Saturday 23 November 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 23/11/2019

1. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
मांसाहारी:वाघ::शाकाहारी:?

मांजर
मानव
कोल्हा
गाय
उत्तर : गाय

2. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
5 सप्टेंबर:शिक्षक दिन::26 जानेवारी:?

स्वातंत्र्य दिन
युवा दिन
प्रजासत्ताक दिन
बालिका दिन
उत्तर : प्रजासत्ताक दिन

3. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
18:90::7:?

40
60
35
49
उत्तर : 35

4. खालील शब्दांचे समानार्थी शब्द सांगा.
सोने

हेम
केसरी
रम्य
तर
उत्तर : हेम

5. 'वाढदिवस' या शब्दातील 'वा' या अक्षरापासून किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील?

एक
दोन
तीन
चार
उत्तर : चार

6. 'काका, तुम्हीही बसा आमच्याजवळ.' या वाक्यातील क्रियापद ओळखा.

तुम्हीही
काका
बसा
आमच्याजवळ
उत्तर : बसा

7. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.

पोलीस
धूसर
मुकुट
टिळा
उत्तर : टिळा

8. 'अष्टपैलू' - या शब्दाचा अर्थ.

आठ कलेत पारंगत
एका कलेत पारंगत
पैलू पाडणारा
सर्व कलांत पारंगत
उत्तर : सर्व कलांत पारंगत

9. खालील शब्दातील पुल्लिंगी शब्द ओळखा.

पाऊल
पिल्लू
घोडा
गाढव
उत्तर : घोडा

10. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा.

पिता
भ्राता
देवता
नेता
उत्तर : देवता

11. 'जनक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

जानकी
जननी
जनका
जनकी
उत्तर : जननी

12. अनेकवचणी असलेला शब्द शोधा.

गळा
शाळा
मळा
विळा
उत्तर : शाळा

13. एकवचनी असलेला शब्द शोधा.

तळे
मळे
डोळे
गोळे
उत्तर : तळे

14. 'उंदराला ----- साक्ष' ही म्हण पर्यायांपैकी योग्य शब्दाने पूर्ण करा.

मांजर
कुत्रा
पोपट
कावळा
उत्तर : मांजर

15. जमीनदोस्त होणे- या वाक्यप्रचाराचा अर्थ

प्रगती होणे
पूर्णपणे नष्ट होणे
जमीन हादरणे
मैत्री वाढणे
उत्तर : पूर्णपणे नष्ट होणे

16. 'मित्र' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

मैत्री
शत्रू
मैत्रीण
सूर्य
उत्तर : शत्रू

17. 'बिनभाड्याचे घर' या अलंकारिक शब्दाचा अर्थ.

शाळा
घराला भाडे नसणे
तुरुंग
मंदिर
उत्तर : तुरुंग

18. शब्दसमुहाबद्दल एक शब्द निवडा.
घोडे बांधण्यासाठी किल्यातील जागा.

तबेला
पागा
गोठा
घोडागृह
उत्तर : पागा

19. शब्द समुहाबद्दल एक शब्द निवडा.
सापाचा खेळ करणारा.

मदारी
जादूगार
दरवेशी
गारुडी
उत्तर : गारुडी

20. खालील शब्दांचे समानार्थी शब्द सांगा.
पाणी

अमृत
दूध
झरा
सलील
उत्तर : सलील

2 comments:

Latest post

पोलीस भरतीसाठी महत्वाचे 50 प्रश्न उत्तरे

1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ◾️  नाईल (4,132 मैल) 2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? ◾️ आशिया 3) जगातील सर्वात मोठा देश कोणता...