Tuesday 21 June 2022

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू’ हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे ?

   1) उपमा    2) उत्प्रेक्षा    3) रूपक      4) अपन्हुती

उत्तर :- 2

2) अभ्यस्त शब्द ओळखा.

   1) तुरट    2) आंबट चिंबट    3) खारट      4) कडवट

उत्तर :- 2

3) स्वातंत्र्य युध्दाच्याकाळात देशभक्तांनी भोगलेल्या तुरुंगवास म्हणजे राष्ट्रहितासाठी दिलेली अग्निपरीक्षाच होती. या विधानातील

    अग्निपरीक्षा या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो ?

   1) लक्ष्यार्थ    2) वाच्यार्थ    3) वाक्यार्थ    4) शब्दार्थ

उत्तर :- 1

4) पुढीलपैकी न जुळणारा शब्द ओळखा.
   1) दैत्य    2) दानव      3) राक्षस      4) देव

उत्तर :- 4

5) ‘दुष्काळ’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

   1) नापीक    2) सुकाळ    3) अवर्षण    4) कोरडा

उत्तर :- 2

6) योग्य पर्याय निवडून खालील म्हण पूर्ण करा. – ‘नांव सोनूबाई हाती .................... वाळा.’

   1) सोन्याचा    2) चांदीचा    3) कथलाचा    4) पितळेचा

उत्तर :- 1

7) दिलेल्या स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार शोधा.

    ‘भिम्याला कुस्तीत चारीमुंडया चीत केल्यापासून त्याचा ...............’

   1) इंगा जिरविणे    2) उधाण येणे    3) ऊर दडपणे    4) उघडा पडणे

उत्तर :- 1

8) निराश्रित मुलांना आश्रय देणारी अशी एक संस्था ..................

   1) धर्मालय    2) अनाथालय    3) देवालय    4) वृध्दाश्रम

उत्तर :- 2

9) खालील शुध्द स्वरूपात लिहिलेला शब्द ओळखा.

   1) दैवदूर्विलास    2) दैवदूर्वीलास    3) दैवदूरविलास    4) दैवदुर्विलास

उत्तर :- 4

10) खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता ?
   1) त्   2) थ्    3) द्      4) ण्

उत्तर :- 4

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...