Tuesday 12 November 2019

भारतीयांच्या वापरात नसलेल्या स्विस खात्यांतील पैसा सरकारजमा..

🍀स्विस बँकेतील भारतीयांची अनेक खाती ही वापरात नसून त्यातील पडून असलेला पैसा आता स्वित्र्झलड सरकारकडे हस्तांतरित केला जाणार आहे.

🍀स्विस सरकारने बंद असलेल्या अशा खात्यांची यादी २०१५ मध्ये जाहीर केली होती.

🍀या खात्यांवर कुणीही दावा केलेला नाही.

🍀या खात्यांबाबत पुरावे देऊन ती चालू करण्याचा प्रस्ताव बँकेने दिला होता. त्यातील किमान १० खाती भारतीयांशी संबंधित आहेत.

🍀भारतीय निवासी, नागरिक, यांची ही खाती असून त्यातील काही ब्रिटिश काळातील आहेत.

🍀या दहाही खात्यांपैकी एकावरही कुणी सहा वर्षांत दावा केलेला नाही, असे स्विस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

🍀या खात्यांवर दावा करण्याचा कालावधी पुढील महिन्यात संपत आहे. काही खात्यांवर २०२० अखेपर्यंत दावा करता येणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

पोलीस भरतीसाठी महत्वाचे 50 प्रश्न उत्तरे

1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ◾️  नाईल (4,132 मैल) 2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? ◾️ आशिया 3) जगातील सर्वात मोठा देश कोणता...