Monday 3 July 2023

औरंगाबाद प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर)

·         औरंगाबाद विभागाचे प्रादेशिक नाव काय? - मराठवाडा. 


·         मराठवाडा विभागाचे मुख्यालय कोठे आहे? - औरंगाबाद. 


·         लातूर जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? - उस्मानाबाद. 


·         जालना पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? - औरंगाबाद. 


·         महाराष्ट्रातील कोणत्या विभागात जंगले सर्वात कमी आहेत? - मराठवाडा. 


·         गवताळा औटरामघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद-जळगाव. 


·         औरंगाबाद जिल्ह्यातील वनोद्यान कोणते? - अजिंठा. 


·         जायकवाडी उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद. 


·         हिमायतबाग उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद. 


·         विष्णुपुरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? - नांदेड. 


·         गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? - पैठण-औरंगाबाद. 


·         जायकवाडी जलाशयाचे नाव काय? - नाथसागर. 


·         जायकवाडी योजना स्टेज-1 कोणत्या जिल्हयासाठी आहे? - औरंगाबाद, अहमदनगर, बीड, परभणी, नांदेड. 


·         महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्प कोणत्या उद्देशाने हाती घेण्यात आला? - कोरडवाहू जमीन ओलीताखाली आणणे. 


·         बोरांसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? - राहुरी व औरंगाबाद. 


·         महाराष्ट्रातील ज्वारीचे उत्पादन कोणत्या भागात जास्त होते? - मराठवाडा. 


·         महाराष्ट्रातील मराठवाडा भागातून इतर ठिकाणी लोक स्थलांतर होण्याचे कारण काय? - कोरडा दुष्काळ. 


·         जायकवाडी जलविद्युत केंद्र कोठे आहे? - पैठण, औरंगाबाद. 


·         गोदावरी नदीवरील जलविद्युत प्रकल्पास कोणत्या देशाचे साह्य लाभले आहे? - जपान. 


·         हिमरुशाली साठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? - औरंगाबाद. 


·         गुजराती फेटे तयार केले जाणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? - पैठण. 


·         महाराष्ट्रातील औद्योगिकदुष्ट्या अविकसित भाग कोणता? - मराठवाडा. 


·         शिखांचे दहावे धर्मगुरु गुरुगोविंद सिंग यांची समाधी कोठे आहे? - नांदेड. 


·         दक्षिणेची काशी म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते? - पैठण. 


·         पैठण हे कोणत्या संताची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते व तेथे कोणत्या संताचा जन्म झाला होता? - संत एकनाथ. 


·         औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? - हिंगोली. 


·         घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद. 


·         शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे ठिकाण कोणते? - नांदेड. 


·         परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणता जिल्ह्यात आहे? - बीड. 


·         खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? - लातूर. 


·         अंबेजोगाई कोणत्या जिल्ह्यात आहे? - बीड. 


·         तेर कोणत्या जिल्ह्यात आहे? - उस्मानाबाद. 


·         पितळखोरा बौद्ध लेणी कोणत्या आहे? - औरंगाबाद. 


·         धाराशिव ही जैन व हिंदू लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? - उस्मानाबाद. 


·         वेरूळची बौद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद. 


·         अखंड शिल्पातले कैलास मंदिर कोठे आहे? - औरंगाबाद. 


·         वेरूळ अजिंठा कशासाठी प्रसिद्ध आहे? - शिल्पकला. 


·         महाराष्ट्रातील शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला भाग कोणता? - मराठवाडा. 


·         मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? - 1972. 


·         वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टि. (वाल्मी) कोठे आहे? - औरंगाबाद. 


·         श्री. शिवाजी महाराजाचे कुलदैवत भवानी मातेचे मंदिर कोठे आहे? - तुळजापूर (उस्मानाबाद). 


·         महानुभव पंथाचे महत्वाचे केंद्र कोठे आहे? - नांदेड. 


·         कवि मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे? - अंबेजोगाई. 


·         मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख कोठे सापडला? - अक्षी. 


·         दौलताबाद जवळील देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद. 


·         प्रादेशिक वस्तु संग्रहालय कोठे आहे? - उस्मानाबाद.


·         महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या सर्वाधिक मागासलेला भाग कोणता? - मराठवाडा.


·         भारुडे लोकप्रिय करणारे संत कोण? - एकनाथ. 


·         शिखांच्या ग्रंथ साहित्यामध्ये कोणत्या संताचे वाण्ड्मय समाविष्ठ आहे? - नामदेव. 


·         प्रवारा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? - गोदावरी. 


·         बालाघाट डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? - बीड. 


·         मराठवाड्यातील प्रमुख कापड निर्मिती केंद्र कोणते आहे? - औरंगाबाद. 


·         देवगिरीचा (दौलताबादचा) किल्ला कोणत्या डोंगरात आहे? - अजंठा रांगा. 


·         गोदावरी व भीमा नदीना वेगळे करणारी रांग कोणती? - हरिषचंद्र-बालाघाट. 


·         बालाघाट व अजंठा रांगांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहे? - गोदावरी. 


·         महाराष्ट्रात अत्यल्प खनिजे कोणता भागात मिळतात? - मराठवाडा.

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ आईस्क्रीम मॅन ऑफ इंडिया' रघुनंदन कामथ यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन ◾️नॅचरल्स आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे ...