Saturday 19 December 2020

भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2020.


🔰यंदाचा 6 वा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF-2020) CSIR- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट स्टडीज (NISTADS) या संस्थेच्या पुढाकाराने आयोजित केला जाणार आहे.


🔰विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR), भूविज्ञान मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि जैवतंत्रज्ञान विभाग यांनी संयुक्तपणे या विज्ञान महोत्सवाचे आयोजन केले आहे.


🔴ठळक बाबी....


🔰महोत्सव 22 डिसेंबर 2020 रोजी सुरू होणार आणि 25 डिसेंबर 2020 रोजी जगातले प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन आणि देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी महोत्सवाची सांगता होणार.


🔰IISF 2020 ची संकल्पना: “आत्मनिर्भर भारत आणि जागतिक कल्याणासाठी विज्ञान" (सायन्स फॉर सेल्फ रिलायंट इंडिया अँड ग्लोबल वेलफेअर).


🔰भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, चर्चा आणि वादविवादाचे अनोखे मिश्रण असून विविध प्रात्यक्षिकांसह तज्ञांशी संवाद आणि वैज्ञानिक नाट्य, संगीत आणि कविता वाचन अश्या विविध कार्यक्रमांचा यात समावेश आहे. IISF-2020 यात 41 कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


🔴पार्श्वभूमी....


🔰भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) देशातली सगळ्यात मोठी तंत्रज्ञान आणि औद्योगिक प्रदर्शनी आहे. हा कार्यक्रम भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्यावतीने आयोजित केला जातो. महोत्सव जनसामान्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार करण्यासाठी तसेच युवा वैज्ञानिकांना आपले अनुभव आणि ज्ञान वाटण्यासाठी आणि महत्त्वाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...