Monday 3 April 2023

मादाम भिकाजी कामा

📌जन्मदिन:- मादाम भिकाजी कामा 

📌जन्म 24 सप्टेंबर 1861 मुंबई

📌मत्यू 19 ऑगस्ट 1936 मुंबई


◾️सवातंत्र्याची ज्योत प्रज्वलीत करणारी, मातृभूमीवर अपार श्रद्धा, प्रेम व निष्ठा असणारी आपला देश स्वतंत्र, एकसंघ झालेला दिसावा म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या क्रांती कार्यात सक्रीय भाग घेणारी, स्वतंत्र भारताचा ध्वज बनवून तो आंतरराष्ट्रीय परिषदेत फडकवणारी महिला म्हणून मादाम भिकाजी कामा ना ओळखले जाते.


◾️  3 ऑगस्ट 1985 रोजी रुस्तुम. के. आर .कामा यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला .रुस्तुम कामा हे वकील होते आणि इंग्रज राजवटीत सोबत त्यांची घनिष्ठ मैत्रीचे संबंध होते. 


◾️भिकाजी कामांचे राष्ट्रीय विचार ,स्वातंत्र्य चळवळीतील लोकांशी भेटणे सासरच्या मंडळींना आवडले नाही .मतभेद तीव्र झाले . भिकाजी कामा, रुस्तुम कामात पासून विभक्त झाल्या.


◾️ 1896 मध्ये प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी रुग्णांची खूप सेवा केली. त्यांनाही प्लेगची लागण झाली. तब्येत ढासळली. हवापालटासाठी त्या लंडन येथे गेल्या. त्यानंतर 1909 मध्ये पॅरिस येथे गेल्या आणि तेथेच त्या स्थायिक झाल्या.


◾️ लडन येथे दादाभाई नौरोजी यांच्या सचिव म्हणून भिकाजी कामा कार्य करू लागल्या. युरोपात येणाऱ्या भारतीय युवकांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित करण्याचे काम श्यामजी कृष्ण वर्मा, दादाभाई नौरोजी यांच्यासोबत मादाम कामा सुद्धा करीत होत्या.


◾️ जर्मनीत स्टुटगार्ट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत यांनी भारताचे नेतृत्व केले. सर्व देशांचे राष्ट्रध्वज होते


◾️भिकाजी कामा यांनी  सहकार्‍यांसोबत चर्चा करून स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज बनविला. त्यावर आठ कमळे तत्कालीन  

8 राज्यांचे प्रतिनिधित्व करीत होते. 


◾️वदे मातरम असे देवनागरी लिपीत मध्ये लिहिलेले होते. सूर्य -चंद्र हे हिंदू आणि मुस्लिमांचे ऐक्य दाखवीत होते .तीन रंग हिरवा पिवळा लाल  असा तिरंगा ध्वज या परिषदेमध्ये मादाम कामांनी 22 ऑगस्ट 1907 रोजी फडकविला.

ध्वज फडकावल्या नंतर आपल्या खणखणीत आणि धीरगंभीर आवाजात त्या म्हणाल्या 


◾️ "माझ्या स्वतंत्र भारताचा हा तिरंगा झेंडा मी हातात धरुन फडकवित आहे .हिंदुस्थानचा तरूण हुतात्म्यांच्या रक्ताने तो आधीच पावन झालेला आहे. स्वातंत्र्यप्रेमी म्हणविणार्‍या परिषदेतील सदस्यांना स्वतंत्र हिंदुस्थानचे मानचिन्ह असणारा तिरंगा  आव्हान देत येथे फडकत आहे .या तिरंग्याला प्रणाम करा.


◾️ सर्व सदस्यांनी भारताच्या तिरंग्याला उभे राहून मानवंदना दिली . मादाम कामांना फ्रान्समध्ये स्थानबद्ध करण्यात आले. तेथे त्या 1935 सालापर्यंत होत्या. त्यानंतर त्यांना आरोग्याच्या कारणास्तव भारतात परत येण्याची परवानगी मिळाली.  वयाच्या 74 व्या वर्षी त्या भारतात परतल्या. 


◾️19 ऑगस्ट 1936 या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये विजेप्रमाणे लकाकणाऱ्या मादाम भिकाजी कामा यांना लाख लाख प्रणाम.

 

No comments:

Post a Comment

Latest post

मध्ययुगीन भारताचा इतिहास

✺ गुलाम वंशाची स्थापना कोणी केली? ► कुतुबुद्दीन ऐबक ✺ कुतुबमिनारचा पाया कोणी घातला? ► कुतुबुद्दीन ऐबक ✺ अडीच दिवस लागलेली झोपडी कोणी बांधली?...