Monday 15 April 2024

लक्षात ठेवा

🔸१) दुर्गाराम मंछाराम यांच्या सहकार्याने दादोबा पांडुरंग यांनी १८४४ मध्ये 'मानवधर्म सभा' या सभेची स्थापना केली. कोठे ?

- सुरत


🔹२) दादोबा पांडुरंग यांनी मुंबई येथे 'परमहंस सभे'ची स्थापना केली .... 

- ३१ जुलै, १८४९


🔸३) हिंदुधर्मातील स्त्रियांची दुःस्थिती व विशेषतः विधवा स्त्रियांची दयनीय स्थिती यांवर प्रकाश टाकणारी 'यमुना पर्यटन' ही कादंबरी लिहिली .... 

- बाबा पद्मनजी


🔹४) सन १८६७ मध्ये मुंबई येथे 'प्रार्थना समाजा'ची स्थापना करण्यात आली. या समाजाच्या स्थापनेचे श्रेय विशेषत्वाने देण्यात येते .... यांना.

- आत्माराम पांडुरंग


🔸५) .... रोजी मुंबईतील कोळीवाडा (मांडवी) येथील समारंभात जोतीराव फुले यांना 'महात्मा' ही पदवी दिली गेली.

- ११ मे, १८८८



🔸१) इ. स. १८४८ मध्ये आपल्या स्वतःच्या घरात मुलींची मुंबईतील पहिली शाळा स्थापन केली ....

- नाना शंकरशेठ


🔹२) मुंबई व पुणे दरम्यान रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी जमशेदजी जिजीभाय यांच्याबरोबरच .... यांनीही विशेष प्रयत्न केले होते.

- नाना शंकरशेठ


🔸३) एरवी इंग्रजी राजवटीचे समर्थन करणाऱ्या .... यांनीच वेळप्रसंगी “दिवाळखोर सरदारांचा धूर्त कारभारी जसा संसार पाहतो तसे इंग्रज सरकार या देशाचा कारभार पाहत आहे." अशा शब्दांत ब्रिटिश शासनावर टीका केली. 

- लोकहितवादी


🔹४) अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना .... यांनी १८५७ चे भिल्लांचे बंड मोडून काढले.

- दादोबा पांडुरंग


🔸५) स्वधर्मात राहून इतर धर्मातील चांगल्या धर्मतत्त्वांचा स्वीकार करावयाचा व स्वधर्मात सुयोग्य दिशेने परिवर्तन घडवून आणावयाचे, असे मानणारा सुधारकांचा एक वर्ग देशात एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर कार्यरत होता. अशा प्रकारच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून आपणास ..... यांनी स्थापन केलेल्या 'मानव धर्मसभा' व 'परमहंस सभा' यांचा उल्लेख करावा लागेल.

- दादोबा पांडुरंग


🔸१) पृथ्वीवरील दोन स्थानांमधील रेखावृत्तीय अंशात्मक अंतरास .... मिनिटांनी गुणले असता त्या दोन ठिकाणातील स्थानिक वेळेतील फरक समजू शकतो. 

- चार


🔹२) विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस २३°३०' अक्षवृत्ता पर्यंतच्या प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडतात. त्यामुळे त्या भागात तापमान जास्त असते. या पट्ट्यास काय म्हणतात? 

- उष्ण पट्टा


🔸३) पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने सूर्याभोवती फिरत असल्याने तिचे सूर्यापासूनचे अंतर सारखे नसते. जेव्हा पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते तेव्हा त्या स्थितीस .... म्हणून ओळखले जाते.

- उपसूर्य स्थिती


🔹४) चमकणाऱ्या विजेमुळे हवेतील काही ऑक्सिजनचे .... वायूत रूपांतर होते..

- ओझोन


🔸५)आपल्या आकाशगंगेचा व्यास किमान .... लाख प्रकाशवर्षे असावा. 

- एक

🔸१) २१ मार्च व २३ सप्टेंबर या दोन दिवशी संपातस्थिती निर्माण होते. म्हणून या दोन दिवसांना ..... असे म्हणतात.
- संपातदिन

🔹२) ज्या वेळी पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो तेव्हा त्या स्थितीस .... असे म्हणतात.
- अयनस्थिती

🔸३) २१ मार्च या संपातदिनाला उत्तर गोलार्धात ..... म्हणून ओळखले जाते.
- वसंत संपात 

🔹४) २३ सप्टेंबर या संपातदिनाला उत्तर गोलार्धात .... म्हणून ओळखले जाते. 
- शरद संपात

🔸५) पृथ्वीला सूर्याभोवती एक अंश फिरण्यास किती वेळ लागतो ?
- चार मिनिटे

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...