Tuesday 26 April 2022

भारतातील उद्योग धंदे

भारतातील उद्योग धंदे


भारतातील काही प्रमुख उद्योग व विकास
महत्वाचे मुद्दे
भारतातील काही प्रमुख उद्योग व विकास
सूती वस्त्र उद्योग
लोकरी वस्त्रोद्योग
साखर उद्योग
ताग उद्योग
रेशीम उद्योग
लोह पोलाद उद्योग
उद्योग


सूती वस्त्र उद्योग
           उद्योग – सूती वस्त्र उद्योग हा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग आहे. भारतातील पहिली कापड गिरणी कावसजी नाना भाय दावर यांनी २२ फेब्रुवारी १८५४ रोजी मुंबई येथे सुरू केली. देशातील पहिली कापड गिरणी फोर्ट ग्लास्टर येथे सुरू झाली. पण ती कापड गिरणी तात्काळ बंद पडली. सूती वस्त्र उद्योग याचा वाटा राष्ट्रीय औद्योगिक उत्पादनात १४ टक्के आहे. मुंबई, मालेगाव, इचलकरंजी ही शहरे सुती वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध आहेत.

लोकरी वस्त्रोद्योग
            लोकरी वस्तू उद्योग साठी कानपूर येथील “लाल ईमली” हि देशातील पहिली लोकर गिरण सुरू झाली. यानंतर १८८१ मध्ये धारीवाल पंजाब, १८८२ मुंबई आणि १८८६ मध्ये बंगलोर कर्नाटक येथेही लोकर गिरण्या सुरू झाल्या. पंजाब मधील धारीवाल अमृतसर लुधियाना खरार येते २५७ लोकर गिरण्या आहेत आणि त्याचा उत्पादनात पहिला क्रमांक लागतो. महाराष्ट्र मध्ये मुंबई येथे ३१ आहेत आणि त्याचा उत्पादनात दुसरा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशामध्ये कानपूर, शहाजहानपूर, मिर्झापूर, आग्रा, वाराणसी येते लोकरीचे ३७ गिरण्या आहेत आणि त्याचा तिसरा क्रमांक लागतो. त्यानंतर गुजरातमध्ये जामनगर, अहमदाबाद, बडोदा, कलोल येथे १० गिरण्या आहेत आणि त्याचा चौथा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलिया, इटली व UK मधून आयात केलेल्या लोकरीपासून महाराष्ट्रात वस्त्रे तयार केली जातात.

साखर उद्योग
            सागर हा उसाच्या कच्च्या मालापासून तयार होतो. साखर उद्योग हा कृषी-आधारित देशातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उद्योग आहे. उत्तर प्रदेश हे उसासाठी सर्वाधिक क्षेत्र आहे. भारत हा जगातील ऊस व साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र मध्ये साखर उत्पादनात प्रथम क्रमांक आहे. आणि उत्तर प्रदेशाचा दुसरा क्रमांक आहे. महाराष्ट्र मधील अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, पुणे या जिल्ह्यात ३५ टक्के साखर उत्पादन तयार होते. आणि उत्तर प्रदेशामध्ये गोरखपूर, देवडीया, मेरट, सहारनपुर २४ टक्के साखर उत्पादन तयार होते. तामिळनाडूमध्ये कोईमतुर, तिरुचिरापल्ली, करुर, तिरुप्पुर येथे साखर उत्पादन ९.५३ टक्के होते. आंध्र प्रदेशामध्ये पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, कृष्णा, चित्तूर येथे ५.८ टक्के साखर उत्पादन होते. गुजरात मध्ये सुरत, भावनगर,अमरेली, बनासकांठा, जुनागढ येथे ५.५६ टक्के साखर उत्पादन होते. भारत जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश असे ओळखले जाते. १०० टन उसापासून १० ते १२ टन साखर मिळते.

ताग उद्योग
          ताग उद्योग हा सुती वस्त्रोद्योग यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा वस्त्रोद्योग आहे. १८५५ साली कोलकत्ता जवळ रिश्रा याठिकाणी भारतातील पहिली ताग गिरणी सुरू झाली. तागाचे उपयोग दोर आणि यासारख्या अनेक उत्पादनासाठी केला जातो. पश्चिम बंगाल मधील कोलकात्ता, हावडा, टिटाघर, बालीगंज, नैहाती, भद्रेश्वर येथे ६४ ताग गिरण्या आहेत आणि त्याचा उपयोग ८४% होतो. त्यानंतर आंध्र प्रदेशामध्ये गुंटूर विशाखापट्टणम एलूरू ओंगोल चिलीवेसला येथे सात ताग गिरण्या आहेत त्याचा दुसरा क्रमांक लागतो व तेथे तागाचा उत्पादन १० टक्के केला जातो. देशांमधील एकूण ८३ ताग गिरण्या आहेत. ताक उत्पादक विकास महामंडळाकडून ताग उद्योगाचे व्यवस्थापन केले जाते. ताग उत्पादनात पश्चिम बंगाल हे राज्य देशात आघाडीवर आहे.

रेशीम उद्योग
            रेशीम उद्योग हे शेतीस पूरक व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन यासारखाच त्यातला एक रेशीम उद्योग आहे. रेशीम उद्योगामध्ये कमी वेळेत जास्त उत्पादन मिळते. भारतात रेशीम उद्योगांमध्ये टसर एरी मुग तुती या चार प्रकारचे रेशीम उत्पादन केले जाते. रेशीम उत्पादनात जगामध्ये चीनचा प्रथम क्रमांक लागतो तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. रेशीम उत्पादनात कर्नाटक हे अग्रेसर राज्य आहे.

रेशीम उद्योग हे कर्नाटक मध्ये कूर्ग, म्हैसूर, मंड्या, तुमकुर येते तुतीचे उत्पादन केले जाते. या शहरांमध्ये ५०% रेशीम उत्पादन केले जाते. पश्चिम बंगाल मध्ये बीरभूम, मालदा, मुर्शिदाबाद, बांकुरा येथे तुती प्रकारचे उत्पादन घेतात आणि तेथे रेशीम उद्योगाचा उत्पादन १३ टक्के होतो. स्वतंत्र रेशीम संचालनालयाची स्थापना महाराष्ट्र मधील नागपूर येथे करण्यात आली. रेशीम उद्योगामध्ये बंगळुरू हे भारतातील रेशमाची राजधानी म्हणून ओळखले जाते. आसाम मधील रेशीम उद्योगासाठी सोलकूची हे प्रमुख केंद्र आहे.

लोह पोलाद उद्योग
               लोह पोलाद उद्योग हे महत्त्वाचे मिश्रधातू आहे. लोह पोलाद उद्योग अवजड स्वरूपामुळे त्याचे स्थानिकीकरण कोळसा क्षेत्राजवळ करतात. लोह पोलाद हे झारखंड मधील जमशेदपूर बोकारो रांची येथे त्यांचा प्रकल्प आहे.. पश्चिम बंगाल मध्ये दुर्गापुर असंनसोल कुल्टी बर्नपुर येथे लोगो पोलादाचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

देशातील लोह पोलाद उद्योग यांचे व्यवस्थापन स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत पाहिले जाते. पश्चिम बंगालमधील फुलती येते भारतातील पहिला आधुनिक लोह पोलाद कारखाना १८६४ साली सुरू झाला. भारताचा पोलाद उत्पादनात चौथा क्रमांक लागतो. जमशेदपूर येथे खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठा लोह पोलाद उद्योग सुरू करण्यात आला. लोखंड व कार्बन यांच्या मिश्र धातूंना लोह पोलाद असे म्हणतात. पोलाद हा बीडा पासून तयार करतात.

No comments:

Post a Comment

Latest post

....𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....

◾️2024 विस्डेन क्रिकेटर्स ऑफ द इयर रिपोर्ट प्रकाशित ◾️रिपोर्ट नुसार जगातील सर्वाधिक आघाडीचे क्रिकेटपटू ⭐️पुरुष : पॅट कमिन्स (Australia) ...