११ जून २०२३

लक्षात ठेवा

 🔸१) रियासतकार सरदेसाई हे १८५७ च्या उठावास 'भारतीय जनतेत धुमसत असलेल्या असतोषाचा स्फोट' असे मानतात, तर महाराष्ट्रातीलच दुसरे एक विचारवंत न. र. फाटक है या उठावास केवळ .... असे संबोधतात.

- 'शिपाई गर्दी'


🔹२) 'विद्यार्थी, शेतकरी व मध्यमवर्गीयांचा उठाव' या शब्दांत १८५७ च्या उठावाचे वर्णन कोणी केले आहे?

- डॉ. अंबिका प्रसाद


🔸३) सन १८५८ च्या कायद्यामुळे (राणीच्या जाहीरनाम्यामुळे) लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला 'व्हाइसरॉय' झाला. तर पहिला 'भारतमंत्री' होण्याचा मान .... यास मिळाला.

- लॉर्ड स्टॅन्ले


🔹४) 'कोलकाता ते अलाहाबाद' हा लोहमार्ग .... या व्हाइसरॉयच्या कारकिर्दीत तयार झाला.

- लॉर्ड कॅनिंग


🔸५) ब्रिटिश पार्लमेंटने इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हीस 'कैसर-इ-हिंद' ही पदवी दिली. व्हाइसरॉय लॉर्ड लिटनने १ जानेवारी, १८७७ रोजी भारतात मोठा दरबार भरवून ही पदवी घोषित केली. हा दरबार कोठे भरला होता ?

- दिल्ली


🔸१) 'तलावांचा जिल्हा' ही उपाधी कोणत्याही एकाच जिल्ह्यास द्यावयाची झाल्यास ती .... जिल्ह्यास द्यावी

लागेल.

- गोंदिया


🔹२) नर्मदा प्रकल्पामधील सहभागी राज्ये ....

- महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात


🔸३) 'धुळे' शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे?

- पांझरा


🔹४) महाराष्ट्राला शिसे आणि जस्त मिळवून देणारा जिल्हा .... 

- नागपूर


🔸५) 'ताडोबा' व 'असोलामेंढा' ही धरणे ..... या जिल्ह्यात आहेत.  

- चंद्रपूर


🔸१) मॅडम ब्लाव्हट्स्की व हेन्री स्टील ऑलकॉट यांनी इ. स. १८७५ मध्ये न्यूयॉर्क येथे 'थिऑसॉफिकल सोसायटी' या संस्थेची स्थापना केली. या संस्थेची शाखा मुंबई येथे सुरू झाली ....

- इ. स. १८७९


🔹२) इ. स. १८९८ मध्ये बनारस येथे 'हिंदू विद्यालया'ची स्थापना केली....

- अॅनी बेझंट


🔸३) .... हे विवेकानंदांचे गुरू होत.

- रामकृष्ण परमहंस


🔹४) .... यांच्या प्रयत्नांचे फलित म्हणूनच इ. स. १८७२ मध्ये बालविवाहाला आळा घालणारा 'सिव्हिल मॅरज अॅक्ट' संमत झाला.

- ईश्वरचंद्र विद्यासागर


🔸५) स्त्रियांची गुलामी नष्ट झाली पाहिजे या विचाराच्या .... या मुस्लीम समाजसुधारकाने विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुस्लीम समाजाला आधुनिक पाश्चात्य संस्कृतीचे महत्त्व समजावून सांगण्याचे कार्य केले..

- मौलवी चिरागअली


🔸१) लष्करामध्ये दक्षिण आघाडी (Southern Command) व उत्तर आघाडी (Northern Command) असे दोन विभाग पाडून .... याने लष्कर अधिक सुसज्ज बनविले.

- लॉर्ड किचनेर


🔹२) एकूणच भारतीय राजकारणावर व भारताच्या भवितव्यावर दूरगामी परिणाम घडवून आणणारी कर्झनच्या कारकिर्दीतील सर्वांत महत्त्वाची घटना ....

- १९०५ मधील बंगालची फाळणी


🔸३) कर्झनने केलेली बंगालची फाळणी पुढे १९११ मध्ये .... याच्या कारकिर्दीत रद्द केली गेली.

- लॉर्ड हार्डिंग्ज


🔹४) १२ डिसेंबर, १९११ रोजी दिल्ली येथे भव्य दरबार भरवून बंगालची फाळणी* रद्द केल्याची घोषणा केली गेली. ही घोषणा कोणी केली ?

- ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज


🔸 ५) इ. स. १८३५ मध्ये मुद्रण स्वातंत्र्यावरील बंदी उठविणाऱ्या .... या ब्रिटिश गव्हर्नर जनरलला 'मुद्रण स्वातंत्र्याचा उद्गाता' म्हणून गौरविले जाते.

- चार्ल्स मेटकाफ


🔸१) फक्त .... हा खंड वाळवंटाशिवाय आहे किंवा त्या खंडात कोणतेही वाळवंट नाही. 

- युरोप


🔹२) .... हे ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर होय. 

- माऊंट कॉशिस्को (२,२२८ मी.)


🔸३) एटना हा इटलीतील जागृत ज्वालामुखी कोणत्या बेटावर आहे ?

- सिसिली


🔹४) नदीपात्रातील खडकांच्या जोडांमध्ये दगड-गोटे आढळले आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे हे दगड -गोटे एकाच ठिकाणी वर्तुळाकार दिशेने फिरत आहेत. कालांतराने येथे तयार होणाऱ्या भूरूपास काय म्हणाल?

- कुंभगर्त किंवा रांजणखळगा


🔸५) लोएस मैदान हे भूरूप वाऱ्याच्या ...... कार्यामुळे तयार होते.

- निक्षेपण


🔸१) कल्याणकारी राज्य ही आदर्श कल्पना भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या भागात नमूद आहे? 

- मार्गदर्शक तत्त्वे


🔹२) सर्वोच्च न्यायालय हे अभिलेखाचे न्यायालय असल्याचे घटनेच्या कलम .... मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. 

- १२९


🔸३) सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशास पदावरून दूर करण्यासाठी जी प्रक्रिया अवलंबावी लागते; तीच प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास बडतर्फ करतानाही अवलंबावी लागते. हे विधान ....

- बरोबर आहे.


🔹४) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो ?

- राष्ट्रपती


🔸५) केंद्र-राज्य संबंधांसंदर्भात या आयोगाचा अहवाल महत्त्वपूर्ण मानला जातो ....

- न्या. सरकारीया आयोग


🔸१) १ ऑक्टोबर, १९५३ रोजी अस्तित्वात आलेले ..... हे भाषिक तत्त्वावरील भारतातील पहिले राज्य होय,
- आंध्र राज्य

🔹२) २ जून, २०१४ रोजी आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन करण्यात येऊन तेलंगाणा हे भारतातील २९ वे राज्य निर्माण झाले. तेलंगाणा प्रदेशाचा समावेश असलेले मूळ आंध्र प्रदेश राज्य केव्हा आकारास आले होते ?
- १ नोव्हेंबर, १९५६

🔸३) .... हा घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असून त्याच्या नावाने राज्याचे कार्यकारी आदेश काढले जातात.
- राज्यपाल

🔹४) राज्यपाल त्याचे कार्यकारी अधिकार थेट किंवा दुय्यम अधिकाऱ्यांद्वारा वापरू शकतो, असे कलम १५४ मध्ये म्हटले आहे. दुय्यम अधिकारी या संज्ञेत कोणाचा समावेश होतो ? 
- सर्व मंत्री व मुख्यमंत्री

🔸५) घटक राज्याच्या राज्यपालास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो .... कडे सादर करावा लागतो.
- राष्ट्रपती


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...