25 August 2019

📲 "डेटा सबस्क्रिप्शन रिपोर्ट" अहवाल📲



-केंद्रीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाद्वारे (ट्राय) जारी

-इंटरनेट वापरून वेगवेगळ्या साईट सर्फिंगमध्ये 'महाराष्ट्र' देशात प्रथम स्थानी

●2018 वर्षात 'डेटा' वापराचा आधार घेत अहवाल

●देशातील डेटा वापरात अग्रेसर 5 राज्ये
1. महाराष्ट्र (4 कोटी 80 लाख नागरिक)
2. आंध्रप्रदेश (4 कोटी 40 लाख)
3. तामिळनाडू (4 कोटी 10 लाख)
4. उत्तरप्रदेश (4 कोटी)
5. कर्नाटक (3 कोटी 6 लाख)

◆भारतात 4G चा वापर 86% इंटरनेट वापरकर्ते करतात.

◆3G चा वापर अजूनही - 12.19%वापरकर्ते करतात

पूरपरिस्थितीच्या अभ्यासासाठी जलसंपदातर्फे दहा जणांची समिती


👉भीमा व कृष्णा नदीच्या खोर्‍यामध्ये आलेल्या महापुराची कारणे शोधण्यासाठी व त्यावर उपायोजनात्मक अहवाल तयार करण्याकरिता जलसंपदा विभागाच्या वतीने दहा जणांची अभ्यास समिती स्थापन केली आहे.

👉जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे हे या समितीचे अध्यक्ष आहेत.

👉दहा सदस्यीय समितीने तीन महिन्यात अहवाल द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

👉जास्तीत तीन महिन्यात म्हणजे 30 नोव्हेंबरपर्यंत अहवाल द्यावा.

👉यावर्षीच्या पावसाळ्यात कृष्णा नदीच्या खोर्‍यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील गावे मोठ्या संख्येने बाधित झाली. त्याचप्रमाणे जीवित व वित्त हानीदेखील प्रचंड झाली.

👉पुराच्या कारणांबाबत विविध स्तरांवरून मतमतांतर व्यक्त होत आहेत. चालूवर्षीची पूरपरिस्थिती अधिकच गंभीर आहे.

👉अलमट्टी धरण तसेच दोन्ही राज्यांतील अन्य प्रकल्पही पूर्णत्वास आलेले आहेत. यात अनेक तांत्रिक गुंतागुंतीच्या बाबी आहेत. या सर्व बाबींचे सखोल तांत्रिक अन्वेषण करून पूरपरिस्थितीची कारणे शोधणे, भविष्यात अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उपाययोजना आखण्याकरिता तज्ज्ञ अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे.

👉त्यामध्ये भारतीय हवामान खाते, भारतीय प्राद्योगिक संस्था (आयआयटी), महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, जलक्षेत्रातील विश्लेषक अशा तज्ज्ञांचा समावेश आहे.

✅नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये समावेश करण्यात आलेल्यांची नावे पुढील प्रमाणे :

👉विनय कुलकर्णी (तांत्रिक सदस्य, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण),

👉संजय घाणेकर (सचिव, प्रकल्प समन्वयक, जलसंपदा विभाग)

👉प्रा. रवी सिन्हा (आयआयटी, मुंबई),

👉नित्यानंद रॉय (मुख्य अभियंता, केंद्रीय जलआयोग, नवी दिल्ली),

👉संचालक, महाराष्ट्र सुदूर संवेदना उपयोजिता केंद्र, नागपूर,

👉उपमहासंचालक, भारतीय हवामान विभाग,

👉संचालक, आय. आय. टी. एम. पुणे,

👉प्रदीप पुरंदरे (सामाजिक कार्यकर्ते व तज्ज्ञ),

👉राजेंद्र पवार (सचिव, जलसंपदा विभाग, मुंबई)

श्रीनगर आणि जम्मूच्या महापौरांना ‘राज्यमंत्री’ चा दर्जा देण्यात आला

श्रीनगर आणि जम्मू नागरी संस्थांच्या महापौरांना केंद्र सरकारने राज्यमंत्रीचा (MoS) दर्जा दिला आहे. राज्याचे अतिरिक्त सचिव सुभाष छिब्बर म्हणाले की, आदरातिथ्य व प्रोटोकॉल विभाग सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने जम्मू-काश्मीर राज्य प्राधान्य वॉरंटमध्ये आवश्यक बदल समाविष्ट करेल.

• या आदेशानुसार, “त्यांच्या क्षेत्रीय कार्यक्षेत्रात SMC (श्रीनगर महानगरपालिका) आणि JMC (जम्मू महानगरपालिका) च्या महापौरांना राज्यमंत्री (एमओएस) च्या समान दर्जा मंजूर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.”

• जम्मू-काश्मीरच्या महानगरपालिकांनी 13 वर्षांच्या अंतरानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चार टप्प्यात निवडणुका घेतल्या. 

• अनुक्रमे जेएमसी आणि एसएमसीचे महापौर म्हणून भाजप नेते चंदर मोहन गुप्ता आणि पीपल्स कॉन्फरन्सचे नेते जुनैद मट्टू हे आहेत.

🔸पार्श्वभूमी :

✍ 6 ऑगस्ट, 2019 रोजी भारत सरकारने कलम 370 आणि जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला. 

✍ केंद्र सरकारने राज्याला जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशात विभागले. 

✍जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या घटनेचा अनुच्छेद 370 सरकारने रद्द केला असल्याचे अमित शाह यांनी राज्यसभेत जाहीर केले. 

✍लडाख प्रदेश हा विधानसभेविना केंद्रशासित प्रदेश (यूटी) असेल. आणि, जम्मू-काश्मीर हा एक विधीमंडळ असलेला केंद्र शासित प्रदेश असेल.

कलम 370 बद्दल :

• अनुच्छेद 370 जम्मू आणि काश्मीर राज्याला एक विशेष दर्जा प्रदान करीत होता. 

• जेव्हा कलम 370 राज्यात सक्रिय होते तेव्हा राज्यात संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण वगळता इतर सर्व कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारला राज्य सरकारची मंजुरी घ्यावी लागत होती. 

• आता कलम 370 मधील कलम 1 वगळता इतर सर्व तरतुदी निरर्थक आहेत. 

• जम्मू-काश्मीरच्या जागा कमी होऊन 83 जागा कमी होतील कारण लडाख प्रदेशातील चार जागा कमी केल्या जातील.

24 August 2019

UAE मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान 🎇

🎯 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी संयुक्त अरब अमिरातीमध्ये ‘ऑर्डर ऑफ झायेद’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा यूएईमधला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

🎯दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी मोदींनी जे प्रयत्न केले त्यासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले.

🎯पंतप्रधान मोदींच्या आधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, क्वीन एलिझाबेथ दुसऱ्या आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

🎯यूएईचे संस्थापक शेख झायेद बिन सुल्तान अल नाहयान यांच्या नावाने ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा पुरस्कार दिला जातो.

🎯या पुरस्काराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे शेख झायेद यांच्या जन्म शताब्दी वर्षात मोदींना हा पुरस्कार देण्यात आला. यूएईने एप्रिल महिन्यात या पुरस्कारासाठी मोदींच्या नावाची घोषणा केली होती.

🎯आमचे भारताबरोबर ऐतिहासिक आणि व्यापक रणनितीक संबंध आहेत. माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे संबंध बळकट करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली असे अबू धाबीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले होते.

🎯 यूएई इस्लामिक देश असला तरी आज पाकिस्तानपेक्षा भारताबरोबर त्यांचे संबंध बळकट आहेत. जम्मू-काश्मीर मुद्दावर जाहीरपणे यूएईने भारताचे समर्थन केले आहे.

🎯जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करणे हा भारताचा अंतर्गत विषय आहे अशी यूएईची भूमिका आहे.

 

देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं आज (24 ऑगस्ट) निधन झालं.



📚 दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते.

श्वसनाचा त्रास होत असल्याने आणि हृदयाचे ठोके वाढल्यामुळे जेटली यांना 9 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

काही दिवसांपासून त्यांना लाईफ केअर सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. अखेर वयाच्या 67 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

किडनी ट्रान्सप्लांटनंतर अरुण जेटली यांचा आजार बळावला होता. 2019 च्या निवडणुकीत तर ते बाहेरही पडू शकले नाहीत.

निवडणूक जिंकल्यानंतर पत्र लिहून जेटलींनी आपला मंत्रिमंडळात समावेश करु नये अशी विनंती केली. मोदींनीही ती मान्य केली. "गेल्या 18 महिन्यांपासून मी आजारी आहे.

माझी प्रकृती खराब आहे. यामुळे माझा मंत्रिपदासाठी विचार केला जाऊ नये," असं स्वत: जेटली यांनी ट्विटरद्वारे सांगितलं होतं.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.

     लहानपण दे गा देवा | मुंगी साखरेचा रवा | ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार |

   1) उपमा    2) दृष्टांत     
   3) उत्प्रेक्षा    4) अतिशयोक्ती

उत्तर :- 2

2) परभाषी शब्द ओळखा.

   1) बक्षीस    2) इनाम      3) भेटवस्तू    4) दान

उत्तर :- 2

3) धन्वन्यर्थ करणे ......................

   1) ‘अभिधा’ शक्तीमुळे जाणवणारा अर्थ    2) ‘व्यंजना’ शब्दशक्तीमुळे सुचित होणार अर्थ
   3) ‘लक्षणा’ शब्दशक्तीमुळे जाणवणारा अर्थ    4) भाषेतील मूलध्वनीचा अर्थ

उत्तर :- 2

4) ‘वारा’ या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता ?

   1) शैल      2) अनल     
   3) अनिल    4) सलील

उत्तर  :- 2

5) ‘आवक’ या शब्दाला विरुध्दार्थी शब्द सांगा.

   1) श्रावक    2) भावक     
   3) जावक    4) वाहक

उत्तर :- 3

6) योग्य तो पर्याय निवडून खालील म्हण पूर्ण करा.

     शहाण्याला .................. मार.
   1) काठीचा    2) हंटरचा   
   3) चाबकाचा    4) शब्दांचा

उत्तर :- 4

7) ‘अतिशय गर्व होणे’ या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.

   1) दोडक्यावानी फुगणे    2) दोन बोटे स्वर्ग उरणे
   3) दोन हात करणे    4) दगडाखालून हात काढून घेणे

उत्तर :- 2

8) अनेक गोष्टीत एकाचवेळी लक्ष देणा-यास ....................... म्हणतात.

   1) कामसू    2) अष्टावधानी   
   3) कार्यरत    4) चौकस

उत्तर :- 2

9) खालील पर्यायी उत्तरातील शुध्द पर्यायी शब्द सांगा.

   1) अग्नीहोत्री    2) अग्निहोत्री   
   3) आग्नीहोत्री    4) आग्निहोत्री

उत्तर :- 2

20) संयुक्त स्वर म्हणजे -

   1) सर्व स्वर एकत्र करणे        2) सर्वांनी मिळून आवाज काढणे
   3) दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले    4) –हस्व उच्चार असलेले

उत्तर :- 3

लिओनेल मेस्सी : 2018-19 सालासाठी UEFAच्या 'गोल ऑफ द सीझन अवॉर्ड'चा विजेता

▪️बार्सिलोना फूटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सी हा 2018-19 सालासाठी युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA) याच्या 'गोल ऑफ द सीझन अवॉर्ड' या पुरस्काराचा विजेता ठरला.

▪️2015 आणि 2016 सालीही मेस्सीने हे विशेष पारितोषिक जिंकले होते.

▪️ गेल्या पाच हंगामात हा पुरस्कार मिळविण्याची ही  तिसरी वेळ  आहे.

▪️त्याने त्याचा प्रतिस्पर्धी क्रिस्टियानो रोनाल्डोला पराभूत केले.

काय आहे "आयएनएक्स" प्रकरण

चिदंबरम यांच्याविरोधात ईडीची लूकआऊट नोटीस जारी. INX मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाचाही तत्काळ दिलासा देण्यास नकार

✍ त्यामुळे आता हे प्रकरण सरन्यायाधीश रंजन गोगोईंकडे सोपवण्याचा न्यायाधीशांचा निर्णय

✍ देशाबाहेर पळून जाण्याची भीती असल्याने CBIकडून चिदंबरम यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी 

✍ CBIची टीम चिदंबरम यांच्या घरी हजेरी लावत असून ते बेपत्ता असल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता

INX मीडिया प्रकरण काय आहे?:

✍ पी चिदंबरम अर्थमंत्री (2007) असताना INX मीडिया ग्रुपमध्ये 305 कोटींची गुंतवणूक परदेशातून झाली होती
✍ या गुंतवणुकीस परवानगी देताना गैरव्यवहार झाल्याचा चिदंबरम यांच्यावर आरोप आहे
✍ सीबीआयने याप्रकरणी 15 मे 2017 ला तक्रार दाखल केली
✍ तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने 2018 मध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला

WTO बद्दल :-


▪️ जागतिक व्यापार संघटना (WTO) ही आंतरसरकारी संघटना आहे, जी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करते. 

▪️ त्याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे आणि त्याचे 164 देश सभासद आहेत.

▪️  1948 साली लागू झालेल्या दर व व्यापार संदर्भात सर्वसाधारण करार (General Agreement on Tariffs and Trade -GATT) याला बदली करून 15 एप्रिल 1994 रोजी 123 राष्ट्रांनी स्वीकारलेल्या मार्राकेश कराराच्या अंतर्गत WTO अधिकृतपणे 1 जानेवारी 1995 रोजी कार्यरत

शिवराम हरी राजगुरु

        जन्म : 24 आॕगष्ट 1908  
(खेड, पूणे, बाॕम्बे प्रेसिडेन्सी, ब्रिटिश भारत)

        फाशी : 23 मार्च 1931
                   (वय : 22 वर्षे)
(लाहोर, ब्रिटिश भारत - सध्या पंजाब, पाकिस्तान)

              भारतीय स्वातंत्र्य लढा म्हणजे जगातील सर्वोत्तम क्रांतिपर्वापैकी एक होय. कित्येक क्रांतिकारकांनी जीवाची पर्वा न करता या धगधगत्या अग्निकुंडात उडी घेतली आणि बलिदान स्विकारले. त्या क्रांतिकारकांची आठवण होताच तीन चेहरे आपसुकच डोळ्यांसमोर येतात. ते म्हणजे - भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव.  राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्य लढयातील एक प्रमुख क्रांतिकारक होते. अचूक नेमबाजी आणि दांडगी स्मरणशक्ती या दोन गुणांचे त्यांना जणू वरदानच लाभले होते.
             राजगुरू यांचा जन्म 24 ऑगष्ट 1908 ला पुणे जिल्हयातील, खेड येथे झाला होता. ते अवघे 6 वर्षांचे असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे अल्प वयातच ज्ञानार्जन व संस्कृत शिकण्यासाठी काशी येथे गेले होते. तेथे त्यांनी हिंदु धर्मग्रंथांसोबतच वेदांचाही अभ्यास केला होता, परंतु 'लघु सिध्दान्त कौमुदी' सारखा क्लिष्ट ग्रंथसुध्दा अल्प वयातच मुखपाठ केलेला होता. त्यांना व्यायामाची आवड होती तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचे प्रशसंक होते.
           वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी घर सोडले. घर सोडण्यामागे त्यांचे कारण देखील वेगळे होते. इंग्रजी विषयात नापास झाल्याने मोठ्या भावाने त्यांना आपल्या नववधूसमोर इंग्रजी धडा वाचायची शिक्षा सुनावली. अर्थातच राजगुरूंना ते काही जमले नाही आणि झाला अपमान त्यांच्या जिव्हारी लागला. शेवटी संधी साधून जसे होते तसे, आईने तेल आणायला दिलेले 9 पैसे आणि बहिणीने अंजीर आणायला दिलेले 2 पैसे असे एकूण 11 पैसे घेऊन त्यांनी घरातून धूम ठोकली ती कायमचीच.
             सर्वप्रथम त्यांनी नाशिकला काही काळ वास्तव्य केले आणि नंतर शिक्षणाच्या उद्देशाने ते काशीला पोहोचले. तेथे पुस्तकांत, राजकीय आणि व्यायामशाळेत लाठीकाठी, दांडपट्टा यांसारख्या खेळात ते रमून गेले. काशी येथील पं. मदनमोहन मालवीयांचे हिंदू विद्यापीठ हे सा-या क्रांतिकारकांचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जायचे. तेथे अनेक गुप्त खलबतेही होत असत. याच काळात काशीमध्येच राजगुरूंची भेट चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत झाली. राजगुरूचे निडर व्यक्तीमत्व पाहून आझादांनी राजगुरूंना क्रांतिकारकांच्या गटात सामिल करुन घेतले. त्या क्रांतिमय वातावरणात वावरतांना राजगुरूंमधील क्रांतिकारक घडत गेला. कोणत्याही मोहिमेसाठी ते एका पायावर तयार असत. वेळ पडली तर या क्रांती संग्रामात बलिदान देण्याची देखील त्यांची तयारी होती.
             याचवेळेस शिव शर्मा नावाच्या एका सहका-यासोबत दिल्लीमधील एका फितुराला ठार करण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपविण्यात आली. पण पिस्तुल एकच असल्याने पंचाईत होती.
कारण तो फितुर क्वचितच घराबाहेर पडत असे. त्यामुळे तेव्हा तो बाहेर पडेल तेव्हाच त्याला मारणे सोयीचे होते. त्यासाठी दोघाकडे पिस्तुल असणे आवश्यक होते. अन्यथा जोखीम पत्करावी लागली असती. राजगुरूंना थांबायला सांगून शिव शर्मा पिस्तुल आणण्यासाठी लाहोरला गेले. पण त्यांना पिस्तुल काही मिळाली नाही. जवळपास तीन दिवसांनी ते दिल्लीहून परतले आणि फितुराच्या घराजवळ पाहतात तो काय भलामोठा पोलीस पहारा आणि सर्चलाईट्स होत्या. शिव शर्मा काय समजायचे ते समजले. तो फितुर संध्याकाळच्या वेळेस 7 ते 8 च्या दरम्यान बाहेर पडत असे. त्याच संधीचा फायदा घेऊन राजगुरूंनी एकटयाने मोहिम फत्ते केली होती !  पाठी लागलेल्या पोलिसांचा ससेमिरा चुकवीत राजगुरू पळत मथुरेच्या दिशेने निघाले आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही पण त्यांनी दिल्लीच्या पुढील दोन स्थानके  काळयाकुट्ट अंधारात रेल्वे पटरींतून पळत पार केली.
          सायमन कमिशनविरूध्द 30 ऑक्टोबर 1928 रोजी झालेल्या निदर्शनादरम्यान ब्रिटिशांनी केलेल्या लाठीहल्ल्यात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले होते. "गंभीर जखमेमुळे 17 नोव्हेंबर 1928 ला त्यांचे निधन झाले.
            पंजाबकेसरी लाला लजपतराय यांच्यावर निर्दयीपणे लाठीहल्ला करून त्यांना ठार मारणा-या पोलीस अधिकारी स्कॉटला जगण्याचा अधिकार नाही अशी गर्जना करीत भगतसिंगांनी त्याचा वध करण्याचा विडा उचलला. राजगुरूंनी हट्ट केल्यामुळे भगतसिंगांनी त्यांना देखील आपल्या बरोबर सामील करून घेतले. त्यांचा अजून एक साथीदार जय गोपाळ पोलीस स्टेशनवर स्कॉटच्या हालचालींवर पाळत ठेवून होता. पण 4 - 5 दिवस स्कॉट त्या भागात आलाच नाही.
            अखेर दुस-या दिवशी एक गोरा अधिकारी पोलीस स्टेशनमधून बाहेर पडला. जय गोपाळला वाटले की हाच स्कॉट आहे, म्हणून दबा धरून बसलेल्या भगतसिंग आणि राजगुरुंना खूण केली. पण भगतसिंगांनी हा स्कॉट नसावा अशी प्रतिक्रिया दिली. परंतु राजगुरूचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते. भगतसिंगांनी नकार देण्यापूर्वीच राजगुरुंनी त्या गो-या अधिका-यावर गोळी झाडली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून भगतसिंगांनी सलग आठ गोळ्या झाडत त्या गो-या अधिका-याला यमसदनी धाडले. त्या सगळ्या गोंधळातून बाहेर पडण्यात मात्र ते यशस्वी झाले . नंतर दोघांनाही कळले की तो स्कॉट नसून साँडर्स होता.
            माणूस चुकला पण मोहीम अयशस्वी राहिली नाही यातच भगतसिंग आणि राजगुरू या दोघांनीही समाधान मानले. इकडे मारेक-यांच्या मागावर पोलीस हात धुवून लागले होते. पण शेवटी वेषांतर करून भगतसिंग आणि राजगुरू दोघेही दिवसाढवळया एकाच गाडीतून लाहोरहून राजकोटला निसटले. लोकांना संशय येऊ नये म्हणून त्यांच्यात मिसळू लागले. परंतु फार काळ ते पोलिसांना गुंगारा देऊ शकले नाहीत, आणि 1929 सालच्या सप्टेंबर महिन्यात ते पोलिसांच्या हाती लागले.

            त्यांनी साथीदारांची नावे सांगावीत म्हणून कारागृहात त्यांचा अमानवी छळ करण्यात आला. शेवटी छळ करणारे थकले पण राजगुरुंनी त्यांना आपल्या साथीदारांच्या नावाची साधी पुसटशी कल्पनाही येऊ दिली नाही. यावरून त्यांची निष्ठा दिसून येते.
             पुढे कारावासात शिक्षा भोगत असतांना भगतसिंग आणि सुखदेव या आपल्या सहाकाच्या सोबत त्यांची पुन्हा भेट झाली. तेथेही त्यांनी आपला क्रांतिकारी बाणा ढळू दिला नाही. अखेर लाहोर खटल्याचा निकाल आला आणि भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांनाही लाहोर जेलमध्ये 23 मार्च 1931 ला संध्याकाळी 7.33 ला फासावर चढवण्यात आले आणि तीन पेटत्या  निखान्यांची धग विझली. त्यांच्या बलिदानाचा 23 मार्च हा दिवस आपल्याकडे शहीद दिन म्हणून साजरा केला जातो.
             स्वातंत्र्यप्राप्ती वगळता कोणतीही अभिलाषा मनात न धरता केवळ आणि केवळ देशासाठी प्राणाची आहुती देणा-या आणि महाराष्ट्राचे नाव क्रांतिपर्वात अढळ करणा-या राजगुरु नामक प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा !!
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏 स्वातंत्र्य वेदीवर शहीद झालेल्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन🙏

एका ओळीत सारांश, 24 ऑगस्ट 2019

🌹🌳🌴दिनविशेष🌴🌳🌹

👉आंतरराष्ट्रीय गुलामगिरीविरोधी दिन - 23 ऑगस्ट.

🌹🌳🌴संरक्षण🌴🌳🌹

👉‘रेडी टू मूव्ह इन’ प्रकल्प तयार करण्यासाठी भारतीय सैन्याने या कंपनीसोबत सामंजस्य करार केला - टाटा रियल्टी अँड हाऊसिंग.

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉RBIने ग्राहकांना ई-जनादेश देऊन एवढ्या रुपयांपर्यंतचे आवर्ती आर्थिक व्यवहार करण्यास परवानगी दिली – 2000 रुपये.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉या देशाने पाण्यावर तरंगणारी जगातली पहिली अणुभट्टी तयार केली - रशिया (अकाडेमिक लोमोनोसोव्ह).

👉या देशाने ऑगस्टमध्ये हवाई, जहाज-रोधी आणि पाणबुडीविरोधी मोहीम राबविण्यास सक्षम असलेली मानवरहित युद्धनौका तयार केली - चीन.

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉अक्षय ऊर्जेचे नवे रूप ज्यास ऊर्जा मंत्रालयाने निर्मितीसाठी मंजुरी दिली - महासागर ऊर्जा.

👉वित्त मंत्रालयाच्या “सबका विश्वास-लेगसी डिस्पुट रिझोल्युशन स्कीम 2019” याने इतकी रक्कम असल्यास ड्युटी डिमांडच्या 70% सवलत देण्यात आली आहे - रू. 50 लक्ष किंवा त्यापेक्षा कमी.

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉गृह मंत्रालयाचे नवे गृहसचिव - अजय कुमार भल्ला.

🌹🌳🌴विज्ञान व तंत्रज्ञान🌴🌳🌹

👉रशियाने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनावर (ISS) पाठविलेला मानवी-आकाराचा रोबोट - फेडर.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) कार्यक्रम सुरू करण्यात आला ते वर्ष - सन 1998.

👉इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) कार्यक्रमाचे भागीदार - संयुक्त राज्ये अमेरिका, रशिया, जपान, युरोप आणि कॅनडा.

👉चीन - राजधानी: बिजींग; राष्ट्रीय चलन: रेन्मिन्बी (युआन).

👉रशिया - राजधानी: मॉस्को; राष्ट्रीय चलन: रशियाई रूबल.

23 August 2019

इंजीती श्रीनिवास समिती

⏩कंपनी कामकाज मंत्रालायचे सचिव इंजीती श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखालील CSRसाठी (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने नुकताच आपला अहवाल अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना सादर केला.

✅इंजीती श्रीनिवास समिती या समितीच्या शिफारशी :

● CSR वर केला जाणारा खर्च कराच्या रक्कमेतून वजा करण्यात यावा.

● ज्या कंपन्यांची CSR रक्कम 50 लाखांपेक्षा कमी असेल त्या कंपनीला CSR समितीच्या स्थापनेतून सूट देण्यात यावी.

● CSRचे पालन न करणे, दंडाची शिक्षा असलेला नागरी गुन्हा

● वापर न करण्यात आलेली CSRची रक्कम सामाजिक प्रभाव असणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यात यावे.

● कंपनी कायद्याचे 7वे परिशिष्ट (जे CSR म्हणून पात्र ठरलेल्या क्रियांच्या रूपरेषा दर्शविते) संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी पुर्तता करणे.

आवर्ती आर्थिक व्यवहारांसाठी कार्डवर ई-जनादेशाच्या प्रक्रियेला RBI ने मंजुरी दिली

👉भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) ई-जनादेश संबंधी नोंदणी, दुरूस्ती आणि निरस्तीकरण प्रक्रियेच्या दरम्यान प्रमाणीकरणाचा अतिरिक्त घटक (additional factor of authentication - AFA) यासह आवर्ती आर्थिक व्यवहारांसाठी (मर्चंट पेमेंट्स) कार्डवर ई-जनादेशाच्या प्रक्रियेला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

👉RBI कडून दिलेले निर्देश 1 सप्टेंबर 2019 पासून लागू होतील.

👉RBIने ग्राहकांना सप्टेंबर 2019 पासून ई-जनादेश देऊन 2000 रुपयांपर्यंतचे आवर्ती आर्थिक व्यवहार (recurring payments) करण्यास परवानगी दिली.

👉ही सुविधा डिजिटल वॉलेट्ससह डेबिट, क्रेडिट, आणि प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स अश्या सर्व प्रकाराच्या कार्डांचा वापर करुन केलेल्या व्यवहारांसाठी लागू आहे.

👉यामुळे एखादी व्यक्ती छोट्या-छोट्या रकमेच्या व्यवहारांसाठी स्वयंचलितपणे इन्सट्रक्शन्स देऊ शकते.

👉कार्डांवर ई-जनादेशास परवानगी देण्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेचा निर्णय देशभरात डिजिटल देयकांना वाढविण्यास सक्षम करणारा ठरणार आहे.