Monday 18 March 2024

रक्तगट




🌺रक्तगटाचा शोध लँड्स्टेनर यानी लावला या शोधांबद्दल त्याना नोबेल पुरस्कार मिळाला.

🌺मानवी रक्तामध्ये असलेल्या तांबड्या रक्तपेशीवरील असलेले विशिष्ट प्रथिनांमुळे रक्तगट ठरतो. या प्रथिनांना प्रतिपिंडे असेही म्हणतात.

🌺 महत्त्वाचे रक्तगट दोंन आहेत. प्रथिन प्रकार ए, आणि प्रथिन प्रकार बी. यालाच ए रक्तगट आणि बी रक्तगट असे म्हणतात.

🌺 तांबड्या पेशीवर कोणत्याही प्रकारचे प्रथिने नाहीत म्हणजे रक्तगट ओ. आणि ए, व बी या दोन्ही प्रकार्ची प्रथिने असल्यास एबी रक्तगट.

🌺रक्त हे पेशी आणि रक्तरस म्हणजे प्लाझमा या द्रवांनी बनलेले असते. रक्तपेशी ए गटातील असल्या म्हणजे रक्तरसामध्ये बी प्रकारच्या प्रथिनांविरुद्ध प्रतिद्रव्य असते.

🌺तसेच बी रक्तगट असल्यास ए प्रकारच्या पेशी विरुद्ध प्रतिद्रव्य रक्तरसामध्ये असते. ए बी रक्तगट असल्यास रक्तरसामध्ये प्रतिद्रव्य नाही.

🌺 पण ओ गटाचे रक्त असल्यास रक्तरसामध्ये दोन्ही ए आणि बी पेशी विरुद्ध प्रतिद्रव्य असते.

रक्ताचे चार प्रमुख गट आहेत.


🍀परकार🍀

🌻रक्तगट

♦️'ए', 'एबी', 'बी', आणि 'ओ' असे चार प्रमुख गट असून 'आरएच' (र्‍हिसस) पॉझिटिव्ह व 'आरएच' निगेटिव्ह असे या प्रत्येक गटाचे दोन प्रकार मिळून आठ रक्‍तगट होतात.

♦️रक्तगट ही रक्ताच्या वर्गीकरणाची पद्धत आहे. तांबड्या रक्तपेशींच्या पटलावरील प्रतिजनांशी (अँटिजेन) रक्तगटाचा संबंध आहे.

♦️ह प्रतिजन आनुवंशिक असतात. ही प्रतिजने, प्रथिने, कर्बोदके, ग्लायकोप्रथिने, किंवा ग्लायकोलिपिड (मेदाम्ले) याने बनलेली असतात.

♦️ रक्तगटाच्या पद्धतीप्रमाणे प्रतिजन कोणत्या रेणूनी बनलेले असतात हे ठरते. यामधील काहीं प्रतिजन इतर उतींच्या पेशी पृष्ठभागावर असतात. तांबड्या रक्त पेशीवरील पृष्ठभागावरील प्रतिजन युग्मविकल्पी (अलील) जनुकामुळे व्यक्त झालेले असतात.

♦️ तयाना एकत्रपणे रक्तगट असे म्हणण्याची पद्धत आहे. रक्तगट आनुवंशिकता माता आणि पित्याच्या रक्तगटाच्या संक्रमणामुळे पुढील पिढीमध्ये येतात.

♦️एकूण तीसहून अधिक रक्तगट ज्ञात आहेत. आंतराष्ट्रीय रक्त संचरण समितीने याना मान्यता दिली आहे. ( इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रांसफ्यूजन).


🍂🍂रक्तगट वेगवेगळे असण्याची कारणे🍂🍂



♦️रक्तगट वेगवेगळे असण्याचे कारणे

रक्‍तात लाल रक्त पेशीवर एक प्रकारचे प्रोटीन (अ‍ॅन्टिजेन) ही असतात. या अ‍ॅन्टिजेनांच्या भिन्‍नतेमुळे वेगवेगळ्या माणसांचे रक्‍त वेगवेगळे असते. या वेगवेगळ्या रक्‍तांनाच रक्‍तगट वा ब्लडग्रुप म्हणतात. ए. (प्रोटीन) असलेला ‘ए’ रक्‍तगट, बी असलेला ‘बी’ रक्‍तगट, दोन्ही असलेले ‘एबी’ रक्‍तगट यापैकी एकही प्रोटीन नसलेला ‘ओ’ रक्‍तगट.

रक्‍तातील आरएच (र्‍हिसस) हे सुद्धा एक प्रथिनेच असतात. ज्यांच्या रक्‍तात ते असते त्यांना आरएच पॉझिटिव्ह व नसणार्‍याला आरएच निगेटिव्ह म्हणतात.

रक्‍तगट आनुवंशिक असतात व ते आपल्या शरीरात माता व पित्याकडून येणाऱ्या गुणसूत्रांवर अवलंबून असतात. माता व पिता यांच्या रक्तगटाप्रमाणे त्यांच्या अपत्यांचे रक्तगट असतात किंवा दोघांच्या रक्तगटाच्या एकत्रपणावर अवलंबून असतात. त्यामुळे भावा-बहिणींचे रक्‍तगट एकच असेल असे नाही.


🌺🌺समजा माता ‘ए’ आरएच पॉझिटिव्ह व पिता ‘बी’ आरएच पॉझिटिव्ह असेल तर अपत्यांचे रक्तगट खालील प्रकारे असू शकतात.🌺🌺

ए आरएच पॉझिटिव्ह

एबी आरएच पॉझिटिव्ह

एबी आरएच निगेटिव्ह

ए निगेटिव्ह

बी निगेटिव्ह

बी पॉझिटिव्ह

ओ पॉझिटिव्ह

ओ निगेटिव्ह


🌺🌺समजा माता ‘एबी’ आरएच पॉझिटिव्ह व पिता ‘ए’ आरएच पॉझिटिव्ह असेल तर अपत्यांचे रक्तगट खालील प्रकारे असू शकतात.🌺🌺

ए आरएच पॉझिटिव्ह

एबी आरएच पॉझिटिव्ह

एबी आरएच निगेटिव्ह

ए निगेटिव्ह

बी निगेटिव्ह

बी पॉझिटिव्ह


🌺समजा माता ‘ओ’ आरएच पॉझिटिव्ह व पिता ‘ओ’ आरएच पॉझिटिव्ह असेल तर अपत्यांचे रक्तगट खालील प्रकारे असू शकतात.🌺

ओ पॉझिटिव्ह

ओ निगेटिव्ह

बाँबे रक्तगट


🌸🌸रक्त जुळवणी🌸🌸

रक्तगट अनुरूपता व्यक्तीचा रक्तगटकोणत्या गटाचे रक्त चालतेओ−ओ+ए−ए+बी−बी+एबी−एबी+ओ

रक्त अनुकूलनासाठी रक्तगटाव्यतीरिक्त इतरही अनेक बाबी महत्त्वाच्या असतात. या बाबतीत वैद्यकीय सल्ला अपरिहार्य आहे.

रक्तगट प्रणाली तांबड्या रक्तपेशींच्या पटलावर तीस प्रतिजन असतात.

व्यक्तीचा रक्तगट तीस प्रतिजनापैकी एक संयोग असतो. तीस रक्तगटामध्ये सहाशेच्या वर विविध प्रतिजन संशोधकानी शोधलेले आहेत.

यापैकी काहीं अगदीच दुर्मीळ आहेत. काहीं वंशामधील व्यक्तीमध्येच ते आढळतात. बहुघा व्यक्तीचा रक्तगट जन्मत: प्रतिजन ठरविणार्‍या जनुकामुळे ठरतो. तो सहसा बदलत नाही

. क्वचित संसर्ग, कर्करोग आणि स्वप्रतिकारयंत्रणेतील विकारामुळे (ऑटोइम्यून डिसीज) व्यक्तीचा रक्तगट बदलतो.

अस्थिमज्जा रोपण हे रक्तगट बदलाचे एक कारण आहे. ल्यूकेमिया आणि लिंफोमा विकारात अस्थिमज्जा रोपण करावे लागते.

व्यक्तीच्या एबीओ पैकी दुसऱ्या गटाच्या व्यक्तीच्या अस्थिमज्जेचे रोपण झाल्यास रुग्णाचा रक्तगट अस्थिमज्जा दात्याच्या रक्तगटाप्रमाणे बदलतो.

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...