Sunday 20 December 2020

पहिली पंचवार्षिक योजना


>> कालावधी: इ.स. १९५१ - इ.स. १९५६

>> अध्यक्ष: पं.जवाहरलाला नेहरु.

>> अग्रक्रम: कृषी विकास

>> प्रतिमान: हेरॉल्ड-डोमर


पहिल्या योजना काळात सार्वजनिक क्षेत्रात २०६९ कोटी रु. खर्च करण्याचे ठरविले , तरी प्रत्यक्षात मात्र १९६० कोटी रु. दुसऱ्या महायुद्धाचे झालेले परिणाम व नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली


◆◆◆◆ प्रकल्प ◆◆◆◆


१. दामोदर खोरे विकास योजना (झारखंड-पश्चिम बंगाल)

>>  २. भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेश-पंजाब)

>> ३. कोसी प्रकल्प (कोसी नदी बिहार) 

>>४. हिराकूड योजना (महानदीवर ओरिसा)

>> ५. सिंद्री (झारखंड) खत कारखाना 

>> ६. चित्तरंजन (पश्चिम बंगाल) येथे रेल्वे इंजिनचा कारखाना. 

>> ७. पेरांबुर (तामिळनाडू) येथे रेल्वे डब्यांचा कारखाना. 

>> ८. HMT- बँगलोर 

>> ९. हिंदुस्थान एंटीबायोटिक


◆ महत्वपूर्ण घटना : - 

१. औद्योगिक विकास व नियमन अधिनियम १९५१ लागू. 


२. community development programme 1952 


३. अखिल भारतीय हातमाग बोर्ड (१९५२) आणि अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग बोर्ड (१९५३) स्थापना. 


४. १९५५ मध्ये गोरवाल समितीच्या शिफारशीनु इम्पिरियल बँकेचे रुपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये करण्यात आले. 


५. भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ (१९५५)


◆ मूल्यमापन : 


योजना सर्व बाबतीत यशस्वी झाली. अन्न धान्याचे उत्पादन ५२.२ दशलक्ष टनावरून (१९५१-५२) ६५.८ दशलक्ष टनापर्यंत (१९५५-५६) वाढले. आर्थिक वाढीचा दर २.१% (संकल्पित) ३.६% (साध्य) राष्ट्रीय उत्पन्न १८ टक्क्यांनी तर दरडोही उत्पन्न ११ टक्क्यांनी वाढले. तसेच किंमतीचा निर्देशांक १३ टक्क्यांनी कमी झाला. 

 पाच तंत्रज्ञान संस्था स्थापन करण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...