२१ एप्रिल २०२२

श्री. अटलबिहारी वाजपेयी

श्री. अटलबिहारी वाजपेयी

May 16, 1996 - June 1, 1996 | Bharatiya Janata Party

श्री. अटलबिहारी वाजपेयी

लोकनेते असा नावलौकिक असलेले श्री.अटल बिहारी वाजपेयी हे राजकीय वचनबद्ध्तेसाठी ओळखले जातात. 13 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांनी सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान पदाची सूत्रे स्विकारली. 1996 साली थोड्या कालावधीसाठी त्यांनी पंतप्रधान म्हणून काम पाहिले होते. पंडित नेहरुनंतर सलग दुसऱ्यांदा जनादेश मिळवून पंतप्रधान होणारे ते पहिले पंतप्रधान ठरले.
ज्येष्ठ संसदपटू असलेले अटल बिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते. श्री. वाजपेयी नऊ वेळा लोकसभेवर तर दोनवेळा राज्यसभेवर निवडून आले होते हाही एक प्रकारचा विक्रमच आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे अंतर्गत व परकीय धोरणास आकार देण्यात एक पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष व एक विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी समर्थपणे भूमिका बजावली.
ब्रिटीश सत्तेला भारतातून पायउतार करण्यात महत्वाच्या ठरलेल्या 1942 मधील भारत छोडो चळवळीमध्ये सहभागी होऊन विद्यार्थीदशेतच वाजपेयी यांनी राष्ट्रवादी राजकारणाचे धडे गिरवले. राज्यशास्त्र व कायद्याचे विद्यार्थी असलेल्या श्री. वाजपेयींना शालेय काळातच परकीय व्यवहारामध्ये रुची निर्माण झाली होती. त्यांनी ही आवड पुढे अनेक वर्ष जोपासली व विविध द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यासपीठांवर भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी ह्या कौशल्याचा उपयोग केला.
श्री. वाजपेयी यांनी एक पत्रकार म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली परंतु अल्पावधीतच म्हणजेच 1951 साली भारतीय जनसंघात प्रवेश करण्यासाठी त्यांनी पत्रकारिता सोडली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्वाचा घटक असलेला भारतीय जनता पक्ष हा आधी जनसंघ म्हणून ओळखला जात होता. समीक्षकांकडून प्रशंसा मिळवलेले श्री. वाजपेयी एक ख्यातनाम कवी आहेत. शिवाय आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून ते संगीत व पाक कलेतही विशेष रस घेतात.
25 डिसेंबर 1924 साली तत्कालीन ग्वालियर संस्थानातील (आताच्या मध्यप्रदेश राज्यात आहे) एका प्राथमिक शिक्षकाच्या घरात श्री. वाजपेयी यांचा जन्म झाला. अटल बिहारी वाजपेयी यांचा सामाजिक जीवनातील उदय हा भारतीय लोकशाही व त्यांच्या कुशाग्र राजकीय बुद्धिमत्तेचा गौरव आहे. उदारमतवादी जागतिक दृष्टीकोन व लोकशाही तत्वांशी असलेली बांधिलकी यामुळे जनसामान्यांना त्यांच्याबद्दल आदर वाटतो.
महिला सबलीकरण व सामाजिक समानतेचे खंबीर समर्थक असलेले श्री. अटल बिहारी वाजपेयी भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांमध्ये एक दूरदर्शी, विकसित आणि मजबूत राष्ट्र म्हणून बघू इच्छितात. 5000 वर्षांची ऐतिहासिक संस्कृती लाभलेल्या व आगामी 1000 वर्षांमध्ये येणारी आव्हाने पेलण्यास तयार असलेल्या भारत देशाचे ते प्रतिनिधित्व करतात.
भारताप्रती असलेले त्यांचे निस्वार्थ समर्पण व पन्नास वर्षाहून अधिक काळ देशासाठी दिलेल्या निस्पृह सेवेबद्दल त्यांना भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 1994 साली उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. एका उल्लेखानुसार, अटल बिहारी वाजपेयी नावाप्रमाणेच एक ज्येष्ठ भारतीय नेते, निष्णात राजकारणी, निस्पृह सामाजिक कार्यकर्ते, बलवान वक्ते, कवी, साहित्यिक, पत्रकार व खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. जनसामान्यांच्या आशा आकांक्षा श्री. वाजपेयी यांनी पूर्ण केल्या. त्यांच्या कार्यातून आजही त्यांची राष्ट्राप्रती असलेली निष्ठा प्रतीत होते.

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी
March 19, 1998 - May 22, 2004 |

अटलबिहारी वाजपेयी
“लोकनेते असा नावलौकिक असलेले श्री. अटल बिहारी वाजपेयी हे राजकीय वचनबद्ध्तेसाठी ओळखले जातात. 13 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांनी सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान पदाची सूत्रे स्विकारली. 1996 साली थोड्या कालावधीसाठी त्यांनी पंतप्रधान म्हणून काम पहिले होते. पंडित नेहरुनंतर सलग दोनदा पंतप्रधान होणारे ते पहिले पंतप्रधान ठरले.
ज्येष्ठ संसदपटू असलेले अटल बिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते. श्री. वाजपेयी नऊ वेळा लोकसभेवर तर दोनवेळा राज्यसभेवर निवडून आले होते हाही एक प्रकारचा विक्रमच आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे अंतर्गत व परकीय धोरणास आकार देण्यात एक पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष व एक विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी समर्थपणे भूमिका बजावली.
ब्रिटीश सत्तेला भारतातून पायउतार करण्यात महत्वाच्या ठरलेल्या 1942 मधील भारत छोडो चळवळीमध्ये सहभागी होऊन विद्यार्थीदशेतच वाजपेयी यांनी राष्ट्रवादी राजकारणाचे धडे गिरवले. राज्यशास्‍त्र व कायद्याचे विद्यार्थी असलेल्या श्री. वाजपेयींना शालेय काळातच परकीय व्यवहारामध्ये रुची निर्माण झाली होती. त्यांनी ही आवड पुढे अनेक वर्ष जोपासली व विविध द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यासपीठांवर भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी ह्या कौशल्याचा उपयोग केला.
श्री. वाजपेयी यांनी एक पत्रकार म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली परंतु अल्पावधीतच म्हणजेच 1951 साली भारतीय जनसंघात प्रवेश करण्यासाठी त्यांनी पत्रकारिता सोडली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्वाचा घटक असलेला भारतीय जनता पक्ष हा आधी जनसंघ म्हणून ओळखला जात होता. समीक्षकांकडून प्रशंसा मिळवलेले श्री. वाजपेयी एक ख्यातनाम कवी आहेत. शिवाय आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून ते संगीत व पाक कलेतही विशेष रस घेतात.
25 डिसेंबर 1924 साली तत्कालीन ग्वालियर संस्थानातील (आताच्या मध्यप्रदेश राज्यात आहे) एका प्राथमिक शिक्षकाच्या घरात श्री. वाजपेयी यांचा जन्म झाला. अटल बिहारी वाजपेयी यांचा सामाजिक जीवनातील उदय हा भारतीय लोकशाही व त्यांच्या कुशाग्र राजकीय बुद्धिमत्तेचा गौरव आहे. उदारमतवादी जागतिक दृष्टीकोन व लोकशाही तत्वांशी असलेली बांधिलकी यामुळे जनसामान्यांना त्यांच्याबद्दल आदर वाटतो.
महिला सबलीकरण व सामाजिक समानतेचे खंबीर समर्थक असलेले श्री. अटल बिहारी वाजपेयी भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांमध्ये एक दूरदर्शी, विकसित आणि मजबूत राष्ट्र म्हणून बघू इच्छितात. 5000 वर्षांची ऐतिहासिक संस्कृती लाभलेल्या व आगामी 1000 वर्षांमध्ये येणारी आवाहने पेलण्यास तयार असलेल्या भारत देशाचे ते प्रतिनिधित्व करतात.
भारताप्रती असलेले त्यांचे निस्वार्थ समर्पण व पन्नास वर्षाहून अधिक काळ देशासाठी दिलेल्या निस्पृह सेवेबद्दल त्यांना भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 1994 साली उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. एका उल्लेखानुसार, अटल बिहारी वाजपेयी नावाप्रमाणेच एक ज्येष्ठ भारतीय नेते, निष्णात राजकारणी, निस्पृह सामाजिक कार्यकर्ते, बलवान वक्ते, कवी, साहित्यिक, पत्रकार व खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत. जनसामान्यांच्या आशा आकांक्षा श्री. वाजपेयी यांनी पूर्ण केल्या. त्यांच्या कार्यातून आजही त्यांची राष्ट्राप्रती असलेली निष्ठा प्रतीत होते.

डॉ. मनमोहन सिंग

डॉ. मनमोहन सिंग

डॉ. मनमोहन सिंग
भारताचे 14 वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे एक विचारवंत व अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा कामाप्रती असलेला व्यासंगी व शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता व विनम्र आचरणामुळे त्यांच्याकडे आदराने बघितले जाते.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील एका खेड्यात झाला. डॉ. सिंग यांनी 1948 साली पंजाब विद्यापीठातून आपले उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांचे शैक्षणिक कर्तृत्व पंजाब विद्यापीठापासून इंग्लंड मधील केम्ब्रिज विद्यापीठापर्यंत विस्तारलेले आहे. 1957 साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली . त्यानंतर 1962 साली डॉ. सिंग यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी फील संपादन केली. त्यांचे ‘इंडियाज एक्स्पोर्ट ट्रेंड्स अन्ड प्रोस्पेक्ट्स फोर सेल्फ ससटेन्ड ग्रोथ’ हे पुस्तक भारताच्या अंतस्थ व्यापारी धोरणाची समीक्षा करणारे आहे.

पंजाब विद्यापीठ व प्रथितयश दिल्ली स्कूल ऑफ इकोनोमिक्स मध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असताना डॉ सिंग यांची शैक्षणिक ओळख अधिक समृद्ध झाली. या काळात युएनसीटीएडी सचिवालयात त्यांनी काही काळ काम पहिले होते. त्यातूनच त्यांची 1987 आणि 1990 या काळात जीनिव्हा येथील साउथ कमिशनच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. डॉ. सिंग यांनी 1971 साली वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली व त्यांचा सरकारमध्ये प्रवेश झाला. त्यातूनच 1972 साली त्यांची अर्थमंत्रालयात प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. डॉ. सिंग यांनी अर्थमंत्रालयात भूषविलेल्या अनेक महत्वाच्या पदांमध्ये अर्थ मंत्रालयाचे सचिवपद , नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद, रिझर्व बँकेचे गव्हर्नरपद,पंतप्रधानांचे प्रमुख आर्थिक सल्लागार व विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद आदी पदांचा समावेश होतो.

स्वतंत्र भारतच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्‍या 1991-1996 या पाच वर्षांच्या काळात डॉ. सिंग यांनी भारताचे अर्थ मंत्रिपद भूषविले. भारताच्या आर्थिक सुधारणा अमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले सर्वंकष धोरण तयार करण्यात सिंग यांची भूमिका जगभरात नावाजली जाते. हा काळ डॉ. सिंग यांच्या नावाशी घट्ट जोडला गेला आहे.

ेत्यांच्या कारकीर्दीत त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अनेक महत्वाच्या पुरस्कारांपैकी भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार(1987), भारतीय विज्ञान कॉंग्रेस मध्ये देण्यात येणारा जवाहरलाल नेहरू जन्म शताब्दी सन्मान(1995), अर्थ मंत्र्यांसाठी दिला जाणारा आशिया मनी अवार्ड (1993 व 1994), केम्ब्रिज विद्यापीठाचा अॅडम स्मिथ पुरस्कार (1956), केम्ब्रिजमधील सेंट जॉन महाविद्यालयात उल्लेखनीय कार्याबद्दल राईट पुरस्कार असे काही विशेष पुरस्कार आहेत. याशिवाय जपान निहोन कायझाई शिम्बून सारख्या अनेक संस्थांनी डॉ. सिंग यांना सन्मानित केले आहे. केम्ब्रिज व ऑक्सफोर्ड सारख्या अनेक विद्यापीठांकडूनही डॉ सिंग यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे . डॉ. सिंग यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि संघटनांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी 1993 मध्ये सायप्रस येथे राष्ट्रकुल प्रमुखांच्या बैठकीत आणि व्हिएन्ना येथे मानवाधिकारावरील जागतिक परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले.

डॉ. सिंग यांनी 1991 पासून राज्यसभा या वरिष्ठ सभागृहात खासदारपद भूषविले आहे 1998-2004 च्या दरम्यान त्यांनी राज्यसभेत विरोधी पक्ष नेत्याची भूमिकाही पार पडली आहे. 22 मे 2004 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकानंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली व 22 मे 2009 रोजी त्यांनी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

भारताचे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांची माहिती

भारताचे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांची माहिती

भारताचे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांची माहिती : कलम ७५(१) नुसार पंतप्रधानची तरतूद केली आहे. पंतप्रधानाची नियुक्ती राष्ट्र्पतींद्वारे होते.

पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ हे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे घटक असतात.

भारताने संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केला आहे. या पद्धतीत ‘घटनात्मक प्रमुख’ व ‘वास्तव कार्यकारी प्रमुख’ असे दोन प्रमुख कार्यरत असतात.

राष्ट्रपती हे नामधारी घटनात्मक प्रमुख (de jure executive) तसेच राष्ट्रप्रमुख (Head of the State) असतात.

पंतप्रधान हेच वास्तव कार्यकारी प्रमुख (de facto executive) तसेच शासन प्रमुख (Head of the Government) असतात.

संविधानात पंतप्रधान या पदाचा उल्लेख ‘प्रधानमंत्री’ (Prime Minister) असाच आहे हे नेहमीच लक्षात ठेवावे.
प्रमुख असे दोन प्रमुख कार्यरत असतात.

निवडणुकीत बहुमत मिळवलेला पक्ष आपल्या नेत्याची प्रधानमंत्रीपदी निवड करायची हे ठरवतो. त्याच पक्षातील प्रधानमंत्र्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांचा प्रधानमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात समावेश होतो. प्रधानमंत्री व अन्य मंत्री संसदेचे सदस्य असणे आवश्यक असते. नसल्यास त्यांना सहा महिन्यांच्या आत संसदेचे सदस्यत्व मिळवावे लागते.

प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ खऱ्या अर्थाने राज्यकारभार करत असते. याचाच अर्थ राज्यकारभाराची वास्तव सत्ता प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाकडे असते.

भारताचे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांची माहिती
पंतप्रधानांची निवड (कलम ७५) : लोकसभेत बहमत मिळविणाऱ्या पक्षाच्या नेत्याची राष्ट्रपती पंतप्रधानपदी नेमणूक करतात व पंतप्रधानांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नेमणूक करतात.

शपथ : पंतप्रधान व त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री यांना पद व गोपनीयतेची शपथ राष्ट्रपती देतात.

पंतप्रधान म्हणून नेमणूक होण्यासाठी उमेदवार हा संसदेचा सदस्य असावा लागतो. नसल्यास सहा महिन्यांच्या आत त्यास संसदेच्या कोणत्याही एका सभागृहावर निवडून येणे क्रमप्राप्त ठरते.

पंतप्रधानांचा कार्यकाल : घटनेने निश्चित केलेला नाही.

लोकसभेचा विश्वास असेपर्यंतच पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ सत्तेत राहू शकते.

मुदतीपूर्वी राजीनामा द्यायचा असल्यास पंतप्रधान आपला राजीनामा राष्ट्रपतींना सादर करतात.

पंतप्रधानांचे अधिकार व कार्ये :

(१) प्रधानमंत्र्यांना सर्वप्रथम आपले मंत्रिमंडळ तयार करावे लागते.

(२) प्रधानमंत्री आपल्या पक्षातील कायदयांच्या विश्वासू सहकाऱ्यांना प्राधान्य देतातच पण त्याचबरोबर तयार प्रशासकीय अनुभव, राज्यकारभाराचे कौशल्य, संसदेच्याकार्यक्षमता, विषयातील तज्ज्ञता यांचाही विचार मंत्री महत्त्वाच्या निवडताना केला जातो.

(३) मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा हे व्यवहार ठरल्यानंतर प्रधानमंत्री त्यांच्यात खात्यांचे वाटप निश्चित करण्याचे काम करतात.

(३) प्रधानमंत्री मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतात.मंत्रिमंडळाच्या सर्व बैठका प्रधानमत्र्याच्या अध्यक्षतेखाली होतात.

(४) खातेवाटप झाल्यानंतर विविध खात्यांमध्ये सुसूत्रता राखणे, खात्यांमधील परस्पर सहकार्य वाढवणे, खात्यांचा कारभार कार्यक्षमतेने होत आहे अमलबजावणीच
की नाही हे पाहणे, इत्यादी कामे प्रधानमंत्र्यांना पार कायद्याच्या पाडावी लागतात.

(५) आंतरराष्ट्रीय क्षेत्रात देशाची प्रतिमा उंचावण्यास जागतिक लोकमत आपल्याला अनुकूल होण्यासाठी प्रयत्न करणे, देशातील जनतेला आश्वस्त करणे, आपत्तीच्या काळात आपत्तीग्रस्तांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणे इत्यादी भूमिका प्रधानमंत्री पार पाडू शकतात.

(६) पंतप्रधान हे मंत्रिमंडळाचे अध्यक्ष (प्रमुख) असतात.

(७) मंत्रिमंडळाचा समन्वयक. पंतप्रधानांचा पदावर असताना आकस्मिक मृत्यू झाल्यास मंत्रिमंडळ बरखास्त होते.

(८) पंतप्रधान हे नीती आयोग, राष्ट्रीय विकास परिषद, राष्ट्रीय लोकसंख्या आयोग यांचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

(९) पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रीमंडळाचा राजीनामा असतो.

(१०) पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या बैठकांचे अध्यक्षस्थान भूषवितात. पंतप्रधान हे देशाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रवक्ते मानले जातात.

(११) पंतप्रधान हा राष्ट्रपती आणि मंत्रीमंडळ यांना सांधणारा दुवा आहे. पंतप्रधान मंत्र्यांमध्ये खातेवाटपाचे कार्य करतात.

(१२) पंतप्रधान मंत्र्यांना बडतर्फ करण्याची शिफारस करतात. संसदेत सरकारच्या वतीने महत्त्वाच्या घोषणा पंतप्रधान करतात.

(१३) पदव्या देणे : व्यक्तींच्या गुणांची कदर करून त्यांना भारतरत्न, पद्मविभूषण यासारख्या पदव्या देण्याचा
अधिकार पंतप्रधान व त्यांच्या मंत्रीमंडळास आहे.

चालू घडामोडी 21 एप्रिल 2022

चालू घडामोडी 21 एप्रिल 2022:-

१) “जागतिक यकृत दिवस” कधी साजरा केला जातो?

(१)१७ एप्रिल

(२) १८ एप्रिल

(३) १९ एप्रिल

(४)२० एप्रिल

उत्तर:(३) १९ एप्रिल

२) “राष्ट्रीय सायबर सुरक्षा घटना प्रतिक्रिया” कार्यक्रम कोण द्वारे आयोजित करण्यात आला आहे?

(१) CSIR

(२)C-DAC

(३) NITI AYOG

(४) राष्ट्रीय सुरक्षा परिषद

उत्तर:(४) राष्ट्रीय सुरक्षा परिषद

३) १२ व्या “सिनिअर पुरुष हॉक्की चाम्पिंअनशिप २०२२” कोणी जिकले आहे?

(१) तामिळनाडू

(२) हरियाना

(३) महाराष्ट्र

(४)गोवा

उत्तर:(२) हरियाना

४) नरेंद्र मोदी यांनी कोठे “WHO ग्लोबल सेंटर फॉर टेडीशनल मेडिसिन” चे उद्घाटन केले आहे?

(१) पानिपत,हरियाना

(२) जामनगर,गुजरात

(३) अमृतसर,पंजाब

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) जामनगर,गुजरात

५) कोणत्या राज्यात “करगा मंदिर उत्सव” चे आयोजन केले आहे?

(१) महाराष्ट्र

(२)गुजरात

(३) कर्नाटक

(४) तामिळनाडू

उत्तर:(३) कर्नाटक

६) पहिली“सेमिकोन इंडिया २०२२ कॉन्फेरंस” कोठे आयोजित होणार आहे?

(१) हैदराबाद

(२) मुंबई

(३) बेंगलोर

(४) दिल्ली

उत्तर:(३) बेंगलोर

७) अणुउर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण आहे ज्यांना १ वर्षाचा कार्यकाल वाढून दिला आहे?

(१)संजय मिश्रा

(२)विनीत जोशी

(३) कमलेश नीलकंठ व्यास

(४)वरीलपैकी नाही

उत्तर:(३) कमलेश नीलकंठ व्यास

८) युनेस्को ने किती “युनेस्को ग्लोबल जिओपार्क” ची घोषणा केली आहे?

(१)८

(२)१०

(३) १२

(४) १४

उत्तर:(१) ८

९) भारत आणि कोणत्या देशात “क्वानटम कॅम्पुटीग आणि VARTUAL नेटवर्क सेंटर” स्तापित करण्याचा निर्णय झाला आहे?

(१)चीन

(२) अमेरिका

(३) फिनलंड

(४) रशिया

उत्तर:(३) फिनलंड

१०) “इंडिया स्मार्ट सिटीज अवार्ड २०२०” नुसार सर्वशेष्ट राज्य पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(१) राजस्थान

(२) बिहार

(३) उत्तरप्रदेश

(४) गुजरात

उत्तर:(३) उत्तरप्रदेश

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच


1) भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?
उत्तर- अप्रत्यक्ष

2) पंचायत समितीचा कार्यकारी/प्रशासकीय अधिकारी कोण असतो?
उत्तर- गटविकास अधिकारी

3) क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते?
उत्तर- राजस्थान

4) अष्टविनायकांपैकी किती गणेश मंदिरे ही पुणे जिल्ह्यात आहेत?
उत्तर- 5

5) अहमदनगर-कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?
उत्तर- माळशेज

6) पुणे जिल्ह्यातील भाडघर धरण हे कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
उत्तर- वेलवंडी
7) भारत सरकारने कोणत्या दिवशी चलनातून 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता?
उत्तर- 8 नोव्हेंबर 2016

8) कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होय.
उत्तर- तेलबीया

9) निरा- नरसिहापुर हे तीर्थ क्षेत्र पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते?
उत्तर- इंदापुर

10) बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी कोणी 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली?
उत्तर- छत्रपती शाहू महाराज

11) पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे?
उत्तर- जॉन चेसन

12) महाबळेश्वर मधील पॉईंट मध्ये समुद्रसपाटीपासून सर्वात उंचावर कोणता पॉईंट आहे?
उत्तर- आर्थरसीट

13) साताऱ्याचे अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्यांचा राजधानीचा मान कोणी दिला?
उत्तर- छत्रपती राजाराम राजे ‌

14) थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते?
उत्तर- कराड

15) महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे ?
उत्तर- पुणे

16) कोणता दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो?
उत्तर- 21 ऑक्टोंबर

17) कोणत्या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते?
उत्तर- मनोधैर्य

18) 31 ऑक्टोंबर ते 6 नोव्हेंबर हा राष्ट्रीय एकता सप्ताह कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा होतो?
उत्तर- सरदार पटेल

19) पेशवेकाळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे?
उत्तर- मुजुमदार

20) कोणत्या वर्षी सातारा जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा जिल्ह्या असे  दोन भाग पाडण्यात आले?
उत्तर- 1949

21) ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मुळगाव कोणते?
उत्तर- कण्हेरखेड

22) वाई शहराच्या जडणघडणीवर कोणत्या सरदार घराण्याचा प्रभाव आहे?
उत्तर- रास्ते

23) खाशाबा जाधव यांना कोणत्या ऑलंपिकमध्ये पहिले ब्राॅन्झ मिळाले?
उत्तर- हेलसिंकी

24) कोणत्या शाहिराने गर्जा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे?

उत्तर- कृष्णराव साबळे

25) सातारा जिल्ह्याच्या मुख्य पोलीस कार्यालयासाठी स्वातंत्र इमारत कोणत्या वर्षी बांधण्यात आली?

उत्तर- 1913

26) कोणता जिल्हा महाराष्ट्रात प्रथमच स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर झाला?
उत्तर- सातारा

27) MACOCA मकोका हा कायदा कशाविरुद्ध वापरला जातो?
उत्तर- संघटित गुन्हेगारी

28) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
उत्तर- आसाम

29) स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली होती?
उत्तर- बाळ गंगाधर टिळक

30) रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो?
उत्तर- स्पीग्मोमॅनोमीटर

31) प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळी कोणता वायू उत्सर्जित केला जातो?
उत्तर- ऑक्सिजन

32) मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे?
उत्तर- दर्पण

33) मीराबाई चाणु कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- वेटलिफ्टिंग
34) नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे?
उत्तर- कोहिमा

35) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? 
उत्तर- बिलासपुर