१९ मार्च २०२४

श्राव्य, अवश्राव्य व श्रव्यातीत ध्वनी

🎙मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा 20 Hz ते 20000 Hz आहे म्हणजेच या वारंवारिते मधील ध्वनी मानवी कान ऐकू शकतो म्हणून या ध्वनीला श्राव्य (Audible) ध्वनी म्हणतात. 


📊मानवी कान 20 Hz पेक्षा कमी व 20000 Hz (20 kHz) पेक्षा जास्त वारंवारितेचा ध्वनी ऐकू शकत नाही. 


🎙20 Hz पेक्षा कमी वारंवारितेच्या ध्वनीस अवश्राव्य ध्वनी (Infrasound) म्हणतात. 


🎙दोलकाच्या कंपनाने निर्माण झालेला ध्वनी, भूकंप होण्यापूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागाची कंपने होऊन निर्माण झालेला ध्वनी हा 20 Hz पेक्षा कमी वारंवारितेचा म्हणजेच अवश्राव्य ध्वनी (Infrasound) आहे. 


🎙20000 Hz पेक्षा अधिक वारंवारितेच्या ध्वनीला श्रव्यातीत ध्वनी (Ultrasound) असे म्हणतात.


🎙कुत्रा, उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन असे प्राणी त्यांना असणाऱ्या विशेष क्षमतेमुळे श्रव्यातीत असलेले ध्वनी ऐकू शकतात. 


🎙या क्षमतेमुळे त्यांना काही आवाजाची चाहूल लागते, जी आपल्याला लागू शकत नाही. 


🎙पाच वर्षाखालील लहान मुले, काही प्राणी व किटक 25000 Hz पर्यंतचा ध्वनी ऐकू शकतात. 


🎙डॉल्फिन्स, वटवाघूळे, उंदीर वगैरे प्राणी श्रव्यातीत ध्वनी निर्माणही करू शकतात.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...