Wednesday 14 August 2019

♻️ महत्त्वाची माहिती नक्की वाचा

👇

कोयना धरण (महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण)

*कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण आहे.*

🔹 *धरणाची माहिती*
▪बांधण्याचा प्रकार : रबल काँक्रीट
▪उंची : १०३.०२ मी (महाराष्ट्रात सर्वात जास्त)
▪लांबी : ८०७.७२ मी
▪धरणाचा उद्देश------सिंचन, जलविद्युत*
▪अडवलेल्या नद्या/प्रवाह------कोयना नदी
▪स्थान------कोयनानगर, पाटण तालुका, सातारा जिल्हा, महाराष्ट्र
▪सरासरी वार्षिक पाऊस------५००० मि.मी.

🔹 *दरवाजे*
▪प्रकार: S - आकार
▪लांबी: ८८.७१ मी.
▪सर्वोच्च विसर्ग: ५४६५ घनमीटर / सेकंद
▪संख्या व आकार: ६, (१२.५० X ७.६२ मी)

🔹 *शिवसागर जलाशय*
*कोयना धरणाचा जलाशय (पाणी साठा) हा शिवसागर या नावाने ओळखला जातो. हा जलाशय त्याच्या निसर्गसंपन्न परिसराकरिता परिचित आहे. जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला तापोळा नावाचे गाव आहे. तिथे कोयना, सोळशी आणि कांदोटा या नद्यांचा संगम आहे. त्या परिसरात बोटिंग व इतर पर्यटन सुविधा उपलब्ध आहेत. जलाशयाच्या काठाने कोयना अभयारण्य आहे.*

🔹 *पाणीसाठा*
▪क्षमता : २७९७.४ दशलक्ष घनमीटर
▪वापरण्यायोग्य क्षमता : २६७७.६ दशलक्ष घनमीटर
▪ओलिताखालील क्षेत्र : १२१०० हेक्टर
▪ओलिताखालील गावे : ९८

🔹 *जलाशयाची माहिती*
▪निर्मित जलाशय------शिवसागर जलाशय
▪क्षमता------२७९७.४ दशलक्ष घनमीटर

No comments:

Post a Comment

Latest post

PRE- INDEPENDENCE ACTS

⭕️ चार्टर अ‍ॅक्ट 1773 - 🟢 बंगालचा गव्हर्नर-जनरल - 🟢 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना - 🟢 कंपनीच्या अधिकाऱ्यांसाठी खाजगी व्यापार प्रतिबंधि...