Monday 18 March 2024

ऊती व ऊतींचे प्रकार

 (Tissue and types of tissue)

🌸 समान रचना असणाऱ्या व समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला ऊती असे म्हणतात.

🌸 सजीवांमध्ये निरनिराळ्या ऊती एकञ येऊन अवयव बनतात व हे अवयव एकञ येऊन अवयव संस्था बनते. उदा. पचनसंस्था, श्वसनसंस्था इ.

🌸 ऊतींचा अभ्यास करणाऱ्या शास्ञाला ऊतीशास्ञ असे म्हणतात.

🌺 पराणी ऊती (Animal Tissue)

🌸 पराणी ऊतींचे वर्गीकरण मुख्य दोन गटात म्हणजे सरल ऊती व जटील ऊती यात केले जाते.

🌸 सरल ऊतीमध्ये केवळ अभिस्तर ऊतींचा समावेश होतो तर जटील ऊतींध्ये संयोजी ऊती, स्नायू ऊती व चेता ऊती यांचा समावेश होतो.



१) अभिस्तर ऊती (Epithelial Tissue)

🌸 अभिस्तर ऊतीमध्ये पेशी एकमेकींचा अतिशय चिटकून व जवळजवळ असतात.
या ऊती तंतूमय पटलाने खालच्या ऊतीपासून वेगळ्या झालेल्या असतात.

त्वचा, तोंडातील स्तर, रक्तवाहिन्यांचे स्तर हे अभिस्थर उतीपासून बनलेले असतात.

🌺 अभिस्तर ऊतींचे प्रकार-

🌸 सरल पट्टकी अभिस्तर (Simple Squamous epithelium)-

या ऊती आकाराने अतिशय बारीक व चपट्या असतात. तसेच या नाजूक अस्तर तयार करतात.

🌸 सतरीत पट्टकी अभिस्तर (Stratified Squamous epithelium)-

 नावाप्रमाणेच या ऊतींच्या रचनेमध्ये एकावर एक असे थर असतात. हे त्वचेच्या बाह्यस्तरात आढळून येतात. या ऊती अवयवांचे संरक्षण करण्याचे व त्यांची झीज थांबवण्याचे मुख्य कार्य करतात.

🌸 सतंभीय अभिस्तर (Columnar epithelium)-

नावाप्रमाणेच या ऊतींची रचना स्तंभाप्रमाणे असते. आकाराने लांबट असून त्या आतड्याच्या आतील स्तरात असतात. पचन झालेल्या अन्नातील पोषणद्रव्यांचे शोषण करणे व पाचकरस स्ञवणे हे स्तंभीय अभिस्तर ऊतींचे मुख्य कार्य आहे.

🌸 रोमक स्तंभीय अभिस्तर (Ciliated columnar epithelium)-

ज्या संभीय अभिस्तर ऊतींना केसासारखे रोमके असतात, त्यांना रोमक स्तंभीय अभिस्तर ऊती म्हणतात. या ऊती आतड्याच्या आतील स्तरात असतात. या ऊती प्रामुख्याने श्वसनमार्गात आढळतात.

🌸 घनाभरूप अभिस्तर (Cuboidal epithelium)-

नावाप्रमाणेच या ऊती घनाकृती असतात. या ऊती वृक्कनलिकांच्या आतील स्तर, लाळग्रंथीच्या नलिका या ठिकाणी आढळतात. लाळ स्ञवण्यासाठी यांचा उपयोग होतो.

🌸 गरंथिल अभिस्तर (Glandular epithelium)-

क्वचित वेळी अभिस्तर ऊतीच्या आतील बाजूस घड्या पडतातत व त्यामुळे बहुपेशीय ग्रंथी तयार होतात, त्यांना ग्रंथिल अभिस्तर ऊती म्हणतात.



२) संयोजी ऊती (Connective Tissue)

🌸 सयोजी ऊती हा मानवी शरीरातील सर्वात प्रचलित आणि व्यापकपणे वितरित ऊती प्रकार आहे.

🌸 शरीरातील विविध अवयव आणि ऊतींना एकमेकींना जोडण्याचे व शरीरातील अवयवांना आधार देण्याचे काम संयोजी उती करतात.
संयोजी ऊती या जेलीसदृश्य द्रवरूपात स्वतःच्या पेशींना सामावून घेतात.

🌸सयोजी ऊतींचे महत्वाचे प्रकार पुढीलप्रमाणे-

🌺 अस्थी (Bone) –

 या अतिशय मजबूत असतात व शरीरातील मुख्य अवयवांना आधार देण्याचे कार्य करतात. अस्थिंमार्फत शरीराची आधारचौकट बनवली जाते. अस्थिपेशी या कॅल्शियम आणि फाॅस्फरसच्या संयुगापासून बनलेल्या जेलीसदृश्य द्रवात घट्ट रूतलेल्या असतात.

🌺 रक्त (Blood) –

रक्त हे द्रवरूप संयोजी ऊती असून हे ज्या द्रवात सामवलेले असते त्याला रक्तद्रव असे म्हणतात. हे रक्तद्रव प्रथिने, क्षार, संप्ररके, लोहित रक्तकणिका, श्वेतरक्तकणिका व रक्तपट्टीका यांनी बनलेले असते. शरीराच्या विविध भागांकडे रक्तातील वायू, अन्नातील पोषणद्रव्ये व संप्रेरके यांचे वहन करण्याचे कार्य रक्त करते.

🌺 अस्थिबंध (Ligament) –

अतिशय लवचिक व त्याबरोबच मजबूत असणारे हे अस्थिबंध सजीवातील दोन हाडांना एकमेकांशी जोडण्याचे कार्य करतात. आकृतीबंध स्थिर राहण्यास मदत करण्याचे कार्यही अस्थिबंध करतात.

🌺 सनायूरज्जू (Tendons) – स्नायूरज्जू तंतूमय व कमी लवचिक असूनही खूप मजबूत असतात. यांच्याद्वारे स्नायू हाडांशी जोडले जातात व अस्थि किंवा आकृतीबंधाची हालचाल होऊ शकते.

🌺 कास्थी (Cartilage) –

शरीरभर विस्तृत भागात विखुरलेल्या असून कास्थीमुळे हाडांच्या सांध्यांच्या ठिकाणी नरमपणा येतो. या पेशी नाक, कान, श्वसननलिका व स्वरयंञातील पोकळीत असतात.

🌺 विरल ऊती (Areolar) – आंतर इंद्रियांना आधार देणे, ऊतींची झीज भरून काढणे व अवयवांच्या आतील भाग भरणे हे यांचे मुख्य कार्य असते. चेतातंतू, अस्थिमज्जा, रक्तवाहिन्यांच्या सभोवताली आणि ऊती त्वचा व स्नायू यांच्या दरम्यान विरल ऊती वास्तव्य करतात.

🌺 चरबीयुक्त युती (Adipose) – या युती त्वचेखाली, वृक्काच्या सभोवताली आढळतात. यांच्या पेशी मेदपिंडाने (fat globules) युक्त असतात. तसेच या ऊती उष्णतारोधक म्हणून कार्य करतात.

३) स्नायूऊती (Mascular Tissue)

🌸 सनायू उती या स्नायूतंतूच्या लांब पेशीपासून बनलेल्या असतात. स्नायुंमध्ये विशिष्ट प्रकारचे प्रथिन असते. त्यास ‘संकोची प्रथिन’ असे म्हणतात. या प्रथिनांच्या आकुंचन व प्रसारणामुळे स्नायूंची

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...