Friday 25 October 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 सराव प्रश्न

1) पुढील वाक्यातील ‘प्रयोग’ ओळखा. – ‘मांजर उंदिर पकडते.’

   1) कर्मणी    2) कर्तरी      3) भावे      4) संकर

उत्तर :- 2

2) ‘गजाननाच्या कृपेने कार्यसिध्दी होवो’ – या वाक्यातील सामासिक शब्द कोणता ?

   1) गजानन    2) कृपेने      3) कार्यसिध्दी    4) होवो

उत्तर :- 1

3) खालीलपैकी विरामचिन्हांचा योग्य वापर केलेले वाक्य ओळखा.

   1) याज्ञवल्क्य म्हणाले, “मैत्रेयी, गृहस्थाश्रमाचा त्याग करून मी आता वानप्रस्थाश्रमाची वाटचाल करणार आहे.”
   2) याज्ञवल्क्य म्हणाले : मैत्रेयी गृहस्थाश्रमाचा त्याग करून, मी आता वानप्रस्थाश्रमाची वाटचाल करणार आहे !
   3) याज्ञवलक्य म्हणाले, मैत्रेयी ! गृहस्थाश्रमाचा त्याग करून मी आता वानप्रस्थाश्रमाची वाटचाल करणार आहे ?
   4) याज्ञवल्क्य म्हणाले, “मैत्रेयी गृहस्थाश्रमाचा त्याग करून मी आता ; वानप्रस्थाश्रमाची वाटचाल करणार आहे.”

उत्तर :- 1

4) अलंकार ओळखा.

     येथे समस्त बहिरे बसतात लोक
     का भाषणे मधुर तू करिशी अनेक I
     हे मूर्ख यांस किमपीहि नसे विवेक
     रंगावरून तुजला गणतील काक II

   1) अप्रस्तुत प्रशंसा  2) उपमा      3) श्लेष      4) प्रतीप

उत्तर :- 1

5) तत्सम शब्द निवडा.

   1) धरती     2) पृथ्वी      3) जमीन      4) धरा

उत्तर :- 2

6) ‘जगाचे नियंत्रण करणारा’ या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय उपयोगात येतो?

   1) जगन्नायक    2) जगन्नियंता   
   3) जगन्नाथ    4) जगतकर्ता

उत्तर :- 2

7) खालीलपैकी अचूक शब्द निवडा.

   1) पारंपारिक    2) परंपारिक   
   3) पारंपरिक    4) पांरपरीक

उत्तर :- 3

8) पुढीलपैकी कोणते दोन वर्ण जोडाक्षरे आहेत ?

   1) ग, ध    2) ज, झ     
   3) प, फ    4) क्ष, ज्ञ

उत्तर :- 4

9) खाली दिलेल्या पर्यायी उत्तरांतील ‘पररूप संधी’ असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते ?

   1) करून    2) जाऊन   
   3) घेईल    4) होऊ

उत्तर :- 1

10) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

     गरीबांना, सर्वांनी मदत करणे आवश्यक आहे.
   1) नाम        2) विशेषण   
   3) उभयान्वयी अव्यय    4) केवलप्रयोगी

उत्तर :- 1

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...