Ads

15 December 2021

चालू घडामोडी प्रश्नसंच


Q1) कोणती आदिवासी जात ‘अनामलाई व्याघ्र प्रकल्प’ येथे वास्तव्यास आहे?
उत्तर :- पुलियार

Q2) कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल टास्क फोर्स ऑन पॅनडेमीक रिस्पॉन्स’ याची स्थापना केली?
उत्तर :-  यूएस चेंबर ऑफ कॉमर्स

Q3) कोण ‘मॅड्रिड ओपन 2021’ या टेनिस स्पर्धेत महिला एकेरी गटाची विजेती ठरली?
उत्तर :- आर्यना सबलेन्का

Q4) कोणत्या संस्थेने ‘ई-संजीवनी ओपीडी’ उपक्रमाचा प्रारंभ केला?
उत्तर :- आर्म्ड फोर्स वेटेरन डॉक्टर्स

Q5) कोणत्या शहराने ‘नाइट फ्रँक प्राइम ग्लोबल सिटीझ इंडेक्स Q1 2021’ या यादीत प्रथम क्रमांक पटकावला?
उत्तर :-  शेन्झेन

Q6) कोणत्या संकल्पनेखाली 2021 या वर्षी ‘जागतिक रेडक्रॉस व रेड क्रिसेंट दिवस’ साजरा करण्यात आला?
उत्तर :- अनस्टॉपेबल

Q7) ‘द बेंच’ या बाल पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर :- मेघन मर्केल

Q8) कोणत्या दिवशी सीमा रस्ते संघटना (BRO) याचा स्थापना दिवस साजरा केला जातो?
उत्तर :- 7 मे

Q9) कोणत्या राज्यात लसींच्या दृष्टीपलीकडील वितरणासाठी प्रायोगिक तत्वावर ड्रोन यंत्राचा वापर करण्याची सशर्त परवानगी मिळाली?
उत्तर :- तेलंगणा

Q10) शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना प्रमाणपत्राचे वाटप करण्याकरिता शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींचे सशक्तीकरण विभागाकडून वापरल्या जाणाऱ्या संकेतस्थळाचे नाव काय आहे?
उत्तर :- युनिक डिसेबिलिटी आयडी

Q11) ऑक्सिजनचे वाटप सुरळीत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या राष्ट्रीय कृती दलात किती सदस्य आहेत?
उत्तर :- 12

Q12) कोणत्या देशाने तिसरी आर्क्टिक विज्ञान मंत्रीस्तरीय बैठक आयोजित केली?
उत्तर :-  जपान

Q13) कोणत्या संस्थेने "2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-DG)" नामक कोविड-19 प्रतिबंधक औषध विकसित केले?
उत्तर :- संरक्षण संशोधन व विकास संघटना

Q14) कोणत्या रोग वा संसर्गाला ‘म्यूकोरमायकोसिस’ असे देखील म्हणतात?
उत्तर :-  ब्लॅक फंगस

Q15) कोण द्वितीय नियामक पुनरावलोकन प्राधिकरण (RRA 2.0) याला सहाय्य करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने नेमलेल्या सल्लागार गटाचे अध्यक्ष आहेत?
उत्तर :- एस. जानकीरमन

Q16) कोणती 2021 साली ‘जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस’ याची संकल्पना आहे?
उत्तर :- सिंग, फ्लाय, सोअर – लाइक ए बर्ड!

Q17) कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल मिथेन असेसमेंट’ या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध केला?
उत्तर :-  क्लायमेट अँड क्लीन एअर कोएलिशन

Q18) ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य हे कोणत्या प्रकाराचे अभयारण्य आहे?
उत्तर :- सागरी अभयारण्य

Q19) कोणत्या संस्थेने लेखा आणि लेखापरीक्षण मानदंडांचे पालन करण्यासंबंधी कंपन्या व लेखा परीक्षकांचा तात्पुरता माहितीसंग्रह तयार केला?
उत्तर :-  राष्ट्रीय आर्थिक अहवाल प्राधिकरण

Q20)कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या ‘ड्राइव्ह-इन लसीकरण केंद्र’ याचे उद्घाटन झाले?
उत्तर:- मुंबई

Q21) कोणत्या व्यक्तीची आसामचे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड झाली?
उत्तर :- हेमंत बिस्वा सरमा

Q22) कोणत्या व्यक्तीने ‘2021 लॉरियस स्पोर्ट्समन ऑफ द इयर’ हा पुरस्कार जिंकला?
उत्तर :-  राफेल नदाल

Q23) कोणता देश द्वितीय विश्वयुद्धात जर्मनी देशाने आत्मसमर्पण केल्याचा दिवस 'विजय दिन' म्हणून साजरा करतो?
उत्तर :- रशिया

Q24) कोणत्या संस्थेने ‘नेचर इन ए ग्लोबलाइज्ड वर्ल्डः कन्फ्लिक्ट अँड कन्झर्वेशन’ या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला?
उत्तर :- IUCN

Q25) हिंद महासागरात अनियंत्रित स्थितीत पडलेला ‘लाँग मार्च 5B’ अग्निबाण कोणत्या देशाचा आहे?
उत्तर :- चीन

Q26) विद्यार्थी आणि पालकांच्या मानसिक सामाजिक कल्याणसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) तयार केलेल्या मोबाइल अॅपचे नाव काय आहे?
उत्तर :-  CBSE दोस्त फॉर लाइफ

Q27) राजकीय आणि धार्मिक संस्थांना SSE मंचाद्वारे निधी उभा करण्यास परवानगी न देण्याची शिफारस करण्यात आलेल्या सोशल स्टॉक एक्सचेंज (SSE) या मंचांच्या संदर्भातील तांत्रिक गटाचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :-  हर्ष कुमार भानवाला

Q28) कोणत्या राज्यात ‘हक्की पिक्की’ ही आदिवासी जमाती आढळते?
उत्तर :-  कर्नाटक

Q29) कोणते जल जीवन अभियानाच्या अंतर्गत ‘हर घर जल’ संकल्प पूर्ण करणारे दुसरे केंद्रशासित प्रदेश ठरले?
उत्तर :-  पुडुचेरी

Q30) कोणत्या संस्थेने “कनेक्टेड कॉमर्स: क्रिएटिंग ए रोडमॅप फॉर ए डिजिटली इंक्लूसिव भारत" या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला?
उत्तर :- नीती आयोग

महत्त्वाचे प्रश्नसंच

1). भारतीय घटनेतील कितव्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करणयात आली आहे  ?

1)   121 व्या

2)   124व्या✅

3)   123 व्या

4)   122व्या

2).आयसीसीच्या ऑगस्ट 2021 मधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा बहुमान कोणत्या खेळाडूला मिळाला ?

1)जसप्रीत बुमराह

2)जो रूट ✅

3)विराट कोहली

4) जे पी ड्युमिनी

3). कोणती संस्था एक नवीन पृथ्वी प्रणाली वेधशाळेची रचना करणार, जी हवामानातील बदलांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्याचे परिणाम कमी करण्यासाठी समर्पित असेल?

2) ईस्ञो 

2) कनेस
 
3) रोसकॉसमॉस

4) नासा

4). सामान्यतः अमोनिया वायू औद्योगिक पातळीवर तयार करतात कारण त्याचा उपयोग .......?

1) प्रथिने तयार करण्यासाठी होतो

2)साबण तयार करण्यासाठी होतो

3) रसायनिक खते तयार करण्यासाठी होतो✅

4)कृत्रिम खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी होतो

5). कोणते झाड 'टाऊंग्या' लागवडीसाठी सर्वसाधारणपणे वापरत नाहीत?

1) साग

2) साल

3) निलगिरी

4) अशोका✅

6).अलीकडे आयआयटी मद्रास स्टार्टअप पाय बीम इलेक्ट्रिकने कोणती ई बाइक लाँच केली?

1) पेटिक

2) पिस्तू

3) प्रति

4) पिमो✅

7). भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) टोल नाक्यावर प्रत्येक वाहनाला ……यापेक्षा अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही याविषयीची खात्री करण्यासाठी मार्गदर्शके जाहीर केली आहेत?

1) 15 सेकंद

2) 20 सेकंद

3) 10 सेकंद✅

4) यापैकी नाही

8).…… आणि ……हे जीवनसत्व 'C' चा सर्वाधिक पुरवठा करतात?

1) पेरू आणि द्राक्षे

2) पेरू आणि आवळा ✅

3) आवळा आणि लिची

4) आवळा आणि संत्रा

9). ज्या भागावर विशेषकरून झाडे आणि लाकूड फाट्याच्या वनस्पती कमी अंतरावर (दाट) घेतली जातात अशा भागाला काय म्हणतात? 

1) सामाजिक वने

2) कुरण 

3) वने ✅

4) यापैकी एकही नाही 

10). स्त्रियांना कृषी क्षेत्रात सक्षम बनविण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाने सुरू केलेल्या महिला किसान सशक्तीकरण परियोजना हा पुढीलपैकी कोणत्या योजनेचा भाग आहे?

1) दीनदयाळ अंत्योदय योजना ✅

2) दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्या योजना 

3) दीनदयाळ उपाध्याय उन्नत कृषी शिक्षा योजना

4) दीनदयाळ स्पर्श योजना

11). प्लेग हा आजार ..... जीवाणूमुळे होतो?
                   
1) यार्सीनिया पेस्टीस ✅

2)हिमोफीलस एनफ्ल्यूएन्झा

3)स्ट्रेप्टोकॉकस सिफिलीस

4) हिब्रिओकेलोरी

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1) "पॉव्हर्टी अँन्ड अन्-ब्रिटीश रुल इन इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

A) दादाभाई नौरोजी ✅
B) लाला लजपतरॉय
C) व्ही. डि. सावरकर
D) लोकमान्य टिळक

2) सन 1962 मध्ये भारतावर चीनने हल्ला केला तेंव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते ?

A) व्ही. के कृष्णमेनन ✅
B) वाय. बी. चव्हाण
C) सरदार स्वर्णसिंग
D) बाबू जगजीवनराम 

3) पश्चिम बंगाल मधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे ? 

F) सिंगभूम
K) राणीगंज ✅
L) खेत्री
O) झरिया

4) तहसिलदार यांना निलंबीत करण्याचा अधिकार ____ यांना असतो, 

A) पंचायत समिती सभापती
B) जिल्हाधिकारी 
C) गट विकास अधिकारी
D) राज्यपाल ✅

नोट:-विभागीय आयुक्त तहसिलदारास निलंबित करू शकतात.....राज्यपाल त्यांना सेवेतून बडतर्फ करू शकतात.

5) सर्वात जुने आणि प्रसिद्ध मत्स्य महाविद्यालय कोणत्या राज्यात आहे ?

A) कर्नाटक ✅
B) महाराष्ट्र
C) आंध्र
D) तामिलनाडू

6) भारतामध्ये केंव्हापासून व्हॅट ह्या करप्रणालीची सुरवात झाली ?

A) 1 एप्रिल 2005 ✅
B) 1 एप्रिल 2003
C) 1 एप्रिल 2001
D) 1 एप्रिल 2002

6) शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेले मि. ओबामा हे अमेरिकेचे _ अध्यक्ष आहेत. 

A) पहिले 
B) दुसरे
C) तिसरे
D) चौथे  ✅

7) पहिल्या मुन मिशनमध्ये चंद्रावर पाण्याचा शोध लावणारा जगातील पहिला देश _ होय.

N) अमेरिका
K) रशिया
M) भारत ✅
H) चीन

8) 2010 मध्ये सर्वश्रेष्ठ लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली ?

A) व्ही. के. सिंग ✅
B) श्री रणजितसिंग
C) श्री गोपालन
D) श्री कर्तार सिंग

9.______ हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रान्तिकारक होय.

H) वि. दा. सावरकर 
O) वासुदेव बळवंत फडके ✅
L) दामोदर चाफेकर
S) अनंत कान्हेरे

10) भारतात 'मिश्र अर्थव्यवस्थेचा' पुरस्कार कोणी केला ?

उत्तर 👉पंडित जवाहरलाल नेहरू

14 December 2021

महाराष्ट्राला मागे टाकत गुजरात सर्वात मोठे उत्पादन केंद्र बनले.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अलीकडील अहवालानुसार, गुंतवणुक आणि व्यवसायात सातत्याने सुधारणा झाल्यामुळे गुजरात हे देशातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र बनले आहे.  


गुजरातने महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे.  RBI च्या मते, 2020 पर्यंत गुजरातचे सकल मूल्यवर्धित (GVA) सरासरी 15.9 टक्क्यांनी वाढून 5.11 लाख कोटी रुपये झाले आहे.  याच कालावधीत महाराष्ट्राचा GVA 7.5 टक्क्यांनी वाढून 4.34 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.  म्हणजेच आठ वर्षांचा सरासरी विकासदर गुजरातच्या निम्मा होता.  


गुंतवणुकीने गुजरातला मागे टाकण्यात मोठी भूमिका बजावली, जी 2012-2020 मध्ये 5.85 लाख कोटी रुपये होती.  याच काळात महाराष्ट्र 4.07 लाख कोटींची गुंतवणूक प्राप्त झाली.  


याशिवाय गुजरातमध्ये व्यवसाय परवाने देण्यासाठी एकच सुलभ कामगार कायदा आणि उत्पादनासाठी प्रोत्साहन योजना यासारख्या सुधारणांनीही मोठी भूमिका बजावली.  


सेवा क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आजही सेवा क्षेत्रात देशात आघाडीवर आहे.  राज्याचा सेवा GVA 2020 मध्ये वार्षिक सरासरी 12.6 टक्के दराने वाढून 15.1 लाख कोटी रुपये झाला. 


सेवा क्षेत्रात, तामिळनाडू रु. 3.43 लाख कोटींच्या GVA सह दुसऱ्या, कर्नाटक रु. 2.1 लाख कोटींसह तिसर्‍या स्थानावर आणि उत्तर प्रदेश रु. 1.87 लाख कोटींसह चौथ्या स्थानावर आहे.  2020 मध्ये देशातील एकूण उत्पादन GVA 16.9 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

आचारसंहिता संपताच लोकसेवा आयोगाच्या उमेदवारांना वाढीव संधीचा निर्णय



🔰वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेसाठी एक वाढीव संधी देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असला तरी विधान परिषद निवडणुकीमुळे शासन आदेश निघू शकलेला नाही.


🔰आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना वाढीव संधी देण्याचा शासन निर्णय काढला जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी माध्यमांना दिली. करोना परिस्थितीमुळे वयोमर्यादा ओलांडलेला एकही उमेदवार परीक्षा देण्यापासून वंचित राहणार नाही, सरकार त्यांच्या पाठिशी आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.


🔰आचारसंहितेमुळे शासन निर्णय लांबणीवर - करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे अनेक उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली गेली होती. करोनाच्या संकटामुळे हे घडल्याने वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारने ११ नोव्हेंबरला सर्व उमेदवारांना एमपीएससी परीक्षेकरिता एक वाढीव संधी देण्याचा निर्णय घेतला होता.


🔰मात्र, त्यानंतर काही दिवसांतच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. आचारसंहिता लागल्याने राज्य शासनाला या संदर्भातील शासन निर्णय काढता आला नाही, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे.


धर्माधारित फाळणी ही ऐतिहासिक चूक.



🔰भारताने १९७१ साली पाकिस्तानविरुद्धचे थेट युद्ध जिंकले आणि सध्या पाकिस्तानच्या प्रोत्साहनाने सुरू असलेल्या दहशतवादाविरुद्धचे अप्रत्यक्ष युद्धही भारत जिंकेल. ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र होताना भारताचे धर्माच्या नावावर झालेले विभाजन ही ‘ऐतिहासिक चूक’ होती हे १९७१च्या युद्धाने दाखवून दिले, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहेत.


🔰दहशतवादाला प्रोत्साहन देऊन आणि इतर भारतविरोधी कारवाया करून पाकिस्तान भारताचे तुकडे करू इच्छितो, असे भारताने १९७१ सालच्या युद्धात पाकिस्तानवर मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर्णिम विजय पर्वाच्या’ (सुवर्णमहोत्सवी समारंभ) उद्घाटन समारंभात केलेल्या भाषणात संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.


🔰भारताच्या सशस्त्र दलांनी १९७१च्या युद्धात पाकिस्तानचे सर्व मनसुबे धुळीला मिळवले आणि सध्या ते दहशतवादाचा धोका मुळापासून नष्ट करण्यासाठी काम करत आहेत. आम्ही प्रत्यक्ष युद्ध जिंकलो आणि आम्ही अप्रत्यक्ष युद्धही जिंकू अशी मी हमी देऊ शकतो, असे राजनाथ सिंह म्हणाले.

घटनेतील मूलभूत हक्क



♦️KEY POINTS TO REMEMBER


कलम 14 - समानता

कलम 15 - भेदभाव

कलम 16 - समान संधी

कलम 17 - अस्पृश्यता 

कलम 18 - किताब


कलम 19 - स्वातंत्र्य

कलम 20 - अपराध दोषसिद्धी

कलम 21 - जीवित व्यक्तिगत

कलम 21A - शिक्षण

कलम 22 - अटक स्थानबद्धता 


कलम 23 - वेठबिगारी मनाई

कमल 24 - बालकामगार मनाई


कलम 25 - धार्मिक आचरण

कलम 26 - धार्मिक संघटन

कलम 27 - धार्मिक कर

कलम 28 - धार्मिक शिक्षण


कलम 29 - अल्पसंख्याक हित संवर्धन

कलम 30 - अल्पसंख्याक शिक्षण


कलम 31 - रद्द (संपत्तीचा हक्क)


कलम 32 - घटनात्मक उपाययोजना


कलम 33 - सेनेच्या हक्कात बदल

कलम 34 - लष्करी कायदा

कलम 35 - संसदेला अधिकार

The Infinity Current



1. कोणते राज्य डिसेंबर 2021 मध्ये, भारतातील पहिले पूर्णपणे कोविड-19 लसीकरण झालेले राज्य 

बनले आहे?


1. हिमाचल प्रदेश

2. हरियाणा

3. मध्य प्रदेश

4. गुजरात


उत्तर- 1


------------------------------------------------------------


2. 6 डिसेंम्बर ह्या दिवशी भारत आणि कोणता देश मैत्री दिवस साजरा करणार आहे?


1. नेपाळ

2. बांग्लादेश

3. भूतान

4. म्यानमार


उत्तर- 2


------------------------------------------------------------


3. खालीलपैकी चुकीचे विधान निवडा


अ. अनन्या बन्सल हिने आशिया युवा पॅरालिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे 

ब. आशिया युवा पॅरालिम्पिक स्पर्धेत F-20 प्रकारात शॉटपुट मध्ये पहिले पदक जिंकले.

क. ही स्पर्धा बहरिनमधील मनामा येथे झाली आहे.

1. फक्त अ

2. फक्त ब

3. या आणि ब

4. एकही नाही


उत्तर- 1


Correct ans- अनन्या बन्सलने रौप्यपदक जिंकले आहे.


------------------------------------------------------------


4. कोणत्या राज्यसरकारने  महिलांसाठी बॅक टू वर्क योजना सुरू केली आहे?


1. मध्य प्रदेश

2. केरळ

3. झारखंड

4. राजस्थान


उत्तर- 4


------------------------------------------------------------


5. 21 व्या शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार आहेत?


1. फ्रांस

2. व्हिएतनाम

3. रशिया

4. अमेरिका


उत्तर- 3


------------------------------------------------------------


6. खालीलपैकी अचूक विधान निवडा


अ. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मुंबईतील नेव्हल येथे यार्ड 22 व्या क्षेपणास्त्र वेसल स्क्वाड्रनला राष्ट्रपती मानक प्रदान करण्यात येणार आहे.

ब. राष्ट्राला दिलेल्या सेवेबद्दल सर्वोच्च कामांडरने लष्करी तुकडीला दिलेला राष्ट्रपती मानक हा सर्वोच्च सन्मान आहे.

क.  वेसल स्क्वाड्रनला किलर्स नावाने ओळखले जाते.


1. अ, ब, क

2. अ, ब

3. ब, क

4. अ, क


उत्तर- 1


------------------------------------------------------------


7. ......या भारतीय-अमेरिकन गणितज्ञांना सिप्रियन फोयास पुरस्कार मिळाला आहे.


1. निखिल श्रीवास्तव

2. शकुंतला देवी

3. सी.एस. शेषाद्री

4. सी.आर.राव


उत्तर- 1


------------------------------------------------------------


8. इंडोनेशियन जावा बेटावर डिसेंम्बर 2021 मध्ये उद्रेक झालेल्या प्राणघातक ज्वालामुखीचे नाव काय आहे?


1. मौना लोआ

2. फुजियामा

3. सेमेरू

4. किलिमांजारो


उत्तर-3


------------------------------------------------------------


9. राष्ट्रीय पुनर्निर्मित कंपनी चे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती केली?


1. अंशुला कांत

2. प्रदिप शाह

3. सुनील मेहता

4.  सुनीत शर्मा


उत्तर- 2


------------------------------------------------------------


10. उत्तरप्रदेश मधील कोणत्या शहरांमध्ये दूरदर्शन केंद्राच्या अर्थ स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले?


1. कानपूर

2. फैजाबाद

3.लखीमपूर

4. गोरखपूर


उत्तर-4

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे


51) एनआरसी, सीएएविरोधात ठराव मांडणारी देशातली पहिली ग्रामपंचायत कोणती?

उत्तर : इसळक (जि. अहमदनगर)


52) मिड डे मिल रेशन पुरवणारे पहिले राज्य कोणते? उत्तर : मध्यप्रदेश


53) प्रत्येक जिल्हयात व्हेंटिलेटरसह बेड सुविधा देणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर :उत्तर प्रदेश


54) आफ्रिकन स्वाईन फ्ल्यूची भारतातील पहिली केस कोठे आढळली होती?

उत्तर : आसाम


55) एफआयआर आपके द्वार ही अभिनव योजना सुरु करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर :मध्य प्रदेश


56) भारतात पहिला कोरोना रुग्ण कोठे आढळला होता?

उत्तर : 30 जानेवारी 2020 लाख केरळ येथे.


57) भारतात सर्वात पहिल्यांदा जनता कर्फ्यू केव्हा लावला होता?

उत्तर : 22 मार्च 2020


58) भारत चीन वाद केव्हा झाला?

उत्तर : 17 जून 2020


59) राम मंदिर चे पूजन केव्हा झाले होते?

उत्तर : पाच ऑगस्ट 2020.


60) महात्मा गांधी यांना बापू ही उपाधी कोणी दिली?

उत्तर : सरोजिनी नायडू

 

भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या.

चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) :-

✍चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली..

साराबंधी चळवळ (सन 1918) :-

✍ 1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्‍याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत.. गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली..

✍ शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला. हा गांधीजीचा दूसरा विजय होता..

रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) :-

✍ भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला..

✍या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता..

✍या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय
बंद होय..

✍13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली.. या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्‍याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.

मोर्ले-मिंटो अधिनियम 1909

🅾लॉर्ड मिंटोची व्हॉईसरॉय पदी निवड झाल्याने संपूर्ण भारत हा राजकीय अशांततेकडे जाताना दिसला.

🅾 त्यामुळे तत्कालीन भारतमंत्री मोर्ले व व्हॉईसरॉय मिंटो यांनी मिळून भारत सरकार अधिनियम पारित 1909 ला पारित केले.

🅾 यानुसार प्रांतीय विधानमंडळाचे आकार व सदस्यसंख्या व अधिकार वाढवण्यात येतील.

🅾 भारतीयांना प्रस्ताव दाखल करणे त्यावर प्रश्न विचारानेही हि तरतूद प्राप्त झाली.

🅾मुसलमानांकरिता स्वातंत्र्य मतदार संघाची निर्मिती करण्यात आली.

🅾 ज्याचा उद्देश राष्ट्रीय आंदोलनामध्ये फूट पाडणे असा होता. या अधिनियमावरच भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर टीका केली.

🅾 जहालवादी व क्रांतिकारी लोकांनी मोठ्या प्रमाणात आपले कार्य करण्याची सुरुवात केली.

🅾 भारत सरकारने 1911 मध्ये राष्ट्रद्रोह अधिनियम पारित केला.

🅾 यानुसार जहालवादी नेता लालालाजपत राय व अजित सिंह यांना अटक करण्यात आली.

🅾 याचवर्षी इंग्लंडचा सम्राट जॉर्ज पंचमच्या स्वागताकरिता भव्य दिल्ली दरबारचे आयोजन करण्यात आले होते.

🧩 1919 मॉन्टेग्यु चेम्सफोर्ड अधिनियम:-

🅾 मॉन्टेग्यु हा भारतमंत्री व चेम्सफोर्ड हा व्हॉईसरॉय होता.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

🅾 पहिल्यांदा द्विदल शासन पद्धत चालू करण्यात आली.

🅾 व्हॉईसरॉयच्या कॉउंसिल मध्ये ६ सदस्य ठेवण्यात आले. त्यापैकी ३ पदे भारतीयांना प्राप्त झाले.

🅾 शीख, ख्रिश्चन व अँग्लो इंडियन यांना वेगळे मतदार संघ प्राप्त झाले.

🅾 प्रॉपर्टी टॅक्स व एज्युकेशन टॅक्स लागू करण्यात आला.

🅾 भारतीयांकरिता एक हायकमिशनचे ऑफिस लंडन या ठिकाणी बनवण्यात आले.

🅾 लोकसेवा आयोगाची स्थापना व त्याचे पूर्ण बांधकाम 1926 मध्ये पूर्ण झाले.

राष्ट्रगीत (National Anthem)

- राष्ट्रगीत (National Anthem) : रविंद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिलेले ‘ जन-गण-मन ’ या गाण्याच्या हिंदी रुपांतरनाचे संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून स्विकार केला.

- २७ डिसेंबर १९११ रोजी भारतीय कोंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले.

- राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे असून हे गीत पूर्णपणे ५२ सेकंदामध्ये म्हणण्याची प्रथा आहे.

- काही वेळेस हे गीत संक्षिप्त रुपात गायले जाते त्याचा कालावधी २० सेकंद आहे.

- जन-गण-मन हे गीत पहिल्यांदा जानेवारी १९१२ मध्ये ‘ भारत विधाता ’ या शीर्षकाखाली ‘ तत्व बोधिनी ’ पत्रिकेमध्ये छापले गेले होते.

- १९१९ मध्ये या गीताचे इंग्रजीमध्ये रुपांतरण करून ‘ Morning song of India ’ या नावाने छापले गेले.

- राष्ट्रीय गीत (National Song ) : बंकिमचंद्र चटर्जी यांचे ‘ वंदे मातरम ’ हे संस्कृतमधील गीत स्वातंत्र्य लढ्यातील लोकांसाठी प्रेरणेचे स्त्रोत होते.

- राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यांना समान दर्जा आहे.

- १८९६ च्या भारतीय कोंग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले होते.

- बंकिमचंद्र चटर्जी यांच्या १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘ आनंदमठ ’ या कादंबरीतून घेतले असून याचे इंग्रजीमध्ये भाषांतर श्री. अरबिंदो यांनी केले आहे.

प्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान.

🅾दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला. प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे होते.

🅾परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे. तो दयाळू आहे. तो सर्वांवर प्रेम करतो.

🅾सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गानेच गेल्यानंतर तो प्रसन्न होतो.

🅾प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते.

🅾परमेश्वर अवतार घेत नाही. त्याने कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही.

🅾मूर्तिपूजा परमेश्वरास मान्य नाही.

🅾सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. म्हणूनच सर्वांनी बंधुत्त्वाच्या भावनेने एकमेकांशी व्यवहार करावा.

🧩प्रार्थना समाजाचे कार्.

🅾प्रार्थना समाजाने अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह इत्यादी क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली. श्री. आर. जी. भांडारकर व न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजाचे मुख्य आधारस्तंभ होते.

🅾न्या. रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन भारतीय जनतेत राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी विधवा विवाह मंडळ स्थापन केले.

🅾ना. म. जोशी यांनी “सोशल सर्व्हिस लीग” स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले.

🅾देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी “सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटी” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निर्मूलनच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

🅾अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

🅾प्रार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे “अनाथ बालकाश्रम” काढण्यात आला. समाजाच्या गरजेच्या दृष्टीने ही भरीव कामगिरी होती.

🅾मुलींच्यासाठी स्वतंत्र शाळा सुरु केल्या. “आर्य महिला समाज” ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था चालू करण्यात आली.

🅾४ मे १८७३ रोजी प्रार्थना समाजाने “सुबोध पत्रिका” हे त्यांचे मुखपत्र सुरु केले होते. या मुखपत्रातून सामाजिक व राजकीय विचार मांडले जात होते.

🅾मजुरांच्यासाठी पहिली रात्रशाळा मुंबईमधील चेऊलवाडी येथे भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांच्या पुढाकाराने इ. स. १८७६ मध्ये काढण्यात आली होती. त्यानंतर मुंबईच्या इतर भागात देखील रात्रशाळा काढण्यात आल्या.

🅾इ. स. १८९० रोजी मुंबईतील मदनपुरा येथे अस्पृश्यांसाठी शाळा काढण्यात आली.

🅾इ. स. १८७६-७७ च्या दुष्काळाच्या वर्षी प्रार्थना समाजाने दुष्काळ पीडितांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले होते. अशा रीतीने प्रार्थना समाजाने एक भरीव सामाजिक कार्य केल्याचे आढळते.

🅾प्रार्थना समाजाची तत्वे पटवून देण्यासाठी, या समाजाबद्दल लोकांना असलेल्या निरनिराळ्या शंकाचे निरसन करण्यासाठी न्या. रानडे यांनी “एकेश्वरनिष्ठांची कैफियत” हा विचार प्रवर्तक ग्रंथ लिहीला.

🧩प्रार्थना समाजाच्या कार्याचे मूल्यमापन..

🅾प्रार्थना समाजाला चांगले नेतृत्व लाभूनही ठराविक शहरापुरतेच त्याचे कार्य पोहचू शकले. त्याचे कारण म्हणजे त्यातील सुधारक मिशनऱ्यांचे अनुकरण करीत होते. त्यामुळे हिंदूना त्यांच्या कार्याविषयी कधीच आपुलकी वाटली नाही.

महात्मा गांधीजीं बाबत संबोधन

१. महात्मा - रविंद्रनाथ टागोर व स्वामी श्रद्धानंद

२. बापू - सरोजिनी नायडू

३. भारतीय राजनीतीचा बच्चा - अॅनी बेझंट

४. राष्ट्रपिता - सुभाषचंद्र बोस

५. मलंग बाबा - खान अब्दुल गफार खान

६. देशद्रोही फकीर - विन्स्टन चर्चिल

७. अर्धनंगे फकीर - फॅन्क मारेश

८. इमानदार परंतु बोल्शेव्हिक - लॉर्ड विलिंग्टन

९. अर्धनग्न विणकर - विल ड्युरॅन्ड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सराव  प्रश्नमालिका


1. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली?
सिंगापूर
टोकिओ
रंगून 
बर्लिन

● उत्तर - सिंगापूर

2. इंडिया इंडिपेंडन्स लीगची (भारतीय स्वातंत्र्य संघाची) स्थापना कोणी केली?
सुभाषचंद्र बोस 
रासबिहारी बोस
जगन्नाथराव भोसले
कॅप्टन मोहन सिंग

● उत्तर - रासबिहारी बोस

3. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?
संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ
संत तुकाराम
संत नामदेव

● उत्तर - संत एकनाथ

4. ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ कोणता?
ज्ञानेश्ररीची शुध्द प्रत
भावार्थ रामायण
मनाचे श्लोक
ज्ञानेश्वरी
● उत्तर - ज्ञानेश्वरी

5. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?
तात्या टोपे
राणी लक्ष्मीबाई 
शिवाजी महाराज 
नानासाहेब पेशवे

● उत्तर - तात्या टोपे

6. भारतात आल्यानंतर गांधीजीनी पहिली चळवळ कोठे घडवून आणली?
बाडोंली
खेडा
चंपारण्य
चौरीचौरा

● उत्तर - चंपारण्य

7. पुणे समाचार हे दैनिक कोणी सुरू केले?
बाबा पद्मजी
गो.ग. आगरकर
शि.म. परांजपे
श्रीधर व्यंकटेश केतकर

● उत्तर - श्रीधर व्यंकटेश केतकर

8. अक्कलकोटच्या युवराजांना शिकवण्यासाठी सरकारने कोणाची नेमणूक केली हाती?
नाना जगन्नाथ शंकरशेठ
बाळशास्त्री जांभेकर
विष्णूशास्त्री पंडित
विष्णूबुवा ब्रह्मचारी

● उत्तर - बाळशास्त्री जांभेकर

9. खालीलपैकी योग्य जोडी कोणती?
बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल 
असहकार चळवळ - लोकमान्य टिळक
चंपारण्य सत्याग्रह - गो. कृ. गोखले
रामकृष्ण मिशन - दयानंद सरस्वती

● उत्तर - बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल

10. र्इष्ट असेल ते बोलणार,  साध्य असेल ते करणार हे कोणत्या नियतकालिकाचे ब्रीदवाक्य?
केसरी
मराठा
ज्ञानोदय
सुधारक (गो.ग आगरकर)

● उत्तर - सुधारक (गो.ग आगरकर)

🔸🔹

प्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान.

🅾दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला. प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे होते.

🅾परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे. तो दयाळू आहे. तो सर्वांवर प्रेम करतो.

🅾सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गानेच गेल्यानंतर तो प्रसन्न होतो.

🅾प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते.

🅾परमेश्वर अवतार घेत नाही. त्याने कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही.

🅾मूर्तिपूजा परमेश्वरास मान्य नाही.

🅾सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. म्हणूनच सर्वांनी बंधुत्त्वाच्या भावनेने एकमेकांशी व्यवहार करावा.

🧩प्रार्थना समाजाचे कार्.

🅾प्रार्थना समाजाने अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह इत्यादी क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली. श्री. आर. जी. भांडारकर व न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजाचे मुख्य आधारस्तंभ होते.

🅾न्या. रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन भारतीय जनतेत राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी विधवा विवाह मंडळ स्थापन केले.

🅾ना. म. जोशी यांनी “सोशल सर्व्हिस लीग” स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले.

🅾देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी “सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटी” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निर्मूलनच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

🅾अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

🅾प्रार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे “अनाथ बालकाश्रम” काढण्यात आला. समाजाच्या गरजेच्या दृष्टीने ही भरीव कामगिरी होती.

🅾मुलींच्यासाठी स्वतंत्र शाळा सुरु केल्या. “आर्य महिला समाज” ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था चालू करण्यात आली.

🅾४ मे १८७३ रोजी प्रार्थना समाजाने “सुबोध पत्रिका” हे त्यांचे मुखपत्र सुरु केले होते. या मुखपत्रातून सामाजिक व राजकीय विचार मांडले जात होते.

🅾मजुरांच्यासाठी पहिली रात्रशाळा मुंबईमधील चेऊलवाडी येथे भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांच्या पुढाकाराने इ. स. १८७६ मध्ये काढण्यात आली होती. त्यानंतर मुंबईच्या इतर भागात देखील रात्रशाळा काढण्यात आल्या.

🅾इ. स. १८९० रोजी मुंबईतील मदनपुरा येथे अस्पृश्यांसाठी शाळा काढण्यात आली.

🅾इ. स. १८७६-७७ च्या दुष्काळाच्या वर्षी प्रार्थना समाजाने दुष्काळ पीडितांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले होते. अशा रीतीने प्रार्थना समाजाने एक भरीव सामाजिक कार्य केल्याचे आढळते.

🅾प्रार्थना समाजाची तत्वे पटवून देण्यासाठी, या समाजाबद्दल लोकांना असलेल्या निरनिराळ्या शंकाचे निरसन करण्यासाठी न्या. रानडे यांनी “एकेश्वरनिष्ठांची कैफियत” हा विचार प्रवर्तक ग्रंथ लिहीला.

🧩प्रार्थना समाजाच्या कार्याचे मूल्यमापन..

🅾प्रार्थना समाजाला चांगले नेतृत्व लाभूनही ठराविक शहरापुरतेच त्याचे कार्य पोहचू शकले. त्याचे कारण म्हणजे त्यातील सुधारक मिशनऱ्यांचे अनुकरण करीत होते. त्यामुळे हिंदूना त्यांच्या कार्याविषयी कधीच आपुलकी वाटली नाही.