13 November 2022

भारतीय राज्यघटनेबद्दल संपूर्ण माहिती

भारतीय राज्यघटनेबद्दल संपूर्ण माहिती

1. लिखित घटना

2. एकेरी नागरिकत्व

3. एकेरी न्यायव्यवस्था

4. धर्मनिरपेक्षता

5. कल्याणकारी राज्य

6. मूलभूत हक्कांचा समावेश

7. मूलभूत कर्तव्यांचा समावेश

घटना समितीतील महत्वाच्या समित्या :

1. मसुदा समिती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

2. संघराज्य राज्यघटना समिती : पं. जवाहरलाल नेहरू

3. घटना समिती : डॉ. राजेंद्र प्रसाद

4. मूलभूत हक्क समिती : सरदार वल्लभभाई पटेल

5. प्रांतीय राज्यघटना समिती : सरदार वल्लभभाई पटेल

6. वित्त व स्टाफ समिती : डॉ. राजेंद्र प्रसाद

7. सुकून समिती : डॉ. के. एक. मुन्शी

भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी :

संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

मूलभूत हक्क : अमेरिका

न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिकाय

कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

कायदा निर्मिती : इंग्लंड

लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

संघराज्य पद्धत : कॅनडा

शेष अधिकार : कॅनडा

उद्देश पत्रिका :

1. संविधान निर्मिती मागचा संविधानकर्त्यांचा उद्देश

2. उद्देशाला संविधानमध्ये किती स्थान देण्यात आलेले आहे जर देण्यात आले नसेल तर घटनेतील दुरूस्ती करून त्याची पूर्तता करणे

3. घटनेतील काही अस्पष्ट गोष्टी स्पष्ट करण्यासाठी उद्देशपत्रिकेचा उपयोग होतो.

उद्देश पत्रिका : “आम्ही भारतीय जनता, भारताच सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारताच्या सर्व नागरिकांना
न्याय : सामाजिक, आर्थिक आणि राजकीय
स्वातंत्र्य : विचार, उच्चार, श्रद्धा, धर्म आणि उपासना यांचे
समता : दर्जा आणि संधी याबाबतीत
बंधुता : व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता राखणारी यांची शाश्वती देण्याचे आमच्या या घटना समितीत आज 26 नोव्हेंबर, 1949 रोजी विचारपूर्वक ठरवीत आहोत.” “व ही घटना आमच्यासाठी तयार, मान्य स्वीकृत करीत आहोत.”

राज्य व्यवस्थेचे स्वरूप :

1. सार्वभौम : म्हणजे भारत आता इतर कोणत्याही देशाच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रणाखाली नाही. अंतर्गत आणि बाह्य परदेशी संबंध निर्माण करण्यास भारत स्वातंत्र्य आहे.

2. प्रजासत्ताक : म्हणजे लोकनियुक्त शासन होय. प्रजासत्ताक राज्यामध्ये अंतिम सत्ता लोकांकडे असते.

3. गणराज्य : म्हणजे राजा नसलेले राज्य होय.

राज्य व्यवस्थेची उद्देश : भारतीय घटनेच्या तिसर्‍या भागामध्ये राज्य व्यवस्थेचा उद्देश स्पष्ट करण्यात आला आहे. त्यासाठी भारतीय घटनेत पुढीलपैकी चार उद्देश उद्देशपत्रिकेत सांगितली आहेत.

न्याय : सामाजिक, आर्थिक, राजकीय

स्वातंत्र्य : विचार, उच्चार, श्रद्धा, धर्म आणि उपासना

समता : दर्जा आणि संधी याबाबतीत

बंधुता : व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता

41 व्या घटना दुरूस्तीनुसार उद्देशपत्रिकेत केलेला बदल :

समाजवादी : हा शब्द या दुरुस्तीनुसार उद्देशपत्रिकेत नमूद करण्यात आला आहे.

धर्मनिरपेक्ष : कोणत्याही धर्माला अनुसरून राज्यकारभार केला जाणार नाही.

अखंडता : भारतातून कोणतेही राज्य निघून जाणार नाही, भारतातील अखंडता टिकून राहील.

महत्वाचे प्रश्नसंच

:
Ques. साधारण विधेयक संबंधित गतिरोध दूर करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक कोण बोलवितो ?

A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. लोकसभा अध्यक्ष
D. उपराष्ट्रपती
Ans. राष्ट्रपती

Ques. स्वतंत्र भारताच अता पर्यंत किती संयुक्त अधिवेशन झाले आहे ?

A. दोन वेळा
B. तीन वेळा
C. चार वेळा
D. एक वेळा
Ans. चार वेळा

Ques. राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती कधी संयुक्त अधिवेशनांची अध्यक्षता करू शकतो का ?

A. नाही
B. हो
C. कधी-कधी
D. है
Ans. नाही

Ques. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाची अध्यक्षता कोण करते ?

A. उपराष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. राष्ट्रपती
D. लोकसभा अध्यक्ष
Ans. लोकसभा अध्यक्ष

Ques. संसदेच्या दोन्हीं गृहांचे सत्रावसान कोण करते ?

A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. लोकसभा अध्यक्ष
D. उपराष्ट्रपती
Ans. राष्ट्रपती

Ques. संसदीय प्रणालीची कोणती प्रथा भारताची देन आहे ?

A. यापैकी नाही
B. प्रथनसत्र
C. वाद-विवाद
D. शून्य काळ
Ans. शून्य काळ

Ques. संसदेच्या कार्यवाहीत कोणते प्रथम विषय असतात ?

A. प्रश्न काळ
B. शून्य काळ
C. चर्चा सत्र
D. वाद-विवाद
Ans. प्रश्न काळ

Ques. संसदेच्या कोणत्या सदस्याला गैर सरकारी सदस्य म्हणटले जाते ?

A. उपराष्ट्रपती
B. लोकसभा अध्यक्ष
C. मंत्री अतिरिक्त अन्य सर्व सदस्य
D. संसदेत गैर सरकारी सदस्य भाग नाही घेऊ शकत
Ans. मंत्री अतिरिक्त अन्य सर्व सदस्य

Ques. संसदेचा स्थायी सभागृह कोणते आहे ?

A. लोकसभा
B. यापैकी नाही
C. दोन्हीं
D. राज्यसभा
Ans. राज्यसभा

Ques. भारतीय संसदेचे सार्वभौमत्तवाला कसली बंदी घातली आहे ?

A. राज्यसभा सद्सयांची
B. लोकसभा सदस्यांची
C. न्याय समीक्षेची
D. संसदेची
Ans. न्याय समीक्षेची

Ques. भारतीय संविधानात राज्याचे मार्गदर्शक तत्वांला शामिल करण्याचे मूख्य उद्देश्य काय आहे ?

A. देशात लोकांला एक विचारधारणा देने
B. मार्गदर्शक तत्वांला जनते पर्यंत पहुचविणे
C. कल्याणकारी राज्याची स्थापना करणे
D. मार्गदर्शक तत्वांचे महत्व समझविणे
Ans. कल्याणकारी राज्याची स्थापना करणे

Ques. भारतीय संविधानाचे कोणता भाग समाजवादी व्यवस्थेची प्रेरणा देतो ?

A. मूलभूत कर्तव्य
B. निती निर्देशक तत्व
C. मूलभूत हक्क
D. यापैकी नाही
Ans. निती निर्देशक तत्व

Ques. संविधानात कल्याणकारी राज्याचे आदेश कोण देते ?

A. न्यायापालिका
B. संघीय कार्यपालिका
C. राज्य विधायिका
D. निती-निर्देशक तत्व
Ans. निती-निर्देशक तत्व

Ques. निति-निर्देशक तत्वांचे क्रियान्वयन कश्यावर निर्धारितकरतात?

A. सरकारच्या विचारांवर
B. सरकार जवळ उपलब्ध संसाधनावर
C. संविधानावर
D. मंत्रीमंडळावर
Ans. सरकार जवळ उपलब्ध संसाधनावर

Ques. मौलिक अधिकार आणि राज्याचे नीतिनिर्देशक तत्वांमधे काय समानता आहे?

A. या दोघांचे अनुकरन अनिवार्य आह़े
B. ते एकदुसरयावर आधारित आहे
C. काही समानता नाही
D. ते एकदूसरयासाठी पूरक आहे
Ans. ते एकदूसरयासाठी पूरक आहे

Ques. नीति-निर्देशक तत्वान्ना कार्यान्वित केल्याने मुळ अधिकारांचे हनन होवु शकते का?

A. मुळ अधिकारंचे हनन करण्याचा अधिकार कोणाला नाही
B. कायद्याने अपराध आह़े
C. काहींचे होवु शकते
D. कायदा ठरवतो
Ans. काहींचे होवु शकते

Ques. भारतीय संविधानात समान कार्यासाठी समान वेतन कुठे सुनिच्छित केले गेले आह़े?

A. मुळ कर्तव्या मधे
B. मौलिक अधिकारा मधे
C. राज्याच्या निति-निर्देशक तत्वांमधे
D. यापैकी काही नाही
Ans. राज्याच्या निति-निर्देशक तत्वांमधे

Ques. भारतीय संविधानात अंतरराष्ट्रीय सुरक्षेला प्रोहत्सान देने कुठे दर्शविले आहें?

A. संघाच्या अध्यायांमधे
B. मौलिक अधिकारामधे
C. राज्याच्या नीतिनिर्देशक तत्वांमधे
D. संघ आणि राज्यांमधल्या संबधामधे
Ans. राज्याच्या नीतिनिर्देशक तत्वांमधे

Ques. संविधानाचा कोणता अंश भारतीय नागरिकांना आर्थिक न्याय प्रधान करण्याचे संकेत देतो?

A. मौलिक अधिकार
B. निति-निर्देशक तत्व
C. मुळ कर्त्तव्य
D. नागरिकता
Ans. निति-निर्देशक तत्व

Ques. राज्याच्या निति-निर्देशक सिन्धान्तामधे कोणत्या अनुच्चेदाचा संबंध आंतराष्ट्रीय शांति अणि सुरक्षेसी आहे?

A. अनुच्छेद-५१
B. अनुच्छेद-५४
C. अनुच्छेद-७२
D. अनुच्छेद-३८
Ans. अनुच्छेद-५१

Ques. राज्याच्या निति-निर्देशक सिन्धातानुसार कोणत्या वर्षापर्यंत मुलांना निशुल्क आणि अनिवार्य शिक्षा देण्याचे प्रयोजन आहे?

A. १२वर्ष
B. १४वर्ष
C. १०वर्ष
D. १६वर्ष
Ans. १४वर्ष

Ques. भारतात कोणत्या राज्यामधे समान नागरिक संहिता लागु आहे?

A. आंध्रप्रदेश
B. पंजाब
C. आसाम
D. गोवा
Ans. गोवा

Ques. निति-निर्देशक तत्वांचे महत्त्व कोणासाठी आहे?

A. जनतेसाठी
B. देशासाठी
C. राज्यासाठी
D. सर्वांसाठी
Ans. राज्यासाठी

Ques. 1857 च्या विद्रोहात जगदीशपुराचे राजा कोण होते?

A. तात्या टोपे
B. अमर सिंह
C. नानासाहेब
D. कुँवर सिंह
Ans. कुँवर सिंह

Ques. मंगल पांडेला फाशी कधी दिल्या गेली ?

A. 8 एप्रैल, 1858
B. 8 एप्रैल, 1857
C. 9 एप्रैल, 1857
D. 2 एप्रैल, 1857
Ans. 8 एप्रैल, 1857

Ques. संन्यासी विद्रोहाचे उल्लेख कोणत्या कादंबरीत केले गेले आहे ?

A. रंगभूमि
B. कपालकुंडला
C. कर्मभूमि
D. आनंद मठ
Ans. आनंद मठ

Ques. कोणी म्हणटले की कांग्रेसचे नेते सत्तेचे भूकेले आहे ?

A. रवींद्र नाथ टैगोर
B. कार्ल मार्क्स
C. बांकिम चंद्र चटर्जी
D. मैक्स वेबर
Ans. बांकिम चंद्र चटर्जी

Ques. 1857 ई च्या विद्रोहात दिल्ली मध्ये कोणी नेतृत्व केले ?

A. तात्या टोपे
B. बहादुरशाह जफर
C. मंगल पांडे
D. नाना साहेब
Ans. बहादुरशाह जफर

Ques. तात्या टोपे चे खरे नाव काय होते ?

A. रामचंद्र पांडुरंग
B. पांडुरंग राव भट्ट
C. नाना साहब
D. बाजीराव
Ans. रामचंद्र पांडुरंग

Ques. दादाभाई नौरोजी यांनी कोणत्या समितीची स्थापना केली ?

A. समाज सुधार समिति
B. कांग्रेस समिति
C. होम रूल लिग
D. भारतीय सुधार समिति
Ans. भारतीय सुधार समिति

Ques. भारतीय सुधार समितीची स्थापना कधी झाली ?

A. 1864
B. 1854
C. 1857
D. 1942
Ans. 1857

Ques. भारतीय राष्ट्रीय आंदोलनाच्या 1885 ते 1905 च्या काळाला काय म्हणटल्या जाते ?

A. उदारवादी काळ
B. उग्रवादी काळ
C. पूंजीवादी काऴ
D. क्रांतीकारी काळ
Ans. उदारवादी काळ

Ques. भारतीय राष्ट्रीय कांग्रेसची स्थापना कधी झाली ?

A. 1886 ई.
B. 1885 ई.
C. 1854 ई.
D. 1864 ई
Ans. 1885 ई.

Ques. भारचतीय कांग्रेसची स्थापना कोणा द्वारे झाली ?

A. व्योमेश चंद्र बैनर्जी
B. डॉ. ए. ओ. ह्यूम
C. गोपाल कृष्ण गोखले
D. महात्मा गांधी
Ans. डॉ. ए. ओ. ह्यूम

Ques. हिंदुस्तान सरकारच्या 1935 च्या कायद्याची पार्शवभूमी कोणत्या घटनांनी तयार केली ?
अ. मुडिमन समिती आणि तिचा अहवाल
ब. सायमन कमिशन
क. नेहरू रिपोर्ट
ड. बॅरिस्टर जिन्नांचे 14 मुद्दे
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?

A. अ, ब , आणि क
B. ब, क, आणि ड
C. अ, ब आणि ड
D. अ, ब, क आणि ड
Ans. अ, ब, क आणि ड

महसुली अर्थसंकल्प

महसुली अर्थसंकल्प – महसुली अर्थसंकल्पात महसुली/ चालू खात्यावरील जमाखर्चाचा समावेश होतो. महसुली जमा व खर्चाचा समावेश होतो, ज्याअंतर्गत पुढील बाबींचा समावेश होतो- महसुली जमा, महसुली खर्च.

महसुली जमा या अंतर्गत 

अ) कर उत्पन्न ब) करेतर उत्पन्न.

करेतर उत्पन्नात

१) राजकोषीय सेवा म्हणजेच चलनी नोटा व नाण्यांमधून मिळणारा नफा
२) व्याज उत्पन्न- ज्यात घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांना दिलेल्या कर्जावरील व्याज, रेल्वे व पोस्ट सेवांवरील व्याज तसेच सार्वजनिक उद्योगांना दिलेल्या कर्जावरील व्याज यांचा समावेश होतो. याशिवाय
३) नफा व लाभांश, ज्यात महसुली जमा याअंतर्गत आर.बी.आय., सार्वजनिक बँक, एल.आय.सी., सार्वजनिक उद्योगांचा नफा यांचा समावेश होतो.

महसुली खर्चात महसुली योजना खर्च म्हणजे सामाजिक मालमत्तेच्या देखभालीवरील खर्च तसेच महसुली बिगर योजना खर्च म्हणजे
१) घेतलेल्या कर्जावरील व्याज खर्च
२) संरक्षणाचा महसुली खर्च
३) अनुदाने
४) नागरी प्रशासन खर्च उदा. पगार, कार्यालयीन खर्च इ. तसेच
५) राज्य सरकारे व केंद्रीय प्रदेशांना दिलेली अनुदाने यांचा समावेश होतो.

* भांडवली अर्थसंकल्प – भांडवली अर्थसंकल्पात भांडवली खात्यावरील जमा व खर्चाचा समावेश होते. भांडवली जमा याअंतर्गत निव्वळ कर्जउभारणी, सरकार वापरत असलेल्या अल्पबचती उदा. पोस्टातील बचती, पेन्शन, प्रॉव्हिडंड फंड इ. तसेच राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश, सार्वजनिक उद्योग इ. दिलेल्या कर्जाची वसुली, याशिवाय निर्गुतवणूक व्यवहारातून प्राप्त होणारा नफा इ.चा समावेश भांडवली जमा याअंतर्गत होतो, तसेच भांडवली खर्चात भांडवली योजना खर्च, ज्याअंतर्गत
१) केंद्रीय योजना उदा. जलसिंचन, पूरनियंत्रण, ऊर्जा इ.वरील खर्च
२) राज्य व केंद्रशासित प्रदेशांना केंद्राने दिलेली मदत तसेच भांडवली बिगरयोजना खर्च, ज्यात १) संरक्षणाचा भांडवली खर्च, राज्ये, केंद्रशासित प्रदेश, सार्वजनिक उद्योग इ. दिलेली कर्जे
३) घेतलेल्या कर्जाची परतफेड यांचा समावेश होतो.

१९८७-८८ च्या अर्थसंकल्पापासून महसुली व भांडवली खर्चाचे वर्गीकरण नवीन प्रकारे करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार सार्वजनिक खर्चाचे दोन गट केले जातात.

१) योजना खर्च – योजना खर्चात केंद्र योजनांवरील खर्च व राज्य योजनांसाठी केंद्राने दिलेला खर्च यांचा समावेश होतो.

२) बिगरयोजना खर्च – योजनांवरील खर्चाव्यतिरिक्त खर्च बिगरयोजना खर्च म्हणून गणला जातो.

10 November 2022

महाराष्ट्रातील मुख्य खनीज संपत्ती

महाराष्ट्रातील मुख्य खनीज संपत्ती

महाराष्ट्र राज्यामध्ये खालील महत्वाची खनिजे आढळून येतात.

(1) कोळसा :- खनिज कोळसा हे एक ऊर्जा शक्तीचे महत्वाचे साधन आहे आणि म्हणूनच राष्ट्राच्या विकासात हया खनिजाचा वाटा महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील कोळशाचे अंदाजित साठे 5539.07 दशलक्ष टन इतके आहेत. राज्यात कोळशाचे साठे नागपूर, चंद्रपूर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात आढळून आले आहेत. राज्यतील उत्पादनापौकी अधिकांश कोळसा विज निर्मिर्ती, सिमेंट उत्पादन, स्पॉन्ज आयर्न व इतर अनेक उद्योगासाठी वापरण्यात येतो.

(2) मॅगनीज :- भारतातील महत्त्वाचे मॅगनीजचे साठे महाराष्ट्रात आहेत. या खनिजांचे नागपूर व भंडारा जिल्ह्यात विपुल साठे आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात काही प्रमाणात आढळून येतात. म्ॉगनिजचा उपयोग फेरोम्ॉगनिज, लोखंड व पोलाद उद्योगात तसेच ब्ॉटरी सेल उद्योगात केला जातो. राज्यातील म्ॉगनिजचे एकूण साठे 20.85 दशलक्षटन इतके आहेत.

(3) लोहखनिज :- राज्यातील महत्त्वाचे लोह खनिजांचे साठे चंद्रपूर, गडचिरोली व सिंधुदूर्ग जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रात लोह खनिजाचे अंदाजित साठे 360 दशलक्ष टन आहेत. लोह खनिजाचा उपयोग स्टील व स्पॉन्ज आयर्न उद्योगात कला जातो.

(4) चुनखडक :- चुनखडकाचे विपुल साठे राज्याच्या चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांत आढळतात. उच्च प्रतीच्या चुनखडकांच्या साठयाव्यतिरिक्त राज्यात बज्याच ठिकाणी कमी प्रतीचे चुनखडकाचे साठे आढळतात. राज्यात चुनखडकाचे अंदाजित साठे साठे 1,310 दशलक्षटन इतके आहेत. चुनखडकाचा उपयोग प्रामुख्याने सिमेंट तयार करण्याकरिता, लोह व पोलाद प्रकल्पात अकभवाह म्हणून तसेच इतर अनेक उद्योगात करण्यात येतो.

(5) डोलोमाईट :- डोलोमाईटचे साठे चंद्रपूर, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात आढळतात. डोलोमाईट अभिवाह म्हणून लोखंड व पोलाद उद्योगांत, कोळसा खाणीत भुकटी म्हणून तसेच शोभिवंत दगड म्हणून उपयोगात आणतात. डोलोमाईटचे महाराष्ट्रातील अंदाजित साठे 61.30 दशलक्षटन आहेत.

(6) कायनाईट-सिलीमनाईट :- राज्यातील कायनाईट व सिलीमनाईटचे साठे फक्त भंडारा जिल्ह्यात आढळतात. या खनिजांचा उपयोग धातुशास्त्रीय उद्योग, सिमेंट निर्मिती, काच निर्मिती इत्यादी उद्योगांमध्ये लागणाज्या उच्च प्रतीच्या उष्णता रोधक विटा तयार करण्याकरिता होतो. या खनिजांचे अंदाजित साठे 2.61 दशलक्षटन आहेत.

(7) बॉक्साईट :- प्रामुख्याने बॉक्साईट या खनिजापासून अॅल्युमिनियम धातूची निर्मिती होते आणि सिमेंट उद्योगातही याचा वापर करण्यात येतो. हे खनिज कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे व सातारा जिल्ह्यातील डोंगरमाथ्यावरील थरात आढळते. सदर कखनजांचे महाराष्ट्रतील अंदाजित साठे 112.951 दशलक्ष टन आहेत.

(8) सिलीका वाळू :- सिलीका वाळूचे साठे मुख्यत्चेकरून राज्यातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यात आढळतात. सिलीका वाळू ही ओतकामासाठी तसेच काचनिर्मितीसाठी वापरली जाते. सिलीका वाळूचे अंदाजित साठे 85.207 दशलक्ष टन आहेत.

(9) क्रोमाईट :- क्रोमाईट या खनिजाचा उपयोग मुख्यत्वेकरून धातुशास्त्रीय उद्योग, उष्णतारोधक वस्तु व रासायनिक उद्योगात केला जातो. या खनिजाचे साठे नागपूर, भंडारा, सिंधुदूर्ग व चंद्रपूर जिल्ह्यांत आढळतात. या खनिजांचे अंदाजित साठे 0.659 दशलक्ष टन आहेत.

(10) बेराईट :- हे खनिज चंद्रपूर जिल्ह्यांत आढळून येते. खनिजांचे अंदाजित साठे 0.1365 दशलक्ष टन आहेत. या खनिजाचा उपयोग मुख्यत्वेकरून तेल विहीरीच्या खोदकामात आणि पेंट उद्योगात केला जातो.

(11) तांबे :- नागपूर जिल्ह्यात तांबे हे खनिज पुलार, तांबेखाणी, कोलारी, इत्यादी ठिकाणी तसेच चंद्रपूर जिल्ह्यात अल्प प्रमाणात आढळून येते. खनिजांचे अंदाजित साठे 7.708 दशलक्ष टन आहेत.

(12) जस्त :- जस्तयुक्त खनिजे नागपूर जिल्ह्यातील तांबेखाणी, कोलारी, भवरी इत्यादी गावाचे परिसरात आढळून येत असून क्षेत्रात सुमारे 8.27 दशलक्षटन खनिज साठे अंदाजित करण्यात आले आहेत. जस्त या खनिजाचा उपयोग ग्ॉलव्हनायजिंग, ब्ॉटरी, अलॉय, रसायने, संरक्षण इत्यादी उद्योग क्षेत्रात करण्यात येते.

(13) टंगस्टन :- टंगस्टन खनिज नागपूर जिल्ह्यात आगरगाव, कुही, खोबना इत्यादी क्षेत्रात आढळून येत असून 19.98 दशलक्ष टन वुल्फ्रामाईट या टंगस्टनयुक्त खनिजाचे साठे अंदाजित करण्यात आले आहेत.

(14) फ्लोराईट :- फ्लोराईट खनिज चंद्रपूर जिल्ह्यात डोंगरगाव इत्यादी क्षेत्रात आढळून येत असून 0.1. दशलक्षटन साठे अंदाजित आहेत.

महाराष्ट्र राज्य भूगोल माहिती

महाराष्ट्र राज्य भूगोल माहिती

जिल्हे 36
जिल्हा परिषद 34
महानगरपालिका 27
नगर परिषद 241
नगरपंचायत 128
कटक मंडळे 7
क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर सर्वात मोठा जिल्हा
क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा.

कोयना धरण

•प्रवाह- कोयना नदी

•स्थान -कोयनानगर , पाटण, सातारा जिल्ह,महाराष्ट्र

•सरासरी वार्षिक पाऊस- ५००० मि.मी.

•लांबी -८०७.७२ मी

•उंची -१०३.०२ मी

•बांधकाम सुरू -१९५४-१९६७

•ओलिताखालील क्षेत्रफळ १२१०० हेक्टर

•जलाशयाची माहिती निर्मित जलाशय शिवसागर जलाशय

•क्षमता- २७९७.४ दशलक्ष घन कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण आहे

•धरणाची माहिती-
बांधण्याचा प्रकार : रबल काँक्रीट उंची : १०३.०२ मी

(महाराष्ट्रात सर्वात जास्त) लांबी : ८०७.७२ मी

दरवाजे प्रकार : S – आकार लांबी : ८८.७१ मी.

सर्वोच्च विसर्ग : ५४६५ घनमीटर / सेकंद

संख्या व आकार : ६, (१२.५० X ७.६२ मी)

पाणीसाठा क्षमता : २७९७.४ दशलक्ष घनमीटर

वापरण्यायोग्य क्षमता : २६७७.६ दशलक्ष घनमीटर

ओलिताखालील क्षेत्र :१२१०० हेक्टर

ओलिताखालील गावांची संख्या :९८ वीज उत्पादन [संपादन]

टप्पा १: जलप्रपाताची उंची : ४७५ मी. जास्तीतजास्त

विसर्ग : १६४ क्यूमेक्स निर्मिती क्षमता :२६० मेगा वॅट

विद्युत जनित्र : ४ X ६५मेगा वॅट [संपादन]

टप्पा २: जलप्रपाताची उंची : ४९० मी. जास्तीतजास्त

विसर्ग : १६४ क्यूमेक्स निर्मिती क्षमता :३०० मेगा वॅट

विद्युत जनित्र : ४ X ७५ मेगा वॅट [संपादन]

टप्पा ४:

जलप्रपाताची उंची : ४९६ मी.

जास्तीतजास्त विसर्ग : २६० क्यूमेक्स निर्मिती क्षमता :१००० मेगा वॅट

विद्युत जनित्र : ४ X २५०मेगा वॅट


दरवाजे प्रकार : S – आकार लांबी : ८८.७१ मी.


सर्वोच्च विसर्ग : ५४६५ घनमीटर / सेकंद


संख्या व आकार : ६, (१२.५० X ७.६२ मी)



शिवसागर जलाशय


कोयना धरणाचा जलाशय (पाणी साठा) हा शिवसागर या नावाने ओळखला जातो. हा जलाशय त्याच्या निसर्गसंपन्न परिसराकरिता परिचित आहे. जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला तापोळा नावाचे गाव आहे. तिथे कोयना, सोळशी आणि कांदोटा या नद्यांचा संगम आहे. त्या परिसरात बोटिंग व इतर पर्यटन सुविधा उपलब्ध आहेत. जलाशयाच्या काठाने कोयना अभयारण्य आहे.


पाणीसाठा- क्षमता : २७९७.४ दशलक्ष घनमीटर


वापरण्यायोग्य क्षमता : २६७७.६ दशलक्ष घनमीटर


ओलिताखालील क्षेत्र : १२१०० हेक्टर


ओलिताखालील गावे : ९८


वीज उत्पादन- टप्पा १: जलप्रपाताची उंची : ४७५ मी. जास्तीतजास्त


विसर्ग : १६४ क्यूमेक्स निर्मीती क्षमता : २६० मेगा वॅट


विद्युत जनित्र : ४ X ६५ मेगा वॅट


टप्पा २: जलप्रपाताची उंची : ४९० मी. जास्तीतजास्त


विसर्ग : १६४ क्यूमेक्स निर्मीती क्षमता : ३०० मेगा वॅट


विद्युत जनित्र : ४ X ७५ मेगा वॅट


टप्पा ४: जलप्रपाताची उंची : ४९६ मी. जास्तीतजास्त


विसर्ग : २६० क्यूमेक्स निर्मीती क्षमता : १००० मेगा वॅट


विद्युत जनित्र : ४ X २५० मेगा वॅट  


पंचगंगा नदी उगम-


प्रयाग संगम, चिखली, करवीर तालुका,कोल्हापूर.


मुख- नृसिंहवाडी (कृष्णा नदी)


लांबी- ८०.७ कि.मी. देश- महाराष्ट्र उ


पनद्या- कासारी , कुंभी , तुळशी , भोगावती या नदीस मिळते- कृष्णा नदी


पंचगंगा नदी पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी आहे. पाच उपनद्यांच्या संगमापासून तयार झाल्याच्या दंतकथेनुसार पंचगंगा असे नाव पडले आहे.


स्रोत-पंचगंगा नदी कोल्हापूर शहराच्या सीमेवरून वाहते, ती प्रयाग संगमावरून ( चिखली गाव, करवीर तालुका ) ती सुरू होते. कुंभी, कासारी, तुळशी, आणि भोगावती नद्यांच्या प्रवाहातून ती तयार होते.


स्थानिक दंतकथेनुसार गुप्त सरस्वती नदीही पंचगंगेला मिळते. यासंगमानंतर नदी कोल्हापूरच्या उत्तरेवर एक गाळाचे पठार तयार करते आणि पूर्वेकडे वाहत जाते


प्रवाह-


कोल्हापुरातून सुरू झालेली पंचगंगानदी जवळजवळ ५० किमी पूर्वेकडे इचलकरंजीकडून वाहत जाऊन कृष्णा नदीला कुरूंदवाड येथे मिळते.


या प्रवाहाला हातकणंगले येथे आळता टेकडीवरून कबनुरजवळ आणखी एक महत्त्वाचा प्रवाह मिळतो

संकीर्ण भूगोल

१]  सरोवरांचे शहर म्हणून ओळखले जाते.
उदयपूर

२]पश्चिम बंगालमधील सिंगनूर येथून ‘नॅनो’ कारचे उत्पादन गुजरात येथील मधील कोणत्या ठिकाणी हलविण्यात आले आहे.
सानंद

३] ‘मुर’ बेटावरून कोणत्या दोन देशांदरम्यान वाद चालू आहे ? भारत –
बांगलादेश

४]भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूंनी वेगवेगळ्या समुद्रांनी वेढलेला
आहे त्यास काय म्हणतात ?
भारतीय द्वीपकल्प

५] जगातील सर्वात मोठे नदीच्या पात्रातील बेट ‘माजोली’ हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे ?
ब्रह्मपुत्रा

६]‘नोकरेक’ जैविक आरक्षण क्षेत्र कोठे आहे ?
मेघालय

७]भारतातील प्रमुख अवकाशयान उड्डाण केंद्र कुठे आहे ?
श्रीहरीकोटा

८] कोणत्या नदीच्या प्रवाहात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते ?
कावेरी

९]जगातील सर्वात लांब धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे.
पेराना

१०] भारतातील सर्वात मोठा सिंचन कालवा कोणता ?
इंदिरा गांधी कालवा

११] कोणत्या प्रमुख पिकांच्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो?
आंबा, केळी, अंगूर,

१2] जगातील आंबा उत्पादनापैकी किती टक्के आंब्याचे उत्पादन भारतात होते.
३९ %

१३] जगात फुलगोबीच्या उत्पादनात भारतात प्रथम क्रमांक, कांद्याच्या उत्पादनात दुसरा तर पत्तागोबीच्या उत्पादनात कोणता क्रमांक लागतो.
तिसरा

१४] भारत …. यांच्या उत्पादनात व उपभोगत जगात प्रथम क्रमांकावर आहे.
काजू

१५] दुधाच्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक आहे तर अंड्याच्या उत्पदनात त्याचा जगात कितवा नंबर लागतो.
पाचवा

१६] कोंबड्यांना होणारा बर्ड फ्ल्यू म्हणजेच …… हा रोग आहे ?
एविअन एन्फ्ल्यूएंजा

१७] सध्या भारतात प्रतिदिन, प्रतिव्यक्ती दुधाची उपलब्धता किती आहे ?
२३१ ग्रॅम

१८] सध्या भारतात कोणत्या पाण्यातील मासेमारीचे प्रमाण सार्वधिक आहे ?
गोड्या पाण्यातील

१९] गोपनाथ सागर किनारा कोठे आहे ?
गुजरात

२०] पाचव्या आर्थिक गणनेनुसार सार्वधिक उद्योग कोणत्या राज्यात आहेत ?
तामिळनाडू ( ४४. ४७ लाख )
( दुसरा – महाराष्ट्र ४३.७५ लाख )