व त्याचे प्रकार

वाक्यामधील क्रिया दर्शविणार्‍या ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
उदा.

गाय दूध देते.
आम्ही परमेश्र्वराची प्रार्थना करतो.
मुलांनी खरे बोलावे.
आमच्या संघाचे ढाल जिंकली.
धातु :

क्रियापदातील प्रत्यय रहित मूळ शब्दाला ‘धातु’ असे म्हणतात.

उदा. दे, कर, बोल, जिंग, ये, जा, उठ, बस, खा, पी, इत्यादी.

धातुसाधीते/ कृदंते :

धातुला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणार्‍या शब्दांना ‘धातुसाधीत’ किंवा ‘कृंदते’ असे म्हणतात.
धातुसाधीते वाक्याच्या शेवटी कधीच येत नाही ते वाक्याच्या सुरूवातीला किंवा वाक्याच्या मध्ये येतात.
धातुसाधीते नाम, विशेषण किंवा क्रियाविशेषणाचे काम करतात.
फक्त संयुक्त क्रियापदातच धातुसाधीते क्रियापदाचे काम करते.
उदा.   

क्रियापदे- केले, करतो, बसला, लिहितो, खातो.
धातुसाधिते- करून, बसता, लिहून, खतांना, खाणारी, लिहितांना, बोलतांना.
धावणे आरोग्यासाठी चांगले असते. (धावणे-धातुसाधीत, असते-क्रियापद)
त्यांच्या घरात खाणारी माणसे पुष्कळ आहेत. (खाणारी-विशेषण, खाणारी-धातुसाधीत, आहेत-क्रियापद)
जहाज समुद्रात बुडतांना मी पाहिले. (बुडतांना- क्रियाविशेषण, बुडतांना-धातुसाधीते, पाहिले–क्रियापद)
त्याचे हसणे लांबूनच एकू आले. (हसणे – नाम, हसणे-धातुसाधीत, आले–क्रियापद)
(टीप :एखादे वाक्य सकर्मक किंवा अकर्मक आहे हे कसे ओळखावे. ओळखण्याची क्रिया कोणावर होते व वाक्यातील क्रिया करणारा/ करणारी कोण असा प्रश्न विचारले असता उत्तर दोन भेटतात. म्हणजे उत्तर वेगवेगळे तर सकर्मक व जर उत्तर एकच भेटत असेल तर ते अकर्मक क्रियापद).

क्रियापदांचे प्रकार :

क्रियापदाचे मुख्य 2 प्रकार पडतात.

सकर्मक क्रियापद
अकर्मक क्रियापद
1. सकर्मक क्रियापद –

ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्याकरिता जेव्हा कर्माची गरज असते, त्या क्रियापदाला त्या वाक्यातील सकर्मक क्रियापद असे म्हणतात.
उदा. 

गाय दूध देते.
पक्षी मासा पकडतो.
गवळी धार काढतो.
राम आंबा खातो.
अनुराग निबंध लिहितो.
आरोही लाडू खाते.

2. अकर्मक क्रियापद –

ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्मांची आवश्यकता नसते. म्हणजे क्रिया कर्त्यापासून सुरू होते व कर्त्यापाशीच थांबते त्यांना ‘अकर्मक क्रियापदे’ असे म्हणतात.
उदा.   

मी रस्त्यात पडलो.
तो बसला.
आज भाऊबीज आहे.
तो दररोज शाळेत जातो.
(टीप : जेव्हा क्रिया कोणावर होते व क्रिया करणारा/करणारी कोण असे प्रश्न विचारले असता दोन्ही प्रश्नांचे उत्तर हे एकच सारखीच मिळतात त्याला ‘अकर्मक क्रियापद’ असे म्हणतात.)
क्रियापदांचे इतर प्रकार :

व्दिकर्मक क्रियापदे –

ज्या क्रियापदास दोन कर्म लागतात त्यास ‘व्दिकर्मक’ असे म्हणतात किंवा ज्या वाक्यातील क्रिया ही कर्त्यांकडून एकाच वेळी दोन घटकांवर घडते अशा क्रियापदास ‘व्दिकर्मक क्रियापद’ असे म्हणतात.
उदा.

आजीने नातीला गोष्ट सांगितली. (आजी – कर्ता, नातीने – अप्रत्यक्ष कर्म, गोष्ट- प्रत्यक्ष कर्म, सांगितले- व्दिकर्मक क्रियापद)
गुरुजी विधार्थ्यांना व्याकरण शिकवितात.
मुलीने भिकार्यायला पैसा दिला.
(प्रत्यक्ष कर्म हे नेहमी वस्तूवाचक असते व त्याची विभक्ती ही प्रथमा/ व्दितिया असते. अप्रत्यक्ष कर्म हे नेहमी व्यक्तिवाचक असते व त्याची विभक्ती ही नेहमी चतुर्थी असते.)
उभयविध क्रियापदे –

जेव्हा एकच क्रियापद हे दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक असे दोन्ही प्रकारे वापरता येते त्यास ‘उभयविध क्रियापद’ असे म्हणतात.
उदा.

त्याने घराचे दार उघडले. (सकर्मक क्रियापद)
त्यांच्या घराचे दार उघडले. (अकर्मक क्रियापद)
रामाने धनुष्य मोडले. (सकर्मक क्रियापद)
ते लाकडी धनुष्य मोडले. (अकर्मक क्रियापद)
अपूर्ण विधान क्रियापद –

जेव्हा वाक्यात क्रियापद असूनही वाक्याचा अर्थ पूर्ण होत नसेल तेव्हा अशा क्रियापदास ‘अपूर्ण विधान क्रियापद’ असे म्हणतात. अशावेळी वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी क्रियापदाव्यतिरिक्त ज्या शब्दांची गरज असते त्याला ‘विधान पूरक’ किंवा ‘पूरक’ असे म्हणतात.
उदा.

राम झाला.
राम राजा झाला. (राजा–विधानपूरक)
मुलगा आहे.
मुलगा हुशार आहे. (हुशार-विधानपूरक)
(टीप : नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द जर नामापूर्वी आला तर त्याला विशेषण म्हणतात आणि नंतर आला तर त्याला पूरक/विधक पूरक असे म्हणतात.)
संयुक्त क्रियापद –

धातुसाधीत व सहाय्यक क्रियापद यांनी मिळून बनलेल्या क्रियापदास ‘संयुक्त क्रियापद’ असे म्हणतात. मात्र या दोन्ही शब्दांमधून कोणत्याही एकच क्रियेचा बोध होणे आवश्यक आहे.
(धातुसाधीत+सहाय्यक क्रियापद= संयुक्त क्रियापद)
उदा.

क्रिडांगणावर मुले खेळू लागली. (खेळू=धातुसाधीत, लागली=सहाय्यक क्रियापद)
बाळ एवढा लाडू खाऊन टाक (खाऊन=धातुसाधीत, टाक=सहाय्यक क्रियापद)
सहाय्यक क्रियापद –

जेव्हा धातुसाधीत व क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध होतो तेव्हा धातुसाधीताला मदत/सहाय्य करणार्‍या क्रियापदाला ‘सहाय्यक क्रियापद’ असे म्हणतात.
उदा.   

क्रीडांगणावर मुले खेळू लागली.
बाळ एवढा लाडू खाऊन टाक.
सिद्ध क्रियापद –

जा, ये, कर, ऊठ, बस, असे जे मूळचे धातू आहेत त्यांना सिद्ध धातू म्हणतात व या सिद्ध धातूना प्रत्यय लागून तयार होणार्‍या क्रियापदाला ‘सिद्ध क्रियापद’ असे म्हणतात.
उदा.

तो दररोज शाळेत जातो.
ती खूप अभ्यास करते.
सूर्य पूर्वेस उगवतो.
आम्ही सकाळी लवकर उठतो.
साधीत क्रियापद –

विविध जातींच्या शब्दांपासून तयार होणार्‍या धातूंना ‘साधीत धातू’ असे म्हणतात व अशा साधीत धातुंना प्रत्यय लागून तयार होणार्‍या क्रियापदांना ‘साधीत क्रियापदे’ असे म्हणतात.
उदा.

हात-हाताळ-हाताळणे/ते/तात.
स्थिर-स्थिराव-स्थिरावतो/ला/वेल.
पुढे-पुढार-पुढारले/पुढारतात.
आण-आणव-आणवली
पाणी-पाणाव-पाणावले.
उदा.   

माझ्या कपटातील पुस्तके तो नेहमी हाताळतो.
तो शिक्षकांच्या व्यवसायात स्थिरावला.
आईच्या आठवणीने तिचे डोळे पाणावले.
आम्ही ही पुस्तके मुंबईहून आणवली.
खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली.
प्रायोजक क्रियापदे –

जेव्हा कर्ता ती क्रिया स्वत: करीत नसून दुसर्‍या कोणालातरी करावयास लावीत आहे असा अर्थ व्यक्त होतो तेव्हा त्या क्रियापदास ‘प्रायोजक क्रियापद’ असे म्हणतात.
उदा.

आई मुलांना हसविते.
तो मुलांना रडवितो.
त्याने त्याच्या मित्राला तुरुंगातून सोडविले.
तो मुलांना खेळवितो.
आई बाळाला निजविते.
तो गुरे चारतो.
शक्य क्रियापद –

वाक्यामधील ज्या क्रियापदाव्दारे कर्त्याच्या ठिकाणी क्रिया करण्याचे सामर्थ्य व्यक्त होते किंवा कर्त्याकडून ती क्रिया करण्याची शक्यता व्यक्त होते. त्या क्रियापदाला शक्य क्रियापदे म्हणतात.
उदा.

मला आता काम करवते.
त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते.
मला दररोज 20 कि.मी. चालविते.
बाईंना वह्या वर्गात आणवत नाही.
अनियमित/गौण क्रियापद –

मराठीत काही धातू असे आहेत त्यांना काळांचे व अर्थाचे सर्व प्रत्यय न लागता ते थोडया वेगळ्याच प्रकारे चालतात, त्यांना ‘अनियमित/गौण क्रियापद’ असे म्हणतात.
उदा.

मुलांनी सतत खेळू नये.
सुज्ञास अधिक सांगणे न लगे.
या दरवाजाने जाऊ नको.
परमेश्र्वर सर्वत्र आहे.
मला कॉफी पाहिजे.
असे वागणे बारे नव्हे.
आई घरी नाही.
भावकर्तुक क्रियापदे –

जेव्हा वाक्यातील क्रियापदाचा मूळ अर्थ किंवा भाव हाच त्यांचा कर्ता मानावा लागतो. अशा क्रियापदांना ‘भावकर्तृक क्रियापद’ असे म्हणतात.
उदा.

मी घरी पोहचण्यापूर्वीच सांजावले.
पित्त झाल्यामुळे तिला आज मळमळते.
पुण्यात जातांना कात्रज जवळ उजाडले.
आज दिवसभर सारखे गडगडते.

सर्वनाम ,विशेषण

 
सर्वनाम:

वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणार्‍या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
सर्वनामाचे मुख्य प्रकार सहा आहेत.

पुरुषवाचक सर्वनाम
दर्शक सर्वनाम
संबंधी सर्वनाम
प्रश्नार्थक सर्वनाम
सामान्य / अनिश्चित सर्वनाम
आत्मवाचक सर्वनाम
Must Read (नक्की वाचा):
वचन व त्याचे प्रकार

1. पुरुषवाचक सर्वनाम :

याचे तीन उपप्रकार पडतात.

1. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम :

बोलणारा स्वत:विषयी. बोलतांना किंवा लिहितांना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्यास प्रथम पुरुषी सर्वनाम असे म्हणतात.
उदा – मी, आम्ही, आपण, स्वत: इ

मी गावाला जाणार
आपण खेळायला जावू.
2 .व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम :

जेव्हा बोलणारा ज्यांच्याशी बोलावयाचे आहे. त्याचा उल्लेख करतांना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्या सर्वनामास व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात.
उदा – तो, तुम्ही, आपण, स्वतः इ

आपण कोठून आलात?
तुम्ही घरी कधी येणार?
3. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम :

जेव्हा बोलणारा दुसर्‍या व्यक्तीशी बोलतांना व तिसर्‍या व्यक्तींचा उल्लेख करतांना ज्या, ज्या सर्वनामाचा वाक्यात उपयोग करतो त्या सर्वनामांस तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात.
उदा –  तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः इ.

त्याने मला कामाला लावले पण स्वतःमात्र आला नाही.
त्या सर्वजण इथेच येत होत्या.
2. दर्शक सर्वनाम :

जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरीता जे सर्वनाम वापरले जाते. त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात.
उदा – हा, ही, हे, तो, ती, ते.

ही माझी वही आहे
हा माझा भाऊ आहे.
ते माझे घर आहे.
तो आमचा बंगला आहे.
3. संबंधी सर्वनाम :

वाक्यात पुढे येणार्‍या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणार्‍या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात.
उदा – जो, जी, जे, ज्या

– ही सर्वनामे मिश्र वाक्यातच येतात.
– ही सर्वनामे गौणवाक्याच्या सुरवातीलाच येतात.
– असे गौण वाक्य हे गौण वाक्याचे विशेषण हे प्रकार असते.
जे चकाकते ते सारेच सोने नसते.
जो तळे राखील तो पाणी चाखील.
4. प्रश्नार्थक सर्वनाम :

ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्या सर्वनामास प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात.
  उदा – कोण, कुणास, काय, कोणी, कोणाला

तुमच्यापैकी कोण धडा वाचणार?
तुझ्याकडे किती रुपये आहेत?
तू कोठे जातोस?
5. सामान्य / अनिश्चित सर्वनाम :

कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला, ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे ते निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम म्हणतात.
उदा.

त्या पेटीत काय आहे ते सांग.
कोणी कोणास हसू नये.
कोण ही गर्दी !
6. आत्मवाचक सर्वनाम :

एकाच वाक्यात आधी आलेल्या नामाचा किंवा सर्वनामाचा पुन्हा उल्लेख करतांना ज्या सर्वनामाचा उपयोग होतो. त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात.
  उदा.

1. मी स्वतःत्याला पहीले.
2. तू स्वतः मोटर चालवशील का?
3. तो आपण होवून माझ्याकडे आला.
4. तुम्ही स्वतःला काय समजतात.
मराठीत मूळ 9 सर्वनाम

मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतःया मूळ सर्वनामापैकी –

लिंगानुसार बदलणारी तीन सर्वनाम आहेत – तो, हा, जो.
तो– तो, ती, ते
हा– हा, ही, हे
जो-जो, जी, जे
मूल सर्वनामापैकी वचनानुसार बदलणारी पाच सर्वनामे आहेत. – मी, तू, तो, हा, जो इ
मी– आम्ही
तू– तुम्ही
तो– तो, ती, ते (एकवचनी) ते, त्या, ती (अनेकवचनी)
हा– हा, ही, हे (एकवचनी) हे, ह्या, ही (अनेकवचनी)
जो– जो, जी, जे (एकवचनी) जे, ज्या, जी (अनेकवचनी)

_______________________________

विशेषण :


नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्‍या शब्दास विशेषण असे म्हणतात.

उदा.

चांगली मुले


काळा कुत्रा


पाच टोप्या


विशेषण – चांगली, काळा, पाच

विशेष्य – पिशवी, कुत्रा, टोप्या

विशेषणाचे प्रकार :

गुणवाचक विशेषण


संख्यावाचक विशेषण


सार्वनामिक विशेषण


1. गुणवाचक विशेषण :

नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणालागुणवाचक विशेषणअसे म्हणतात.

उदा.

हिरवे रान


शुभ्र ससा


निळे आकाश


2. संख्या विशेषण :

ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात.

संख्या विशेषणाचे पाच प्रकार आहेत.

गणना वाचक संख्या विशेषण


क्रम वाचक संख्या विशेषण


आवृत्ती वाचक संख्या विशेषण


पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण


अनिश्चित संख्या विशेषण


1. गणना वाचक संख्या विशेषण :

ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूची गणती किंवा गणना करण्यासाठी होतो त्या विशेषणाला गणनावाचक विशेषण असे म्हणतात

उदा.

दहा मुले


तेरा भाषा


एक तास


पन्नास रुपये


गणना वाचक संख्या विशेषणाचे तीन प्रकार पडतात

1. पूर्णाक वाचक – पाच, सहा, अठरा, बारा.

2. अपूर्णाक वाचक – पावशेर, अर्धा, सव्वा, दीड.

3. साकल्य वाचक – पाचही मैत्रिणी, दोन भाऊ.

2. क्रमवाचक संख्या विशेषण :

वाक्यामधील जे विशेषण वस्तूचा क्रम दर्शविते त्या विशेषणाला क्रमवाचक विशेषण असे म्हणतात.

उदा.

पहिल दुकान


सातवा बंगला


पाचवे वर्ष


3. आवृत्ती वाचक संख्या विशेषण :

वाक्यामधील जे विशेषण संख्येची किती वेळा आवृत्ती झाली ते दर्शविते त्यास आवृत्तिवाचक विशेषण असे म्हणतात.

उदा.

तिप्पट मुले


दुप्पट रस्ता


दुहेरी रंग


4. पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण :

जी विशेषणे पृथ्वकत्व म्हणजे वेगळा बोध करून देतात त्यांना पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण असे म्हणतात.

उदा.

मुलींनी पाच-पाच चा गट करा


प्रत्येकाने चार-चार प्रश्न सोडवा


5. अनिश्चित संख्या विशेषण :

ज्या विशेषणाव्दारे नामाची निश्चित संख्या व्यक्त होत नाही अशा विशेषणाला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात.

उदा.

काही मुले


थोडी जागा


भरपूर पाणी


3. सार्वनामिक विशेषण :

सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात.

उदा.

हे झाड


ती मुलगी


तो पक्षी


मी, तू, तो, हा, जो, कोण, काय ही सर्वनामे अशावेळी नेहमीच मूळ स्वरुपातयेता सर्वनामास विभक्तीची प्रत्यय लागून त्यांच्या रूपात पुढील प्रमाणे बदल होतो.

मी – माझा, माझी,


तू – तुझा, तो-त्याचा


आम्ही – आमचा, तुम्ही-तुमचा, ती-तिचा


हा – असा, असला, इतका, एवढा, अमका


तो – तसा, तसला, तितका, तेवढा, तमका


जो – जसा, जसला, जितका, जेवढा


कोण – कोणता, केवढा


मूलभूत कर्तव्ये,मूलभूत अधिकार/हक्क

मूलभूत कर्तव्ये

घटनेतील कलम 51 (अ) आणि 55 मध्ये 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश आहे.
स्वर्णसिंह कमिटीच्या शिफारशिनुसार खालील 10 मूलभूत कर्तव्यांचा भारतीय घटनेत समावेश करण्यात आलेला आहे.
1. घटनेतील आदर्शचा , राष्ट्रीय ध्वजाचा व राष्ट्रगीताचा आदर करणे.

2. स्वतंत्र लढ्यापासून निर्माण झालेल्या उदात्त आदर्शाचा अभिमान बाळगणे व त्यांचे अनुपालन करणे.

3. भारतीय सार्वभौमत्व व एकात्मता यांचे संरक्षण करणे.

4. राष्ट्राचे संरक्षण करणे व राष्ट्राला गरज असेल तेव्हा राष्ट्रसेवेस धौन जाणे.

5. सार्व भारतीयांमध्ये एकात्मता बंधुभाव निर्माण करणे.

6. जंगल, सरोवरे , नद्या , तळे , वन्य प्राणी यासारख्या नैसर्गिक देणग्यांचे संरक्षण करणे.

7. आपल्या संस्कृतीचा वैभवशाली वारसा जतन करणे.

8. शास्त्रीय दृष्टीकोन, मानवता व अभ्यासूवृती यांची वाढ करणे.

9. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे.

10. व्यक्तीगत व सार्वजनिक अशा प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टतेने वाटचाल करणे.

__________________________________



मूलभूत अधिकार/हक्क




भारतीय राज्यघटनेच्या तिसर्‍या प्रकरणात 14 ते 35 या कलमामध्ये मूलभूत हक्काविषयी माहिती आहे.


घटनेनुसार नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरूवातीस 7 होते मात्र 44 व्या घटना दुरूस्ती (1978) नुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार रद्द करून तो कायदेशीर अधिकार केला आहे.


म्हणून सध्या 6 अधिकार आहेत.


1. समतेचा अधिकार = कलम 14 ते 18


 


2. स्वातंत्र्याचा अधिकार = कलम 19 ते 22


 


3. शोषणाविरुद्धचा अधिकार = कलम 23 ते 24


 


4. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार = कलम 25 ते 28


 


5. संस्कृती व शिक्षणाचा अधिकार = कलम 29-30


 


6. न्यायालयीन संरक्षणाचा अधिकार – कलम 32 


राज्यघटनेतील परिशिष्ट्ये

राज्यघटनेतील परिशिष्ट्ये (Schedules)

सध्या राज्यघटनेत एकूण 12 परिशिष्ट्ये आहेत.
परिशिष्ट – 1 –   घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची यादी (28) व (7)

परिशिष्ट – 2 –   राष्ट्रपती, पंतप्रधान, न्यायाधीश, सभापती आणि इतर सदस्य यांच्या पगाराचा तपशील

परिशिष्ट – 3 –   विविध शपथा व प्रतिज्ञा यांचे नमुने

परिशिष्ट – 4 –   राज्य व केंद्रशासित प्रदेशातर्फे राज्यसभेवर किती सदस्य पाठवावे याची नोंद

परिशिष्ट – 5 –   अनुसूचित जाती व जमाती प्रशासन व नियंत्रण

परिशिष्ट – 6 –   उत्तर पूर्वीय राज्यातील आदिवासींचे प्रशासन

परिशिष्ट – 7 –   केंद्रसूची, राज्यसूची व समवर्ती सुचींची माहिती

परिशिष्ट – 8 –   राष्ट्रीय भाषांची माहिती (22 भाषा)

परिशिष्ट – 9 –   विविध कायद्यांची माहिती

परिशिष्ट – 10 – पक्षांतर विरोधी विधेयकाची माहिती

परिशिष्ट – 11 – पंचायत राज संबंधी तरतुदी

परिशिष्ट – 12 – नागरी प्रशासन (नगरपालिका) याविषयी तरतुदी

राज्यसभेबद्दल संपूर्ण माहिती

राज्यसभेबद्दल संपूर्ण माहिती

राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असून ते व्दितीय सभागृह आहे असे म्हटले जाते तर लोकसभा कनिष्ठ सभागृह असून प्रथम सभागृह मानले जाते.

सभासदांची संख्या :

घटनेच्या 80 व्या कलमामध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की, राज्यसभेची सभासद संख्या 250 इतकी असेल त्यातील 238 निर्वाचित असतील तर 12 सदस्य भारताच्या राष्ट्रपतींकडून नियुक्त केलेले असतील यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ असतील.

उदा. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक इ.

उमेदवारांची पात्रता :

घटनेच्या 84 व्या कलमात सभासदांची पात्रता सांगितली आहे ती पुढीलप्रमाणे:

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

निवडणूक पद्धत :

राज्यसभेच्या सदस्यांची निवड भारतीय नागरिकांकडून न करता प्रत्येक घटक राज्याच्या विधानसभेत निवडून आलेल्या उमेदवारांकडून केली जाते व ही निवडणूक पद्धत प्रत्यक्ष नसून अप्रत्यक्ष आहे.

राज्यसभेचा कार्यकाल :

राज्यसभा हे स्थायी सभागृह असून दर दोन वर्षानी 1/3 सभासद निवृत्त होतात. तेवढेच त्याच्या जागी नव्याने निवडतात.

सभासदांचा कार्यकाल :

प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 6 वर्ष इतका असतो परंतु कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी तो आपला राजीनामा राज्यसभेच्या अध्यक्षाकडे देऊ शकतो.

पदमुक्तता :

कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होते. परंतु (60 दिवसात संबंधित सभागृहाला लागोपाठ चार दिवस सुट्ट्या आल्या असतील तर सभासदत्व रद्द होत नाही.)

बैठक किंवा आधिवेशन :

घटनेच्या 85/1 कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची योग्य वाटेल त्यावेळी अधिवेशन बोलवितो परंतु या अधिवेशनामध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे.

गणसंख्या :

कोणतेही सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली सभासद संख्या म्हणजेच गणसंख्या होय. ती 1/10 इतकी निर्धारित करण्यात आली आहे.

राज्यसभेचा सभापती :

घटनेच्या 89व्या कलमानुसार भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. तो राज्यसभेचा सभासद नसल्यामुळे त्याला सभागृहात मतदान करण्याचा अधिकार नाही परंतु 100 व्या कलमानुसार समान मते पडल्यास तो आपले निर्णायक मत देऊ शकतो.

उपाध्यक्ष :

राज्यसभेतील निवडून आलेल्या एका सदस्याची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते.





लोकसभेबद्दल संपूर्ण माहिती

लोकसभेबद्दल संपूर्ण माहिती

लोकसभेची निर्मिती ब्रिटन आणि कॅनडाच्या कॉमन सभागृहाच्या धर्तीवर करण्यात आली आहे.

सभासदांची संख्या :

घटनेच्या 81 व्या कलमामध्ये लोकसभेच्या सभासदांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे. 1974 च्या 31 व्या घटनादुरुस्तीनुसार घटकराज्यांच्या सभासदांची संख्या 525 तर केंद्रशासीत प्रदेशांची सभासद संख्या 20 इतकी करण्यात आली आहे. परंतु लोकसभेत जास्तीत जास्त 552 इतके सभासद सांगितले आहेत. त्यामध्ये 530 घटकराज्य. 20 केंद्रशासीत प्रदेश आणि जर अँग्लो इंडियन समाजाला लोकसभेत प्रतिनिधीत्व मिळाले नाही तर दोन सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. भारतीयलोकप्रतींनिधी कायदा 1951 नुसार पाच ते साडेसात लाख मतदारांमागे एक लोकसभेचा उमेदवार निवडला जातो.

मतदारसंघ निर्धारण आयोग :

या आयोगाची निर्मिती 1972 साली करण्यात आली. त्या आयोगाचा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश असतो.

उमेदवारांची पात्रता :

घटनेच्या 84 व्या कलमात सभासदांची पात्रता सांगितली आहे ती पुढीलप्रमाणे

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

निवडणूक पद्धत :

लोकसभेची निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने होते. ती निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली होते.

लोकसभेचा कार्यकाल :

पाच वर्ष इतका आहे परंतु तो कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. आणीबाणीच्या कालखंडात संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाल फक्त एकदाच एका वर्षासाठी 83/2 कलमानुसार वाढवू शकतो.

सभासदांचा कार्यकाल :

प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 5 वर्ष इतका असतो परंतु कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी आपला राजीनामा लोकसभेच्या सभापतींकडे देऊ शकतो.

बैठक किंवा अधिवेशन :

घटनेच्या 85 कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची वाटेल त्या वेळी अधिवेशन बोलवितो परंतु दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

गणसंख्या :

कोणत्याही सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली सभासद संख्या म्हणजेच गणसंख्या होय. ती 1/10 इतकी निर्धारित करण्यात आली आहे.

पदमुक्तता :

कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होते. परंतु (60 दिवसात संबंधित सभागृहाला लागोपाठ चार दिवस सुट्ट्या आल्या असतील तर सभासदत्व रद्द होत नाही.)

लोकसभेचा सभापती कार्य आणि अधिकार :

लोकसभेत निवडून आलेल्या एका सदस्याची सभापती म्हणून व दुसर्‍या एका सदस्याची उपसभापती म्हणून लोकसभेतील सदस्यांकडून निवड केली जाते.

कार्य :

धनविधेयक आहे की नाही हे ठरविणे.
प्रश्न आणि उपप्रश्न विचारण्यास परवानगी देणे.
प्रवर समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती करणे.
कमरोको प्रस्ताव आणण्यासाठी सभापतींची परवानगी आवश्यक आहे.
सभागृहात शांतता व सुव्यवस्था राखणे.
सभागृहाचे कामकाज सुरू होण्यासाठी पुरेशी गणसंख्या नसेल तर कामकाज थांबविणे.
राष्ट्रपतीने दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलविल्यास अध्यक्षपद भूषविणे.
सामान्य उद्देश समिती, नियम समिती व कार्यवाही समितीचा सभापती पदसिद्ध अध्यक्ष असतो.