०३ ऑक्टोबर २०२४

BIS Recruitment 2024


BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्या जागांसाठी भरती प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आली असून या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. भारतीय मानक ब्युरो मध्ये ऑफिसर पदाच्या भरतीसाठी उमेदवारांसाठी एक चांगली सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले असून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे.



भारतीय मानक ब्युरो अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व माहिती पुढीलप्रमाणे दर्शवलेली आहे यामध्ये पदाचे नाव, पदांची संख्या, जाहिरात क्रमांक, वयाची मर्यादा, नोकरी ठिकाण ,महत्त्वाच्या तारखा ,ऑनलाइन अर्ज कसा करायचा, परीक्षा शुल्क, वेतन श्रेणी, निवड प्रक्रिया, या सर्व बाबींची माहिती पुढीलप्रमाणे दिलेली आहे इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी सर्व माहिती सविस्तरपणे काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करायचा.


BIS Recruitment 2024 Notification

👉पदाचे नाव (Name Of The Posts) : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी पुढील पदांची पदभरती होणार आहे. पदाचे नाव आणि पुढील प्रमाणे –


असिस्टंट डायरेक्टर ( ऍडमिनिस्ट्रेशन आणि फायनान्स) : 01

असिस्टंट डायरेक्टर ( मार्केटिंग आणि अफेअर्स) : 01

असिस्टंट डायरेक्टर ( हिंदी) : 01

पर्सनल असिस्टंट : 27

असिस्टंट सेक्शन ऑफिसर : 43

असिस्टंट (Computer Aided Design) : 01

स्टेनोग्राफर ; 19

सीनियर सिक्रेट रिअल असिस्टंट : 128

जूनियर सेक्रेटरी असिस्टंट : 78

टेक्निकल असिस्टंट (Laboratory) : 27

सीनियर टेक्निशियन ; 18

टेक्निशियन ( इलेक्ट्रिशियन/ वायरमन) : 01

✍️पदांची संख्या (Total Posts ) : या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 पदांची पदभरती होणार आहे.


📒शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत होणाऱ्या नोकरी भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता हे पदानुसार विविध आहे. पुढील प्रमाणे –


पद क्रमांक 1 : CA/CWA/MBA/ (Finance) + 03 वर्षाचा अनुभव

पद क्रमांक 2 : एमबीए मार्केटिंग किंवा मास कम्युनिकेशन मधील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा पाच वर्षाचा अनुभव

पद क्रमांक 3 : हिंदी/ इंग्रजी पदव्युत्तर पदवी आणि 05 वर्षाचा अनुभव

पद क्रमांक 4 : पदवीधर

कृपया अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक पहा.


✈️ नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत


✅वयाची अट (Age Limit) : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांचे वयाची मर्यादा पुढीलप्रमाणे दिलेली आहे.


पद क्रमांक 1 ते 3 : 18 ते 35 वर्षे

पद क्रमांक : 4 ते 6 आणि 10 : 18 ते 30 वर्षे

पद क्रमांक 7 ते 9, 11 & 12 : 18 ते 27 वर्षापर्यंत

👉 अर्ज पद्धत : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज करावा इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.


BIS Recruitment 2024 Qualification

💵अर्ज शुल्क (Fees) : या भरतीसाठी पुढीलप्रमाणे अर्ज शुल्क आहे.


पद क्रमांक 1 ते 3 ; जनरल/OBC : 800/-

पद क्रमांक 4 ते 12 : जनरल/ ओबीसी : ₹500/-

(SC/ST/PWD/ महिला ; शुल्क नाही)


👉निवड प्रक्रिया (Selection Process) : – या नोकरीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे.


💵 वेतन / पगार (Pay Scale ) : या भरती प्रक्रियेमध्ये अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना 19,900 ते 1,77,500 इतका पगार प्रति महिना दिला जाणार आहे. तसेच इतर आवश्यक असणारे भत्ते सुद्धा मिळणार आहेत,


✅ परीक्षा (Exam) : नंतर कळवण्यात येईल


📒जाहिरात PDF येथे क्लिक करा 

✅अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

👉ऑनलाइन अर्ज करा येथे क्लिक करा 

BIS Recruitment 2024 Apply Online Last Date

👉ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last Date of Online Application) : भारतीय मानक ब्युरो मध्ये होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.


BIS Recruitment 2024 Apply Online

भारतीय मानक ब्युरो मध्ये होणाऱ्या नोकरी भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

ऑनलाइन अर्जामध्ये उमेदवारांनी सर्व माहिती सविस्तरपणे काळजीपूर्वक भरायचे आहे.

तसेच आवश्यक असणारे कागदपत्रे अपलोड करावयाचे आहेत.

भारतीय मानक ब्यूरो मध्ये

सरनाम्यासंबंधित खटले

☀️प्रस्ताविका घटनेचा भाग आहे की नाही याबाबत विवाद निर्माण झाला होता.


☀️याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे खटले :-


⭐️1) बेरूबारी युनियन खटला (1960):-

    💡(कलम 143 अंतर्गत सल्ला)

    💡प्रस्ताविका➡️ घटनेचा भाग 😀

                               त्यामुळे दुरुस्ती😀


⭐️केशवानंद भारती खटला (1973):-

        💡प्रस्ताविका ➡️घटनेचा भाग ✅

                               ➡️दुरुस्ती शक्य✅

(मूलभूत संरचना न बदलता कलम 368 अंतर्गत शक्य आहे.)


⭐️3)एलआयसी ऑफ इंडिया खटला (1995):- 

       💡प्रस्ताविका➡️अविभाज्य भाग✅

                          ➡️दुरुस्ती करता येते✅


⭐️सरनामाबाबत लक्षात असू द्या  :-


📌USA 1st to have Preamble संकल्पना USA घटनेवरून

💫Start USA WE,THE PEOPLE

💫Start IND WE, THE PEOPLE


⭐️संविधान समितीत :-


🔴ठराव - 13 Dec 1946 - पं. ज. नेहरू

🔴अनुमोदन- पुरुषोत्तमदास टंडन

🔴पारित- 22 Jan 1947

🔴दि.26 Nov 1949 ला स्विकृत

[National law day -1979-2015; Constitution Day -2015 पासून]


💡दुरुस्ती :-

💫42th CAA-18 Dec 1976

                🔴Secularism (धर्मनिरपेक्ष)

                🔴Socialist (समाजवाद)

                🔴Integrity (एकात्मता)

🔓CAA लागू - 3 Jan 1977


➡️सरनामाबद्दल Thinker आणि त्यांची मते :-


✅गांधीजी- "माझ्या स्वप्नातील भारत"

✅पालखीवला -"राज्य घटनेचा ओळखपत्र"

✅P. T. भार्गव-" राज्यघटनेचा आत्मा, गुरुकिल्ली, आभूषण, गद्यकाव्य, मौल्यवान, स्थान केंद्रभागी"

✅मा.CJI सिक्री-"राज्यघटनेचा अंत्यत महत्वपूर्ण भाग"

✅अल्लादी कृष्णस्वामी अयर-"दिर्घकालीन स्वप्न"

✅K.M.मुन्सी-"राजकीय कुंडली, HOROSCOPE"

✅हिदायतुल्लाह -"एक दृढ निश्चय, क्रांतिच बदलू शकेल"

✅J.B. कृपलानी-"अचंबीत तत्वे"

✅अर्नेस्ट बार्कर-"मुख्य तत्व,The Key-कुंजी नोट"


प्रस्ताविका/ सरनामा/ उद्देशपत्रिका


              (PREAMBLE)

- सरनामा म्हणजे, "राज्यघटनेची प्रारंभिक माहिती".

- संविधान ज्या तत्त्वज्ञानावर आधारलेले आहे ते तत्वज्ञान सरनाम्यात समाविष्ट आहे.

- जगात सर्वप्रथम "अमेरिका" राष्ट्राच्या घटनेत सरनामा लिहिला गेला.

- भारताने  आपल्या घटनेत सरनामा असावा ही बाब "अमेरिकेकडून" स्वीकारली.

- 1919 चा भारत सरकार कायदा (माँटफर्ड) याला सरनामा होता. मात्र 1935 च्या कायद्याला सरनामा नव्हता.

- पं जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव मांडला. हा ठराव घटनासमिती समोरचा दिशादर्शक होता.

- हा ठराव घटनासमितीने 22 जानेवारी 1947 ला बिनविरोधपणे संमत केला.

- हा उद्दिष्टांचा ठराव म्हणजे सरनामा नाही. मात्र सरनामा हा या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे.

- 22 जानेवारी ला उद्दिष्टांचा ठराव जरी संमत झाला असेल. तरी मूळ सरनामा हा  घटना संमत झाल्यावर संमत  करण्यात आला.

- भारतीय सरनाम्याची सुरुवात "आम्ही भारताचे लोक" तर अमेरिकेच्या सरनाम्याची सुरुवात ही आम्ही अमेरिकेचे लोक अशी आहे.

:
1) उद्दिष्टांचा ठराव मांडला ?
    - पं. नेहरू

2) उद्दिष्टांचा ठराव मांडला तो दिनांक ?
    - 13 डिसेंबर 1946

3) उद्दिष्टांचा ठराव स्वीकारला?
    - 22 जानेवारी 1947

4) सरनामा असावा हा आदर्श कोणाचा किंवा सरनामा असलेली जगातील पहिले संविधान?
  - अमेरिका

पोलीस भरती सराव प्रश्न


Q1.भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये कोणत्या राज्यातील आदिवासी भागांच्या संदर्भात विशेष प्रशासकीय तरतुदी आहेत?

उत्तर :- आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम


Q2. कर्कवृत्त कोणत्या देशातून जात नाही?

उत्तर :- नेपाळ


Q3. अन्न आणि कृषी संघटना (FAO) चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?

उत्तर :-  रोम, इटली


Q4. ऑलिम्पिक इतिहासात सर्वाधिक सुवर्णपदके कोणाकडे आहेत?

उत्तर :- लारिसा लॅटिनिना


Q5. खालीलपैकी कोणता स्त्रोत मौर्य साम्राज्याच्या नगर प्रशासनाची तपशीलवार माहिती देतो?

उत्तर :- मेगास्थनीज इंडिका


Q6. मीराबाई चानू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

उत्तर :- भारतोलन


Q7. भारताच्या 2011 च्या जनगणनेचे बोधवाक्य खालीलपैकी कोणते होते?उत्तर :- आपली जनगणना, आपले भविष्य


Q8. भारतातील वनक्षेत्राची टक्केवारी अंदाजे किती टक्के आहे?

उत्तर :-  24%


Q9. __च्या नमुन्यासाठी लीड क्रोमेटची चाचणी घेतली जाते.

उत्तर :- हळद पावडर


Q10. भारताच्या राज्यघटनेत ____ मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देणे समाविष्ट आहे.

उत्तर :- राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे

भारतीय राज्यघटनेची प्रमुख व महत्त्वाची वैशिष्ट्ये – भारतीय राज्यघटनेतील तरतुदींचे महत्त्वाचे स्त्रोत पुढीलप्रमाणे…

भारतीय राज्यघटनेची प्रमुख व महत्त्वाची वैशिष्ट्ये –
महत्वाचे मुद्दे
भारतीय राज्यघटनेची प्रमुख व महत्त्वाची वैशिष्ट्ये –
भारतीय राज्यघटनेतील तरतुदींचे महत्त्वाचे स्त्रोत ....

१) लिखित घटना

भारतीय राज्यघटनेचे स्वरूप लिखित आहे. लिखित घटना एका निश्चित वेळी तयार केली जाते व एका निश्चित तारखेपासून अधिनियमात व अमलात येते.

भारतीय राज्यघटनेचे स्वरूप लिखित आहे मात्र ब्रिटनची राज्यघटना अलिखित स्वरुपाची आहे.

सध्या भारताच्या घटनेत २५ भाग ४६१ कलमे आणि १२ अनुसूची आहेत. अमेरिकेच्या राज्यघटनेची तुलना करावयाचे झाल्यास अमेरिकेच्या घटनेत केवळ ७ कलमे आहेत.

भारतीय घटना विस्तृत का?

भारतीय घटनेमध्ये जगातील विविध देशांच्या घटनांचा अभ्यास करून चांगल्या वैशिष्ट्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये केला असल्यामुळे घटना विस्तृत झाली आहे.

देशाच्या प्रशासनाचे तपशीलवार विवेचन भारतीय राज्यघटनेमध्ये आहे.

केंद्र व राज्याची सामायिक एकच घटना असल्यामुळे घटनेचा विस्तार वाढला आहे.

कलम ३७० कलम ३७१ ते कलम ३७१ (J) मध्ये राज्यांची संबंधित विशेष तरतुदी देण्यात आल्या आहेत.
भारतीय संघराज्य व्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र-राज्य संबंध तपशीलवार देण्यात आले आहेत.
मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्त्वे मूलभूत कर्तव्य यांचे विस्तृत स्पष्टीकरण घटनेमध्ये भर घालते.
इतर देशांच्या घटनांचा अभ्यास व त्या या देशातील महत्त्वाच्या कलमांचा अंतर्भाव यामुळे भारतीय राज्यघटनेचा आकार वाढला आहे.

२) राज्यघटनेचे विविध स्त्रोत rajyaghatanechi vaishishte

सुमारे ६० देशांच्या घटनांचा विचार करून त्यातील महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश भारतीय घटनेमध्ये करण्यात आलेला आहे.

भारत सरकार कायदा १९३५ नुसार भारतीय राज्यघटनेचा संरचनात्मक आराखडा मांडण्यात आलेला आहे या कायद्यातील सुमारे २५० तरतुदी स्वीकारण्यात आल्या आहेत.

घटनेचा तात्विक भाग म्हणजे मूलभूत हक्क हे अमेरिकेच्या घटनेवरून स्वीकारण्यात आले आहेत तर मार्गदर्शक तत्वे आयरिश घटनेवरून घेण्यात आले आहेत.

घटनेच्या राजकीय भागाचा विचार करता ब्रिटनच्या घटनेवर आधारलेली संसदीय शासन व्यवस्था भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेली आहे.

कॅनडा जर्मनी फ्रान्स जपान दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया रशिया इत्यादी देशांच्या घटनेचा प्रभाव भारतीय राज्यघटने वरती दिसून येतो. याच कारणामुळे भारतीय राज्यघटनेला उसनी घटना(Borrowed Constitution), ठीगळांचे कार्य(patchwork), पश्चिमेचे अनुकरण(slavish imitation of the west), अशा टीका केल्या जातात. मात्र यामध्ये भारतीय परिस्थितीला अनुसरून त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे म्हणून हे सुंदर ठिकाणांचे कार्य आहे असे संबोधले जाते.

भारतीय राज्यघटनेतील तरतुदींचे महत्त्वाचे स्त्रोत पुढीलप्रमाणे…

भारत सरकार कायदा १९३५ – भारत सरकारच्या १९३५ च्या कायद्यानुसार संघराज्य व्यवस्था, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद, प्रशासकीय तपशील इत्यादी भाग स्वीकारण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटना ही मूलतः भारत सरकार कायदा १९३५ वर आधारित आहे. rajyaghatanechi vaishishte
ब्रिटिश घटना – संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट, द्विगृही संसद, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व आणि विशेषाधिकार हे ब्रिटिश घटनेवरून स्वीकारण्यात आले आहेत.

अमेरिकेची घटना – मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपती वरील महाभियोग, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पदावरून दूर करण्याची पद्धत याबाबी अमेरिकेच्या घटनेवरून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.

कॅनडा ची घटना – प्रभावी केंद्र असलेले संघराज्य शेषाधिकार, राज्यपालाची नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकारक्षेत्र या बाबी कॅनडाच्या घटनेवरून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.
आयरिश घटना – मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतींची निवडणूक, राज्यसभेतील सदस्यांचे नामनिर्देशन या बाबी आयरिश घटनेवरून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाची घटना – समवर्ती सूची, संयुक्त बैठक, व्यापार व वाणिज्य चे स्वातंत्र्य या बाबी ऑस्ट्रेलियाच्या घटनेचा अभ्यास करून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.
जपानची घटना – कायद्याने प्रस्थापित पद्धत
सोवियत रशिया ची घटना – मूलभूत कर्तव्य, प्रस्ताविकातील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श

वेईमर घटना (जर्मनी) – आणीबाणीच्या कालावधीतील तरतुदी व मूलभूत हक्कांमध्ये होणारा बदल
दक्षिण आफ्रिका – घटना दुरुस्ती ची पद्धत, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक
फ्रान्सची घटना – गणराज्य, प्रास्ताविकेल स्वातंत्र्य, समता, बंधुता या गोष्टी फ्रान्सच्या घटनेवरून घेण्यात आलेल्या आहेत.

३) संघराज्य व्यवस्था (rajyaghatanechi vaishishte) – भारतीय घटनेने संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे संघराज्य व्यवस्थेची वैशिष्ट्ये आपल्या घटनेमध्ये आढळतात. केंद्र व घटक राज्य सरकारांचे अस्तित्व, अधिकारांची विभागणी, घटनेची स्वच्छता घटनेची ताठरता स्वतंत्र न्याय व्यवस्था द्विगृही कायदे मंडळ इत्यादी.

घटनेमध्ये गैर संघात्मक किंवा एकात्मक वैशिष्ट्ये ही आढळतात. त्यामध्ये प्रभावी केंद्रशासन एकच घटना एकेरी नागरिकत्व घटनेची लवचिकता एकात्मिक न्यायव्यवस्था अखिल भारतीय सेवा.

म्हणूनच भारतीय राज्यघटनेचे वर्णन अर्ध-संघराज्यीय (k.c. व्हेअर), वाटाघाटीचे संघराज्य (मॉरीस जोन्स) सहकारी संघराज्य (ऑस्टिन), केंद्रीकरण्याची प्रवृत्ती असलेले संघराज्य (इवोर जिनिंग)

४) संसदीय शासन पध्दती (rajyaghatanechi vaishishte)

भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार ब्रिटनच्या घटनेवरून केलेला आहे. अध्यक्षीय शासन व्यवस्थेत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ पूर्णपणे विभक्त असतात मात्र संसदीय शासन व्यवस्थेमध्ये यांच्यामध्ये समन्वय व सहकार्य असते.

संसदीय शासन व्यवस्थेमध्ये मंत्रिमंडळाचे निवड कायदे मंडळाच्या सदस्याकडून केली जाते व मंत्रिमंडळ म्हणजेच कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असते. राष्ट्रप्रमुख हे नामधारी कार्यकारी प्रमुख असतात तर शासन प्रमुख हे वास्तव कार्यकारी प्रमुख असतात.

भारतीय संसदीय शासन व्यवस्थेची वैशिष्ट्ये
राष्ट्रपती नामधारी प्रमुख पंतप्रधान वास्तव प्रमुख
मंत्री कायदेमंडळाच्या सदस्य असणे.

मंत्रिमंडळाची कायदेमंडळा प्रति जबाबदारी
कनिष्ठ सभागृह चे विसर्जन
बहुमताचे सरकार
या वैशिष्ट्यामुळे संसदीय शासन व्यवस्थेला जबाबदार शासन व्यवस्था किंवा कॅबिनेट शासन व्यवस्था असेही म्हणतात. या व्यवस्थेमध्ये पंतप्रधानांची भूमिका महत्त्वाचे असल्याने पंतप्रधान शासनव्यवस्था असेही म्हटले जाते.

भारतीय संसदीय शासन व्यवस्था व ब्रिटिश संसदीय शासन व्यवस्थेमध्ये मूलभूत फरक आहे ब्रिटिश पार्लमेंट प्रमाणे भारतीय संसद सार्वभौम संस्थां नाही.

भारतीय राज्यसंस्था ही एक गणराज्य आहे व ब्रिटिश राज्यसंस्था ही राजेशाही आहे.

५) ताठर व लवचिक (rajyaghatanechi vaishishte)

भारताची राज्यघटना अति ताठर ही नाही व अति लवचिकही नाही यामुळे ताठरता व लवचिकता याचे एकत्रीकरण भारतीय राज्यघटनेमध्ये दिसून येते. ताठर घटनेची घटना दुरुस्ती पद्धत कठीण असते उलट लवचिक घटनेची घटना दुरुस्ती सोपी असते.

भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 मध्ये घटना दुरुस्ती ची पद्धती देण्यात आली आहे.

घटनेच्या काही तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता असते.

घटनेतील संघराज्याची वैशिष्ट्ये यामध्ये बदल करण्यासाठी वरीलप्रमाणे विशेष बहुमता बरोबरच निम्म्या राज्यांचे समर्थन आवश्यक असते.

या पद्धतीने घटना दुरुस्ती करणे अवघड असल्याने घटना ताठर मानली जाते. मात्र घटनेच्या काही तरतुदी मध्ये केवळ साध्या बहुमताने बदल करता येतो याबाबतीत घटना लवचिक आहेत.

६) संसदीय सार्वभौमत्व व न्यायिक सर्वोच्चता याचे संतुलन (rajyaghatanechi vaishishte) – भारतीय राज्यघटनेत कायदे मंडळ व न्याय मंडळ यांच्यामध्ये अधिकाराबाबत योग्य संतुलन राखण्यात आले आहे. संसदेला कायदा व घटना दुरुस्ती करण्याचे अधिकार आहेत आणि संसदेने केलेले कायदे घटनादुरुस्त्या घटनात्मक आहेत किंवा नाहीत हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयांना आहे. यात न्यायालयांना सर्वोच्चता आहे. म्हणजेच भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा सर्वोच्च नाही तर दोघांच्या अधिकारांमध्ये संतुलन निर्माण करण्यात आलेले आहे. केशवानंद भारती खटला 1973 नुसार असे संतुलन निर्धारित करण्यात आले.

७) स्वतंत्र व एकात्मिक न्यायव्यवस्था – (rajyaghatanechi vaishishte)

भारताच्या घटनेने कायदेमंडळ कार्यकारी मंडळ यांच्याबाबतीत संघराज्य व्यवस्था निर्माण केलेली आहे मात्र न्याय व्यवस्था एकात्मिक ठेवण्यात आली आहे. एकात्मिक न्यायव्यवस्थेत सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय अशी क्रमबद्ध शृंखला आहे. भारताच्या घटनेने सर्वोच्च न्यायालयाला संघराज्य न्यायालय, अपीलाचे न्यायालय, मूलभूत हक्काचा हमीदाता, घटनेचा संरक्षक बनवले आहे.

८) मूलभूत हक्क –

लोकशाहीमध्ये नागरिकांना समान हक्क प्राप्त होतात. नागरी जीवनासाठी हे मूलभूत हक्क असतात.भारताच्या घटनेने असे हक्क उपलब्ध करून दिले आहेत. मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट असल्याने ते प्राप्त करून घेता येतात. हे हक्क नागरिकांना शासन संस्थे विरुद्ध उपलब्ध आहेत. मूलभूत हक्क मुळे देशात राजकीय लोकशाहीच्या संकल्पनेची पूर्तता करण्याचे कार्य करतात. असे मूलभूत हक्क व मर्यादित नसून त्यावर बंधने आहेत.

९) राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्त्वे (rajyaghatanechi vaishishte) –

मार्गदर्शक तत्वे भारतीय घटनेचे एक वैशिष्ट्य आहे.ही तत्वे कल्याणकारी राज्याची निर्मिती करून लोकांना सामाजिक व आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी समाविष्ट करण्यात आलेली आहेत. मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत मात्र देशाच्या प्रशासनात सरकारला मार्गदर्शक आहेत. घटनेच्या प्रारंभा नंतर मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यापैकी वरचढ कोण असा प्रश्न निर्माण झाला. यावेळी मिनर्वा मिल खटला १९८० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला की भारतीय घटनेतील मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे संतुलनाच्या आधार शिलेवर आधारलेली आहेत.

१०) मूलभूत कर्तव्य – (rajyaghatanechi vaishishte)

स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीनुसार ४२ वी घटनादुरुस्ती १९७६ मध्ये मूलभूत कर्तव्य कलम ५१ अ मध्ये अंतर्भूत करण्यात आली. यात दहा मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली. २००२ मध्ये ८६ व्या घटनादुरुस्तीने अकरावे कर्तव्य अंतर्भूत करण्यात आले.

११) आणीबाणी विषयक तरतुदी (rajyaghatanechi vaishishte)-

घटनाकर्त्यांनी कारभार चालवणे अवघड असण्याच्या स्थितीची कल्पना करून आणीबाणीची तरतूद केली. अशा कारभाराच्या स्थितीमध्ये देशाची राजकीय लोकशाही व्यवस्था व घटना यांचे संरक्षण करता यावे यासाठी आणीबाणीच्या तरतुदी दिलेल्या आहेत.

घटनेमध्ये तीन प्रकारच्या आणीबाणीची तरतूद आहे

३५२ कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव या कारणावरून पुकारले जाते.
३५६ कलमा अंतर्गत घटक राज्यातील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट स्पष्ट करण्यात आलेली आहे.
३६० कलमानुसार भारताच्या वित्तीय स्थैर्य किंवा पत धोका निर्माण झाल्यास अशी आणीबाणी पुकारता येते.
१२) एकेरी नागरिकत्व –

संघराज्य शासन व्यवस्थेत दुहेरी नागरिकत्व दिले जाते. त्यामुळे नागरिकांना राज्य सरकारचे व केंद्र सरकारचे असे दोन प्रकारचे हक्क प्राप्त होतात.भारतीय जनतेला मात्र भारतीय घटनेने एकच नागरिकत्व बहाल केलेले आहे. देशातील प्रादेशिक भिन्नता कमी करून नागरिकांमध्ये राष्ट्रवादाची एकच भावना वाढीस लावणे हा उद्देश एकेरी नागरिकत्व मागे आहे.

१३) सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धत –

भारतीय लोकशाही एक व्यक्ती एक मत या तत्वावर चालते. कलम ३२६ मध्ये सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या व्यवस्थेची तरतूद आहे. भारतीय घटनेत सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या पद्धती द्वारे राजकीय समानता प्रस्थापित करते.

१४) धर्मनिरपेक्ष राज्य (rajyaghatanechi vaishishte) –

भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्ष राज्याची निर्मिती केली आहे. प्रस्ताविका व्यतिरिक्त कोठेही धर्मनिरपेक्ष शब्द आढळत नाही. मात्र घटनेतील विविध तरतुदी वरून धर्मनिरपेक्षता दिसून येते.भारतात सकारात्मक धर्मनिरपेक्षता स्वीकारण्यात आलेली आहे. यामध्ये राज्य कोणत्याही धर्माचा पुरस्कार करणार नाही मात्र सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाते.

महादेव गोविंद रानडे :



जन्म - 18 जानेवारी 1842, निफाड (नाशिक).

मृत्यू - 16 जानेवारी 1901.

रानडे यांना हिन्दी अर्थशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जात .

तसेच त्यांना पदवीधरांचे मुकुटमणी असेही म्हटले जात असे .

रानडे हे अक्कलकोटी राज्याचे कारभारी होते.

1886 - भारत सरकार अर्थसमितीचे सदस्य वित्तीय समितीवर नियुक्त होणारे पहिले भारतीय.

रानडे हे गोपाल कृष्ण गोखले यांचे गुरु होते .

त्यांना महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे जनक म्हटले जात .

समाजसुधारकांसाठी सर्वांगीण प्रतिमान मांडणारे प्रज्ञावंत.

रानडे हे आर्थिक राष्ट्रवादी होते .

1887 - सामाजिक परिषद.

1890 - औद्योगिक परिषद.

त्यांना मराठी पत्रकारीतेचे जनक असेही म्हटले जात असे.

संस्थात्मिक योगदान :


1865 - विधवा विवाहोत्तेजक मंडळी (विष्णु पंडित) सहाय्य.

1867 - मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापनेत सहभाग.

1870 - सार्वजनिक सभा स्थापनेत सहभाग.

उद्दीष्ट - थंड गोला घेवून पडलेल्या समाजात विचार, संघटना व कृतीची सांगड घालण्यासाठी व्यासपीठ उभे केले.

वकृत्वोत्तेजक सभा - पुणे.

नगर वचन मंदिर - पुणे.

1875 वसंत व्याख्यान - माला (पुणे).

1882 - हुजूरपागा शाळा (पुणे).

31 ऑक्टोबर 1896 डेक्कन सभा.

1896 - हिंदू विडोज होम.

इन्फेक्शन डेसिजेस हॉस्पिटल स्थापन केले .

मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी, नाशिक.

पुना मार्कटाईल बँक, रशीम गिरणी, लवाद कोर्ट, पुणे रंगशाला यांच्या स्थापनेत सहभाग.

1889 - Industrial As Sociation Of Western India स्थापन.

रानडे यांनी केलेले लेखन :


इंदु प्रकाश (मासिक).

एकेश्र्वरनिष्ठांची कैफियत.

1874 - जबाबदार राज्यपद्धतीची मागणी करणारा अर्ज.

1888 - ऐजेस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स.

मराठी सत्तेचा उदय.

मराठी पत्रकारितेचा पाया घातला.

निबंध - प्रजावृद्धीचे दुष्परिणाम, मराठा सत्याग्रहातील नाणी व चलन.

'तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्य' हा निबंध ज्ञानप्रसारक नियतकालिकात गाजला.

वैशिष्ट्ये :

ग. व. जोशी यांच्या सामाजिक व आर्थिक विचारांचा प्रभाव.

भारतात प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया घातला.

1873 - 11 वर्ष वयाच्या मुलीसोबत पुनर्विवाह.

पंचहौद मिशन प्रकरणी प्रायश्र्चित घेतले.

संमतीवय विधेयकास पाठिंबा.

इंडियन नॅशनल कॉग्रेसला पाठिंबा.

दारिद्र्यनिर्मूलनासाठी औद्योगीकरणाचा उपाय सुचवले.

'महाष्ट्राला पेशवाईनंतर आलेली प्रेतकळा उडवून सचेतन करण्याची काळजी आमरण वाहिनी.' टिळकांचे मत.

भारतीय क्रांतिकारी संघटना.



🅾️वयायाम मंडळ
– चाफेकर बंधू  ( १८९६ )

🅾️अनुशीलन समिती
– ज्ञानेंद्रनाथ बोस ( १९०१ ) मिदनापुर

🅾️अभिनव भारत( पुणे )
– वि .दा .सावरकर  ( १९०२ )

🅾️इडिया हाऊस
– श्यामजी कृष्णा वर्मा ( १९०४ )

🅾️सवदेश बांधव समिती
– अश्विनीकुमार दत्त ( १९०५ )

🅾️अभिनव भारत( लंडन)
– वि. दा. सावरकर ( १९०६ )

🅾️इडियन इंडिपेंडस लिग
– तारकानाथ दत्त ,अमेरिका, १९०७

🅾️अनुशीलन समिती
– विरेंद्रकुमार घोष - भूपेंद्र दत्त
                  १९०७ ( ढाका )

🅾️भारत माता सोसायटी
– अजितसिंह आंबाप्रसाद (१९०७ )

🅾️गदर पार्टी
– लाला हरदयाळ ( १९१३ )

🅾️इडियन इंडिपेंडस लिग
– लाला हरदयाळ - विरेंद्र चट्टोपाध्याय ( १९१४ ) ( बर्लिन )

🅾️इडियन इंडिपेंडस लिग
– राज महेंद्र प्रताप ( १९१५ ) काबूल

🅾️हिन्दुस्थान रिपब्लिकन असोशिएशन
– सचिंद्रनाथ संन्याल ( १९२४ )

🅾️नौजवान सभा
– भगतसिंग ( १९२६ ) (लाहोर)

🅾️हिन्दुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोशियशन
– चंद्रशेखर आझाद (१९२८)

🅾️इडियन इंडिपेंडन्स लिग( *टोकियो* )
– रासबिहारी बोस (१९४२)

🅾️आझाद हिंद सेना
– रासबिहारी बोस (१९४२) टोकियो

घटना समिती राज्यनिहाय सदस्य

भारतीय प्रांत सदस्य:-229

मद्रास:-49   मुंबई:-21

बंगाल:-19   संयुक्त प्रांत:-55

पूर्व पंजाब:-12  बिहार:36

मध्य प्रांत:-17   आसाम:-8

ओरिसा:-9


⭕️दिल्ली अजमेर मारवाड प्रत्येकी 1 सदस्य होते


घटना समिती

सांप्रदायिक प्रतिनिधित्व

⚛हिंदू:-163   ⚛मुस्लिम:-80

⚛SC:-31      ⚛ST:-6

⚛भारतीय ख्रिशन:-6

⚛शीख:-4     ⚛पारशी:-3

⚛अँग्लो इंडियन:-3

एकूण 296 सदस्य आहेत

I N D I A N  R U L E R S             (Delhi sultanat)

1.👉गुलाम वंश
1=1193 मुहम्मद गौरी
2=1206 कुतुबुद्दीन ऐबक
३=१२१० अराम शाह
४=१२११ इल्तुतमिश
५=१२३६ रुकनुद्दीन फिरोज शाह
६=१२३६ रझिया सुलतान
७=१२४० मुइझुद्दीन बहराम शाह
8=1242 अल्लाउद्दीन मसूद शाह
9=1246 नसिरुद्दीन महमूद 
10=1266 ग्यासुद्दीन बलबन
11=1286 काई खुशरो
१२=१२८७ मुइज्जुद्दीन कैकुबाद
13=1290 शमुद्दीन कैमूर
👉**1290 गुलाम वंशाचा अंत झाला
(राज्यकाळ - अंदाजे 97 वर्षे)**

2.👉 खिलजी घराणे
1=1290 जलालुद्दीन फिरोज खिलजी
२=१२९६
अल्लाउद्दीन खिलजी
४=१३१६ सहाबुद्दीन उमर शाह
५=१३१६ कुतुबुद्दीन मुबारक शाह
६=१३२० नसिरुद्दीन खुसरो शाह
7=1320 खिलजी वंशाचा अंत झाला
👉(राज्यकाळ - अंदाजे 30 वर्षे)

3.👉 तुघलक वंश
१=१३२० घियासुद्दीन तुघलक पहिला
२=१३२५ मुहम्मद बिन तुघलक दुसरा  
३=१३५१ फिरोजशाह तुघलक
४=१३८८ गियासुद्दीन तुघलक दुसरा
५=१३८९ अबू बकर शाह
६=१३८९ मुहम्मद तुघलक तिसरा
७=१३९४ सिकंदर शाह पहिला
८=१३९४ नसिरुद्दीन शाह दुसरा
९=१३९५ नसरत शाह
10=1399 नसिरुद्दीन मेहमेद शाह पुन्हा सत्तेवर आले.
11=1413 दोलतशाह
1414 तुघलक वंशाचा अंत झाला
👉(राज्यकाळ - अंदाजे 94 वर्षे)

4.👉सय्यद घराणे
1=1414 खिजर खान
२=१४२१ मुइज्जुद्दीन मुबारक शाह दुसरा
३=१४३४ मुहम्मद शाह चौथा
४=१४४५ अल्लाउद्दीन आलम शाह
1451 मध्ये सईद वंशाचा अंत झाला
👉(राज्यकाळ - अंदाजे 37 वर्षे)

5.👉 लोदी घराणे
1=1451 बहलोल लोदी
२=१४८९ सिकंदर लोदी दुसरा
३=१५१७ इब्राहिम लोदी
1526 मध्ये लोदी वंशाचा अंत झाला
👉(राज्यकाळ - अंदाजे 75 वर्षे)
🙏💥🔥💥🔥💥🔥💥🔥💥🔥💥🙏

२६ सप्टेंबर २०२४

BMC परीक्षेविषयी माहिती


1) मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ही वास्तू कोणत्या बंदरावर उभारण्यात आलेली आहे ? 👉अपोलो बंदर


2) गेट वे ऑफ इंडियाची उंची किती आहे?👉 26 मी. (85 फूट)


3) गेट ऑफ इंडिया चे उद्घाटन कधी करण्यात आले? 👉 04 डिसेंबर 1924


4) गेट वे ऑफ इंडिया वरील शिलालेखात रोमन अंकात काय लिहिलेलं आहे ? 👉 MCMXI म्हणजे रोमन अंकात 1911


5) गेट वे ऑफ इंडियाचे वास्तुकार कोण आहेत? 👉जॉर्ज विटेट 


6) गेट वे ऑफ इंडिया कुणाच्या भेटीचे स्मारक म्हणून निर्माण करण्यात आले आहे ?👉 राजा पाचवा जॉर्ज व राणी मेरी (2) डिसेंबर 1911)


7) मुंबईतील कोणत्या वास्तूला भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते?👉 गेट वे ऑफ इंडिया


8) प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय कोणत्या कधी व कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले ? 👉 11 नोव्हेंबर 1905 मध्ये मुंबई येथे.


9) प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाचे नवीन नाव काय आहे?👉 छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय


10) मुंबईतील राजाबाई क्लॉक टॉवर (घंटाघर) हे इंग्लंड मधील कोणत्या वास्तूच्या धर्तीवर उभारण्यात आले आहे? 👉इंग्लंड मधील लंडन शहरातील बिग बेन.


11) राजाबाई टॉवर उभारण्यासाठी त्याच्या आई राजाबाई याच्या स्मुर्तीप्रित्यर्थ कुणी २ लाख

रु देणगी दिली होती?👉 प्रेमचंद रायचंद


12) मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली? 👉9 जुलै 1875


 13) मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हणून कुणाला ओळखले जाते ?👉 प्रेमचंद रायचंद


 14) बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची इमारत मुंबई मध्ये कोणत्या ठिकाणी आहे ? 👉 दलाल स्ट्रीट.


बृहन्मुंबई  जिल्हा विशेष


• ✅मुंबईमधील वांद्रे वरळी यास जोडणाऱ्या सागरी सेतुला कोणाचे नाव दिले आहे?=   राजीव गांधी


✅क्षेत्रफळाचा विचार करता महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता = मुंबई शहर


✅• सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले महारष्ट्रातील जिल्हा कोणता  - मुंबई शहर


✅न्हावाशेवा येथील अत्याधुनिक बंदराप्त खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे?=   जवाहरलाल नेहरू


✅भारतातील पहिले दूरदर्शन केव्हा सुरू झाले? = 1959


✅प्रीन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे? - मुंबई


✅राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन

कोठे झाले? - मुंबई


✅'महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे - मुंबई


✅महाराष्ट्रात पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली - मुंबई


✅भारतातील पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली == कावसजी दावर


✅ फिशरी सव्र्व्हे ऑफ इंडिया या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे -= मुंबई


✅• केंद्रीय मत्स्यशिक्षण संस्था महाराष्ट्रात कोठे आहे  =  मुंबई


✅• माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर पार्क कोठे विकसित होत आहे -  = द्रोणागिरी, नवी मुंबई

आणीबाणी



1. आणीबाणीचे प्रकार

   - कलम 352: राष्ट्रीय आणीबाणी (युद्ध, बाह्य आक्रमण, सशस्त्र बंड).

   - कलम 356: राष्ट्रपती राजवट (राज्य शासन).

   - कलम 360: आर्थिक आणीबाणी (आजपर्यंत लागू नाही).


2. घोषणेसाठी आधार

   - भारताची सुरक्षा: 

   - 42 वी घटनादुरुस्ती: विशिष्ट भागात आणीबाणी.

   - 44 वी घटनादुरुस्ती: "आंतरर्गत गोंधळ" चे "सशस्त्र बंड" मध्ये बदल; मंत्रिमंडळाच्या लेखी शिफारशीची आवश्यकता.


3. न्यायालयीन पुनरावलोकन

   - 38 वी घटनादुरुस्ती: राष्ट्रीय आणीबाणी पुनरावलोकनापासून मुक्त.

   - 44 वी घटनादुरुस्ती: तरतूद हटविली.

   - मिनर्वा मिल्स प्रकरण (1980): आणीबाणीची घोषणा न्यायालयात आव्हान दिली जाऊ शकते.


4. मंजुरी प्रक्रिया

   - संसद मंजुरी: एका महिन्याच्या आत (पूर्वी दोन महिने होते).

   - लोकसभा विसर्जन असल्यास: नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठक पासून 30 दिवस टिकेल, राज्यसभेची मंजुरी आवश्यक.

   - वाढ: दर सहा महिन्यांनी संसदेच्या मंजुरीने अनिश्चित काळासाठी वाढवता येते.


5. मंजुरीसाठी बहुमत

   - एकूण सदस्य: बहुमत आवश्यक.

   - उपस्थित आणि मतदान करणारे: दोन-तृतीयांश बहुमत.


6. राष्ट्रीय आणीबाणीचे रद्दीकरण

   - राष्ट्रपतींचे रद्दीकरण: कधीही शक्य.

   - लोकसभा ठराव: सतत चालू ठेवण्याचे नकार.

   - लेखी सूचना: एक-दशांश सदस्यांनी सूचना द्यावी; 14 दिवसांत विशेष बैठक बोलवावी.

   - साधे बहुमत: नकारासाठी.


7. राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम

   - केंद्र-राज्य संबंध: कार्यकारी, विधायी, आर्थिक बदल.

   - आयुष्य वाढ: लोकसभा आणि राज्य विधानमंडळांचे कार्यकाळ वाढविला जाऊ शकतो.

   - मूलभूत अधिकार:

     - कलम 19: स्वयंचलित निलंबन (कलम 358).

     - कलम 32: राष्ट्रपतींच्या परवानगीने निलंबन (कलम 359).


8. ऐतिहासिक उदाहरणे

   - 1962, 1971, 1975: राष्ट्रीय आणीबाणी घोषित.

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)



🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे.

🔻स्थापनाः 1964 - संथानम समितीच्या शिफारशींनुसार.

🔻2003 मध्ये वैधानिक दर्जा 

🔻रचनाः राष्ट्रपतींद्वारे नियुक्त एक केंद्रीय दक्षता आयुक्त (अध्यक्ष) आणि कमाल दोन दक्षता आयुक्त (सदस्य) +2

🔻CVC कोणत्याही मंत्रालय/विभागाद्वारे नियंत्रित नाही. 

CVC एक स्वतंत्र संस्था आहे जी केवळ संसदेला जबाबदार आहे..

🔻लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, 1988 अंतर्गत काही विशिष्ट श्रेणीतील लोकसेवकांनी केलेल्या गुन्ह्यांची  'चौकशी करण्याचा अधिकार आहे.

🔻CVC ला भ्रष्टाचार किंवा पदाच्या गैरवापराच्या तक्रारी प्राप्त होतात आणि तिच्यातर्फे योग्य कारवाईची शिफारस केली जाते.

🔻CVC ही तपास यंत्रणा नाही. सीव्हीसी एकतर सीबीआय किंवा सरकारी कार्यालयातील मुख्य दक्षता अधिकाऱ्यांमार्फत (सीव्हीओ) तपास करते.

🔻पहिले CVC: एन. एस. राव)

🔴सध्याचे CVC: पी. के. श्रीवास्तव

राज्य पुनर्रचना आयोग -1953


सदस्य - 

1) फझल अली ( अध्यक्ष)

2) के एम पन्नीकर

3) हच. कुंझरू 


➡️अहवाल - 30 सप्टेंबर 1955 सादर 


➡️या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार 14 राज्ये व 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली.


✅आयोगाच्या शिफारशी


1. यात मुख्यतः भाषावार पुनर्रचनेला पाठिंबा. त्या आधारावर 16 राज्ये व 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करावे.


2. उत्तर भारत-बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान असे चार भाग करावे.


3. थोडे बदल करून पूर्वेकडील राज्ये आहे तशीच राहू दिली. बिहार आणि आसाम मधून 'ट्रायबल' राज्ये बनवावीत, ही मागणी आयोगाने फेटाळून लावली.


4. मुंबई व पंजाब यांच्या विभाजनाला आयोगाचा विरोध, गुजरात व महाराष्ट्र मिळून मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे.


5. एकभाषी राज्यातील अल्पसंख्याकांवर अन्याय होऊ नये म्हणून प्रत्येकाला मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण द्यावे.


6. राष्ट्रऐक्यासाठी अखिल भारतीय सेवांमध्ये निम्मे (अर्धे) उमेदवार राज्याबाहेरील असावेत. त्यांच्या केंद्रातून प्रांतात व प्रांतातून केंद्रात बदल्या व्हाव्यात.


7. उच्च न्यायालयातील 1/3 न्यायाधीश राज्याबाहेरील असावेत.

विरोधी पक्षनेता (LoP) - मुख्य मुद्दे


🔺 लोकसभा (LS) आणि राज्यसभा (RS) मधील स्थान

- १९७७ च्या संसदेत विरोधी पक्षनेते वेतन आणि भत्ते कायद्याने स्थापन.

- गृहात किमान १०% खासदार आवश्यक.

- १९५४ च्या कायद्यानुसार वेतन आणि भत्ते मिळण्याचा हक्क.


🔺 सदनातील अधिकार

- क्रमाने ७ व्या स्थानावर, केंद्रीय मंत्रीमंडळाच्या मंत्र्यांसह.

- विधीमंडळ प्रमुखांच्या डाव्या बाजूला प्रथम ओळीत बसण्याचा हक्क.

- राष्ट्रपतींच्या दोन्ही सभागृहांना संबोधनाच्या वेळी प्रथम ओळीत आसन.

- विरोधी पक्षाचे आवाज, सावली पंतप्रधान म्हणून कार्य.


🔺 इतर भूमिका आणि जबाबदाऱ्या

- विरोधी पक्षाचे प्रतिनिधित्व महत्त्वाच्या नियुक्ती समित्यांमध्ये:

  - CBI चे संचालक

  - केंद्रीय सतर्कता आयुक्त (CVC)

  - मुख्य माहिती आयुक्त (CIC)

  - राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) अध्यक्ष आणि सदस्य

  - लोकपाल

- सार्वजनिक खाते, सार्वजनिक उपक्रम, अंदाज आणि संयुक्त संसदीय समित्यांमध्ये सदस्य.



विरोधी पक्षनेते पद मागील दोन कार्यकाळात रिक्त होते.

18 वी लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र


✔️18 व्या लोकसभेसाठी महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात मतदान संपन्न झाले.


✔️ महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार पडली.


✔️ महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान 63.71% हे पहिल्या टप्प्यात झाले 


✔️ दुसऱ्या टप्प्यात 62.71% मतदान झाले.


✔️ तिसऱ्या टप्प्यात 63.55% मतदान झाले 


✔️ चौथ्या टप्प्यात 59.64% मतदान झाले.


✔️ महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात सर्वात कमी म्हणजे 54.33% मतदान झाले 


✔️ पाचवा टप्प्यात मुंबई सह 13 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले.


▶️ राज्यातील सर्वाधिक मतदान झालेले 10 मतदारसंघ :-


1 ) गडचिरोली-चिमूर - 71.88

2 ) कोल्हापूर - 71.59

3 ) हातकणंगले - 71.11

4 ) नंदूरबार -  70.68

5 ) बीड - 70.92

6 ) जालना - 69.14

7 ) चंद्रपूर - 67.55

8 ) भंडारा गोंदिया  - 67.04

9 ) अहमदनगर - 66.16

10 ) वर्धा - 64.85

पूर्व परीक्षेच्या गुणांचे गणित


📌 मागील पूर्व परीक्षांचा cut- off पाहिल्यास आपल्याला हे लक्षात येईल की पूर्व परीक्षेत 125+ मार्क्स आल्यास second key आली तरी आपण पूर्व परीक्षा नक्की पास होऊ हा विश्वास राहतो. त्यामुळे  कोणत्याही  शंकेविना  मुख्य परीक्षेकडे मोर्चा वळवता येतो. 

 

📌 त्यासाठी पूर्व परीक्षेत 125+ गुण मिळतील हा उद्देश ठेवून अभ्यास त्या दृष्टीने करावा . 125 गुण मिळविण्यासाठी तुम्ही पूर्ण प्रश्न  सोडवत आहात असे गृहीत धरल्यास तुमचे 70 प्रश्न बरोबर येणे अपेक्षित आहे.


📌  या प्रमाणे विषयाच्या काठिण्य पातळी नुसार प्रत्येक विषयात किती किती गुण मिळणे अपेक्षित आहे ते आपण पाहू

    

विषय.          एकूण प्रश्न.      पैकी ✅ अपेक्षित


राज्यशास्त्र             15.                   13

 

भूगोल.                 15.                    12


अर्थशास्त्र.             15.                    12


पर्यावरण.              5.                      3


विज्ञान.                 20.                    12


चालू घडामोडी.       15.                    9


इतिहास                15.                     9.   

          

             एकूण.    100.                   70

               

📌 प्रत्येक विषयाला किमान वरीलप्रमाणे प्रश्न बरोबर येणे अपेक्षित आहे. तुमच्या विषयावरील प्रभुत्वानुसार हे प्रमाण तुम्ही बदलू शकता.  जसे तुम्हाला विज्ञान जर कठीण जात असेल तर ती कसर चालू घडामोडी मध्ये भरून काढू शकता.


📌 सुरवातीच्या तीन विषयात ( राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल) सर्वांना गुण मिळविणे तुलनेने सोपे असते. तर या विषयाचा व्यवस्थित अभ्यास करणे अपेक्षित आहे.


📌 चालू घडामोडींचा अभ्यास दररोज केल्यास शेवटी त्याचा load येत नाही. Analytical विषय जसे की विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण , भौतिक भूगोल यांचा अभ्यास सुरवातीच्या टप्प्यात करावा. व ज्या विषयात  फॅक्ट्स जास्त आहेत (राज्यशास्त्र, अर्थशास्त्रातील आकडेवारी,इतिहास) ते विषय परीक्षा जवळ आली की हाताळावे म्हणजे short term memory मध्ये फॅक्टस लक्षात राहतात.

 

📌 अशाप्रकारे स्वतःला आधी analize करून अभ्यासाचे नियोजन केल्यास कमी श्रमात परिणामकारक अभ्यास करता येऊ शकतो.

सोळा महाजनपदाची प्राचीन आणि आधुनिक नावे


🔸काशी ➾ बनारस

🔹कोसल ➾ लखनौ

🔸मल्ल ➾ गोरखपुर

🔹वत्स ➾ अलाहाबाद

🔸चेदी ➾ कानपूर

🔹कुरू ➾ दिल्ली

🔸पांचाल ➾ रोहिलखंड

🔹गांधार ➾ पेशावर

🔸कंबोज ➾ गांधारजवळ

🔹मत्स्य ➾ जयपुर

🔸शूरसेन ➾ मथुरा

🔹अश्मक ➾ औरंगाबाद-महाराष्ट्र

🔸अवंती➾ उज्जैन

🔹अंग ➾  पूर्व-बिहार

🔸मगध ➾ दक्षिण बिहार

🔹वृज्जी ➾ उत्तर बिहार।