1-अस्टाध्यायी पांणिनी
2-रामायण वाल्मीकि
3-महाभारत वेदव्यास
4-अर्थशास्त्र चाणक्य
5-महाभाष्य पतंजलि
6-सत्सहसारिका सूत्र नागार्जुन
7-बुद्धचरित अश्वघोष
8-सौंदरानन्द अश्वघोष
9-महाविभाषाशास्त्र वसुमित्र
10- स्वप्नवासवदत्ता भास
11-कामसूत्र वात्स्यायन
12-कुमारसंभवम् कालिदास
13-अभिज्ञानशकुंतलम् कालिदास
14-विक्रमोउर्वशियां कालिदास
15-मेघदूत कालिदास
16-रघुवंशम् कालिदास
17-मालविकाग्निमित्रम् कालिदास
18-नाट्यशास्त्र भरतमुनि
19-देवीचंद्रगुप्तम विशाखदत्त
20-मृच्छकटिकम् शूद्रक
21-सूर्य सिद्धान्त आर्यभट्ट
22-वृहतसिंता बरामिहिर
23-पंचतंत्र विष्णु शर्मा
24-कथासरित्सागर सोमदेव
25-अभिधम्मकोश वसुबन्धु
26-मुद्राराक्षस विशाखदत्त
27-रावणवध भटिट
28-किरातार्जुनीयम् भारवि
29-दशकुमारचरितम् दंडी
30-हर्षचरित वाणभट्ट
31-कादंबरी वाणभट्ट
32-वासवदत्ता सुबंधु
33-नागानंद हर्षवधन
34-रत्नावली हर्षवर्धन
35-प्रियदर्शिका हर्षवर्धन
36-मालतीमाधव भवभूति
37-पृथ्वीराज विजय जयानक
38-कर्पूरमंजरी राजशेखर
39-काव्यमीमांसा राजशेखर
40-नवसहसांक चरित पदम् गुप्त
41-शब्दानुशासन राजभोज
42-वृहतकथामंजरी क्षेमेन्द्र
43-नैषधचरितम श्रीहर्ष
44-विक्रमांकदेवचरित बिल्हण
45-कुमारपालचरित हेमचन्द्र
46-गीतगोविन्द जयदेव
47-पृथ्वीराजरासो चंदरवरदाई
48-राजतरंगिणी कल्हण
49-रासमाला सोमेश्वर
50-शिशुपाल वध माघ
51-गौडवाहो वाकपति
52-रामचरित सन्धयाकरनंदी
53-द्वयाश्रय काव्य हेमचन्द्र
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
Ads
10 May 2020
प्राचीनकाल की महत्वपूर्ण पुस्तकें
टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यास वर्षाअखेरीस आयपीएल शक्य :
देशभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला होणारं आर्थिक नुकसान मोठं असणार आहे.
यासाठीच स्पर्धा पूर्णपणे रद्द न करता बीसीसीआय वर्षाअखेरीस आयपीएलचं आयोजन करता येईल का याची चाचपणी करत आहे. करोनामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा बंद आहेत. आयसीसीलाही याचा मोठा आर्थिक फटका बसतोय.
वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे. मध्यंतरी प्रेक्षकांविना विश्वचषक स्पर्धा खेळवण्याच्या पर्यायावर चर्चा झाली. मात्र आयसीसीच्या बहुतांश सदस्यांचा याला विरोध असल्यामुळे टी-२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलली जाईल असे संकेत मिळतायत. असं झाल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळात बीसीसीआय आयपीएलचं आयोजन करु शकतं. याविषयीवर बीसीसीआय अधिकाऱ्यांची टेलिकॉन्फरन्सिंगमध्ये चर्चा झाल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
एवढ्यात सुटका नाही - देशात जून-जुलैमध्ये उच्चांकावर पोहोचणार करोना रुग्णांची संख्या :
सध्या संपूर्ण देशात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. लॉकडाउनदरम्यान करोनाच्या वाढत्या संख्येला काही प्रमाणात आळा बसला असला तरी दररोज रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. भारतात आतापर्यंत करोनाग्रस्तांची संख्या तब्बल ५० हजारांवर गेली आहे. यादरम्यान एम्सचे अध्यक्ष डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “सध्या दोन गोष्टींकडे प्रामुख्यानं पाहण्याची गरज आहे.
जशी जशी करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे, तसं आपण चाचण्याही वाढवत आहोत. जर आपल्याला या लढाईत यशस्वी व्हायचं असेल तर चाचण्या कितीही वाढल्या तर करोनाग्रस्तांच्या केसेस कमी होणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला सतर्क राहिलं पाहिजे. जून आणि जुलैमध्ये करोनाचं संक्रमण पीकवर म्हणजेच वेगानं वाढेल,” असं गुलेरिया म्हणाले.
जून आणि जुलैमध्ये करोनाचं संक्रमण पीकवर म्हणजेच वेगानं वाढेल. दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीनंतरच करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ रोखली जाईल किंवा ती संख्या कमी होईल. सरकारला कोविड सेंटर्स, चाचण्यांमध्ये वाढ आणि हॉटस्पॉट ठरवण्यात आलेल्या ठिकाणी कठोरपणे नियमांचं पालन करणं सरकारला सुरू ठेवावं लागेल,” असंही त्यांनी नमूद केलं.
लोकसत्ता वृत्तपत्र समूहाकडून वृत्तपत्र PDF/कात्रणे शेअर करण्यास मज्जाव...
"Circulating any copies of this publication or part thereof, is ILLEGAL and strict legal action will be taken against individuals."
"या प्रकाशनाच्या कोणत्याही प्रती किंवा त्यातील काही भाग प्रसारित करणे बेकायदेशीर आहे आणि व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल."
विद्यार्थी मित्रहो,
आपल्यासाठी एक थोडी अडचणीची बातमी आज देत आहोत, दररोज प्रमाणे आज लोकसत्ता पेपर डाउनलोड करत असताना वरील msg आजपासून दिसण्यास सुरवात झालेली आहे, त्यामुळे लोकसत्ता आणि indian Express वृत्तपत्र समूहाच्या कॉपीराईटच्या नियमांचे आदरपूर्वक पालन करून उद्यापासून आपणास लोकसत्ता पेपरचे कोणतेही कात्रण टेलिग्राम चॅनेल वर आम्हास शेअर करता येणार नाही, याची सर्व विद्यार्थीमित्रांनी नोंद घ्यावी...
मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप नाही, मग होणार गुन्हा दाखल
⛑करोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि करोना संबंधित माहितीसाठी केंद्र सरकारनं आरोग्य सेतू अॅप विकसित केलं आहे.
⛑या अॅपचा वापर करण्याचं आवाहनं केंद्र सरकारच्या वतीनं वारंवार केलं जात असून, नोएडा पोलिसांनी आरोग्य सेतू अॅप अनिवार्य केलं आहे. नोएडा आणि ग्रेटर नोएडा परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडे आरोग्य सेतू अॅप नसल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आदेशच पोलिसांनी काढले आहेत.
⛑करोनाविषयीच्या माहितीत सूसुत्रता आणण्यासाठी त्याचबरोबर संसर्ग झालेल्या रुग्णांची माहिती ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आरोग्य सेतू अॅप तयार केलं. हे अॅप देशभरात वापरलं जात आहे. तर अनेक जणांकडे हे अॅप नाही. दरम्यान, नोएडा पोलिसांनी आरोग्य सेतू अॅप मोबाईलमध्ये ठेवण्याची सक्ती केली आहे. “ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, पण आरोग्य सेतू अॅप नाही, अशा नागरिकांविरुद्ध पोलीस कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा दंडाधिकारी त्या व्यक्तीला शिक्षा द्यायची, दंड ठोठवायचा की, सोडून द्यायचं हे ठरवतील,” असं नोएडाचं कायदा आणि सुव्यवस्था पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार यांनी सांगितलं.
⛑“पकडल्यानंतर लोकांनी जर हे अॅप लगेच डाउनलोड केलं, तर त्यांना कोणतीही कारवाई न करता सोडण्यात येईल. लोकांनी आदेश गांभीर्यानं घेऊन अॅप डाउनलोड करावं म्हणून पोलीस हे काम करत आहे. पण, वारंवार इशारा देऊनही जर अॅप डाउनलोड केलं नाही, पोलीस त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करतील,” असं कुमार म्हणाले.
अग्रणी बँक योजना
‼️14 बँकांचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर बँकांच्या शाखा विस्तारासाठी, विशेषत:ग्रामीण भागात, एका चांगल्या योजनेची गरज वाटू लागली. त्यादृष्टीने अग्रणी बँक योजना तयार करण्यात आली.
♾शिफारस -
‼️डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय पत समिती अभ्यास गटा' ने राष्ट्रीयीकृत बँकांना 'क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण' लागू करण्याची शिफारस केली. (अर्थ : आपला शाखा विस्तार करीत असतांना राष्ट्रीयीकृत बँकांनी एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रीत करावे, त्या क्षेत्रात बँकिंगच्या सुविधांनी वाढ घडवून आणून त्या क्षेत्राचे पालन-संगोपन करून आर्थिक विकास घडवून आणावा.)1969 मध्ये या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी श्री.एफ.के.एफ. नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली "बँक व्यावसायिकांची समिती" (Committee of Bankers) स्थापन करण्यात आली. नरिमन समितीने गाडगीळ यांचा "क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण" मान्य करून त्याला मूर्त स्वरूप दिले व "अग्रणी बँक योजना" तयार केली.
♾सुरुवात -
‼️1969 च्या अखेरीला RBI ने योजना स्विकारली व तिची अंमलबजावणी देशातील 338 जिल्ह्यांमध्ये सुरू झाली.
♾योजना -
‼️देशातील 338 जिल्हे, SBI, तिच्या सहयोगी बँका, 14 राष्ट्रीयीकृत बँका व 3 खाजगी बँकांमध्ये वाटून देण्यात आले.मात्र, मुंबई, कलकत्ता, मद्रास ही महानगरे आणि दिल्ली, पोंडीचेरी व गोवा हे केंद्रशासित प्रदेश यांना ही योजना लागू करण्यात आली नाही.अशा रितीने एक जिल्हा एका बँकेला दत्तक म्हणून देण्यात आला. त्या बँकेला त्या जिल्ह्याची "अग्रणी बँक" म्हणून दर्जा देण्यात आला.असा दर्जा मिळाल्यानंतर त्या अग्रणी बँकेने त्या जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी प्रथम पुढाकार घ्यावा. तसेच,जिल्ह्याचे पतधोरण तयार करून संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी अग्रणी बँकेवर टाकण्यात आली.
♾कार्ये -
‼️जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी अग्रणी बँकेने खालीलकार्ये करणे अपेक्षित होते -
‼️जिल्ह्याचे सर्वेक्षण करून जिल्ह्याची पत गरज ठरविणे.बँक-शाखा कोठे सुरू करता येतील याचा शोध घेणे.जिल्हा सल्लामसलतसमित्या(Dist.Consultative committees) ची स्थापना करून पुढीलप्रमाणे समन्वयाचे कार्य घडवून आणणे -जिल्ह्यातील सर्व व्यापारी बँका, सहकारी बँका व अन्य वित्तीय संस्थांमध्ये समन्वय.जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील बँकांमध्ये समन्वय.अल्पकालीन व दीर्घकालीन कर्ज पुरवठ्यामध्ये समन्वय.जिल्ह्यातील विकास कार्यांमध्ये गुंतलेल्या सर्व संस्थांच्या कार्यांमध्ये समन्वय.1976 च्या उच्चाधिकारी समितीच्या शिफारसींनुसार अग्रणी बँकांवर 3 वर्षाचे जिल्हा पतधोरण (District Credit Plans) तयार करण्याची जबाबदारी टाकण्यात आली.
‼️ हे धोरण सर्वसमावेशक स्वरूपाचे असून त्यात जिल्ह्यातील बँकांसाठी गटनिहाय, क्षेत्रनिहाय योजनानिहाय आणि बँकनिहाय कर्ज पुरवठ्याची लक्ष्ये ठरविली जातात.भारत सरकारच्या सुचनेंतर्गत एप्रिल 1989 मध्ये अग्रणी बँक योजनेंतर्गत क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण लागू करण्यात आला.
♾महाराष्ट्रातील अग्रणी बँका (33 जिल्हयांसाठी)
‼️स्टेट बँक ऑफ इंडिया - बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नंदुरबार.सेंट्रल बँक ऑफ इंडिया - अकोला, अमरावती, सांगली, धुळे, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर, वाशीम, बुलढाणा.बँक ऑफ इंडिया - नागपूर, भंडारा, चंद्रपुर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया.बँक ऑफ महाराष्ट्र - औरंगाबाद, नाशिक, पुणे, सातारा, ठाणे, जालना.
♾सध्यस्थिती -
‼️सध्या फेब्रुवारी 2013 मध्ये अग्रणी बँक योजना देशातील 622 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्यात उत्स्फृर्तपणे सहभागी आहेत. फेब्रुवारी 2013 मध्ये SBI किंवा तिच्या सहयोगी बँका सर्वाधिक म्हणजे 204 जिल्ह्यांमध्ये अग्रणी बँक म्हणून कार्य करीत होती.
♾उषा थोरात समिती -
‼️भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीमती. उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अग्रणी बँक योजनेच्या परीक्षणासाठी एका उच्चाधिकार समितीची स्थापना केली होती. या समितीने 20 एप्रिल, 2009 रोजी आपला अहवाल सादर केला.
अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com
09 May 2020
राज्यघटना प्रश्नसंच
1) कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला ?
1) 45 वी घटना दुरुस्ती
2) 46 वी घटना दुरुस्ती
3) 42 वी घटना दुरुस्ती
4) 44 वी घटना दुरुस्ती
उत्तर :- 3
2) भारतीय राज्यघटनेचे कलम ‘51अ’ कशा संबंधी आहे ?
1) मूलभूत कर्तव्ये
2) मूलभूत हक्क
3) मार्गदर्शक तत्त्वे
4) राष्ट्रपती
उत्तर :- 1
3) घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश ........................ च्या शिफारशीवरून करण्यात आला.
1) वल्लभभाई पटेल समिती
2) कृपलानी समिती
3) सरकारिया आयोग
4) स्वर्ण सिंग समिती
उत्तर :- 4
4) भारतीय राज्यघटनेतील व्यक्तीच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे ?
1) फ्रान्स
2) यु.एस.ए.
3) यु.एस.एस.आर
4) यु.के.
उत्तर :- 3
5) मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा.
अ) मूलभूत कर्तव्ये नागरिकांना शिक्षित करण्याची भूमिका बजावतात.
ब) हक्क कर्तव्यांसोबत निगडित असलेच पाहिजेत.
क) कर्तव्ये स्वत:हून लागू होत नाहीत.
ड) अशा प्रकारची कर्तव्ये साधारणत: पाश्चात्य उदारवादी देशांच्या राज्यघटनेत आढळतात.
वरीलपैकी कोणते विधान / विधाने चुकीची आहेत ?
1) अ, क
2) ब, ड
3) ब, क, ड
4) ड
उत्तर :- 4
चालू घडामोडी
📍 कोण अंतराळात सर्वाधिक दिवस वास्तव्य करणारी महिला ठरली?
(A) जेसिका मीएर
(B) अॅन मॅक्लेन
(C) सॅली राइड
(D) क्रिस्टीना कोच ✅✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍 "ड्रीम्स ऑफ ए बिलियन: इंडिया अँड ऑलिम्पिक गेम्स" हे पुस्तक ___ ह्यांनी लिहिले.
(A) चेतन भगत
(B) पी. टी. उषा
(C) उसेन बोल्ट
(D) बोरिया मुजूमदार ✅✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍 02 जुलै रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) ........ यांच्याविरुद्ध एक विशेष मोहीम सुरू केली.
(A) बँकेची फसवणूक करणारे✅✅
(B) आयकर चुकविणारे गुन्हेगार
(C) मानव तस्करी करणारे
(D) वरील सर्व
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍 38 अब्ज डॉलर एवढ्या रकमेच्या वाटाघाटीसह जगातला सर्वात महागडा घटस्फोट घेणार्या महिलेचे नाव काय आहे?
(A) मारिया मॅकेन्झी
(B) शेरल वुड्स
(C) श्रेया सिम्पसन
(D) मॅकेन्झी बेझोस✅✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍 तामिळनाडूच्या राज्य सरकारने घोषित केलेल्या राज्य फुलपाखरूचे नाव काय आहे?
(A) साऊर्थन बर्ड विंग्ज
(B) कॉमन पिकोक
(C) तामिळ योमन✅✅
(D) मलबार बॅंडेड पिकोक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍 मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशन्स नेटवर्क (MFIN) याच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
(A) विनीत छत्री
(B) हर्ष श्रीवास्तव
(C) मनोज कुमार नांबियार✅✅
(D) ग्यान mohon
१) भारताचे पहिले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणते आहे ?
अ) A - 05
✓ब) B - 05
क) C - 05
ड) D - 05
२) मुंबई विद्यापीठाच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
अ) मनीष सिसोदिया
✓ब) रतन टाटा
क) नीता अंबानी
ड) यापैकी नाही
३) खालीलपैकी कोणती व्यक्ती ' कुस्ती ' या क्रिडा प्रकाराशी संबंधित नाही ?
अ) युवराज पाटील
ब) खाशाबा जाधव
क) गणपतराव आंदळकर
✓ड) भाऊसाहेब पडसलगीकर
४) हरित अर्थसंकल्प अशा प्रकारचा अर्थसंकल्प सादर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?
अ) महाराष्ट्र
ब) पंजाब
✓क) बिहार
ड) तेलंगणा
५) खालीलपैकी नुकतीच कोणी मलेशियाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली ?
✓अ) मोहिउद्दिन यासीन
ब) महातीर मोहंमद
क) नजीब रजाक
ड) महम्मद यासीन
पोलीस भरती प्रश्नसंच
▪ केनियात आढळणाऱ्या जिराफच्या कोणत्या जातीत केवळ एकटाच नर जीवंत आहे?
उत्तर : पांढरा जिराफ
▪ भारत आणि अमेरिका यांची शिष्यवृत्ती असलेल्या ‘WISTEMM’ याचे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर : विमेन इन सायन्स, टेक्नॉलजी, इंजिनीरिंग, मॅथेमॅटिक्स अँड मेडिसीन
▪ कोणत्या BSF प्रमुखाची मध्यप्रदेश पोलीस विभागाच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली?
उत्तर : व्ही. के. जोहरी
▪ भारत सरकार कोणत्या योजनेच्या अंतर्गत ‘हेल्थ बेनीफिट पॅकेज 2.0’ उपक्रम राबवित आहे?
उत्तर : आयुषमान भारत-PMJAY
▪ भारत ‘राष्ट्रकुल निधी’चे नाव कोणत्या राजकीय नेत्याच्या नावावरून ठेवण्याची योजना करीत आहे?
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल
▪ आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला किती महिलांना ‘नारी शक्ती’ पुरस्काराने गौरविण्यात आले?
उत्तर : 15
▪ अफगाणिस्तानच्या कोणत्या दोन राजकीय नेत्यांनी स्वत:ला अफगाणिस्तानचे राष्ट्रपती घोषित केले?
उत्तर : अशरफ घानी आणि अब्दुल्ला अब्दुल्ला
▪ उत्तरप्रदेश संरक्षण मार्गिका (UPDC) प्रकल्पामध्ये किती गुंतवणूक होण्याचा अंदाज आहे?
उत्तर : रु. 20,000 कोटी
▪ भूषण पॉवर अँड स्टील कंपनी कोणत्या पोलाद निर्मिती कंपनीकडून विकत घेतली जाणार आहे?
उत्तर : JSW स्टील
▪ पेटीएमच्या साथीने हैदराबाद मेट्रो रेल लिमिटेड ही कंपनी कोणती यंत्रणा सादर करणार आहे?
उत्तर : प्रवाश्यांसाठी QR वर आधारित असलेली तिकीट बुकिंग सिस्टम
General knowledge
*(1) भारताच्या पश्चिमी भागामध्ये कोणत्या प्रसिद्ध खेळाला हु तु तु' म्हणूनही जाणले जाते?(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P2 - 2018)*
A. लगोरी
B. कुस्ती
C. कबड्डी
D. हँडबॉल
*उत्तर : कबड्डी*
========================
*(2) 'एग्झाम वॉरियर्स' हे पुस्तक कुणी लिहिले? (महाबीज विभाग Assistant Field Officer - 2018)*
A. नितीन गडकरी
B. सुषमा स्वराज
C. नरेंद्र मोदी
D. रामनाथ कोविंद
*उत्तर : नरेंद्र मोदी*
========================
*(3) बाबा आमटे हे-..... च्या निर्मुलनाशी संबंधित आहेत. (महाबीज विभाग Assistant Field Officer - 2018 )*
A. क्षयरोग
B. कुष्ठरोग
C. कांजिण्या
D. गोवर
*उत्तर : कुष्ठरोग*
========================
*(4) बाबा आमटे कोणत्या रोगाने पीडित लोकांच्या पुनर्वसनाशी संबंधित आहेत ? (अन्न पुरवठा निरीक्षक SI - P1 -2018)*
A. कर्करोग
B. क्षयरोग
C. कुष्ठरोग
D. एड्स
*उत्तर : कुष्ठरोग*
========================
*(5) खालीलपैकी कुणाला नोबेल पारितोषिक मिळाले नाही?(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P2 - 2018)*
A. महात्मा गांधी
B. अमर्त्य सेन
C. मदर तेरेसा
D. सी. व्ही. रमण
*उत्तर : महात्मा गांधी*
========================
*(6) 'दादासाहेब फाळके पुरस्कार' कशासाठी दिला जातो: (अन्न पुरवठा निरीक्षक SI - P6 -2018)*
A. नाट्य
B. समाजकल्याण
C. सिनेमा
D. साहित्य
*उत्तर : सिनेमा*
========================
*(7) 'जागतिक मधुमेह दिन' दरवर्षी.....ह्या दिवशी साजरा केला जातो. (कृषी सेवक KS - P6-2019)*
A. 14 नोव्हेंबर
B. 29 जून
C. 28 नोव्हेंबर
D. 28 जून
*उत्तर - 14 नोव्हेंबर*
========================
*(8) खालीलपैकी कोणत्या दिवशी 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' साजरा केला जातो ?(महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग Clerk - 2018)*
A. 1 फेब्रुवारी
B. 3 एप्रिल
C. 8 मार्च
D. 5 जून
*उत्तर : 8 मार्च*
========================
*(9) आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी..... ह्या दिवशी साजरा केला जातो. (कनिष्ठ लेखापाल व लेखा लिपिक AC - 05 -2019)*
A. 8 मार्च
B. 25 मार्च
C. 14 मार्च
D. 18 मार्च
*उत्तर : 8 मार्च*
========================
महत्त्वाचे प्रश्नसंच
1 बायबलचा बंगाली भाषेत कोणी अनुवाद केला
उत्तर विल्यम वोर्ड
2 जॉर्ज मार्शमेनने कोणत्या भारतीय भाषेतील विश्वकोष तयार केला
उत्तर बंगाली भाषा
3 चार्ल्स विलकिन्सने गीता ग्रंथाचा इंग्रजीत अनुवाद केला तर त्यास कोणी प्रस्तावना लिहली
उत्तर हेस्टिंग्ज
4 बनारस येथे संस्कृत कॉलेजची स्थापना कोणत्या ब्रिटिश व्यक्तीने केली
उत्तर जोनाथन डांकण
5 राजाराम मोहनराय व राधकांत देव यांनी 1817 ला हिंदू कॉलेजची स्थापना केली त्यासाठी त्यांना कोणत्या ब्रिटिश व्यापाऱ्याने मदत केली
उत्तर डेव्हिड हेअर
6 कोणत्या चार्टर ऍक्ट नुसार भारतातील शिक्षणाची जबाबदारी ब्रिटिश कंपनीवर टाकण्यात आली
उत्तर 1813 चा ऍक्ट
7 कोन्सिल ऑफ एज्युकेशन चक्र स्थापना कोणत्या साली करण्यात आलीं
उत्तर 1842
8 1857 ला संपूर्ण भारतात किती महाविद्यालये होती
उत्तर 27
9 1857 ला भारतात कोणत्या दोन ठिकाणी इंजिनेरींग कॉलेज कार्यरत होती
उत्तर रुरकी व कलकत्ता
10 थॉमस रॅले आयोग कोणत्या साली नियुक्त केला होता
उत्तर 1902
▪ ‘NSG प्रादेशिक केंद्रस्थळ’ याच्या परिसराचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : कोलकाता
▪ भारताने कोणत्या देशासोबत 40 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचा संरक्षण करार केला?
उत्तर : अर्मेनिया
▪ कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आशियाई विकास बँकेनी सदस्यांसाठी किती कर्ज मंजूर केले?
उत्तर : 4 दशलक्ष डॉलर
▪ कोणत्या शहरात ‘पुसा कृषी विज्ञान मेळावा 2020’ आयोजित करण्यात आला?
उत्तर : नवी दिल्ली
▪ 29 फेब्रुवारी 2020 रोजी ‘चिंतन बैठक’ या नावाखाली बंदरांची आढावा बैठक कुठे पार पडली?
उत्तर : तामिळनाडू
▪ 'डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी पुरस्कार' कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी दिला जातो?
उत्तर : राजकारण
▪ सहावी ‘इंडिया आयडिया परिषद’ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली.
उत्तर : गुजरात
▪ कोणत्या दिवशी ‘शून्य भेदभाव दिन’ साजरा केला जातो?
उत्तर : 1 मार्च
▪ ‘एकम महोत्सव’ कुठे आयोजित करण्यात आला?
उत्तर : नवी दिल्ली
▪ ‘अतुल्य भारत’च्या संकेतस्थळावर कोणत्या भाषांचा समावेश करण्यात आलं आहे?
उत्तर : चिनी, अरबी, स्पॅनिश
ग्रीस या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण की ज्यांनी मार्च 2020 रोजी शपथ घेतली
उत्तर केटरीना सेकेलारोपाउलो
मार्च 2020 मध्ये युनो ने महिलांच्या अधिकारावरील राजकीय जाहीरनामा स्वीकारला तो कितव्या बैठकीत
उत्तर 64 व्या
हिंदी महासागर आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली
उत्तर 1982
हिंदी महासागर आयोगाचा भारत हा निरीक्षक असणारा कितवा देश आहे
उत्तर पाचवा
सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक मोफत उपलब्ध करून देणारा जगातील पहिला देश कोणता
उत्तर लकसम्बर्ग
25 फेब्रुवारी 2020 ला होस्नी मुबारक यांचे निधन झाले तर ते कोण होते
उत्तर राष्ट्रपती इजिप्त
2020च्या आतंरराष्ट्रीय मातृभाषा दिनाची संकल्पना काय होती
उत्तर सीमाविरहीत भाषा
आतंरराष्ट्रीय मातृभाषा दिन केव्हा साजरा केला जातो
उत्तर 21 फेब्रुवारी
24 फेब्रुवारी 2020 रोजी महाथिर महंमद यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला तर ते कोणत्या देशाशी सबंधित आहेत
उत्तर मलेशिया
17 फेब्रुवारी 2020 रोजी रस्ते सुरक्षा जागतिक संमेलन कोठे पार पडले
उत्तर स्टोहोम स्वीडन
महाराष्ट्रातील पहिली अंतर शहर इलेक्ट्रिक बस कोणत्या शहरांच्या दरम्यान सुरू करण्यात आली
उत्तर मुंबई पुणे
देशातील पहिले ऐकल प्लास्टिकमुक्त विमानतळ कोणते
उत्तर दिल्ली
ऑपरेशन्स ग्रीन्स हे कोणत्या पिकाशी संबंधित आहे
उत्तर टोमॅटो कांदा व बटाटा
19 वी जागतिक उत्पादकता परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे
उत्तर बेंगलोर
सिंडिकेट बँकेचे विलिनीकरण कोणत्या बँकेत झाले
उत्तर कॅनरा बँक
इंडिया इंटरनॅशनल सि फूड शो 2020 चे कोठे आयोजन केले
उत्तर कोची
23 वि ई--गव्हर्नर्स परिषद कोठे पार पडली
उत्तर वरळी मुंबई
पीएम किसान सन्मान निधी प्रति शेतकरी किती मिळणार आहे
उत्तर सहा हजार
राष्ट्रीय गोकुळ मिशन साठी किती तरतूद करण्यात आली आहे
उत्तर 750 कोटी रुपये
रायगड किल्ला संवर्धनासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याने किती तरतूद केली आहे
उत्तर 606 कोटी रुपये
▪ सोलार रिसिव्हर ट्यूब तंत्रज्ञान कोणत्या संस्थेने विकसित केले आहे?
उत्तर : इंटरनॅशनल अॅडव्हान्स्ड रिसर्च सेंटर फॉर पॉवर मेटलर्जी अँड न्यू मटेरियल्स
▪ 11 मार्च रोजी कोणत्या राज्याच्या विधानसभेनी जात वैधता दाखल्याच्या संदर्भात विधेयक मंजूर केले?
उत्तर : महाराष्ट्र
▪ COVID-19 विषाणूशी लढा देण्यासाठी भारतात कोणता कायदा लागू करण्यात आला आहे?
उत्तर : महामारी कायदा-1897
▪ शेतकर्यांसाठीच्या कोणत्या योजनेसाठी सल्ला प्राप्त करण्यासाठी भारत सरकारने समिती नेमली?
उत्तर : किसान रेल योजना
▪ महाराष्ट्र मंत्रिमंडळाद्वारे मान्यता दिलेल्या प्रस्तावानुसार मुंबई सेंट्रल स्थानकाचे नवे नाव काय असणार?
उत्तर : नाना शंकरशेठ स्थानक
▪ कोणत्या व्यक्तीची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाचे नवे संचालक म्हणून नेमणूक झाली?
उत्तर : देबाशीष पांडा
▪ संसदेत दिवाळखोरीसंबंधी कोणते विधेयक मंजूर करण्यात आले?
उत्तर : नादारी व दिवाळखोरी संहिता (दुरुस्ती) विधेयक-२०२०
▪ भारतीय स्टेट बँकेचा ‘फायनॅनष्यल इंक्लूजन अँड मायक्रो मार्केट’ उपक्रम कोणत्या प्रकारची कामे हाताळणार?
उत्तर : सूक्ष्म वित्तीय कार्ये
▪ 10 मोठ्या उद्योगांकडे येस बँकेचे थकीत असलेले कर्ज किती आहे?
उत्तर : रु. 34,000 कोटी
▪ कोणत्या महिला संघाने ‘ICC टी-20 विश्वचषक 2020’ या क्रिकेट स्पर्धेचे विश्वविजेतेपद जिंकले?
उत्तर : ऑस्ट्रेलिया
10 महत्त्वाचे सराव प्रश उत्तरे
▪️ आंतरराष्ट्रीय चेर्नोबिल दुर्घटना स्मृती दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 26 एप्रिल
▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘जीवन शक्ती’ योजना लागू केली?
उत्तर : मध्यप्रदेश
▪️ कोणत्या कंपनीसोबत व्होडाफोन-आयडिया या कंपनीने ‘रीचार्ज साथी’ कार्यक्रम आरंभ करण्यासाठी करार केला?
उत्तर : पेटीएम
▪️ दसतिनिब या भारतीय ब्रॅंडची 'दसशील' ही जेनेरिक औषधी कोणत्या कंपनीने तयार केली?
उत्तर : शिल्पा मेडिकेअर
▪️ 2020 सालासाठी जागतिक बौद्धिक संपदा दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : इनोव्हेट फॉर ए ग्रीन फ्युचर
▪️ अमेरिकेच्या NASA संस्थेनी विकसित केलेल्या व्हेंटिलेटरचे नाव काय आहे?
उत्तर : VITAL
▪️ कोणते उद्योग क्षेत्र प्रथमच भारतातले सर्वोच्च निर्यात क्षेत्र बनले?
उत्तर : रसायने आणि पेट्रोकेमिकल्स
▪️ कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेनी कृषी क्षेत्रासाठी खेळते भांडवल मागणी ऋणची घोषणा केली?
उत्तर : इंडियन ओव्हरसीज बँक
▪️ चर्चेत असलेले ‘वेस्ट टेक्सास इंटरमिडीएट’ (WTI) काय आहे?
उत्तर : कच्च्या तेलाचा एक ग्रेड
▪️ झारखंड सरकारने लोकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहचविण्यासाठी कोणते अॅप तयार केले?
उत्तर : झारखंड बाजार
-----------------------------------------------------