Thursday 9 December 2021

रक्तवाहिन्या

● धमन्या (Arteries)

- हृदयाकडून ऑक्सिजनयुक्त रक्ताचे वहन करतात. अपवाद – फुफ्फुसधमनी (Pulmonary Artery) भित्तिका जाड असून कमी लवचिक असतात.
- शरीरात खोलवर स्थित असतात व झडपा नसतात.
- रक्तदाब खूप जास्त म्हणजेच 100 mm Hg एवढा असतो.
- महाधमनी – धमन्या – धमनिका

● शिरा (Veins)

- उतींकडून कार्बन डायॉकसाईड युक्त रक्ताचे वहन हृदयाकडे करतात. अपवाद – फुफ्फुसशिरा (Pulmonary Veins) भित्तिका पातळ असून जास्त लवचिक असतात.
- शरीरात त्वचेखाली स्थित असतात व झडपा असतात.
- रक्तदाब खूप कमी म्हणजेच 2 mm Hg एवढा असतो.
- महाशिरा -शिरा – शिरिका

● केशिका (Capillaries)

- धमनिका आणि शिरिका यांच्या पेशीतील जाळ्याला केशिका असे म्हणतात.
- केशिका अत्यंत बारीक, एकस्तरीय असून भित्तिका पातळ असतात.
- केशिकांमुळे पेशींमध्ये पोषद्रव्ये, ऑक्सिजन,कार्बन डायॉकसाईड, विकरे, संप्रेरके तसेच टाकाऊ पदार्थांची देवाण – घेवाण घडून येते

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 15 एप्रिल 2024

◆ नवीन शिक्षण धोरणानुसार नव्या पद्धतीने शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडवण्यासाठी प्रेरणा उत्सवाची सुरुवात वडनगर गुजरात येथून करण्यात येणा...