Thursday 2 February 2023

१८५७ च्या उठावाची ठिकाणे* दिल्ली - मीरत पासून दिल्ली ३० मैल अंतरावर आहे. ते अंतर काटून बंडवाले शिपाई दुसऱ्या दिवशी दिल्लीस आले. बहादुरशहा यास सिंहासनावर बसवून त्याची राजवट सुरु झाल्याची घोषणा त्यांना करावयाची होती. बादशहा हा नावाचाच बादशहा बनला होता. २४ तासात दिल्ली बंडवाल्यांच्या हाती आली. कालपर्यंत गुलाम असलेला बहादुरशहा त्यांनी हिंदूस्थानचा सम्राट बनवला. वास्तविक उत्तर हिंदुस्तानातील वेळची इंग्रजांची अवस्था मोठी नाजूक होती. परंतु इंग्रजांनी पंजाब वगैरे प्रदेशातून दिल्ली कडे फौजा गोळा केल्या. दिल्ली म्हणजे हिंदुस्तानची पूर्वापारची राजधानी आणि ती आपण काबीज केली. असा इंग्रजांचा अंदाज होता.


* प्रसिद्ध इतिहासकार थॉमसन व गरेट म्हणतात ' बंडाचा प्रारंभ तर यशस्वी झाला, पण उत्तर हिंदुस्तानातील इंग्रजांच्या नाजूक अवस्थेचा फायदा उठवणारा एकही कार्यक्षम नेता बंडवाल्याजवळ नव्हता हे लवकरच स्पष्ट झाले. १५ सप्टेंबर १८५७ रोजी इंग्रज व बंडवाले यांच्यातील लढाईस तोंड फुटले. बंडवाल्यांनी इंग्रजी फौजांशी १० दिवस घेतले.


* कानपूर - कानपूर शहराचा विकास कंपनीच्या कारकिर्दीत झाला होता. कानपूर येथे इंग्रजी कंपनीच्या छावण्या असत. जवळच ब्राम्हवर्त येथे मराठ्यांचा पदच्युत पेशवा दुसरा बाजीराव याचे निवासस्थान होते. मृत्यूपूर्वी त्याने धोंडोपंत उर्फ नानासाहेब याला दत्तक घेतले. पण बाजीरावानंतर त्यास मिळणारा आठ लाखाचा तनखा, छोटी जहागीर, व पदव्या नानासाहेबास बहाल करण्यास इंग्रजी राज्यकर्त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे नानासाहेबाच्या हृदयात सुडाच्या अग्नी धुमसत होत्या पण इंग्रजांच्या सामर्थ्यापुढे तूर्त त्याने नमते घेतले होते. आता सूड उगवण्याची आयती संधी चालून आली होती.


* १ जुलै रोजी नानासाहेब पेशवा बनल्याचा व कंपनी राज्य नष्ट झाल्याचा जाहीरनामा काढण्यात आला. परंतु कानपूर हातातून गेल्याचे कळताच इंग्रजांनी तिकडे फौजा पाठविल्या होत्या. आणि या फौजांचा पराभव केल्याशिवाय नानासाहेबाची कानपूरमधील नवी राजवट सुरक्षित राहणार नव्हती. इंग्रज फौजा कानपुरावर नवी राजवट सुरक्षित राहणार नव्हती. इंग्रज फौजा कानपूरावर येण्यापुर्वीच नानासाहेबाने फौजेनिशी कूच करून त्याच्याशी लढाई दिली. पण नानासाहेब यांचा पराभव झाला.


* पुढे सैन्याची जमवाजमव करून नानासाहेब व त्याचा सेनापती तात्या टोपे यांनी कानपुरवर चाल केली व पुन्हा ताब्यात घेतले. त्यानंतर ६ डिसेंबर १८५७ ला पळ काढावा लागला.


१८५७ च्या उठावाचे परिणाम 


* कंपनीची राजवट बरखास्त झाली : स १८५७ चा कायदा - रेग्युलेटिंग अक्ट हा कायदा इंग्लिश पार्लमेंटने पास केल्यापासून सरकारचे कंपनीच्या कारभारावरील कंपनीच्या कारभारावरील नियंत्रण वाढतच गेले होते.सरकारने १८५७ साली खास कायदा मंजूर करून कंपनीची राजवट बरखास्त केली व तेथून पुढे हिंदुस्तानात इंग्लंडच्या राणीची राजवट सुरु झाल्याचे घोषित करण्यात आला. कंपनीचे सर्व भूदल व आरमार राणी सरकारकडे घेण्यात आले. राणीच्या वतीने हिंदुस्तानचा व्हाईसराय हा हिंदुस्तान सरकारचा कारभार पाहणार होता. पूर्वीची बोर्ड ऑफ कंट्रोल व बोर्ड ऑफ डायरेक्टर हि मंडळे बरखास्त करून त्यांच्या जागी भारत मंत्री आणि त्यांचे मंडळ [ The secretary of state in council ] हा भारतमंत्री पार्लमेंटचा व ब्रिटीश मंत्रिमंडळाचा सभासद असे.


* राणीचा जाहीरनामा : राज्यकर्त्यांचे उदार धोरण - १८५७ च्या उठवातून इंग्रज राज्यकर्त्यांनी अनेक धडे घेतले. हिंदुस्तानातील असंतोषाची तीव्र जाणीव त्यांना उठावाने झाली. त्यामुळे त्यांनी हिंदुस्तान विषयक आपले धोरण बदलले. हे  धोरण १ नोव्हेंबर १८५८ रोजी अलाहाबाद येथे दरबार भरवून व तेथे दरबार भरवून व तेथे राणीचा जाहीरनामा घोषित करून स्पस्ष्ट केले. राणीचा जाहीरनामा असा - [ आम्ही आता राज्यवृद्धीच्या उद्योगाला हात घालणार नाही, देशी संस्थानिकांचे हक्क, मानमरातब आणि प्रतिष्ठा यांचा आमच्याप्रमाणे मान राखू, त्यांनी व आमच्या प्रजेने समृद्धीत राहावे अशीच आमची इच्छा आहे. अंतर्गत शांतता व चांगले सरकार यामुळेच हिंदुस्तानात सामाजिक प्रगती घडून येईल. तसेच आम्ही जाहीर करतो की, देशी संस्थानिकांचे कंपनीशी जे करारदार झाले असतील ते येथून आम्ही पाळू. संस्थानिकांना आपल्या इच्छेनुसार दत्तक घेता येईल. त्यांची राज्ये विलीन केली जाणार नाहीत. धर्मासाठी कोणावर कृपा व अन्याय केला जाणार नाही. सरकार धर्माच्या बाबतीत ढवळाढवळ करणार नाही. सरकारी नोकऱ्या लायकी पाहून दिल्या जातील. धर्म, वर्ग, किंवा जात त्यांच्या मार्गात येणार नाहीत.


* हिंदी लष्कराची पुनरचना करण्यात आली - १८५७ चा उठाव प्रथम हिंदी लष्करात झाला, त्यामुळे इंग्रजांनी या लष्कराची पुनरचना करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले.


* संस्थानांसंबंधीच्या आक्रमक धोरणाचा त्याग


* इंग्रजांचे सामाजिक सुधारनासंबंधीचे धोरण बदलले


* इंग्रजी राजवटीबद्दल दहशत व तिरस्कार


 * उठवपासून हिंदी लोकांनी घेतलेला धडा


* हिंदू मुसलमानमधील दरी वाढत गेली


* हिंदूस्थानचे परराष्ट्रीय धोरण इंग्लंडशी बद्ध झाले


* इंग्रजांची हिंदुस्तानवरील पकड घट्ट झाली

No comments:

Post a Comment

Latest post

हिमालयातील 8000 मी.उंचीपेक्षा जास्त उंची असणारी शिखरे..

-----------------======---------------------- शिखर               उंची(मी)             स्थान ---------------------------------------------...