Saturday 10 June 2023

तलाठी

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम -७ (३) नुसार प्रत्येक सज्जाकरिता एक किंवा अधिक तलाठी नेमण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतो.

तलाठी हा महसूल खात्याचा वर्ग -३ चा कर्मचारी असून तो गावस्तरावरील अतिशय महत्वाचा घटक मानला जातो.

– भारतामध्ये सर्वप्रथम १९१८ साली कोल्हापूर संस्थानिकांमध्ये राजश्री शाहू महाराजांनी कुलकर्णी वतने रद्द करून तलाठी हे पद निर्माण केले.

– तलाठी यांच्या कार्यालयास सज्जा असे म्हणतात.

– १ ऑगस्ट ते ३१ जुलै हे महाराष्ट्राचे महसूल वर्ष आहे.

पात्रता                 तो व्यक्ती पदवीधर असावा.

                         तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा

निवड             -     जिल्हा निवड समितीद्वारे

नेमणूक         -      जिल्हाधिकारी

दर्जा              -     वर्ग – ३चा कर्मचारी

कार्यक्षेत्रे         -     गाव ( सज्जा )

वेतन श्रेणी       -       ५२०० ते २०,८०० अधिक ग्रेड पे – २४०० रु.

नियंत्रण        -          मंडळ अधिकारी  व तहसीलदार

राजीनामा           -   जिल्हाधिकारी

बडतर्फी          -       जिल्हाधिकारी

1 comment:

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...