Thursday 31 December 2020

‘सहायक-एनजी’: विमानातून सोडता येऊ शकणारी मालवाहू पेटीभारतीय नौदलाने संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या सहकार्याने तयार केलेल्या ‘सहायक-एनजी’ या विमानातून खाली सोडता येऊ शकणाऱ्या स्वदेशी मालवाहू पेटीची (container) पहिली चाचणी यशस्वीपणे पार पाडली.


ठळक बाबी


भारतीय नौदलाची रसद आणि इतर सामुग्री वाहून नेण्याची क्षमता वाढविण्यासाठी अश्या पेट्या तयार करण्यात आलेल्या आहेत. पेट्यांमधून संकटकाळात गरजेच्या अभियांत्रिकी सामानाचे वहन कशा पद्धतीने करता येणार, याबाबत संशोधन करण्यात आले आहे.


भारतीय नौदलाच्या विमानातून गोव्याच्या सागरी प्रदेशात पेट्या खाली सोडण्यात आल्या होत्या. गोव्यापासून 2000 किलोमीटर अंतरावर तैनात जहाजांना काही अभियांत्रिकी साधनसामुग्री पुरविण्याचा प्रयोग करण्यात आला.


अश्या सुविधेमुळे आवश्यकतेच्यावेळी जहाजांना सामुग्री, सामानाचे सुटे भाग घेण्यासाठी किनाऱ्यापर्यंत यावे लागणार नाही.


‘सहायक-एनजी’ची आधुनिक आवृत्ती ‘सहायक एमके 1’ तयार करण्यात आली आहे. या नवीन आवृत्तीमध्ये GPS म्हणजेच वैश्विक स्थान प्रणालीच्या मदतीने हवेतून पेटी खाली सोडण्यात येतात. या पेटीची वहन क्षमता 50 किलो वजन एवढी आहे. विमानातून ही पेटी नियोजित स्थानी खाली सोडता येते.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना

👉 1. महंमद गझनवी :- अकराव्या शतकापासून भारतावर तुर्काची आक्रमणे होण्यास सुरुवात झाली. गझनीचा तुर्क सत्ताधीश सबक्तगीन याने भारतावर स्वार्‍या...