Sunday 28 November 2021

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) पुढीलपैकी केवलप्रयोगी शब्द ओळखा.

   1) परंतु    2) शाबास   
   3) त्यासाठी    4) तेथे

उत्तर :- 2

2) ‘ला’ ख्यातावरून कोणता काळ ओळखला जातो ?

   1) वर्तमान    2) भूत     
   3) भविष्य    4) रीतिवर्तमान

उत्तर :- 2

3) खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर पुल्लिंग व स्त्रीलिंग अशा दोन्ही प्रकारे होतो ?

   1) बाग      2) वेळ     
   3) वीणा    4) सर्व

उत्तर :- 4

4) खालीलपैकी कोणत्या विभक्तीला उपपदार्थ नाही.

   अ) संबोधन      ब) व्दितीया   
   क) प्रथमा      ड) षष्ठी
   1) अ आणि ड    2) फक्त अ   
   3) ब आणि क    4) फक्त ब

उत्तर :- 4

5) खालील मिश्र वाक्याचे केवल वाक्य करा.

     “आपण अपराधी आहोत हे त्याने कबूल केले.”

   1) आपण अपराधी असल्याचे त्याने कबूल केले.    2) अपराध केला म्हणून तो कबूल झाला.
   3) त्याने आपला अपराध कबूल केला.      4) तो अपराध करून कबूलही झाला.

उत्तर :- 1

6) फळे गोड निघाली या वाक्यातील विधेय पूरक ओळखा.

   1) फळे      2) गोड फळे   
   3) गोड      4) निघाली

उत्तर :- 3

7) पुढील पर्यायातून ‘कर्मणी प्रयोग’ ओळखा.

   1) सुरेशने पुस्तक वाचले      2) सुरेश पुस्तक वाचतो
   3) सुरेशने पुस्तक वाचावे      4) सुरेशकडून पुस्तक वाचवले

उत्तर :- 1

8) ‘देशगत’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

   1) तृतीया तत्पुरुष    2) षष्ठी तत्पुरुष
   3) व्दितीया तत्पुरुष    4) सप्तमी तत्पुरुष

उत्तर :- 3

9) बापरे केवढा मोठा हा हत्ती ........................

   1) ?      2) !     
   3) -      4)  :

उत्तर :- 2

10) पुढीलपैकी ‘प्रत्ययघटित’ शब्द कोणता ?

   1) दिवाणखाना    2) दुर्जन     
   3) कटकट    4) चुळबुळ

उत्तर :- 1

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...