11 April 2022

आंनदयात्री कवी बाळकृष्ण भगवंत बोरकर उर्फ बा भ. बोरकर

आंनदयात्री कवी बाळकृष्ण भगवंत बोरकर उर्फ बा भ. बोरकर यांच्या विषयी
जन्म.३० नोव्हेंबर १९१९
१९३० मध्ये वयाच्या विसाव्या वर्षीच त्यांचा प्रतिमा हा काव्यसंगह प्रकाशित झाला. त्यांच्या या काव्यसंगहावर केशवसुत, बालकवी, गोविंदागज यांचा प्रभाव विशेषत्वाने जाणवतो. बोरकरांच्या मनावर घरातील धार्मिक वातावरण, प्रेमळ आप्त परिवार, शालेय जीवनातील संस्कार आणि गोव्याचा व कोकणचा रमणीय निसर्ग यांचा खोल परिणाम झालेला त्यांच्या कवितेतूनही दिसून येतो.
निसर्गाच्या भव्योत्कट सौंदर्याचा त्यांना जणू ध्यास जडला होता. निसर्ग हीच त्यांची भाषा बनली; त्यांच्या अविष्काराचे माध्यम बनले. गोव्याच्या निसर्गरम्य भूमीचे वर्णन ते पुढील शब्दांत करतात, - या गोव्याच्या भूमीत मधाचे नारळ असतात. कड्याकपारीतून दुधाचे घट फूटतात; आंब्या फणसांची रास असते. इथे चांदणे माहेरी येते आणि पावसात दारापुढे सोन्या-चांदीच्या धारा खेळतात... किती नितांत सुंदर आणि अत्यंत कल्पनारम्य, पण जिव्हाळ्याने केलेले हे वर्णन आहे! त्यांच्या सर्वच प्रकारच्या लेखनात, विशेषत: कवितेत नियमितपणे निसर्ग डोकावतो. निसर्ग भाषा हेच त्यांचे वेगळेपण.
१९३२ साली बोरकरांच्या कवितेने भारावून जाऊन श्रेष्ठ कवी भा. रा. तांबे यांच्या तोंडून Here is a new star on horisen असे कौतुकाचे उद्गार निघाले. कवीवर्य भा. रा. तांबे यांच्या विचारसरणीचा, काव्यशैलीचा त्यांच्यावर खूप परिणाम झालेला दिसतो. एकलव्यासारखे तांबे यांचे गुरुपद त्यांनी मनोमन स्वीकारले व मानाने मिरवलेही. त्यामुळे तांब्यांच्या घराण्याची गायकी पुढे नेणारे कवी अशी त्यांची प्रतिमा झाली. बोरकरांचे वि. स. खांडेकर, काकासाहेब कालेलकर, कुमार गंधर्व, पु.ल.देशपांडे, चित्रकार दलाल, यांच्यासह म. गांधी, डॉ. लोहिया, पं. नेहरू, योगी अरविंद बाबू यांसारया विविध प्रांतांतील थोर लोकांबरोबर स्नेहपूर्ण नाते होते. त्यामुळे त्यांचे अनुभवविश्र्व व जीवन अधिक समृद्ध झाले. बोरकरांच्या संपूर्ण काव्यप्रवासात त्यांची कविता जीवनाच्या गतीनुसार आशयदृष्ट्या समृद्ध होत गेलेली दिसते. ते सौंदर्यलुब्ध मनाचे कवी होते. या सौंदर्यातूनच त्यांना दिव्यत्वाचा, अपार्थिवाचा साक्षात्कार होतो.
दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती,
यज्ञी ज्यांनी देऊनी निज शीर, घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभुमीवर, नाही चिरा नाही पणती,
तेथे कर माझे जुळती.
या कवितेतील मानवतावादामागील सच्चेपणा आपणास आजही भावतो. अतिशय प्रगल्भ व अर्थगर्भ शब्दयोजनेमुळे ही कविता मैलाचा दगड ठरली. ज्ञानदेव गेले तेव्हा, देखणे ते चेहरे, जीवन त्यांना कळले हो अशा एकाहून एक सरस कविता त्यांनी लिहिल्या. स्त्री सौंदर्य आणि प्रेमभावना हेदेखील त्यांच्या कवितांचे प्रमुख विषय होते. त्यांचे गोव्यावर व कोकणी भाषेवरही अतिशय उत्कट प्रेम होते. कोकणी भाषेतही त्यांची बरीच पुस्तके प्रकाशित आहेत. त्यातील सासाय या कोकणी संगहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. वास्तवाच्या प्रखर आचेतही बोरकरांच्या कवितेने काव्यात्मतेची स्वप्नील धुंदी टिकवून ठेवली. सुंदरतेच्या श्रद्धेतून, श्रुतिमधूर, गीतधर्मी व भावपूर्ण कवितांसाठी आजही ते आदरपूर्वक ओळखले जातात. १९३४ मध्ये बडोदा येथील साहित्य संमेलनात तेथे कर माझे जुळती या कवितेसाठी त्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले.
बोरकरांच्या भावीण या कादंबरीला १९५० मध्ये गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे सुवर्णपदक मिळाले. त्यांच्या आनंदभैरवी, चित्रवीणा, गितार, आनंदयात्री रवींद्रनाथ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले. १९६७ साली राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री हा किताब देऊन त्यांना गौरवण्यात आले. स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांच्या बहुमोल सकिय सहभागाबद्दल भारत सरकारतर्फे १९७४ मध्ये तामपट देण्यात आला.
  *मा.बा भ. बोरकर* यांचे ८ जुलै १९८४ निधन झाले. आपल्या समूहाकडून *मा.बा भ. बोरकर* यांना आदरांजली.
*माझ्या गोव्याच्या भूमीत*

माझ्या गोव्याच्या भूमीत
गड्या नारळ मधाचे,
कड्या-कपाऱ्यां मधुन
घट फ़ुटती दुधाचे||

माझ्या गोव्याच्या भूमीत
आंब्या-फ़णसाची रास,
फ़ुली फ़ळांचे पाझर
फ़ळी फ़ुलांचे सुवास||

माझ्या गोव्याच्या भूमीत
वनश्रीची कारागिरी,
पाना-फ़ुलांची कुसर
पशु-पक्ष्यांच्या किनारी||

माझ्या गोव्याच्या भूमीत
उन्हाळ्यात खारा वारा,
पावसात दारापुढे
सोन्याचांदीच्या रे धारा||

माझ्या गोव्याच्या भूमीत
येते चांदणे माहेरा,
ओलावल्या लोचनांनी
भेटे आकाश सागरा||

माझ्या गोव्याच्या भूमीत
चाफ़ा पानाविण फ़ुले,
भोळा भाबडा शालीन
भाव शब्दाविण बोले||

माझ्या गोव्याच्या भूमीत
गडे साळीचा रे भात,
वाढी आईच्या मायेने
सोन-केवड्याचा हात||

माझ्या गोव्याच्या भूमीत
सागरात खेळे चांदी,
आतिथ्याची, अगत्याची
साऱ्या षडरसांची नांदी||
बा. भ. बोरकर

तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे

*तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे*

ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला.अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणूनपरिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.१९४४ ला त्यांनी लाल बावटा पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।ही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. १६ ऑगष्ट १९४७ साली “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा शिवाजी पार्क वर दिला त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत.अण्णा भाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या  मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु तिचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.*

विरुद्धार्थी शब्द ,काही महत्त्वाचे शब्द व अर्थ ,साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

   विरुद्धार्थी शब्द
अकृत्रिम               कृत्रिम
अकर्मक               सकर्मक
अकुशल               कुशल
अखेर                   प्रारंभ
अडाणी                ज्ञानी
अविचार               विचार
अच्युत                 च्युत
अध्ययन               अध्यापन
अचुक                  चुक
अप्रस्तुत               प्रस्तुत
असंतोष              संतोष
अकारण              सकारण
अमोल                 मोल
अस्पष्ट                 स्पष्ट
असली                नकली
अविलंब              विलंब
अनिष्ट                 इष्ट
असुर                  सुर
अबला                सबला
अखेर[शेवट].      आरंभ
अचल                 चल
अपराधी             निरापराधी
अपारदर्शक        पारदर्शक
अपरिमित           परिमीत
अपकर्ष             उत्कर्ष
अप्रिय                प्रिय
अप्रचलित          प्रचलित
अप्रशस्त            प्रशस्त
अपकीर्ती           कीर्ती
अप्रतिबंध          प्रतिबंध
अपुर्ण                पुर्ण
अपुरा                पुरा
अपार्थिव           पार्थिव
अपरिचित          परिचित
अप्रत्यक्ष            प्रत्यक्ष
अदृश्य               दृश्य
अपेक्षित           अनपेक्षित
अप्रसिद्ध          प्रसिद्ध

____________________________

काही महत्त्वाचे शब्द व अर्थ

1.अकालिन=  एकाएकी घडणारे 2.आकालिन=  अयोग्य वेळेचे 3.आकांडतांडव=रागाने केलेला थरथराट
4.अखंडित=सतत चालणारे
5.अगत्य=आस्था
6.अगम्य=समजू न शकणारे
7.अग्रज=वडील भाऊ
8.अग्रपूजा=पहिला मान
9.अज्रल=अग्री
10.अनिल=वारा
11.अहारओठ, ओष्ट
12.अनुग्रह=कृपा
13.अनुज=धाकटा भाऊ
14.अनृत=खोटे
15.अभ्युदय=भरभराट
16.अवतरण=खाली येणे
17.अध्वर्यू=पुढारी
18.अस्थिपंजर=हाडांचा सापळा
19.अंबूज=कमळ
20.अहर्निश=रांत्रदिवस, सतत
21.अक्षर=शाश्वत
22.आरोहण=वर चढणे
23.आत्मज=मुलगा
24.आत्मजा=मुलगी
25.अंडज=पक्षी
26.अर्भक=मूल
27.अभ्रक=पारदर्शक पदार्थ
28.आयुध=शस्त्र
29.आर्य=हट्टी
30.इतराजी=गैरमर्जी
31.इंदिरा=लक्ष्मी
32.इंदू=चंद्र
33.इंद्रजाल=मायामोह
34.उधम=उधोग
35.उदार=मोठ्या मनाचा
36.उधुक्त =  प्रेरित
37.कमल=मुद्दा, अनुच्छेद
38.तडाग=तलाव, दार, दरवाजा
39.उपवन  =  बाग
40.उपदव्याप =  खटाटोप
41.दारा=बायको
42.नवखा=नवीन
43.नौका=होडी
44.उपनयन =  मुंज
45.भयान=हजोडे
46.उपेक्षा=दुर्लक्ष
47.उबग=विट
48.ऐतधेशीयया= देशाचा
49.सुवास=चांगला वास
50.सुहास=हसतमुख
51.आंग=तेज
52.ओनामा=प्रारंभ
53.ओहळ=ओढा
54.अंकीत=स्वाधीन, देश
55.अंगणा=स्त्री
56.कणकं=सोने
57.कटी=कमर
58.कंदूक=चेंडू
59.कन=वधा
60.कंटू=कंडू
61.कमेठ=सनातणी
62.कर्मठ=सनातनी
63.कवडीचुंबक=अतिशय कंजूस
64.कसब=कौशल्य
65.कशिदा=भरतकाम
66.काक=कावळा
67.कवड=घास
68.कामिनी=स्त्री
69.काया=शरीर
70.कसार=तलाव

 _________________________

साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर...प्रसिद्ध कवी श्रीकांत देशमुख यांच्या 'बोलावे ते आम्ही' काव्यसंग्रहाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार...तसेच प्रसिद्ध अनुवादक सुजाता देशमुख यांच्या 'गौहर जान म्हणतात मला' या पुस्तकाला साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे ...
श्रीकांत देशमुख हे सध्या लातूरला विभागीय सहनिबंधक म्हणून कार्यरत आहेत.

सलग 3 रया वर्षी मराठवाड्याचा सन्मान 

श्रीकांत देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार
सलग 3 वर्ष पुरस्कार 
2015 ला वीरा राठोड यांच्या सेन साई वेस या काव्य संग्रहाला  
2016 ला आसाराम लोमटे यांच्या आलोक कथासंग्रहाला 
2017 चा श्रीकांत देशमुख यांच्या बोलावे ते आम्ही या काव्यसंग्रहाला मिळाला आहे...
  हा पुरस्कार म्हणजे आपल्या शेती संस्कृतीचा सन्मान असल्याचे मत श्रीकांत देशमुख यांनी व्यक्त केले आहे...शेतकऱ्याच्या व्यथा वेदना मी साध्या सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न या काव्यसग्रहात केल्याच त्यांनी सांगितले...

महिलां विषयी कायदे ,सामान्य माहिती


♻️ वाचा :- महिलां विषयी कायदे ♻️

― सतीबंदी कायदा -1829

― विधवा पुनर्विवाह कायदा -1856

― धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद ‌कायदा -1866

― भारतीय घटस्फोट कायदा -1869

― मानवी हक्क संरक्षण कायदा -1993

― आनंदी विवाह कायदा -1909

― मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा -1986

― विशेष विवाह -1954

― हिंदू दत्तक व निर्वाह कायदा -1956

― विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959

― अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा-1956

― वैद्यकी व गर्भपात कायदा -1929

― हुंडाप्रतिबंधक कायदा -1929

― बालविवाह निर्बंध कायदा -1929

― कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक  कायदा -2005

― महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा -2005

― मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961

― समान वेतन कायदा -1976

― बालकामगार कायदा -1980

― अपंग व्यक्ती कायदा -1995

― मानसिक आरोग्य कायदा -1987

― कुटुंब न्यायालय कायदा - 1984

― राष्ट्रीय महिला आयोग कायदा -1990

― माहिती अधिकार कायदा -2005

― बालन्याय कायदा - 2000

― भिक्षा प्रतिबंधक कायदा -1959

― अनाथालय व धर्मादाय कायदा - 1960

― हिंदू विवाह कायदा -1955

― कर्मचारी विमा योजना -1952

― प्रसूती सुधारणा कायदा -1961
  
― अंतरराज्यीय प्रवासी कामगार कायदा - 1979
   
― वेश्या वृत्ती निवारण कायदा -1986

― हुंडा निषेध कायदा - 1986.

_____________________________

♻️ जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 अँटाॅमिक रिअँक्टरमध्ये चेन रिअँक्शन कशामुळे नियंत्रित केली जाते ?
🎈काॅपर राॅड.

💐 'स्टार्च' हे कशाचे मिश्रण आहे ?
🎈कार्बोहायड्रेटस्.

💐 'न्यूटन' हे कशाचे एकक आहे ?
🎈जोर.

💐 पदार्थाच्या द्रवणांकातील बदल कशावर अवलंबून असतो ?
🎈दाब.

💐 डी एन ए रेणूच्या रचनेची प्रतिकृती कोणी तयार केली ?
🎈वाॅटसन व क्रिक.

11 एप्रिल 2022 चालू घडामोडी

11 एप्रिल 2022 चालू घडामोडी

प्र. अलीकडे कोणत्या राज्याने इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरणामध्ये ई-सायकलचा समावेश केला आहे?
उत्तर :- नवी दिल्ली

प्र. भारत-किरगिझस्तान संयुक्त विशेष सैन्य सरावाच्या 9व्या आवृत्तीचे अलीकडेच कोणत्या राज्यात आयोजन करण्यात आले आहे?
उत्तर :- हिमाचल प्रदेश

प्र. अलीकडेच केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षेचे कारण देत 4 पाकिस्तानी चॅनेल्ससह किती YouTube चॅनेलवर बंदी घातली आहे?
उत्तर :- २२

प्र. अलीकडेच 57 वा CRPF शौर्य दिवस 2022 कधी साजरा झाला?
उत्तर :- ९ एप्रिल

प्र. अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दर किती टक्के ठेवला आहे?
उत्तर :- ४ टक्के

प्र. अलीकडेच ओडिशाच्या किनार्‍याजवळील इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (ITR), चांदीपूर येथे “सॉलिड फ्युएल डक्टेड रामजेट” (SFDR) बूस्टरची यशस्वी चाचणी कोणी केली?
उत्तर:- DRDO

प्र. नुकताच शोधलेला बाह्य ग्रह 'K2-2016-BLG-0005Lb' हा कोणत्या ग्रहाचा एकसारखा जुळा आहे?
उत्तर :- बृहस्पति

प्र. अलीकडेच इंदिरा गांधी दिल्ली महिला तांत्रिक विद्यापीठाने कोणत्या देशाच्या विद्यापीठाशी करार केला?
उत्तर :- मलेशिया

प्र. अलीकडेच ८ एप्रिल २०२२ रोजी 'प्रधानमंत्री मुद्रा योजने'चा कोणता वर्धापन दिन साजरा करण्यात आला?
उत्तर :- ७ वा

प्र. अलीकडेच कोणत्या राज्याच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी जागतिक बँक आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) द्वारे 7500 कोटी रुपयांचे कर्ज दिले गेले?
उत्तर :- गुजरात

प्र. अलीकडे कोणत्या देशाचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशात लागू केलेली आणीबाणी उठवली आहे?
उत्तर :- श्रीलंका

प्र. अलीकडे कोणत्या देशाच्या कृषी निर्यातीने प्रथमच ५० अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे?
उत्तर :- भारत

प्र. अलीकडे कोणत्या राज्याने इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरणामध्ये ई-सायकलचा समावेश केला आहे?
उत्तर :- नवी दिल्ली

प्र. भारत-किरगिझस्तान संयुक्त विशेष सैन्य सरावाच्या 9व्या आवृत्तीचे अलीकडेच कोणत्या राज्यात आयोजन करण्यात आले आहे?
उत्तर :- हिमाचल प्रदेश

प्र. अलीकडेच केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षेचे कारण देत 4 पाकिस्तानी चॅनेल्ससह किती YouTube चॅनेलवर बंदी घातली आहे?
उत्तर :- २२

प्र. अलीकडेच 57 वा CRPF शौर्य दिवस 2022 कधी साजरा झाला?
उत्तर :- ९ एप्रिल

प्र. अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दर किती टक्के ठेवला आहे?
उत्तर :- ४ टक्के

प्र. अलीकडेच ओडिशाच्या किनार्‍याजवळील इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (ITR), चांदीपूर येथे “सॉलिड फ्युएल डक्टेड रामजेट” (SFDR) बूस्टरची यशस्वी चाचणी कोणी केली?
उत्तर:- DRDO

प्र. नुकताच शोधलेला बाह्य ग्रह 'K2-2016-BLG-0005Lb' हा कोणत्या ग्रहाचा एकसारखा जुळा आहे?
उत्तर :- बृहस्पति

प्र. अलीकडेच इंदिरा गांधी दिल्ली महिला तांत्रिक विद्यापीठाने कोणत्या देशाच्या विद्यापीठाशी करार केला?
उत्तर :- मलेशिया

प्र. अलीकडेच ८ एप्रिल २०२२ रोजी 'प्रधानमंत्री मुद्रा योजने'चा कोणता वर्धापन दिन साजरा करण्यात आला?
उत्तर :- ७ वा

प्र. अलीकडेच कोणत्या राज्याच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी जागतिक बँक आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) द्वारे 7500 कोटी रुपयांचे कर्ज दिले गेले?
उत्तर :- गुजरात

प्र. अलीकडे कोणत्या देशाचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशात लागू केलेली आणीबाणी उठवली आहे?
उत्तर :- श्रीलंका

प्र. अलीकडे कोणत्या देशाच्या कृषी निर्यातीने प्रथमच ५० अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे?
उत्तर :- भारत

भारतीय अर्थव्यवस्था WTO ची तत्त्वे,वीस कलमी कार्यक्रम, 20 कलमे पुढीलप्रमाणे

🔲 भारतीय अर्थव्यवस्था 🔲:
WTO ची तत्त्वे:-

1)    जागतिक व्‍यापाराचे नियमन करणे.

2)    आंतरराष्‍ट्रीय व्‍यापाराला चालना व प्रोत्‍साहन देणे.

3)    भेदरहित आंतरराष्‍ट्रीय व्‍यापारासाठी प्रयत्‍न करणे.

4)    व्‍यापाराच्‍या माध्‍यमातून आर्थिक विकास करण्‍याचे तत्त्व प्रस्‍थापित करणे.

5)    आंतरराष्‍ट्रीय व्‍यापारासाठी गरीब देशांना मदत करणे.

____________________________

वीस कलमी कार्यक्रम :

26 जून 1975 रोजी इंदिरा गांधी सरकारने पहिले 20 कलमी कार्यक्रम सुरू केला होता.
लोकांच्या विशेषतः दरिद्रय रेषेखालील, राहणीमानाच्या दर्जात सुधारणा करणे, हा त्यामागील उद्देश होता.
त्यानंतर 1982, 1986 व 2006 मध्ये या कार्यक्रमाची पुनर्रचना करण्यात आली.

______________________

20 कलमे पुढीलप्रमाणे-

1. गरीबी हटाओ 
2. जन शक्ती 
3. किसान मित्र 
4. श्रमिक कल्याण 
5. सर्वांसाठी घरे 
6. स्वच्छ पेय जल 
7. खाध्य सुरक्षा 
8. सर्वांसाठी आरोग्य 
9. सर्वांसाठी शिक्षण 
10. अनुसूचीत जाती, जमाती, अल्पसंख्यांक आणि इतर मागासवर्गीय कल्याण 
11. महिला कल्याण 
12 बाल कल्याण 
13. युवा विकास 
14. झोपडपट्टी सुधार 
15. पर्यावरण संरक्षण आणि वनवृद्धी 
16. सामाजिक सुधार 
17. ग्रामीण सडक
18. ग्रामीण ऊर्जा 
19. मागास भागांचा विकास 
20. ई-शासन

जवाहर ग्राम योजना ,1991 पासून आर्थिक सुधारणेच्या दिशेने घेतल्या गेलेल्या काही प्रमुख पावले खालीलप्रमाणे आहेत.

जवाहर ग्राम योजना

योजनेची सुरुवात 1 एप्रिल 1999

योजनेत कार्यवाही नववी पंचवार्षिक योजना

लक्ष रोजगार निर्माण करणे

उद्देश जवाहर रोजगार योजनेस अधिक प्रभावी आणि व्यवहारिक बनविण्याच्या दृष्टीने जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरू करण्यात आली ग्रामीण भागामध्ये मागणी आधारीत सुविधा उभारून शाश्वत मालमत्ता उभारणे व निरंतर रोजगार उपलब्ध करणारी कायमस्वरूपी  साधन सामग्री तयार करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली

जवाहर ग्रामसमृद्धी योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या 75:25% आर्थिक सहभागातून सुरू करण्यात आली

_________________________

 
1991 पासून आर्थिक सुधारणेच्या दिशेने घेतल्या गेलेल्या काही प्रमुख पावले खालीलप्रमाणे आहेत.

(१) औद्योगिक परवाना प्रथा रद्द करणे,(२) आयात शुल्कामध्ये कपात आणि परिमाणात्मक पद्धतींमधून फेज घालणे,
३) बाजारपेठेद्वारे विनिमय दर निश्चित करणे (सरकारद्वारे नाही)
,(4) आर्थिक क्षेत्रातील सुधारणा,
5)भांडवल बाजार उदारीकरण,
(6) खासगी क्षेत्रात सार्वजनिक क्षेत्रात प्रवेश 
,(7) खाजगीकरण,
(8) अबकारी शुल्कात कपात,
(9) आयकर आणि महानगरपालिकेच्या करात कपात
,(१०) सेवा कर लागू करणे 
,(११) नागरी सुधारणा,
(१२) सरकारमधील कर्मचार्‍यांची संख्या कमी करणे
(१३) पेन्शन क्षेत्रात सुधारणा,
(१४) मूल्यवर्धित कर (व्हॅट) लागू करण्यासाठी
(१५) अनुदानाची कपात

महत्त्वाची माहिती

🔲 भारतीय अर्थव्यवस्था 🔲:
संतुलित अंदाजपञक

संतुलित अंदाजपञक फायदे व तोटे

अशा अर्थसंकल्पात सरकारचे उत्पन्न व खर्च समान असते.

फायदे

खर्चावर नियंञण

चलनपुरवठा वाढत नाही

उत्पादनवाढीस उपयुक्त

कार्यक्षमता

अर्थसंकल्पिय परिणाम नाही

तोटे

अर्थव्यवस्थेस उपयुक्त नाही

विकासाला पोषक नाही

मंदी वाढते

खर्चात अपव्यव

सामाजिक लाभ नाहीत

_______________________

विजय केळकर समिती

❇️वर्ष:- 2002

❇️विषय:- प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर सरलीकरण

❇️शिफारस:-

🔳आयकर मुक्त मर्यादा वाढवावी

🔳विक्रीकरात VAT पद्धत लागू करावी.

🔳कर आकारणी चा पाया विस्तृत करावा.

🔳महसूल वृद्धीवर अधिक भर द्यावा.

🔳निगम 30 %पर्यन्त कमी करावा.

🔳आयकरात 2 टायर पद्धती लागू करावी.

________________________

पारंपारिक अंदाजपञक

उत्पन्न व खर्च यांच्यावर त्यातील समायोजनावर भर देणारे अर्थसंकल्प म्हणजे पारंपारिक अर्थसंकल्प होय.

_________________________

कार्यात्मक अंदाजपञक

सरकारची उत्पन्न व खर्च ही साधने असून ती विशिष्ट सामाजिक उद्दिष्टांसाठी(कार्यास) वापरणे म्हणजे कार्यात्मक अर्थसंकल्प होय.

____________________

शून्याधिष्ठीत अंदाजपञक

मागील वर्षाच्या खर्चाचा आधार न घेता किंवा मागील वर्षाच्या खर्चाचा आधार शून्य समजून तयार केलेला अर्थसंकल्प.

सामान्य ज्ञान

🔲 भारतीय अर्थव्यवस्था 🔲:
अर्थसंकल्प- अर्थ व उद्दिष्ट्ये

प्रा. बॅस्टेबल यांच्या मते, “अर्थसंकल्प हे विशिष्ट काळातील उत्पन्न व खर्चाची किंवा वित्तीय समायोजनाची माहिती देणारे पञक असून ते मान्यतेसाठी संविधानाकडे किंवा संसदेकडे सादर केले जाते.”

अर्थसंकल्पाबाबत आपणास असे म्हणता येईल की,

हे सरकारच्या उत्पन्न व खर्चाचे माहितीपञक असते.

हे एका वर्षासाठी असते.

अर्थसंकल्पाला सार्वजनिक मान्यता मिळावी लागते.

उत्पन्न कसे मिळवले जाणार आहे व खर्च कसा केला जाणार आहे याची माहिती अर्थसंकल्पात असते.

चालू वर्षाचे अपेक्षित उत्पन्न व खर्च याप्रमाणेच गतवर्षाचे उत्पन्न खर्च याची माहिती अर्थसंकल्पात असते.

__________________________________

शिलकीचे अंदाजपञक

शिलकीचे अंदाजपञक फायदे व तोटे

ज्या अर्थसंकल्पात सरकारचे उत्पन्न हे सरकारच्या खर्चापेक्षा अधिक असते असे अर्थसंकल्प.

फायदे

आर्थिक शिस्त

आर्थिक कार्यक्षमता

खर्चाचे प्राधान्यक्रम

सरकारचा किमान हस्तक्षेप

भविष्यकालीन तरतूद

तोटे

आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य करता येत नाहीत

कालबाह्य संकल्पना

आर्थिक आपत्ती

कल्याणकारी राज्यसंकल्पनेशी विसंगत

आर्थिक विकासास पूरक नाही

अर्थसंकल्प साधन आहे, साध्य नाही