Sunday 20 December 2020

जीवनसत्त्व अ


» याचे रासायनिक नाव रेटिनॉल आहे. 

» ते घन स्वरूपातील अल्कोहॉल असून पिवळे असते. 

» लालसर व पिवळ्या फळांत अ जीवनसत्त्व जास्त प्रमाणात असते. 

» शार्क, हॅलिबट, ट्यूना, सील, व्हेल, ध्रुवीय अस्वले यांच्या यकृतात विपुल असते. 

» माशांच्या यकृतापासून काढलेल्या तेलातून ते मिळविता येते. 

» दूध व दुधापासून मिळविलेली साय, लोणी व तूप तसेच पालक, कोथिंबीर, मका, सुरण, रताळी, टोमॅटो, गाजर, लाल भोपळा, पपई व आंबा यांत ते भरपूर प्रमाणात असते. 

» प्राणिज तेलात अ जीवनसत्त्व रेटिनॉल व डीहायड्रोरेटिनॉल या स्वरूपात आढळते. 

» वनस्पतिज पदार्थात ते कॅरोटीन या रंजकद्रव्य स्वरूपात असते. 

» कॅरोटीन हे अ जीवनसत्त्वाचे पूर्वगामी आहे. शरीरात त्याचे रूपांतर रेटिनॉलमध्ये होते. 

» प्रौढ व्यक्तीला रोज ९०० मायक्रोग्रॅम अ जीवनसत्त्व लागते.

» अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे स्पष्ट दिसत नाही व रातांधळेपणा येतो. 

» या जीवनसत्त्वाचे अतिसेवन विषाक्त होते. त्यामुळे यकृत आणि प्लीहेची अतिरिक्त वाढ होते तसेच त्वचा कोरडी होऊन डोके, भुवया व पापण्यांचे केस गळून पडतात.

No comments:

Post a Comment

Latest post

वनस्पतींचे वर्गीकरण

##  मुख्य प्रकार दोन  : अ) अबीजपत्री (Cryptogamae) ब)  बीजपत्री  ( Phanerogame) --------------=========--------------- अ) अबीजपत्री (Cr...