Saturday 7 March 2020

संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्नसंच

*11) खालील विधानातील ‘उद्देश्य’ कोणते ओळखा. ?*

     मला आपल्यासमोर चार शब्दांपेक्षा अधिक लांब भाषण करवत नाही.

1) *भाषण ☑*
2) समोर     
3) अधिक   
4) करवत नाही

*12) आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवावे हे ................ या प्रयोगातील वाक्य आहे. ?*

1) कर्मणी   
2) कर्तरी     
3) संकरित   
4) *भावे ☑*

*13) पुढील समास कोणत्या प्रकारचा आहे ?*

*– पुरणपोळी*

1) *मध्यमपदलोपी समास ☑*
2) तत्पुरुष समास 
3) अव्ययीभाव समास     
4) व्दंव्द समास

*14) वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ?*

1) अर्धविराम   
2) स्वल्पविराम   
3) संयोगचिन्ह   
4) *अपूर्णविराम ☑*

*15) ‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू’ ?*

     *या काव्य ओळीत कोणत्या अलंकाराचा उपयोग केला आहे ?*

1) उपमा   
2) रूपक     
3) *उत्प्रेक्षा ☑*
4) अनन्वय

*16) पुढीलपैकी ‘अभ्यस्त’ शब्द कोणता?*

1) दररोज   
2) रात्रंदिवस   
3) अभ्यास   
4) *यापैकी कोणताही नाही ☑*

*17) ‘ढळला रे ढळला दिन सख्या, संध्या भिवविती हदया’ या काव्यपंक्तीतील ‘दिन ढळला’ या शब्दसमूहाचा ध्वन्यार्थ सांगा. ?*

1) दिवस मावळला 
2) सूर्य बुडाला   
3) *आयुष्य संपत आले ☑*
4) दिवस संपला

*18) खालील शब्दांपैकी विसंगत शब्द कोणता ?*

1) वाट     
2) *पंथ ☑*
3) रस्ता     
4) पथ

*19) ‘नैसर्गिक’ या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडा. ?*

1) प्राकृतिक   
2) स्वाभाविक   
3) *कृत्रिम ☑*
4) सृष्टी

*20) ‘बादरायण संबंध असणे’ चा योग्य अर्थ निवडा. ?*

1) घनिष्ठ मैत्री असणे     
2) दुरान्वयाने संबंध असणे
3) *ओढून ताणून संबंध  लावणे  ☑*
4) शत्रूत्व असणे

*21) ‘नाकी नऊ येणे’ या वाक्प्रचाराचा योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून अचूक वाक्य निवडा. ?*

   1) *कर्जबाजारी झाल्याने संपतरावांच्या नाकी नऊ आले. ☑*
   2) आवडता पदार्थ मिळाल्यावर नाकी नऊ येतात.
   3) दोन मित्र खूप दिवसांनी भेटल्यावर नाकी नऊ येतात.
   4) उशिरा घरी आल्यावर नाकी नऊ आले.

*22) सामान्य लोकात अपवादाने आढळणारा सज्जन – या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. ?*

1) युगपुरुष   
2) युगप्रवर्तक   
3) लेखक   
4) *लोकोत्तर ☑*

*23) पुढील पर्यायातून व्याकरणदृष्टया योग्य शब्द लिहा. ?*

1) *व्यक्तीमत्व ☑*
2) व्यक्तीमहत्त्व   
3) व्यक्तिमत्त्व   
4) व्यक्तीमत्त्व

*24) रिकाम्या जागी योग्य शब्द वापरा – नाकातून स्पष्ट उच्चार होणा-या अक्षरावर ................... द्यावा. ?*

1) रफार   
2) उभादंड   
3) चंद्रबिंदू   
4) *अनुस्वार ☑*

*25) स्वर संधी म्हणजे ................ ?*

   1) जवळ जवळ येणा-या दोन वर्णांपैकी एक स्वर व दुसरा व्यंजन जोडणे.
   *2) एकमेकांशेजारी येणारे दोन स्वर जोडले जाणे. ☑*
   3) एकत्र येणा-या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन जोडला जाणे.
   4) एकत्र येणा-या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण स्वर जोडला जाणे.

*26) खालीलपैकी शब्दाची अविकारी जात ओळखा. ?*

1) नाम     
2) सर्वनाम   
3) विशेषण   
4) *उभयान्वयी अव्यय ☑*

*27) पुढील गटांतून ‘नामे’ ओळखा. ?*

1) मी, तू, हा     
2) *फूल, हरी, गोडी ☑*
3) बसतो, जाईल, खाईल   
4) गोड, कडू, दहा

*28) सर्वनामाचा प्रकार ओळखा – ‘जो’ ?*

1) पुरुषवाचक   
2) दर्शक सर्वनाम   
3) *संबंधी सर्वनाम ☑*
4) अनिश्चित सर्वनाम

*29) पुढील चार पर्यायातून विशेषणाचा प्रकार अचूक ओळखा. ?*

     *संख्याविशेषण*

1) *चौपट फळे ☑*  
2) आंबट आंबा   
3) तुझी वही   
4) वरचा मजला

*30) “शाब्बास ! तुमच्या संघाने आज अंतिम सामना जिंकला व ढालही मिळविली” – या वाक्यातील कर्म ओळखा. ?*

1) शाब्बास !   
2) *सामना व ढाल ☑*
3) संघाने     
4) अंतिम सामना

*💥..विषय : मराठी*

*31) ‘पाऊस सगळीकडे पडला बरं का’ क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा. ?*

1) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय     
2) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
3) *स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ☑*
4) परिणामदर्शक क्रियाविशेषण अव्यय

*32) शब्दयोगी अव्यये पुढीलपैकी कोणत्या शब्दजातीला जोडून येतात ?*

1) नाम     
2) क्रियापदे   
3) क्रियाविशेषणे   
4) *वरील सर्व पर्याय बरोबर  ☑*

*33) अधोरेखित शब्दाची जात ओळखा ?*

– *‘भयंकर वादळ सुटले आणि पत्रे उडून गेले.’*

1) गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय  
2) प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय
3) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय 
4) *समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय ☑*

*34) अबब ! या अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो. ?*

1) संमती   
2) *आश्चर्य ☑*
3) विरोध     
4) संबोधन

*35) ‘तो नेहमीच उशिरा येत असतो.’ या वाक्यातील काळ ओळखा. ?*

1) साधा वर्तमानकाळ   
2) रीती भविष्यकाळ
3) रीती भूतकाळ   
4) *रीती वर्तमानकाळ ☑*

*36) ‘वानर’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. ?*

1) माकड   
2) *वानरी ☑*
3) माकडीण   
4) बोका

*37) लाली – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. ?*

1) लाल्या   
2) लाले     
3) *लाली ☑*
4) लाल

*38) पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचे असलेले ‘विशेषणाचे सामान्यरूप’ होणारे विशेषण कोणते आहे ?*

1) गरीब   
2) *भला ☑*
3) लोकरी   
4) खेळू

*39) ‘पोपट पेरू खातो’ या वाक्यातील कर्म कोणत्या विभक्तीत आहे. ?*

1) तृतीयान्त   
2) चतुर्थ्यन्त   
3) व्दितीयान्त   
4) *प्रथमान्त ☑*

*40) तुमच्या परीक्षा कधी सुरू होणार ? – ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?*

1) विध्यर्थी   
2) *प्रश्नार्थी ☑*
3) उद्गारार्थी   
4) विधानार्थी

*💥 विषय : मराठी*

*41) ‘पिवळी गाय दूध देते’ या वाक्यातील उद्देश्य ओळखा.?*

1) *गाय ☑*
2) पिवळी   
3) दूध     
4) देते

*42) प्रयोग ओळखा ?*

– *“तो बैल बांधतो” हे या प्रयोगातील वाक्य होय.*

1) *कर्तरी प्रयोग ☑*
2) भावे प्रयोग   
3) कर्मणी प्रयोग   
4) संकीर्ण प्रयोग

*43) वैकल्पिक व्दंव्द समासाचे उदाहरण ओळखा.?*

1) मीठभाकर   
2) गजानन   
3) *पापपुण्य ☑*
4) यापैकी कोणताच पर्याय नाही

*44) यातील कोणते विरामचिन्ह अपसारण चिन्ह आहे ?*

1) .     
2)  ?     
3) “     “     
4) *– ☑*

*45) ‘उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन आले असता ............... अलंकार होतो.’ ?*

1) *व्यतिरेक ☑*
2) अपन्हुती   
3) अनन्वय   
4) श्लेष

*46) खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे ?*

1) तंबाखू   
2) *किल्ली ☑*
3) दादर     
4) हापूस

*47) शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू-पदार्थ डोळयासमोर येतो. ही ती शब्दशक्ती म्हणजे – ?*

1) लक्षणा   
2) व्यंजना   
3) निरूढा   
4) *अभिधा ☑*

*48) ‘पती’ या शब्दाच्या समानार्थी शब्द पुढील पर्यायातून निवडा : ?*

1) प्रियकर   
2) *भ्रतार ☑*
3) जिवलग   
4) सखा

*49) ‘फिकट’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा. ?*

1) फुकट   
2) बिकट     
3) *गडद ☑*
4) चिक

*50) ‘ज्याच्या अंगी सामर्थ्य आहे तो इतरांवर अंमल गाजवतो’ – या आशयासाठी पुढील कोणती म्हण योग्य आहे ?*

1) पाचामुखी परमेश्वर     
2) गाव करील ते राव काय करील
3) दिव्या खाली अंधार     
4) *बळी तो कान पिळी ☑*

*77. खालीलपैकी अंशाभ्यस्त शब्द ओळखा . ?*

1) बडबड
2) कडकड
3) *लटपट ☑*
4) कटकट

*78. ' वारुणी ' म्हणजे काय ?*

1) *दारू ☑*
2) घोडी
3) हवा
4) पुरुष

*79. म्हण पूर्ण करा . ?*

' जळत्या घराचा .....वासा .'

1) जळता
2) *पोळता ☑*
3) पळता
4) मिळता

*80. प्रयोग ओळखा.?*

' तू पैलवानाला पाडलेस .

1) कर्तरी
2) कर्मणी
3) *कर्तृ- भाव संकर ☑*
4) भावे

*81. खालील सामासिक शब्दाचा समास ओळखा . ?*

' म्हाळसाकांत '

1) अव्ययीभाव
2) *विभक्ती तत्पुरूष ☑*
3) द्वंद्व
4) कर्मधारय

*82. खालीलपैकी परवर्ण कोणता ?*

1) ऋ
2) लृ
3) अं
4) *ल् ☑*

*83. खालील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?*

*' परीक्षेत मोठी पोस्ट मिळावी म्हणून त्याने गावाला रामराम ठोकला .'*

1) संकेतबोधक
2) समूच्चयबोधक
3) *उद्देशबोधक ☑*
4) परिणामबोधक

*84. ' नदी ' या शब्दाचे सामान्यरूप खालीलपैकी कोणते प्रत्यय लागून होतो?*

1) या
2) ऎ
3) *चा ☑*
4) आ

*85. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा . ?*

1) पुरुषवाचक सर्वनामे - मी , आम्ही , आपण , स्वतः
2) दर्शक सर्वनामे - हा , ही , हे .
3) *संबंधी सर्वनामे - तो , ती , ते .☑*
4) प्रश्नार्थी सर्वनामे - कोण , काय

*81) खालील गाळलेल्या जागी (वाक्यात) योग्य वाक्यप्रकार लिहा. ?*

     *‘लहान मुलांच्या भांडणात मोठया माणसांनी विनाकारण ................... कटाक्षाने टाळावे.’*

1) वडयाचे तेल वांग्यावर काढणे    
2) *वर्दळीवर येणे ☑*
3) येळकोट करणे       
4) रागाच्या आहारी जाणे

*82) ‘भीतीपोटी प्रत्येक गोष्टीस नकार घंटा वाजविणार घाबरट मनुष्य’ – या वाक्यबंधासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा. ?*

1) शुक्राचार्य   
2) शिराळशेट   
3) *रडतराऊत ☑*
4) पाताळयंत्री

*83) पुढील पर्यायातून अचूक शब्द ओळखा. ?*

1) *चतुष्पाद ☑*
2) चतु:ष्पाद   
3) चतु:पाद   
4) चतुश्पाद

*84) अनुनासिकाला काय म्हणतात ?*

1) *अनुस्वार ☑*
2) शब्द     
3) व्यंजन   
4) विशेषण

*85) ‘मन्वंतर’ या जोड शब्दाची संधी करा. ?*

1) मन + अंतर   
2) मन्व + अंतर   
3) *मनु + अंतर ☑*
4) मन व अंतर

*86) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. ?*

    ‘वानर’ वडावर चढले.

1) भाववाचक   
2) विशेषनाम   
3) *सामान्यनाम ☑*
4) धातुसाधित नाम

*87) ‘काही लक्षात येत नाही’ अधोरेखित शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखा. ?-*

1) आत्मवाचक   
2) *अनिश्चयवाचक ☑*
3) प्रश्नार्थक   
4) संबंधी

*88) जे शब्द क्रियापदाची व नामाची विशेष माहिती सांगतात त्यांना ................ म्हणतात. ?*

1) शब्दयोगी अव्यये 
2) उभयान्वयी अव्यये 
3) *विशेषणे ☑*
4) शब्दसिध्दी

*89) ‘सांजावले’, ‘मळमळते’, ‘उजाडले’ हे शब्द क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहेत ?*

1) संयुक्त क्रियापदे 
2) *भावकर्तृक क्रियापदे ☑*
3) धातुसाधित क्रियापदे 
4) सकर्मक क्रियापदे

*90) अचूक वाक्य ओळखा. ?*

   1) सर्वच क्रियाविशेषणे अव्यय असतात.
   2) *काही क्रियाविशेषणे विकारीही असतात. ☑*
   3) क्रियाविशेषणे ही एकाक्षरी नसतात.
   4) क्रियाविशेषणे ही क्रियेच्या कर्त्याविषयी माहिती देतात.

*91) पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यये व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय नाही?*

1) विनी   
2) खेरीज   
3) *देखील ☑*
4) निराळा

*92) अधोरेखित शब्दाची जात ओळखा. –*

*‘कांगारू म्हणून एक सस्तन प्राणी आहे.’ ?*

1) *स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय ☑*
2) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
3) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय  4) उद्देश्यबोधक उभयान्वयी अव्यय

*93) ठीक ! या अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो. ?*

1) *प्रशंसा ☑*
2) विरोध     
3) आश्चर्य   
4) यापैकी नाही

*94) ‘मी निबंध लिहीत असतो.’ या ‍विधानातील काळाचा प्रकार कोणता ?*

1) साधा वर्तमानकाळ     
2) अपूर्ण वर्तमानकाळ
3) पूर्ण वर्तमानकाळ     
4) *रीती वर्तमानकाळ ☑*

*95) ‘वाघ’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. ?*

1) वाघिण   
2) वाघिन   
3) वाघ्रीन   
4) *वाघीण ☑*

*96) ‘तो शाळेत पायी गेला’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा. ?*

1) कर्ता   
2) अपादान   
3) *करण ☑*
4) अधिकरण

*97) ‘सर्वांनी सकाळी लवकर उठावे’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?*

1) संकेतार्थी   
2) स्वार्थी   
3) आज्ञार्थी   
4) *विध्यर्थी ☑*

*98) खालील विधानातील उद्देश्यविस्तार स्पष्ट करणारा शब्द ओळखा. ?*

     *‘शिवाजीचा भाऊ व्यंकोजी तंजावरास गेला.’*

1) व्यंकोजी   
2) शिवाजी   
3) *शिवाजीचा भाऊ ☑*
4) तंजावरास

*99)  ‘शिपायाकडून चोर धरला गेला.’ हे या प्रयोगातील वाक्य होय. ?*

1) भावे   
2) *कर्मकर्तरी ☑*
3) कर्तृकर्तरी   
4) कर्मणी

*100) ‘पुरणपोळी’ या शब्दाचा अर्थ ?*

1) *पुरण भरलेली पोळी ☑*
2) पुरणाची पोळी
3) पुरण आणि पोळी     
4) गूळ घालून केलेली पोळी

*101) एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरता?*

1) पूर्णविराम   
2) अर्धविराम   
3) *स्वल्पविराम ☑*
4) अपूर्ण विराम

*102) ‘सरडयाची धाव कुंपणापर्यंत’ – या वाक्यातील अलंकार ओळखा. ?*

1) *अन्योक्ती ☑*
2) चेतनगुणोक्ती   
3) स्वभावोक्ती   
4) अतिशयोक्ती

*103) ‘धातुसाधित’ यास दुसरे नाव कोणते ?*

1) शुध्द शब्दयोगी 
2) शब्द सिध्दी   
3) उभयविध धातू   
4) *कृदंत ☑*

*104) घडयाळाने पाच वाजल्याचे दर्शविले’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. ?*

1) अभिधा    
2) लक्षणा   
3) लाक्षणिक   
4) *व्यंजना ☑*

*105) ‘गाय’ शब्दाशी संबंधित नसलेला शब्द ओळखा : ?*

1) धेनू     
2) गोमाता   
3) गो     
4) *Go ☑*

*106) ‘वाघ्या’ या शब्दाच्या विरुध्दलिंगी शब्द ओळखा. ?*

1) वाघीण   
2) वाघी     
3) *मुरळी ☑*
4) मुरळीण

*107) “खाई त्याला खवखवे” या म्हणीशी अर्थाच्या दृष्टीने जास्तीत जास्त जुळणारी म्हण निवडा. ?*

1) *चोराच्या मनात चांदणे ☑*
2) उथळ पाण्याला खळखळाट फार
3) नाचता येईना अंगण वाकडे   
4) करावे तसे भरावे

*108) ‘दुर्लक्ष करणे’ या अर्थाचा खालीलपैकी वाक्प्रचार कोणता ?*

1) कान टोचणे     
2) *कानाडोळा करणे ☑*
3) कानात तेल घालून झोपणे 
4) कानाला खडा लावणे

*109) ‘ज्याला आई, वडिल नाहीत असा असलेला’ या शब्दसमुहासाठी योग्य पर्याय निवडा. ?*

1) सनाथ   
2) दुबळा     
3) *पोरका ☑*
4) वनवासी

*110) व्याकरणाच्या नियमानुसार बरोबर शब्द कोणता, ते लिहा. ?*

1) दु:दैवी   
2) दुदैवी     
3) *दुर्दैवी ☑*
4) दुर्वेवी

*111) पुढील वाक्यातील रिकामी जागा अचूक पर्यायाने भरा. ?*

     शब्दाच्या अक्षरांमधील शेवटच्या अक्षराला .............. म्हणतात.

1) *अन्त्य अक्षर ☑*
2) आद्य अक्षर   
3) उपान्त्य अक्षर   
4) उपान्त्यर्पू अक्षर

*112) ‘वाडमय’ या शब्दातील संधी सोडवा. ?*

1) वाग् + मय   
2) वाक् + अमय   
3) *वाक् + मय ☑*
4) वांग + मय

*113) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.?*

     “नुसती हुशारी काय कामाची ?”

1) विशेषण   
2) *गुणधर्मदर्शक भाववाचक नाम ☑*
3) सामान्य नाम   
4) विशेषनाम

*114) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. ?*

    ‘कुठे आहे तो भामटा ? तो बघा पळाला’

1) *दर्शक सर्वनाम ☑*
2) संबंध सर्वनाम   
3) आत्मवाचक सर्वनाम 
4) सामान्य सर्वनाम

*115) पुढील शब्दापासून विशेषण कशाप्रकारे तयार होईल ते चार पर्यायातून निवडा. –?*

नागपूर .............

1) नागपूरकर   
2) संत्री     
3) *नागपूरी ☑*
4) मोसंबी

*116) ‘मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला’ – या वाक्यातील कर्ता ओळखा. ?*

1) मी   
2) संकष्टी चतुर्थी   
3) *चंद्र ☑*
4) दिसणे

*117) खालील अधोरेखित शब्दाला क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. ?*

     ‘पाणी गटागट पिऊ नकोस’

1) परिणाम दर्शक क्रियाविशेषण अव्यय   
2) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
3) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय   
4) *रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ☑*

*118) शब्दयोगी अव्यये वाक्यात स्वतंत्रपणे येतात तशी विभक्तीप्रत्ययेही स्वतंत्रपणे येऊ शकतात. उत्तरांचा योग्य पर्याय सांगा. ?*

1) हे संपूर्ण विधान चूक आहे     
2) *विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे ☑*
3) विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे 
4) हे संपूर्ण विधान बरोबर आहे

*119) अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – ‘आम्ही जाऊ नाहीतर राहू, तुला काय त्याचे  ?’*

1) प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय 
2) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
3) *विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय ☑*
4) उद्देश्यबोधक उभयान्वयी अव्यय

*120) उंहू ! या अव्ययातून खालीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो. ?*

1) *विरोध ☑*
2) तिरस्कार
3) शोक   
4) यापैकी नाही

*121) ‘सुरेखा चित्र काढत असे’ – काळ ओळखा.?*

1) साधा भूतकाळ   
2) *रीती भूतकाळ ☑*
3) अपूर्ण भूतकाळ 
4) पूर्ण भूतकाळ

*122) ‘सुतार’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.?*

1) भ्रतार     
2) *सुतारीण ☑*
3) लोहार   
4) होलार

*123) सोने – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.?*

1) सोन्य     
2) सोनं     
3) *सोने ☑*
4) सोनी

*124) पुढील विधाने वाचा. ?*

   अ) ईकारान्त पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप याकारान्त होते.
   ब) ऊ – कारान्त पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप वाकारान्त होते.
   क) ओकारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप ओकारान्तच राहते.

1) अ व ब बरोबर   
2) ब व क बरोबर   
3) अ बरोबर   
4) *सर्व बरोबर ☑*

*125) कोणताही प्रत्यय न लागलेल्या पदाची विभक्ती कोणती मानतात ?*

1) षष्ठी       
2) संबोधन   
3) *प्रथमा ☑*
4) तृतीया

*126) ‘तु फार चतुर आहेस’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?*

1) आज्ञार्थी   
2) उद्गारार्थी   
3) *विधानार्थी ☑*
4) प्रश्नार्थी

*127) ‘विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला.’ या वाक्यातील ‘अंत’ या शब्दाला वाक्य पृथक्करणात .............. म्हणतात. ?*

1) *उद्देश्य ☑*
2) उद्देश्य विस्तार   
3) क्रियापद   
4) विधानपूरक

*128) रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा : भावे प्रयोगात क्रियापद नेहमी ............. असते. ?*

1) *नपुंसकलिंगी ☑*
2) पुल्लिंगी   
3) स्त्रीलिंगी   
4) अनेकलिंगी

*129) अव्ययीभाव समासात  ....?*

1) *पहिले पद महत्त्वाचे असते ☑*
2) दुसरे पद महत्त्वाचे असते
3) दोन्ही पदे महत्त्वाची असतात   
4) दोन्ही पदांनी सूचित केलेले वेगळेच पद महत्त्वाचे असते

*130) वाक्‍यातून जिज्ञासा, कुतूहल, जाणून घेणे असा अर्थ विचारला जात असेल तर .............. हे विरामचिन्ह वापरतात. ?*

1) पूर्णविराम   
2) *प्रश्नचिन्ह ☑*
3) उद्गारचिन्ह   
4) विचारचिन्हविराम

*131) ‘सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी’ – अलंकार ओळखा. ?*

1) उत्प्रेक्षा   
2) *उपमा ☑*
3) रूपक     
4) यमक

*132) खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत रूढ झाला आहे ?*

1) पेशवा   
2) *पाव ☑*
3) पावडर   
4) पाकीट

*133) रस व त्याचे स्थायीभाव यांच्या जोडया लावा. ?*

   अ) शांत    i) जुगुप्सा
   ब) अद्भुत    ii) उत्साह
   क) वीर    iii) शम
   ड) बीभत्स    iv) विस्मय

  अ  ब  क  ड
         1)  i  iii  iv  ii
         2)  *iii  iv  ii  i ☑*
         3)  i  ii  iii  iv
         4)  iv  i  ii  iii

*134) वेगळा शब्द ओळखा. ?*

1) ग्रंथ     
2) पोथी     
3) पुस्तक   
4) *पिशवी ☑*

*135) ‘मोहन नीताला तिच्या परीक्ष बोलला होता’ या वाक्यातील ‘परीक्ष’ शब्दाच्या विरुध्द असणारा शब्द निवडा. ?*

1) उपकार   
2) *अपरोक्ष ☑*
3) परिधान   
4) उपेक्षित

*136) घटना प्रसंगासाठी साजेशी म्हण शोधा. ?*

     ‘एखादी गोष्ट खूप वेळा चर्चिली गेली की तिचे महत्त्व कमी होते.’

1) *फार झाले हसू आले ☑*
2) नव्याचे नऊ दिवस
3) नवी विटी नवे राज्य   
4) नाव मोठे लक्षण खोटे

*137) ‘खांदेपालट करणे’ हा वाक्यप्रयोग पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे ?*

1) *अन्त्ययात्रा ☑*
2) डाव     
3) घटका     
4) दंड

*138) ‘सहा महिन्यांतून एकदा प्रसिध्द होणारे’ या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी कोणता शब्द आहे ते ओळखा. ?*

1) मासिक   
2) दैनिक     
3) सामासिक   
4) *षण्मासिक ☑*

*139) पुढील पर्यायांपैकी कोणता शब्द शुध्द लेखनाच्या दृष्टीने योग्य आहे ते ओळखा. ?*

1) *षष्ठयब्दिपूर्ती ☑*
2) षष्टयब्दिपूर्ति   
3) षष्टयब्दीपूर्ती   
4) षष्टयब्दिपुर्ति

*140) मूर्धन्य वर्णाचा गट ओळखा.?*

   1) त्, थ्, द्, ध्, न्‍ 
2) *ट्, ठ्, ड्, ढ्, ण्‍  ☑* 
3) प्, फ्, ब्, भ्, म्‍   
4) च्, छ्, ज्, झ्, म्

*81) थरथर, चुरचुर, खळखळ, सळसळ, ओरड, पीक – हे शब्द कोणते धातू आहेत ?*

1) कृतिवाचक धातू   
2) *अकर्मक धातू ☑*
3) उभयविध क्रियापदे   
4) सकर्मक क्रियापदे

*82) खालील वाक्य हे कोणत्या ‘स्थानिक क्रियाविशेषणाचे’ उदाहरण आहे. ?*

     *‘ती काय माती गाते !’*

1) विशेषण     
2) नाम     
3) *कृदंत ☑*
4) उभयान्वयी अव्यय

*83) दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ?*

    *‘आज्ञेबरहुकूम’*

1) हेतुवाचक     
2) *योग्यतावाचक ☑*
3) संबंधवाचक     
4) भागवाचक

*84) मधूला गोरी नि शिकलेली वधू पाहिजे या वाक्यातील ‘नि’ हे अव्यय कोणते ?*

1) विकल्प बोधक   
2) *समुच्चय बोधक ☑*
3) परिणाम बोधक     
4) न्युनत्व बोधक

*85) काल म्हणे मुलांनी गडबड केली. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार सांगा. ?*

1) संबोधनदर्शक     
2) *व्यर्थ उद्गारवाची ☑*
3) संमती दर्शक     
4) यापैकी नाही

*86) जेव्हा वर्तमान काळाबरोबर क्रिया करण्याचा हेतू समजतो तेव्हा  तो .............. वर्तमानकाळ होतो. ?*

1) पूर्ण वर्तमानकाळ   
2) रीती वर्तमानकाळ
3) अपूर्ण वर्तमानकाळ   
4) *उद्देश वर्तमानकाळ ☑*

*87) पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. ?*

   अ) अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप आ – कारांत होते.

   ब) अकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात ए – कारांत होते.

1) केवळ अ बरोबर   
2) केवळ ब बरोबर   
3) *अ आणि ब बरोबर ☑*
4) अ आणि ब चूक

*88) खालीलपैकी अनेक वचनी नामे ओळखा. ?*

अ) रोमांच     
ब) हाल     
क) शहारे       
ड) डोहाळे

1) फक्त क आणि ड   
2) फक्त अ, क आणि ड 
3) *वरील सर्व ☑*
4) फक्त अ आणि ब

*89) कर्मणी प्रयोगात कर्म हे ..................... विभक्तीत असते. ?*

1) *प्रथमा ☑*
2) व्दितीया  
3) तृतीया     
4) चतुर्थी

*90) ‘माणूस जातो. त्याची कीर्ति मागे उरते.’ या वाक्याचे संयुक्त वाक्य कसे होईल ?*

1) *माणूस गेला तरी त्याची कीर्ति मागे उरते ☑*
2) माणूस जातो. कीर्ति उरते
3) कीर्ति उरली, माणूस उरला       
4) यापैकी काहीही नाही

*91) पुढील वाक्यातील उद्देश्य विस्तार कोणता?*

     *‘बाभळीच्या काटेदार फांद्यांनी ती गाडी शिगोशिग भरली होती.’*

1) ती गाडी   
2) शिगोशिग   
3) भरली होती   
4) *बाभळीच्या काटेदार फांद्यांनी ☑*

*92) ‘आजी दृष्ट काढते’ वाक्यातील प्रयोग ओळखा. ?*

1) कर्मणी प्रयोग   
2) *कर्तरी प्रयोग ☑*
3) भावे प्रयोग   
4) शक्यकर्मणी प्रयोग

*93) ‘चक्रपाणी’ या सामासिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा. ?*

1) मध्यमपद लोपी समास     
2) समाहार व्दंव्द
3) इतरेतर व्दंव्द       
4) *कोणताही नाही ☑*

*94) विरामचिन्हांचा वापर करताना ‘संयोगचिन्हाचा वापर करण्यात येतो.’ ?*

अ) दोन शब्द जोडताना       
ब) संबोधनाकरिता वापर केला जातो
क) दुस-याचे मत अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी  
ड) ओळीच्या शेवटी शब्द अपूरा राहिल्यास

1) ब बरोबर   
2) ब, ड बरोबर   
3) क     
4) *अ, ड बरोबर ☑*

*95) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ! (अलंकार ओळखा.) ?*

1) श्लेष अलंकार   
2) यमक अलंकार   
3) अतिशयोक्ती अलंकार 
4) *उपमा अलंकार ☑*

*96) सिध्द शब्द ओळखा. ?*

1) येऊन   
2) *ये ☑*
3) येवो     
4) येणार

*97) ‘चला पानावर बसा’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. ?*

1) व्यागार्थ   
2) *लक्षार्थ ☑*
3) वाच्यार्थ   
4) संकेतार्थ

*98) ‘पाणी’ या शब्दाच्या समानार्थी शब्द शोधा : ?*

1) जल      ***
2) *जलद ☑*
3) ढग     
4) क्षार

*99) ‘अवरोहण’ या शब्दाला विरुध्दार्थी शब्द निवडा. ?*

1) उन्नत   
2) अवनत   
3) *आरोहण ☑*
4) प्रारंभ

*100) ‘फायदा असेपर्यंत सारे गोळा होतात.’ –*

*हा अर्थ स्पष्ट करणारी योग्य म्हण निवडा. ?*

1) *हात ओला तर मित्र भला ☑*
2) मूल होईना सवत साहीना
3) मनास मानेल तोच सौदा   
4) फुले वेचली तेथे गोव-या वेचू नये

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ युनायटेड नेशन्स ट्रेड अँड डेव्हलपमेंट (UNCTAD ) च्या अहवालानुसार  2023 मध्ये भारतात थेट परकीय गुंतवणुकीत 15 व्या स्थानावर आहे ◾️2023 मध...